छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड

Submitted by केदार on 2 September, 2015 - 09:08

तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की

औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.

मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.

अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते. Wink

अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.

shivaji_tweet.JPG

आता शोएबच्या लेखाचे खंडन.

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.

शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.

पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गापै, ते ब्रिटिशकालीन भारतात जन्मलेले व भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे, म्हणजे भारतीयच होते की. "अफगाण असले तरी" समजले नाही.

पैशासाठी इंग्लंड्ची चाकरी करणारे चाकर इतरांच्या देशभक्तीची सर्टिफिकिटं देताहेत हे पाहून माझा आत्मा गलबलला .

फारेण्ड,

भारतवादी म्हणजे अखण्ड भारतवादी. मौलाना आझाद, झाकीर हुसैन इ. त्याकाळातील मुस्लिम कॉन्ग्रेस नेत्या.न्प्रमाणे त्यान्चाही फाळणीला विरोध होता. सरहद्दीवर रहात असल्याने ते पाकिस्तानात गेले. सत्ता मिळवुन निदान एक (भारत) फ्रेण्डली सरकार त्याना पाकिस्तानात आण्णायच होत. स्वात.न्त्र्यवीर सावरकरा.न्प्रमाणेच त्यान्चेही (तिथल्या) सरकारने खुप हाल केले. विरोधी मता.न्मुळे त्यान्च स्वात.न्त्र्यलढ्यातील योगदान ही दुर्लक्षल्या गेल.

त्यान्चाही फाळणीला विरोध होता +१

त्यांना आणि त्यांच्या नेतृत्वाखाली वायव्य सरहद प्रांतास भारतात सामील व्हायचे होते, असे बरेच ऐकले आहे. आजही बलोच खदखदतोय, तेव्हा कदाचित खरेही असावे.

अधिक माहिती कुठे मिळेल?

रमा - ओके आले लक्षात. त्यांचा फाळणीला विरोध होता ते माहीत आहे. पण त्याचे आश्चर्य वाटले नाही. एक जीना सोडले तर काँग्रेसबरोबर काम करणार्‍या अनेकांचा तसा होता. गफार खान मात्र अ‍ॅक्टिवली राजकीयदृष्ट्या विरोध करत होते, प्रयत्न ही करत होते मुस्लिम लीग ला सत्ता मिळू नये म्हणून. पंजाब व वायव्य सरहद्द प्रांतांमधे तेव्हा हातात असलेले राजकारण (दोन्हीकडे मुस्लिम पण फाळणीबद्दल फारसे उत्सुक नसलेले नेते होते) काँग्रेसने एकदम का सोडून दिले तो भाग अजून फारसा प्रकाशात नाही. बहुधा ब्रिटिशांच्या दबावामुळे.

फारएण्ड,

>> काँग्रेसने एकदम का सोडून दिले तो भाग अजून फारसा प्रकाशात नाही. बहुधा ब्रिटिशांच्या दबावामुळे.

नेहरूंनी कुठल्याशा पुस्तकात लिहिलंय : We were getting old and tired of the struggle. Partition offered a way out. So we took it.

वरील मजकुरातील शब्द माझे असून आशय नेहरूंचा आहे. एक संदर्भ : https://books.google.co.uk/books?id=4ONLmttE3tsC&pg=PA62&lpg=PA62&dq=we+...

आ.न.,
-गा.पै.

फारएण्ड,

>> ते ब्रिटिशकालीन भारतात जन्मलेले व भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करणारे, म्हणजे भारतीयच होते की.
>> "अफगाण असले तरी" समजले नाही.

या अर्थी सगळे पाकिस्तानवादीही फाळणीच्या अगोदर भारतीयच होते. Happy मात्र जेव्हा फाळणी घोषित झाली तेव्हा एकेकाचे खरे चेहरे उघडे होऊ लागले. Sad

भारतीय मुस्लिम उर्वरित भारतीयांहून वेगळे असून त्यांना भारताच्या वायव्येकडील प्रदेश वेगळा तोडून मिळाला पाहिजे, असा फाळणीवाल्यांचा दावा होता. या दाव्याच्या जोरावर पाकिस्तानची निर्मिती समर्थनीय ठरवली गेली. मात्र याच दाव्यास वायव्येतून म्हणजे ऐन बालेकिल्ल्यातून गफारखानांनी प्रखर विरोध केला. अफगाण म्हणजे मुस्लिम असूनही ते भारतवादीच होते. म्हणून 'अफगाण असले तरी ...' असा शब्दप्रयोग केला आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

गम्मत म्हणजे खान वली खान ( अब्दुल गफार यान्चा मुलगा) भारताच्याच बाजूने होते. च्यायला,( शिवीबद्दल सॉरी) कधी कधी ना मला असे वाटते की काट्यानेच काटा काढावा. तसेही हे पाकडे बोम्बलतातच आहेत की रॉ ( भारतीय गुप्तचर) अफगाणाना मदत करतीय म्हणून, मग सौ सुनारकी एक लोहारकी या नात्याने एकदाच काय ते या पखुनिस्तान आणी सिन्ध वाल्याना पाठिम्बा देऊन या पाकड्याना धडा शिकवला पाहीजे. न रहेगा बास. एकदाच काय ते बास! कन्टाळा आला या छुप्या युद्धाचा. नुसतेच स्लोपॉयझनिन्ग चाल्ले आहे. ( विषय भरकटला का?)

रश्मी - रॉ त्याच्या परिने कार्य करतोच आहे आणि म्हणुन ते ओरडतात... असे मला वाटते. आता परिणाम दृष्य स्वरुपात दिसत नाही... प्रक्रिया मन्द आहे.

