तर औरंगजेब रोडचे नामकरण डॉ APJ अब्दुल कलाम झाले. ते अनेकांना आवडले नाही. ओके. पण आता लोकं औरंगजेब कसा चांगला होता ह्याचे घाऊक पीक घेत आहेत. आजच एका लेखात एका लेखकाने एक मुद्दा मांडला की
औंरगजेबाने हिंदू लोकांना नौकरीस ठेवले होते. ( इन्क्लुडिंग शिवाजी) आणि शिवाजीने कसा माफिनामा दिला त्याचे एकाने केलेल एक ट्विट त्याचा लेखात दिले.
मला ते ट्विट बघून खूप गंमत वाटली.
अर्थात लेखक शोएबला मराठा गनिमी कावा काय हे माहिती असण्याचे काही कारण नाही.पण ट्विट करणारा मात्र इतिहासातील PhD करणारा आहे. त्याला "मराठा राजकारण" कळाले नाही ह्याचे दुख: जास्त. त्याने जदुनाथ सरकारांचे लिखित उदाहरण त्याला हवे तसे मांडले. मोल्डींग ऑफ हिस्ट्री हे कुणा एकाबाजूनेच होत नाही असे दिसते.
अर्थात माफिनामा लिहून दिला म्हणणारे खूप असतात, त्यात नविन काही नाही. पण तो का दिला हे इथे मायबोलीवर सांगायची गरज नसावी.
आता शोएबच्या लेखाचे खंडन.
Was Aurangzeb the most evil ruler India has ever had? ह्या लेखातील त्याचे मुद्दे
१. Aurangzeb built more temples than he destroyed -
हिंदू रेकॉर्ड (म्हणजे मराठेशाही , राजपुताना वगैरे देण्यापेक्षा मी तुम्हाला मोगल फारसी रेकॉर्ड देतो. मग तुमचा विश्वास कदाचित बसेल.
औरंगजेब म्हणतो, की हिंदू देवळाकडे नुसते पाहणे देखील मुस्लिमांनी करू नये. तसा आदेश त्याने केशवराय मंदीर तोडताना दिला.
Julus (R.Yr.) 9, Rabi II 24 / 13 October 1666.
काल्का मंदीरात हजारोंनी लोकं पुजेला जमत असत. ही साईट सम्राट अशोकाने बांधलेली आहे. सन १७३२ मध्ये मराठा रेकॉर्ड मध्येही काल्का मंदीराची नोंद घेतली आहे. कारण औरंगजेब मेल्यावर लगेच तिथे पुन्हा बांधले गेले.
त्याला तोडण्याचे आदेश औरंगजेबाने दिले. Siyah Waqa'i- Darbar Regnal Year 10, Rabi I, 23 / 3 September 1667.
जामा मशिदीच्या पायर्यात लागणारे दगड म्हणून औरंगजेबाने मंदीर पाडण्याचा फतवा काढला.
मंदीर पाडण्याची जनरल ऑर्डर -
काशी विश्वेश्वरांची ऑर्डर आणि इतर अश्या अनेक ऑर्डर देण्याची आता काही गरज नसावी.
माझ्यामते इतके पुरे आहे.हवे तर मी आणखी फारसी पत्रे अपलोड करत राहिल. (अगेन हा इतिहास आहे ना. हिंदू नाही, मोगल रेकॉर्ड मधील. तो पण लिखित स्वरूपात. )
२ Music flourished in India during Aurangzeb’s reign
शास्त्रीय संगीत औरंगजेब येण्या आधीही होते / नंतरही होते. हा दावा फोल आहे. पण आता लिहायला बसलोच तर.
Muntakhab-al Lubab मधील हे वाक्य. ""Bury it so deep that no sound or echo of it may rise again", Aurangzeb,
होप ह्या दाव्यात किती तथ्य आहे ते कळाले असेलच.
३. Aurangzeb employed more Hindus (including Shivaji) than any other Mughal
ह्यावरच तर मी हा लेख लिहिला. शिवाजी हे नाव आल्यामुळे.
