छत्रपती शिवाजी, औरंगजेब, माफीनामा आणि अब्दूल कलाम रोड

Submitted by केदार on 2 September, 2015 - 09:08

तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की

औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.

मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.

अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते. Wink

अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.

shivaji_tweet.JPG

आता शोएबच्या लेखाचे खंडन.

Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे

१. Aurangzeb built more temples than he destroyed -

हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.

औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.

Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.

Fatva_1.JPG

काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.

त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.

Fatva_2.JPG

जामा मशिदीच्या पायर्‍यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.

Fatva_4.JPG

मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -

Fatva_3.JPG

काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.

माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )

२ Music flourished in India during Aurangzeb’s reign

शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.

Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,

होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.

३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal

ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.

औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.

४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.

५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time

अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.

शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्‍या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.

ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.

अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.

पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<की औरंगजेबाने(शिवाजीने/अशोकाने/अमुकतमुक इ.) डिक्टेट हिंदीत (किंवा इंग्रजीत) केलं, तरी कारकून हे फारसीत कन्वर्ट करून लिहित असत का?>

हो. फार्सी लिहूवाचू शकणारे फरसीनवीस, म्हणजे पारसनीस म्हणून ओळखले जात आणि फार्सीत बातम्या लिहिणारे वाकनीस. हे दोघं नसले तर कामकाज अडून राहत असे. शिवाजीनं फारसीचं महत्त्व कमी करण्यासाठी राज्यव्यवहारकोश तयार करवून घेतला होता. पण फारसीतले व्यवहार पेशव्यांच्या काळातही सुरू होते.

प्वाइंट हा आहे, की औरंगजेबाने(शिवाजीने/अशोकाने/अमुकतमुक इ.) डिक्टेट हिंदीत (किंवा इंग्रजीत) केलं, तरी कारकून हे फारसीत कन्वर्ट करून लिहित असत का >

नाही. मोडी मध्ये खूप पत्रे आहेत. अशोकाची ऑलमोस्ट सर्व पत्रे* वगैरे लिखाण पाली मध्ये आहे. तीच तेंव्हाची लिखीत राजभाषा.

*पत्रे म्हणणे चूक आहे. लिखान !

शिवाजीनं फारसीचं महत्त्व कमी करण्यासाठी राज्यव्यवहारकोश तयार करवून घेतला होता. पण फारसीतले व्यवहार पेशव्यांच्या काळातही सुरू होते. >> +1

त्यातलं "हो" मी आधी पाहिलं नाही. खूप सारी पत्रे मोडी मध्ये उपलब्ध आहेत त्यामुळे सरसकट फारसीच होती हे पटत नाही. क्रॉस बॉर्डर पत्रे जरूर फारसी मध्ये पण देशी ( मराठा एम्पायर इंटर्नल) पत्रे मोडी मध्ये वाचायला मिळतात.
तसे मोगल साम्राज्याबद्दल नाही. त्यांची इंटर्नल पत्रे ही मुस्लीम आक्रमनासोबत आलेल्या फारसी मधूनच असत.

माझ्या मताची पिंक टाकल्याशिवाय आता पुढे जाववत नाही.

औरंगजेब हा अतिशय सत्तापिपासू आणि कुटील राजकारणी होता. सत्तेसाठी ज्याने स्वत:च्या जवळच्या नातेवाईकांची हत्या करायला मागे पुढे पहिले नाही तो परक्यांना दया माया दाखवेल ही अपेक्षाच फोल आहे.
जिथे जिथे त्याला मातब्बर प्रतिस्पर्धी भेटले तिथे तिथे औरंगजेबाने त्यांना संपूर्ण नेस्तनाबूत करायचा चंग बांधला. शत्रूचा स्वाभिमान पूर्ण पायदळी तुडवून त्याला नांगी ठेचलेल्या विंचवासारखा नामोहरम करणे ही औरंजेबाची ष्टाईल होती. परधर्मियांना मुसलमान होण्यास भाग पाडणे हा या कुटील रणनीतीचा भाग होता. ज्यांनी धर्मांतर पत्करले त्या नेताजी सारख्या लोकांचे प्राण वाचले. ज्यांनी धर्मांतर करण्यास नकार दिला त्यांना हाल हाल करून मारले. यामध्ये धार्मिक कारणापेक्षा शत्रूची विटम्बना करून त्यांच्या स्वाभिमानाच्या चिंधड्या उडवणे हा मुख्य भाग होता. स्वत:च्या राजवटी विरुद्ध कुठेही बंडाळी होऊ नये अशी दहशत बसवणे हा उद्देश होता. ज्यांनी औरंगजेबाचे स्वामित्व सहजगत्या मान्य केले त्यांना हिंदूच राहू देण्यात त्याला काहीच हरकत नव्हती. उलट अशा मांडलिक लोकांना त्याने मंदिरे वगैरे बांधायला मदतही केली. हे सगळे त्याच्या कुटील राजकारणाचा भाग होता. धर्मप्रसार करण्यापेक्षा साम्राज्यविस्तार करणे हा जास्त महत्वाचा उद्देश होता.

