छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड

Submitted by केदार on 2 September, 2015 - 09:08

तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की

औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.

मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.

अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते. Wink

अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.

shivaji_tweet.JPG

आता शोएबच्या लेखाचे खंडन.

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.

शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.

पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>> साती | 5 September, 2015 - 00:05 नवीन

किती तो सात्त्विक संताप!
<<<

घरच्या स्त्रियांना घेऊन पॉर्न फिल्म बनवावी ह्या प्रतिसादाचा संताप येतो मला. तुम्हाला एक स्त्री असूनही येत नसेल तर अजब आहे सगळे.

टग्या,

ते राजकारण होत? ते राजकारण होत म्हणून तुमच्या पोस्टमध्ये मला समर्थनीय सूर वाटला ब्वा. चुकल माकल माफ करून टाका.

दारा शुकोव्हला मारलं, तेव्हा इस्लाम शुकोव्ह धोक्यात आणत होता, मी निव्वळ इस्लामच रक्षण करण्यासाठी गादीवर बसत आहे, हे वाक्य ही कदाचित राजकारण असेल.

आल्या आल्या उलेमा आणि इमाम लोकांच प्रस्थ वाढवून त्यांच्या सल्ल्याने कारभार करणे हे ही कदाचित राजकारणच असेल.

राज्यातली (म्हणजे औरंगजेबाच्या राज्यातली) सगळी मंदिर तोडण्याचा आदेश काढणेही कदाचित राजकारण असेल. केदारनी फर्मान लावलाय तिथे Wink

केशवराय मंदिर तोडून तिथे मशीद उभी करण हेही राजकारणच असेल, सोबत केशवराय मंदिरातल्या मुर्त्या आग्र्याच्या मशिदीच्या पायरीमध्ये बसवणे हेही राजकारणच होते (आता केश्वराय मंदिर त्याच्याच राज्यात होते, मांडलिकसुद्धा नव्हे) बसवायलाच हव्या नाही का? आता औरंगजेब जरा कमीच क्रूर म्हणायला हवा! नाहीतर आदिलशहानी ८० वर्ष्याच्या म्हातार्या रामरायचा मेंदू पोखरून काढून शौचकुपात बसवला होता. आभार हो आलमगीरचे ... त्याने किमान तसली विटंबना नाही केली.

काशीविश्वेश्वर फोडून ग्यानवापी बनवणे, हेपण राजकारणच होते! बिंदुमाधव मंदीराच तर काही ठेवलाच नाही ... आता काशी त्याच्याच राज्यात होती, तरी लोकांच मोरल घटवणे हे राजकारणच नव्हे का?

मारवाडी राजा जसवंत सिंघ ( जोधपूरचा) मेल्यावर त्याच्या राज्यावर आक्रमण केलेत आणि शेकडो मंदिर तोडली! हे मी मान्य करतो की राजकारणच होते.त्याच स्वारीत अख्या उदयपुरमधली सगळी मंदिर तोडणे, हे नक्कीच राजकारण होते. आता हा मांडलिक होता बहुतेक ... त्याचे का मंदिरे तोडली? समजावा न मला राजकारण?

चित्तोडच्या किल्ल्याला भेट दिली! किल्ल्याचे कौतुक केलेच आणि सोबत ६३ मंदिर तोडायचा हुकुम दिला ... हे राजकारण नव्हते तर काय होते? फक्त मलाच नाही समजत ... तो चितोडचा राणापण तर औरंगजेबाचा मांडलिक होता.

१६८१ मध्ये ओरिसामध्ये स्वारी केली ... आणि जगन्नाथपुरीचे मंदिर तोडले ... हे देखील राजकारण! हे समजल मला. कारण हरलेल्या लोकांना दाखवून देण, की तुमचा राजा, तुमचा देव तुमच काही रक्षण करू शकत नाही ... खल्लास करण आणि इस्लामच्या उदार पंखाखाली घेण ... राजकारणच नव्हे का?

बाकी ते शरीया आणि जिझियाच राजकारण नाही समजल! सगळ्यात शेवटी, जिझिया आणि शरियत लागू केल! का? त्यात कोणते राजकारण होते? आलरेडी हिंदू त्याचेच प्रजाजन होते ... हरलेले होते तरी त्याला सगळा कर देत होते बिनबोभाट. मग जिझिया लावून कंबर तोडायची आणि भरण नाही झाल तर मुसलमान व्हा किंवा मरा ... म्हणजे ४ रुपये मिळतील (तेव्हाच्या काळी बर) त्यातल राजकारण समजावून द्या ब्वा मला.