औरंगजेबाकडे जसे हिंदू राजे होते तसेच हिंदू राज्यांकडे मुस्लिम सरदार होते. शिवाजी महाराजांकडे होते तसेच पेशव्यांकडेही होते. ह्यात नविन काय आहे? एनलायटन मी.
४. Aurangzeb’s mother tongue was Hindi
वरची पत्रे कोणत्या भाषेत आहेत. औरंगजेबाचे मुलाला लिहिलेले एक पत्र आहे. त्याचा शोएब आधार घेतो. त्यात औरंगजेब म्हणतो की मला तुझे बालपण आठवते तू, "बाबाजी धम धम" असे म्हणालास. ह्यावरून शोएब सुतावरून स्वर्ग गाठत आहे.
५. The jizya tax wasn’t unusually discriminatory for its time
अओ. आता काय लिहू. खूप लिहून झाले आहे. पण शोएब मराठा राजांचे उदाहरण देतो, की मराठा राज्यात महारांना काठीने आवाज करायची प्रथा सुरु केली गेली. मान्य आणि ती प्रथा हीन आहे हे ही मान्य. पण जिझिया कसा बरोबर आहे हे सांगायला जी उदाहरणं दिली आहेत ती पटत नाही. त्यावरच एक मोठा लेख लिहू शकतो.
शोएब स्पेशली इतिहासाचे ट्विट तो करतो आणि लेख लिहितो. त्याचे लेख अपुर्या माहितीवर असतात. सिलेक्टिव्ह असतात असे माझे म्हणणे आहे.
ज्या जदुनाथ सरकारांचे तो उदाहरणं देतो, तेच जदुनाथ सरकार औंरंगजेबाबरही टीका करतात हे तो विसरतो.
अजून खूप सारे लिहू शकतो. पण थांबतो.
पण मी इथे का लिहिले? आय डोन्ट केअर तो रस्ता का बदलला. पण औरंगजेबचे काही चूक नाही, तो चांगलाच आहे असे ठरविणे आय डु केअर.
संदर्भ देऊन लिहीणे मान्य
संदर्भ देऊन लिहीणे मान्य नसल्यास सध्या सोशल मीडीयावर व्हायरल झालेली माहीती इथे आणून ओतावी का ?
१. औरंगझेबाच्या काळात ब्राह्मणांना जिह्जिया कर भरावा लागत नव्हता. वरच्या लिंकमधे अर्थातचा त्याचा अप्रत्यक्ष उल्लेख आहेच.
२. संभाजीराजांच्या हत्येमधे त्यांचे ब्राह्मण मंत्री फितूर झालेले होते. त्यांच्या कारस्थानामुळेच संभाजीराजांचा ठावठिकाणा औरंगझेबाला कळू शकला.
हे इथे लिहावं का ?
इतिहास ब्राह्मणी इतिहासकारांनी लिहीलेला आहे आणि त्या इतिहासाला जगात कुठेही मान्यता नाही. या इतिहासकारांच्य लबाड्या आता जगजाहीर होत चालल्या आहेत. अशा परिस्थितीत इतर पुरावे तपासल्याशिवाय निष्कर्ष काढता येत नाही.
लेखात कुठले फोटो आणून टाकले आहेत , लेखाचं प्रयोजन काय, कोण कुठे कुनास म्हणाले याचा थांगपत्ता नाही. ज्याने काही म्हटलेले आहे त्याने मायबोलीवर काही म्हटले आहे का याचा पाचपोच नाही. असाच अधांतरी विषय सुरू करण्यात आलेला आहे. शेंडा ना बुडखा असलेल्या लेखात जी चित्रं दिलेली आहेत ती लिपी वाचता येत नाही. त्याचं प्रमाणित इंग्रजी/हिंदी/मराठी भाषांतर इथे नाही.
अशा परिस्थितीत मम म्हणण्याशिवाय काय राहतंय सदस्यांच्या हाती ?