आपण बरीच वर्षे माबोवर असल्याने एखादा माबोकर आणी त्याचे विचार याचे एक कनेक्शन बनून जाते. केदार भाजपा चा प्रवक्ता वगैरे नाही पण त्याचे "दिल" कुठे आहे हे आजवरच्या लिखानातून स्पष्ट आहे. त्यात काही चूक नाही आणी मी ही पक्षपाती आहेच.

हा लेख ज्या बातमीच्या पार्श्वभूमीवर आला ते पहाता लेखाचा उद्देश नाम बदलाचे समर्थन आहे असा समज झाला तर नवल नाही. "काही लोक लिहितात तसा औरंगजेब सहिष्णू नव्हता" हेच लेखाचे सार असेल तर भाग वेगळा. त्यात काही मत भेद असू नयेत.

पण आवडो न आवडो, औरंगजेब आणी एकुणच मुघल हे आपल्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत. ताज, लाल किल्ला, हाही आपल्या सॉफ्ट पॉवर चा भाग अहेत. ताज महाल चालतो, लाल किल्ला चालतो, तर औरंगजेब रोड का चालू नये हा प्रश्न रास्त आहे.

औरंगजेब इतर मध्ययुगीन राजाप्रमाणे साम्राज्य वादी होता. त्याला इस्लाम चा प्रसार करणे महत्वाचे वाटे असे नसावे. तुम्ही जर गपगुमान पूजापाठ करून मला राज्य करू दिले तर मी तुम्हाला त्रास देणार नाही असा त्याचा हेतू असावा.

औरंगजेब/ शिवाजी या संघर्षाला पोस्ट फॅक्तो हिंदु मुस्लिइम स्वरूप देणे आजच्या राजकारणाला सोयिचे असेल पण ते खरे नाही. औरंगजेबाने देवळाला मदत केली उदाहरणे आहेत तशीच मराठांनी देउळ लुटल्याचीही आहेत.

आणी त्या रस्त्याला औरंगजेबाचे नाव बदलणे हे दिसते तितके इनोसंट नाही. बात्रांची पुस्तके, बीफ बंदी, एफ टी आय आय , अशा इतर घटनाच्या संदर्भात पाहिले तर ते नक्की काय आहे हे लक्शात येते.

"डिवचणे" हा शब्दप्रयोग योग्य आहे.

दुसर्‍या टोकाला काही लोक "बिच्चारा औरंगजेब .." असे लेख पाडतात किंवा मग शिवाजी महाराजानी दरबारात हजेरी लावली असे सांगतात पण तीस वर्शे दक्खान मध्ये ठाण मांडून ही त्याला निराश होउन जावे लागले हे विसरतात.

भलत्याच प्रदेशात गेल्यावर धर्मविस्ताराआधी साम्राज्यविस्तार हे प्राधान्य असणारच!

======

>>>"काही लोक लिहितात तसा औरंगजेब सहिष्णू नव्हता" हेच लेखाचे सार असेल तर भाग वेगळा. त्यात काही मत भेद असू नयेत. <<<

अ‍ॅक्च्युअली ह्यानंतरचा प्रतिसादाचा भाग 'का' आहे असा प्रश्न पडत आहे.

एखाद्या प्रदेशाचा इतिहास प्रचंड वादळी असेल, शांतीमय असेल किंवा काहीही! तो आज कसा बघितला जायला हवा ह्याबाबतच्या मतप्रदर्शनाला काही महत्त्व आहे की नाही? इतिहास बदलता येत नाही हे ठीक आहे, पण बदलता येत नाही तो इतिहास गौरवशालीच आहे ही भावना किस खुषीमे?