असो.

हाय रे कर्मा ! आता उपरोधिक लिहितानाही मी "उपरोधिक लिहितोय बर का!" अशी प्रस्तावना करावी लागणार.

"ज्यांना पोर्न लीगल असावे वाटते त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना घेऊन पोर्न बनवावे व प्रसिद्ध करावे"

हे माझे मत अजिबात नाही. ते अवतरणचिन्हात आहे. औरंगजेबाचे चित्र घरावर लावायचा युक्तिवाद किती चुकिचा आहे हे दाखवायला लिहिलेलले उदाहरण होते ते. माज्या इतक्या दिवसाच्या वावरा नंतरही लोकांना ते माझे मत वाटावे ? उठा ले रे बाबा ! विषयाशी संबंध नसलेले वाक्य मी सिरियसली का टाकेन ?

"ज्यांना पोर्न लीगल असावे वाटते त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना घेऊन पोर्न बनवावे व प्रसिद्ध करावे"

>>

मुजरा स्वीकारा कुलकर्णी.

कुळकर्णी, उद्या तुमच्या घरावर संस्कृतीरक्षक ब्रिगेडचा मोर्चा येणार बघा.
नाक धरा आणि माफी मागा बरं इन अ‍ॅडव्हान्स!
Wink

>>>"ज्यांना पोर्न लीगल असावे वाटते त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना घेऊन पोर्न बनवावे व प्रसिद्ध करावे"

हे माझे मत अजिबात नाही. ते अवतरणचिन्हात आहे. औरंगजेबाचे चित्र घरावर लावायचा युक्तिवाद किती चुकिचा आहे हे दाखवायला लिहिलेलले उदाहरण होते ते. माज्या इतक्या दिवसाच्या वावरा नंतरही लोकांना ते माझे मत वाटावे ? उठा ले रे बाबा !<<<

उपहासगर्भ लिहिण्यासाठी अवतरण चिन्हे वापरून तुम्ही निवडलेले उदाहरण अत्यंत थर्डक्लास आहे. हे उदाहरण निवडावेसे वाटणे आणि ते उपरोधिकपणे वापरावेसे वाटणे हाच एक प्रॉब्लेम आहे, इतक्या वर्षांनंतर! खरोखरच 'उठा ले रे बाबा' अशी अवस्था आहे असे वाटले.

इतकी वर्षे झाल्यावर मायबोलीसारख्या संकेतस्थळावर तुम्हाला उदाहरणे तरी जरा बरी सुचायला हवी होती. ही अभिरुची फारच उत्तम म्हणावी लागेल.

कुळकर्णी, उद्या तुमच्या घरावर संस्कृतीरक्षक ब्रिगेडचा मोर्चा येणार बघा.
नाक धरा आणि माफी मागा बरं इन अ‍ॅडव्हान्स!
>>
कुळकर्णी आम्ही असे काही करणार नाही.
तुमच्या घरात चार भिंतींआड तुम्ही आणि घरचे काय करता त्याच्याशी आम्हाला काहीही घेणेदेणे नाही.

च्यामायला, सत्य तीन शब्दांत सांगता येतं : औरंग्या हलकट होता !

मग एव्हढी मगजमारी काहून लागून ऱ्हायलीये?

डोस्कं पार भंजाळलंय !

-गा.पै.

च्यामायला, सत्य तीन शब्दांत सांगता येतं : औरंग्या हलकट होता !
>>>>>

औरंगजेब हा कट्टर आणि कडवा मुस्लिम होता. इस्लामचा धर्मप्रसार आणि अघोरी सत्तालालसा त्याच्या अंगी मुरलेली होती. यापायी बापाविरुद्ध बंड करण्याची, प्रसंगी बापाला कैदेत टाकण्याची आणि भावांचं शिरकाण करण्याची मुघलांची थोर परंपरा त्याने राखली. त्याच्या हिशेबात मुस्लिम नसलेला कोणीही काफीरच होता आणि त्या दृष्टीने त्यांना जास्तीत जास्तं क्लेश भोगायला लावणं हीच त्याच्या आयुष्याची इतिकर्तव्यता असल्यागत त्याचं वर्तन होतं.