भाषा जरा कठोर झालेली आहे याची कल्पना आहे. पण यातूनही आशय समजून घेनारे लोक आहेतच. इतरांची पर्वा करण्ञाची आवश्यकता वाटत नाही.
२. संभाजीराजांच्या हत्येमधे
२. संभाजीराजांच्या हत्येमधे त्यांचे ब्राह्मण मंत्री फितूर झालेले होते. त्यांच्या कारस्थानामुळेच संभाजीराजांचा ठावठिकाणा औरंगझेबाला कळू शकला<<<<
शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण? या पुस्तकात आहे माहिती .
धाग्याच्या पान ८ वर पण आहे.
अर्रर्र सोर्री बरका ... विकी
अर्रर्र सोर्री बरका ... विकी चालत नाही का इथे? बर मग ते मी मासिरे आलमगीरचा रेफेरेंस दिला, तो पण नाही चालायच का?
मी जिझियाच्या इंटरप्रीतेशनचा दुसरा रेफरन्स देऊ का?
अनिरुद्ध, लीव्ह इट.
अनिरुद्ध, लीव्ह इट.
झालं पुन्हा सुरू. गप्पागोष्टी
झालं पुन्हा सुरू. गप्पागोष्टी आणि कट्टा असे दोन ग्रुप्स असून प्रत्येक ग्रुप मधे गप्पांचा अड्डा बनवण्याला काय म्हणणार ? तसे यांचे विरोधक पण कमी नाहीत. हाड हुड शिवाय भाषा नाही. एखाद्यावर अन्यायकारक कारवाई होत असेल तर चूक त्याचीच म्हणून त्यालाच बोल लावणार आणि स्वतःवर कारवाई झाल्यावर जगबुडी झाल्यासारखी अॅडमिनची विपू विनोदी करून टाकणार. ते ही ड्युआयडीसाठी !!! कमाल आहेत सारे
अरेरे, अग्नी तृणांनी झाकितात
अरेरे, अग्नी तृणांनी झाकितात याचे आश्चर्य वाटते.
जगदंब जगदंब...
The Jizya is a tax levied on
The Jizya is a tax levied on non-Muslims in lieu of military service which is compulsory for Muslims but not for non-Muslims. The amount of Jizya is much less than the Zakat, which is levied on Muslims only. The non-Muslims paying Jizya were exempt from compulsory military service in a Muslim State but were entitled to full protection.
http://www.answering-christia
http://www.answering-christianity.com/bassam_zawadi/is_jizya_tax_oppress...
महाराजांची बदनामी करणा-याला
महाराजांची बदनामी करणा-याला महाराष्ट्रभूषण पुरस्कार देणा-यांकडून आणि त्याचं समर्थन करणा-यांकडून अपेक्षा तरी काय ठेवणार...
औरंगझेब परवडला. तो उघड शत्रू होता.
संभाजी हत्येमध्ये फितुर
संभाजी हत्येमध्ये फितुर असलेल्या ब्राह्मण मंत्रयांची नावे दयाल का?
का बरं ? वरच्या लोकांना
का बरं ?
वरच्या लोकांना संदर्भा मागा आधी. त्यांनी दिला की बघू. बाकी पोस्टचा अर्थ कळेल तर मग काय...दिवाळी आत्ताच साजरी करूयात.
झाली ततपप
झाली ततपप
येडछाप आहात कि काय ? पोस्ट
येडछाप आहात कि काय ?
पोस्ट वाचा पुन्हा एकदा. कसले सेनापती, गाजर नाव घ्या
मराठीत लिहीलेलं कळत नसेल तर
मराठीत लिहीलेलं कळत नसेल तर तुमचा काय समज झाला याच्याशी ... घेणं देणं नाही.
संभाजीराजांना पकडून देणारा
संभाजीराजांना पकडून देणारा खुद्दं त्यांचा मेव्हणा गणोजी होता. संभाजीराजांबरोबरच कलशालाही औरंगजेबाने हालहाल करुन मारलं. हा कलश ब्राम्हणच होता.