इतर धर्मांचा आदर करणे म्हणजे आपण ज्या धर्माचे आहोत त्याचा थेट अपमान होऊ देणारे भूतकाळात गेल्यानंतरही तो होऊ देणे आणि त्यात धन्यता मानणे नव्हे ना? Happy

चु भु द्या घ्या

भलत्याच प्रदेशात म्हणजे काय हो तात्या?
म्हणजे आर्य साम्राज्य विस्तार करत आले आणि इथे त्यांनी त्यांचा वैदिक धर्मप्रसारही केला तसंच ना?

ज्यांना औरंगजेब फार महान होता वाटतय, त्याच्याविषयी फार कळवळा आहे, त्यांनी त्यांच्या घरावर ' औरंगजेब सदन ' किंवा स्वतःच नाव बदलुन औरंगजेब ठेवावं , तरच त्यांना खरोखर औरंगजेबाविषयी प्रेम आहे हे सिद्ध होईल नाहीतर नुसतीच बोलाचीच कढी आणि बोलाचाच.....

ज्यांना मोदी फार महान होता वाटतय, त्याच्याविषयी फार कळवळा आहे, त्यांनी त्यांच्या घरावर 'मोदी सदन ' किंवा स्वतःच नाव बदलुन मोदी ठेवावं , तरच त्यांना खरोखर मोदीविषयी प्रेम आहे हे सिद्ध होईल नाहीतर नुसतीच बोलाचीच कढी आणि बोलाचाच.....

ता क: मोदी फ़क्त उदाहरणार्थ घेतले आहेत. दुसरं कुठलंही नाव या आर्गुमेंटचा मूर्खपणा सिद्ध करू शकते. मुळात औरंगजेब महान होता असं इथे बोलताना कोणीच आढळला नाही

>मुळात औरंगजेब महान होता असं इथे बोलताना कोणीच आढळला नाही
+१

"ज्यांना पोर्न लीगल असावे वाटते त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना घेऊन पोर्न बनवावे व प्रसिद्ध करावे"

केदार.. माबोबाहेरच्या मिडियामधे काहि लेख छापून आला त्यात कोणितरी कुठलं तरी ट्वीट पण टाकलं.. त्यावरून माबोवर लेख टाकायचं कारण मला समजलं नाही. इन फॅक्ट तुझ्या या लेखामुळंच मला कळालं की असला काहीतरी लेख आला आहे (ज्याची तू लिंकही दिली नाहियेस) आणि असले ट्वीट करणारा कोणी आहे.. शिवाय हा लेख इथं लिहिताना तू माबोकरांना काहीही विचारलंही नाहियेस की तुमचं काय मत आहे. शिवाय इथल्या कोणाच्या कुठल्याही मतामुळं नाव बदलायच्या निर्णयात काहीही बदल होणार नाहिय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा रस्ता महाराष्ट्रातल्याही कुठल्या शहरात नाहिये जिथं औरंगजेबला शत्रूच समजलं जातं.

तर एकंदर या लेखाचा हेतू काय आहे ते मला एवढ्या पोस्टींनंतर सुध्दा अजून समजलं नाहिये.

औरंगजेब केवळ आपल्या इतिहासाचा अविभाज्य भाग आहे म्हणून नामांतराला विरोध हे पटले नाही. हिटलर, ओसामा बिन लादेन किंवा इदी अमिन यांच्या नावाने त्या देशाच्या राजधानीत एक मुख्य रस्ता कधी असेल का ?

>>> vijaykulkarni | 4 September, 2015 - 22:43 नवीन

>मुळात औरंगजेब महान होता असं इथे बोलताना कोणीच आढळला नाही
+१<<<

औरंगजेब महान होता हे विधान करण्यासाठी विशिष्ट दृष्टिकोन बाळगायला हवा ना? Happy

>>>"ज्यांना पोर्न लीगल असावे वाटते त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना घेऊन पोर्न बनवावे व प्रसिद्ध करावे"<<<

हे विधान बरोबर आहे का?

माझ्यामते, संदर्भ कोणताही, काहीही असो, हे विधान करणे अत्यंत निषेधार्ह आहे.

(जे शब्द खोडले ते लिहीत नाही)

औरंगजेब हा जोधा अकबर या वंशावळीतील आहे ना ?

जोधाबाई भारतीय असल्याने पुढची संतती आपोआपच भारतीय ठरते.

मग तो परदेशी होता ही बोंबाबोंब मराठे का करत होते ?