वर कोणीतरी श्रीमंत कोकाट्यांच्या शिवाजी महाराजांचे खरे शत्रू या पुस्तकातले उतारे दिले आहेत. हे पुस्तक संपूर्णपणे ब्राम्हणद्वेषातून कोणत्याही संदर्भांविना लिहीलेलं आहे. या पुस्तकातलं "रामदास हा संत नसून जंत होता आणि तो औरंगजेबाचा हेर होता" हे समर्थ रामदासस्वामींबद्दलचं एक वाक्यंच या पुस्तकाची विश्वासार्हता दाखवण्यास पुरेसं आहे.

vijaykulkarni,

>> "ज्यांना पोर्न लीगल असावे वाटते त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना घेऊन पोर्न बनवावे व प्रसिद्ध करावे"

तुमचं औपरोधिक उदाहरण वाचून तुमच्याच या विधानाची आठवण आली :

>> माबोसारख्या कुटुंबवत्सल संकेतस्थळावर इतके तपशील कशाला ?

op_quotes.jpgतुम्ही माझ्यासारखे बनू लागलात हे पाहून आनंद झाला.cl_quotes.jpg

बाकी चालू द्या!

आ.न.,
-गा.पै.

मी दुपारी वाचून नंतर बराच वेळ नव्हतो येथे. मला तरी विकुंचे उदाहरण उपरोधिकच वाटले होते. श्री ने जे लिहीले होते त्यातील लॉजिक ची चूक दाखवायची म्हणून. केवळ त्यांनी "उद्या कोणीतरी म्हणेल..." असे मागे लावून लिहीले नाही इतकेच. ते सिरीयसली असे लिहीतील अशी अजिबात शक्यता वाटत नाही.

>>"ज्यांना पोर्न लीगल असावे वाटते त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना घेऊन पोर्न बनवावे व प्रसिद्ध करावे"

हे माझे मत अजिबात नाही. ते अवतरणचिन्हात आहे. औरंगजेबाचे चित्र घरावर लावायचा युक्तिवाद किती चुकिचा आहे हे दाखवायला लिहिलेलले उदाहरण होते ते. माज्या इतक्या दिवसाच्या वावरा नंतरही लोकांना ते माझे मत वाटावे ? उठा ले रे बाबा !<<

आता सारवासारव करण्याचा प्रयत्न केविलवाणा वाटतोय - बुंद से गइ वो हौद से नहि आती...

माबो प्रशासनाची वाढलेली टाॅलरंस लेवल बघुन डोळे पाणावले...

हा धागा वाचतोय. इतकावेळ काही कमेंट करावीशी वाटली न्हवती, कारण एकूणच सगळं उगाच उकरून वाद इ. वाटलेलं.
विकुंची कमेंट 'जर औरंगजेबाच नाव बदललं ते आवडत नसेल आणि पुळका असेल तर त्याचं नाव स्वतःला/ घराला द्या', यावर केलेली होती. ती analogy घेऊन केलेलं तर्कट होतं, ती कमेंट जर बोचत्येय तर औरंग्जेबाचं नाव द्या म्हणण ही तितकंच हास्यास्पद आहे. पोर्न लीगल हवं म्हणणारी माणसं स्वतःला पोर्न बघायला मिळावं म्हणून ते म्हणत नसतात, तर सरकारचा अंकुश या बाबतीत नको. प्रत्येकाला काय करायचं ते ठरवू द्या, अशा दृष्टीने म्हणत असतात. तसच, जर कोणी नाव का बदललं? म्हणत असेल तर तुम्ही स्वतःला ते नाव घ्या हे म्हणण काही बरोबर वाटलं नाही.

बाकी नाव तेच ठेवून किंवा बदलून कोणाच्या जगण्यात काही फरक पडतो असं वाटत नाही. जर नाव बदलणे कायदेशीर असेल, तर बदलू द्या. प्रत्येक रस्त्याचे नाव बदलणे कायदेशीर असेल तर ते करा. काम केलं, बिलं पास केली होईल. अर्थात नुसतं एकदा डावीकडे आणि एकदा उजवीकडे कलून काहीतरी केल्याचा भास होतो, पण गाडी पुढे जात नसते.

उपरोध कळला, पण फारसा पटला नाही.

विकुंना उद्देशून - औरंगजेब आपला आहे, हे ठासून सांगण्यामागे तुमचा 'भारतीय मुसलमानांना परके मानू नका' असे सांगण्याचा उद्देश असेल, तर तर्कात गडबड आहे. औरंगजेबाला हिंदूविरोधी मानणार्‍यांपैकी बराच साइझेबल वर्ग हा त्यांना डिसओन करणारा नाहीये.