वर शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण या भंपक पुस्तकाचा उल्लेख आला आहे. त्यात रामदास हा संत नसून जंत होता आणि तो औरंगजेबाचा हेर होता या शब्दांत उल्लेख केला आहे. या बद्दल कोणताही पुरावा दिलेला नाही. ते पुस्तक श्रीमंत कोकाट्यानी लिहीलेलं आहे यावरुनच त्याची लायकी कळावी.
प्रश्नाला अजूनही बगल. झेपत
प्रश्नाला अजूनही बगल. झेपत नाही तर लिहत जाऊ नका काहीपण.
संभाजीवर कुठली पुस्तके वाचुन
संभाजीवर कुठली पुस्तके वाचुन हे लिहिलेत ते तरी सांगा कि
नीट वाचत चला. अर्थ समजत नसेल
नीट वाचत चला. अर्थ समजत नसेल तर शाळेतल्या मुलांना विचारा. इतका वेळ काय झोपेत होता का?
आधी पोस्ट वाचा. (हे तुम्हाला
आधी पोस्ट वाचा. (हे तुम्हाला सांगण्यातही अर्थ नाही. पुन्हा पुन्हा सांगणे म्हणजे
ते तुमचे बगलबच्चे जे कैच्या कै पाजळताहेत ना त्यांना विचारत बसा प्रश्न.
नाही आता झोपतो. बघा जमल्यास
नाही आता झोपतो. बघा जमल्यास लिहा काहीतरी संभाजीवर.
कशासाठी लिहायचं ? आणि मला काय
कशासाठी लिहायचं ? आणि मला काय सांगता ? काय संबंध ? जमल्यास या प्रश्नांची उत्तरे द्या. कधीतरी अचानक पोस्टचा अर्थही लागेल. इतके बत्थड असाल असं खरंच वाटलं नव्हतं.
महामूर्ख युक्तीवादावर घालवायला वेळ नाही.
एकदा एक मनुष्य म्हणाला धावायच्या रेसमधे लोक घोडा कसे काय आणू शकतात ? मी पण तिथून कार आणली तर चालेल का ? तर तिथे कारचा तज्ञ समजणारा एक जण आला आणि म्हणू लागला सांगा टॉर्क म्हणजे काय, बीएचपी कशाला म्हणतात, वेट टू पॉवर रेशो काय असतो. त्या माणसाने करूण दृष्टीकोण टाकला आणि पुढे जाऊ लागला. मागचा विव्हळत राहीला, झाली का ततप्प, मारली का बगल....
तर ते असो. प्रकाश पडला तर पडला. नाहीतरी आपल्याला काय ?
सेनापती अॅडमिन आहेत का ? मी
सेनापती अॅडमिन आहेत का ?
मी अॅडमिनला प्रश्न विचारला होता की इथे लोक संदर्भाशिवाय काहीही लिहीत असतील तर मी सुद्धा संदर्भ सोडून फेसबुकवर व्हायरल झालेले हे तीन विषय इथे आणून चिकटवू का ?
यावर हे साहेब संदर्भ मागत असतील तर चित्रातल्या प्रमाणे त्यांच्या पाया का पडू नये ? यांना अधिक सुलभपणे सांगू शकेल असा या मायबोलीवर कोण आहे ? जर सेनापती हेच अॅडमिन असतील तर खुशाल काहीही आणून चिकटवा अशी परवानगीच त्यांनी दिलेली आहे किंवा आदेश दिलेला आहे असं समजून एक व्हिडीओ इथे चिकटवण्यात येत आहे.
https://www.facebook.com/kushal.deshmukh.906/videos/998097770213261/
हा व्हिडीओ काळजीपूर्वक पहा किंवा पाहू नका.
पण अॅडमिनला उद्देशून विचारलेल्या पोस्टबद्दल संदर्भ मागण्याचं तर्कट काय होतं हे इतर कुणाला समजलं असेल तर मेल मधे कळवावं ही नम्र विनंती. सर्वांनाच समस्या असेल असं होऊ शकत नाही यावर विश्वास आहे .