ह्या पत्रातील मजकूर शब्दश: (मूळ फारसीतले शब्द) काय आहे ते कळू शकेल का? इंग्रजी अनुवादाऐवजी हे वाचायला जास्त आवडेल.

सावरकरानीही सत्तेत जायला हवे होते.. देश परतंत्र असताना जहाल मताच्या कविता लिहायच्या आणि प्रत्यक्ष देश चालवायची वेळ आल्यावर गायब ?

थक्क करणारे विधानः

>>>प्रत्यक्ष देश चालवायची वेळ आल्यावर गायब <<<

रत्नागिरीतील स्थानबद्धता ब्रिटिशांशी केलेल्या राजकारणात भाग न घेण्याच्या कराराचा भाग होती. ती स्थानबद्धता १९३७ पर्यंतच कायम होती.

ती स्थानबद्धता १९३७ पर्यंतच कायम होती.>>>>> हो मयेकर.माय मिस्टेक. वरची पोस्ट संपादित करते.
दुरुस्तीबद्दल धन्यवाद!

सावरकरांवर टीका करण्यासरखे इतर मुद्दे आहेत पण हे हास्यास्पद आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर सावरकरांचा पक्ष इतका लहान होता की त्यांना इच्छा असती तरी सत्तेत जाता आले नसते.

गांधींनी असे मत मांडले होते की स्वातंत्र्य मिळाल्यावर काँग्रेसचे विसर्जन करून लोकांनी आपापल्या विचारांचे राजकीय पक्ष बनवावेत आणि लोकशाही पद्धतीने त्यात जे कुणी जिंकेल ते जिंकेल. पण नेहरु वगैरे लोकांना हे मान्य नव्हते. कारण काँग्रेसच्या लोकप्रियतेवर स्वार होऊन सत्तेचे लोणी बळकावण्याचा मोह त्यांना खुणावत होता. असली तत्त्वनिष्ठता त्यांच्या पचनी पडणे शक्य नव्हते.
जर अशा प्रकारे काँग्रेसचे विसर्जन होऊन सगळ्यांना समान स्पर्धेला तोंड द्यावे लागले असते तर कदाचित सावरकरांना संधी होती. पण काँग्रेसची लोकप्रियतेची इतकी प्रचंड लाट असताना तसे होणे शक्य नव्हते.

<<< हा धागा वाचतोय. इतकावेळ काही कमेंट करावीशी वाटली न्हवती, कारण एकूणच सगळं उगाच उकरून वाद इ. वाटलेलं.
विकुंची कमेंट 'जर औरंगजेबाच नाव बदललं ते आवडत नसेल आणि पुळका असेल तर त्याचं नाव स्वतःला/ घराला द्या', यावर केलेली होती. ती analogy घेऊन केलेलं तर्कट होतं, ती कमेंट जर बोचत्येय तर औरंग्जेबाचं नाव द्या म्हणण ही तितकंच हास्यास्पद आहे.>>> अमितव हे तर्कट मान्य करताय ह्याचा अर्थ विजयकुलकर्णीने स्वतःचे व्हिडिओ अपलोड करायला सांगितले ह्याला पण तुमची मान्यता असणारच नाही का ?

पोर्न लीगल हवं म्हणणारी माणसं स्वतःला पोर्न बघायला मिळावं म्हणून ते म्हणत नसतात, तर सरकारचा अंकुश या बाबतीत नको.>>> अरेच्चा इतकी सज्जन , परोपकारी मंडळी पण अस्तित्वात आहेत ?

ह्या पोस्टच्या अनुशंगाने <<<एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी? >>> बाफ वरील सगळ्यांचे प्रतिसाद वाचुन आता मला हसु यायला लागलयं, खरतर अशी बुरखा घेऊन वागणारी माणसच ह्या समाजासाठी अत्यंत घातक आहेत , नो वंडर भारतात बलात्काराच आणि छेडछाडीच प्रमाण प्रचंड आहे. But be careful 'what goes around comes around'.

<<मी घराला औरंगजेबाचे नाव देइइन.>>
----- कोल्होबा पण घर कुणाचे ? तुमचे स्वत: चे असेल तर कुणाची काही हरकत असण्याचे कारण नाही. अत्यन्त शुर सरदार अफझल यान्च्या नावाचा पण विचार करा. वेगळा धागा काढल्यास अजुन पर्याय मिळतील. Happy

नाव स्वतःच्या घरालाच देतात ना ?

एकदा काश्मिरात आग लागली होती. औरंगजेबाला हे समजल्याव्र तो बोलला .. चिनार वृक्षांचे नुकसान तर नाही ना झाले ?

इतका तो सहृदय होता.

काश्मीरच्या विव्ध बागा मोघलानीच निर्माण केल्या.

( पेप्रात वीणा पाटील ट्रॅवलकडुन मोठे लेख येतात . हे त्यात होते. )

एकदा काश्मिरात आग लागली होती. औरंगजेबाला हे समजल्याव्र तो बोलला .. चिनार वृक्षांचे नुकसान तर नाही ना झाले ?

इतका तो सहृदय होता.
Rofl

एकदा काश्मिरात आग लागली होती. औरंगजेबाला हे समजल्याव्र तो बोलला .. चिनार वृक्षांचे नुकसान तर नाही ना झाले ?

इतका तो सहृदय होता.>>> ह्यावरून हॅरी पॉटरची आठवण झाली.

"If you made a better rat than a human, it's not much to boast about, Peter."
—Sirius Black to Pettigrew

Pages