"औरंगजेब इतर मध्ययुगीन राजाप्रमाणे साम्राज्य वादी होता. त्याला इस्लाम चा प्रसार करणे महत्वाचे वाटे असे नसावे. तुम्ही जर गपगुमान पूजापाठ करून मला राज्य करू दिले तर मी तुम्हाला त्रास देणार नाही असा त्याचा हेतू असावा. " हे जे तुमचे वाक्य आहे, त्याला 'तुम्ही असे म्हणता' ह्याशिवाय आधार तुम्ही दिलेला नाही. मध्ययुगातील औरंगजेबाचा पूर्वज म्हणता येईल असा नोमॅडिक राजा म्हणजे तिमूर. तो स्वतःला "इस्लामची तलवार" म्हणवी. ह्याच तिमूरच्या वंशजांची दुसरी एक शाखा म्हणजे पर्शियातले सफाविद साम्राज्य. ह्याचा पहिला शहा इस्माईल. हा बाबराचा समकालीन. त्याने अक्ख्या इराणला सुन्नीपासून शिया बनवले. त्यातलाच शहा अब्बास (पहिला) ह्याने आर्मेनियन ख्रिश्चनांना मुस्लिम बनवून गुलाम म्हणून ठेवल्याची उदाहरणे आहेत. मग तुम्ही कुठल्या मध्ययुगीन राजांविषयी सांगता आहात? Perhaps Aurangjeb preferred diplomacy instead of war in case of religion. पण वेळ आल्यावर त्याने दात बरोबर दाखवलेले आहेत. प्रतिपक्षाच्या की फिगर्सना मुसलमान केले, (नेताजी, संभाजी) की त्यांना लॉयल असणारे लोक सुद्धा आपल्याकडे येतील असा त्याचा होरा असावा.

तसेही असेल, पण औरंगजेबाला ( वा मुघलांना) लोकांना मुसलमान करणेच महत्त्वाचे वाटत असते तर त्याने आपले सरदार ई लोकांना मुस्लीम बनण्याची सक्ती केली असती. जिझिया करासारखा जुलमी कर लावणे शक्य होते तर मुस्लिम व्हा अशी सक्ती करणे अशक्य होते का? शिवाय त्याने निदान काही देवळांना मदत केली, सती विरोधी कायदे केले हे उरतेच.

औरंगजेबाला हिंदूविरोधी मानणार्‍यांपैकी बराच साइझेबल वर्ग हा त्यांना डिसओन करणारा नाहीये.

नसेलही पण व्हेन डायग्राम काढली तर कॉमन अरेया जास्त येइल. Happy

अगदी स्पष्ट लिहायचे तर वर कुणी औरंगजेबाला शिवाजी महाराजांच्या जवळपासचेही स्थान दिलेले नाही.

औरंगजेब्कट्टर मुस्लमान अस्ला तरे तो भारतीअच होता. परदेशी नव्हे.
>>>>>

औरंगजेबाची वंशावळी :-

तैमुरलंग
|
मिरान शाह
|
अबू सैद मिर्झा
|
उमर शेख मिर्झा
|
झहीर उद्दीन महंमद (बाबर)
|
हुमायून
|
अकबर
|
जहांगीर
|
शाहाजहान
|
औरंगजेब

औरंगजेब हा अफगाणिस्तानातून हाकलून लावलेल्या तुर्की बाबराचा वंशज होता. बाबर स्वतः तैमुरलंगाचा वंशज होता. उगाच औरंगजेबाला भारतीय म्हणून खपवू नका.

अगदी स्पष्ट लिहायचे तर वर कुणी औरंगजेबाला शिवाजी महाराजांच्या जवळपासचेही स्थान दिलेले नाही.
>>>>>

शिवाजी महाराजांची तुलना औरंगजेबाशी? आणि जवळपासचं स्थान? ग्रेट!

केंद्रातील मोदी सरकारची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याचे प्रशस्तीपत्रक शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सरकारला दिले. संघ आणि मोदी सरकार यांच्यातील तीन दिवसांच्या समन्वय बैठकीचा समारोप आज झाला. मात्र, ही बैठक म्हणजे मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा नसल्याचा दावा संघाने केला. समारोपाच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही बैठकीला हजेरी लावून संघाचे महत्त्व अधोरेखित केले.