जिझिया अजिबात अन्यायकारक
जिझिया अजिबात अन्यायकारक नव्हता.
ज्याना युद्धात जायचे नसायचे त्याम्च्याकडुन तो गोळा केला जायचा.
युद्धाचा खर्च , युधात कामी आलेल्यांचे नातेवाइक अपंगग लोक यांची पूर्तता करण्याचे ते एक प्रॅक्टिकल सोल्युशन होते.
.....
एका महान धर्मातला एक राजा युद्धापुर्वी रडत बसला होता म्हणे. युद्ध होणार , माणसे मरणार , अपंग होणार ... मी काय करु ? राज्य कसे हाकू ?
देव बोल्ला ... मारतोही मीच , योगक्षेमही मीच बघेन . तु फक्त बाण मार !
पुढं त राज्य , पंगू ,विधवा .... काय झालं ... इचारायचं न्हाय बरं का !
........
त्यामानाने इस्लाम व औरंगजेब प्रॅक्टिकल होते. मूसलमान जकात भरतात. इतर धर्मातील स्त्रीया , मुले , रुग्ण व वृद्द वजा करा व इतरांकडून ( जर ते युद्धात जानार नसतील तर ) जिझिआ घ्या !
ऊगाच लढा आनि मरा ! मी निमित्तमात्र ! योगक्षेम देव बघेल ! असला भंपकपणा नाही.
...........
आजही सैन्यातील लोकाना स्वस्तात वस्तू मिळतात . आम जनता जास्त पैसे देऊन थोड्या महाग दराने वस्तू विकत घेते. हे काय ? न लढणार्या लोकांवर लावलेला ट्याक्सच ना ?
So we are exactly following Alamgeer Aurangzeb and not Geeta !!!!
सेनापती, ब्राम्हणांबद्दल
सेनापती,
ब्राम्हणांबद्दल पद्धतशीरपणे भावना भडकावण्याचे उद्योग सुरु आहेत.
बर्याच दिवसानी मिळालेला आयडी पुन्हा उडण्यापूर्वी शक्यं तितकी गरळ ओकून घेतली जात आहे.
कोणताही शेंडाबुडखा नसलेले आरोप आणि पर्सनल कॉमेंटस याचा आता काही दिवस रतीब सुरु राहणार.
औंगजेब वाइट नव्हताच. जर तो
औंगजेब वाइट नव्हताच.
जर तो वाइट होता तर थोर दैवतं त्याच्या दारात रांगेत उभे रहायला का जात होती?
माझ्या मुलाला वतनदार करा वगैरे पत्रेही कुणीकुणी लिहित होते म्हणे.
...
जो मायनस यांनी तांब्याच्या
जो मायनस यांनी तांब्याच्या खाणी टाकल्या वाटतं.
ब्राह्मणांनी लिहीलेला इतिहास हा हिंदू - मुसलमान दंगली भडकवण्याच्या दृष्टीकोणातून लिहीलेला आहे. औरंगझेबाचे शिवाजी महाराजांशी असलेले वैर हा साम्राज्याच्या विस्ताराचा भाग होता कि हिंदू वि. मुसलमान युद्धाचा भाग होता या प्रश्नाला ब्राह्मणी इतिहासकार हातोहात बगल देतात. इतिहासात चार्वाकापासून ते बौद्ध भिक्खूंच्या हत्यांचा इतिहास हा ब्राह्मणी धर्माचे वर्चस्व राखण्यासाठी केला गेला आहे हेच सांगतो.