माझे प्रतिसाद पुढे कुठे जाणार याचे तुमचे आकलन चुकले केदार. त्या चुकलेल्या आकलनातून डिवचणे योग्य शब्दप्रयोग आहे इथपर्यंत गाडी मात्र आपसूक आली.

रच्याकाने
सोशल मीडिया बाबताचा "अध्यक्षिय आदेश" बरिक नेटका आहे हो...

सर्वप्रथम अकबराला जोधा ही एकच बायको नव्हती.
सलीम उर्फ जहांगीर हा जोधाचा मुलगा असला तरी त्या काळीही आणि आजही मुलांचा धर्म बापाच्या ध्रर्मावर ठरतो की आईच्या?

औरंगजेब पक्का मुस्लिम होता. उगाच फाटे फोडू नका.

https://en.wikipedia.org/wiki/Mariam-uz-Zamani

There is a popular perception that the wife of Akbar, mother of Jahangir, was also known as "Jodha Bai".[44]

Her name as in Mughal chronicles was Mariam-uz-Zamani. Tuzk-e-Jahangiri, the autobiography of Jahangir, doesn't mention Jodha Bai nor Harka Bai or Heer Kunwari.[44] Therein, she is referred to as Mariam-uz-Zamani.[45] Neither the Akbarnama (a biography of Akbar commissioned by Akbar himself), nor any historical text from the period refer to her as Jodha Bai.[45]

Her name as in Mughal chronicles was Mariam-uz-Zamani. Tuzk-e-Jahangiri, the autobiography of Jahangir, doesn't mention Jodha Bai nor Harka Bai or Heer Kunwari.[44] Therein, she is referred to as Mariam-uz-Zamani.[45] Neither the Akbarnama (a biography of Akbar commissioned by Akbar himself), nor any historical text from the period refer to her as Jodha Bai.[45]

सातीताईजी बाईसाहेबजी,
कृपया एतीहासीक दैस्ताएवजांची लिंक / फोटो / संदर्भ देऊन विकी ला खोटे पाडुन माझ्या मनातील आपल्या अदराला हजार ने गुणावे हि नम्र विनंती.

विजयकुलकर्णी हे तुम्ही नाही तुमचे संस्कार बोलताहेत.
vijaykulkarni | 4 September, 2015 - 10:13

>मुळात औरंगजेब महान होता असं इथे बोलताना कोणीच आढळला नाही
+१

"ज्यांना पोर्न लीगल असावे वाटते त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना घेऊन पोर्न बनवावे व प्रसिद्ध करावे"

टग्या, आपल्या इच्छेविरुद्ध आपण एखादा धर्म स्विकारणार का? केवळ जबरदस्ती म्हणुन? तसे न केल्यास एतीहासीक काळात अशा लोकांविरुद्ध के काही केले गेले तसे तुमच्यासोबत करण्यास आपली संमती आहे का?

माननीय सातीताईजी बाईसाहेबजी,
कृपयाच विषय न बदलता मुद्द्याचे काय ते उत्तर द्यावे ही नम्र विनंती.

>>> श्री | 4 September, 2015 - 23:59 नवीन

विजयकुलकर्णी हे तुम्ही नाही तुमचे संस्कार बोलताहेत.
vijaykulkarni | 4 September, 2015 - 10:13

>मुळात औरंगजेब महान होता असं इथे बोलताना कोणीच आढळला नाही
+१

"ज्यांना पोर्न लीगल असावे वाटते त्यांनी आपल्या घरातील स्त्रियांना घेऊन पोर्न बनवावे व प्रसिद्ध करावे"
<<<

थॅंक गॉड कोणीतरी ह्याबद्दल बोलले. मला वाटत होते की माझा काही गैरसमज झाला की काय?

विकु,

तुमच्यासारख्या आय डी कडून ही अपेक्षा नाही.

काही लाजलज्जा नावाचा प्रकार माहीत असेल असे वाटले होते. सॉरी!

मी जे शब्द लिहून खोडले ते केवळ डोके शांत करून खोडले.

आणि इथे एवढ्या अन् तेवढ्यावरून रान पेटवणार्‍या बायका आणि पुरुष शांत आहेत हे अचाटच!

वर पुन्हा त्याकडे दुर्लक्ष करून चर्चा चालूच ठेवणारे आणखीनच महान!

अशक्य!

Angry

Pages