पाक, बांगलादेशात आपलेच भाऊबंद

पाकिस्तान आणि बांगलादेश भारतातूनच विभक्त झाले असून, ते आपल्याच कुटुंबातले भाऊबंद आहेत. त्यामुळे जुन्या गोष्टी विसरून सांस्कृतिक संबंध दृढ करण्यावर भर देण्यात आला. देशाचा सांस्कृतिक वारसा शुद्ध राखण्यावरही चर्चा करण्यात आली. धार्मिक जनगणनेवर व्यापक चर्चा झाली नाही, असे होसबोळे यांनी सांगितले.

चर्चा आणि सूचना

संघ आणि मोदी सरकारमधील बैठकीत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेविषयी चर्चादेशाची अर्थव्यवस्था आणि शिक्षणाच्या भारतीयीकरणावरही चर्चाहिंसाचार आणि माओवाद संपुष्टात आणण्यासाठी सरकारने ताकदीचा आणि योग्य धोरणाचा अवलंब करावाभारतीय चिंतन आणि विचार, तसेच आधुनिक काळानुसार आर्थिक विकासाची रूपरेषा आखण्याची सूचनाशहरीकरण रोखण्यासाठी ग्रामीण विकासावर लक्ष केंद्रीत करण्यावर भर आधुनिक शिक्षणासोबत भारतीय मूल्ये आणि चरित्र निर्माण करणारे शिक्षण देण्याला

!

<<<<"औरंगजेब इतर मध्ययुगीन राजाप्रमाणे साम्राज्य वादी होता. त्याला इस्लम चा प्रसार करणे महत्वाचे वाटे असे नसावे. तुम्ही जर गपगुमान पूजापाठ करून मला राज्य करू दिले तर मी तुम्हाला त्रास देणार नाही असा त्याचा हेतू असावा. " हे जे तुमचे वाक्य आहे, त्याला 'तुम्ही असे म्हणता' ह्याशिवाय आधार तुम्ही दिलेला नाही. >>>>

+१

शेर शहा सुरी ने हुमायुन ला भारतातुन हुसकावुन लावल्यावर बैरमखान च्या सहाय्याने अकबराने फ्रॉम स्कृअ‍ॅच साम्राज्यविस्तार केला अस म्हणता येइल. त्यासाठी त्याने रुथलेस मेथड वापरली. उदा. शरण आलेल्या वा पकडल्या गेलेल्या शत्रुला डायरेक्ट स्म्पवण (हेमच.न्द्र विक्रमादित्य उर्फ हेमु ह्या ७० च्या पलीकडे असलेल्या राजाचा शिरछ्छेद) पण तरीही त्याने असे घाउक धर्मातरा.न्चे कि.न्वा म.न्दीरान्च्या विधव.न्साचे हुकुम सोडल्याचे इतिहासावरुन दिसत नाही. त्याच्या साम्राज्यविस्तारात धर्म हा फारसा महत्वाचा फॅक्टर नव्हता अस मानायला जागा आहे. आयुष्याच्या शेवटाकडे तर तो सहिष्णु बनत गेला.
जहा.न्गीर आणि शहाजहान जरी अकबराइतके सहिष्णु नसले तरी धर्मान्ध नव्हते.

और.न्गजेबाच्या बाबतीत मात्र त्याच्या धर्मा.न्धपणाचे अनेक पुरावे त्याच्या कारकिर्दित बघायला मिळतात. ह्या चर्चेच्या अनुष.न्गाने बर्‍याच लोका.न्नी तसे पुरावे दिले आहेत. (अकबराने माफ केलेला जिझिया परत लागु करणे, काशी आणि तत्सम महत्वाच्या त्याच्याच राज्यातील मन्दीरा.न्चा विध्व.न्स इ.). थोडक्यात सा.न्गायच तर अफगाण शहाच्या कार्किर्दीत निदान काबुल मध्ये अस्तित्वात असलेला मॉडर्न अफगाणिस्तान जसा तालिबानने मध्य्युगात ढकलला तसच काहिस और.न्गजेबाने त्याच्या कारकिर्दीत केल अस मला म्हणायचय.

आपल्याशी लॉयल असलेल्या लोका.न्च्या हिता.न्बाबत तो सहिष्णु होता असा एक मतप्रवाह तुमच्या आणि इतर बर्‍याच लोकान्च्या पोस्टस मधुन दिसला म्हणुन त्या स.न्दर्भात खालील उदाहरण देतेय.