जर औरंगझेबाचे युद्ध हिंदू धर्माशी असतं. तर मिर्झा राजे जयसिंहासारखे राजे त्याच्याबरोबर निष्ठा कसे काय बाळगून होते ? औरंगझेबाच्या एकाही सरदाराला शिवाजी महाराजांना हरवणे शक्य झाले नाही, पण तेच मिर्झा राजे जयसिंह महाराजांना पराभूत करतात. याबद्दल ब्राह्मनी इतिहासकार अवाक्षर काढत नाहीत. अफजलखान, शाहीस्तेखान , दौलतखान सारख्या सरदारांना हिंदू धर्मावरचे संकट अशा पद्धतीने रंगवणारे इतिहासकार आणि कादंबरीकार जयसिंहांच्या बाबतीत बोटाला कुलूप लावून बसलेले दिसतात.
संजय सोनवणी यांनी अत्यंत अभ्यासाने ब्राह्मणी धर्म आणि हिंदू धर्म वेगवेगळे असल्याचं सिद्ध केलं आहे. ज्याला हिंदू म्हटलं जातं त्यांच्या हिंदू या धर्माचं नाव मुस्लमान या देशात येन्याआधी एकाही देशी ग्रंथात दिसत नाही. म्हणजेच ब्राह्मण हे वेगळे असल्याने मुसलमानांविरुद्ध पद्धतशीरपणे भडकावून स्वतःला हिंदू म्हनून लीडर बनण्ञाचे हे कारस्थान आहे.
त्यामुळे ब्राह्मणांचा इतिहास तपासून मगच स्विकारलेला बरा.
इथल्या लेखाचं प्रयोजन सुद्धा शेंडा ना बुडखा असल्याचं मागेच म्हटलं साव़काशीने लेखाचा हेतू याबद्दलची चिकित्सा करूच. पण लेख देणा-याने प्रमाणित भाषांतरं का दिलेली नाहीत याचा उलगडा होत नाही.
ती औंगजेबकालीन पत्रेही सुंदर
ती औंगजेबकालीन पत्रेही सुंदर आहेत. निळा , चॉकलेटी , पांढरा किती सुंदर सुंदर कागद त्या काळात बनायचे नै !
उडया मस्त मारता. अनेक आयडी
उडया मस्त मारता. अनेक आयडी असल्याने सवय असेलच.
बर आता शिवाजीने जयसिंगला लिहिलेले पत्र वाचा. नाहीच जमले तर उलटया कमेंट्स करा. गाढव डुक्कर असे नवे फोटो टाका पण थांबू नका. खुप छान लिहित आहात
सेनापती मायबोलीचा इतिहास
सेनापती
मायबोलीचा इतिहास चान्गला होता, पण भविष्य मात्र घाणेरडे दिसतय.:फिदी:
सेनापती यांनी विचारलेल्या
सेनापती यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर सुनियाद अजिबातच देऊ तर शकले नाहीतच,
पण वर अतिशय हिणकस, फालतू आणि फक्त ब्राह्मणद्वेष उभा करणारे विचार मात्र उच्चरवाने लिहित बसले आहेत. असे जोरजोरात अरेरावीच्या भाषेत लिहिल्याने काही होणार नाहीये.
>>ठराविक लोक नेहमीच मुजोर कसे काय वागू शकतात ? नेहमीच यांना चार चार आयडीज घेईपरपर्यंत प्रशासन कसं काय झोपी गेलेलं असतं. काही लोकांना एकही आयडी उरणार नाही ही दक्षता कशी काय घेतली जाते ?
जे स्वतः चुकीचे वागत आहेत त्यांनी साळसूदपणाचा आव आणून स्वतः खुप चांगले असल्याचे भासविणे याचे उत्तम उदाहरण आहे हे.
माझे कोणाशीही कसलेच वैर नाहीये, पण हे असले विखारी विचार पसरून मने कलुषित केली जात आहेत ते पहावत नाही. तसेच ज्या वाचकांना या ब्रिगेडी षडयंत्राची कल्पना नाही त्यांचा बुद्धीभ्रम होऊ नये ही एक प्रामाणिक इच्छा आहे.
या लोकांच्या बाष्कळ बडबडीतले प्रत्येक मुद्द्दे घेऊन त्याचा प्रतिवाद करत बसण्याएवढा वेळ आणि एनर्जी नाहीये.
Pages