मिर्झा राजा जयसि.न्ग हा औरन्गजेबाचा खन्दा समर्थक. अगदी दारा शुकोह वर मात करुन औरन्गजेबाने सत्ता हस्तगत केली त्या सुरुवातीच्या दिवसान्पासुनचा. त्याचा मृत्यु अतिशय स.न्शयास्पद स्थितीत झाला. त्यान्च्याच एका कारकुनाने त्यान्च्यावर विषप्रयोग केला असा त्यान्च्या धाकटा मुलगा किरत्सिन्ग ह्याला स.न्शय होता. म्हणुन तो ह्या कारकुनाच्या मागे हात धुवुन लागला. स्वतःला वाचवण्यासाठी त्या कारकुनाने धर्मा.न्तर केल. परिणामस्वरुप कीरतसि.न्गाला अक्षरश हात चोळत गप्प बसाव लागल कारण औरन्गजेबाच्या राजवटीत तसा कायदाच होता!

वरील उदाहरण बाबासाहेब पुर.न्दरेन्च्या शिवचरित्रातुन

नामान्तर पुर्णपणे राजकीय कारणासाठी करण्यात आल असाव हे मला मान्य आहे. तरीही स्वतःला सेक्युलर मानणार्‍या माझ्यासारख्या व्यक्ती.न्नी त्याच समर्थन कराव अस मला वाटत. ह्याच कारण ही दोन नाव थॉट स्कुल्स रिप्रेझेन्ट करतात त्यान्च्यातला फरक.

औरन्गझेब हा तालिबानी, "दार उल हब" फिलॉसॉफी रिप्रेझे.न्ट करतो (माझ मत अर्थातच). तर डॉ. कलाम हे त्याच्या विरुध्द म्हणजे लिबरल, सेक्युल,, आधुनिक इस्लामाला रिप्रेझे.न्ट करतात. अस असताना निव्वळ कुणाच्या भावना दुखावतील म्हणुन नामान्तराला विरोध करण ही शहाबानो प्रकरणासारखीच चुक ठरेल अस मला वाटत.

शिवाय त्याने निदान काही देवळांना मदत केली, सती विरोधी कायदे केले हे उरतेच.>>> पैकी सतीविरोधी कायदे हे "हिंदू बायकांबद्दल फार कळवळा वाटून केलेले नव्हते हे निश्चित"

मुळात आपण कट्टर मुस्लिम मानसिकतेला समजून न घेताच हे मुद्दे लिहत आहात. ज्या क्षणी एक "धार्मिक कट्ट मुसलमान" इतर काफीर जगाकडे ज्या दृष्टीनं बघतो ते समजेल त्यावेळी औरंगजेबानं सतीविरोधी कायदे का केले वगैरे बाबी समजतील. शुभेच्छा.

पॉर्नच्या वाक्यामधला उपरोध समजला, पण ते वाक्य बिल्कुल आवडले नाही. पॉर्न सारख्या अतिशोषण होणार्‍या इंडस्ट्रीबद्दल वापरल्याने अजिबात आवडलेले नाही.

नामान्तर पुर्णपणे राजकीय कारणासाठी करण्यात आल असाव हे मला मान्य आहे. तरीही स्वतःला सेक्युलर मानणार्‍या माझ्यासारख्या व्यक्ती.न्नी त्याच समर्थन कराव अस मला वाटत. ह्याच कारण ही दोन नाव थॉट स्कुल्स रिप्रेझेन्ट करतात त्यान्च्यातला फरक.

औरन्गझेब हा तालिबानी, "दार उल हब" फिलॉसॉफी रिप्रेझेन्ट करतो (माझ मत अर्थातच). तर डॉ. कलाम हे त्याच्या विरुध्द म्हणजे लिबरल, सेक्युलर, आधुनिक इस्लामाला रिप्रेझेन्ट करतात.

रमा यांच्या वरील पोस्टला अनेकानेक अनुमोदन

त्याकरता नाव बदलाला पाठींबा

रमा यांच्या वरील पोस्टला अनेकानेक अनुमोदन
+++++++++++++ १००००००००००००%

अरेरे मायबोलीच्या लेव्हलची काळजी वाटायला लागलीय !

एका लंगड्याच्या औलादीने अर्ध्या भारताचा उपभोग घेतला.

. अल्ला , मुझे वो लंगडा बना दे.

... जागो लंगडुद्दीन प्यारे !

Proud

Pages