कोणती गाडी घ्यावी?

Submitted by साजिरा on 15 October, 2009 - 07:51

इतक्या गाड्या नि कंपन्या बाजारात आहेत, की निर्णय घेताना गोंधळ होणे साहजिकच असते. एकट्या मारुती-सुझुकीच्याच डझनावारी गाड्या आहेत. त्यात पुन्हा पेट्रोल, डिझेल शिवाय फीचर्स कमी-जास्त करून तयार केलेली मॉडेल्स. अधिक फीचर्ससाठी पन्नासेक हजार किंवा लाखभर रुपये बजेट वाढवावे, तर मग आणखी थोडे पैसे देऊन थोडी मोठी, यापेक्षा चांगली गाडी का घेऊ नये हा प्रश्न उभा रहतो. प्रत्येक कंपनीची, ब्रँडची एक इमेज आपल्या मनात ठसलेली असते. जुने बरेवाईट अनुभव पण पदरी असतात. शिवाय आपल्यापैकी बहुतेक जण कमी-जास्त फायनान्स घेऊनच गाड्या विकत घेतात. हे सारे टप्पे ओलांडून अनुभवलेली निर्णयप्रक्रिया म्हणाजे एक मोठा प्रवासच.

काही मॉडेल्स 'इंटरनॅशनल' असली, तरी भारतीय (छोटे) रस्ते अन गर्दीची (कोण बोललं रे ते- 'बेशिस्तीची म्हण की सरळ!') वाहतूक लक्षात घेता 'स्मॉल कार्स' अन 'मिडसाईझ सेदान कार्स' अर्थातच जास्त विकल्या जातात. यात पुन्हा 'गियरवाल्या' की 'ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवाल्या' हेही आहेच. लक्झरी कार्स, सुपरलक्झरी कार्स, मल्टियुटिलिटी कार्स, स्पोर्ट्स युटिलिटी कार्स आणि स्पोर्ट्स लक्झरी कार्स - या सार्‍यांचाही आपापला चाहता वर्ग. सेगमेंट आहेच आहे.

तुमचे काय मत आणि अनुभव? नवीन गाडी घेणार्‍या मायबोलीकराला थोडीफार इनपुट्स मिळाली, तर तो दुवा देईल; अन भेटलाच, तर त्याच्या नव्या गाडीतून पार्टीला घेऊन जाईल- हा हेतू. Happy

याशिवाय इथेच दुचाक्या, नवीन लाँचेस, भारतातले बदलते ट्रेंड्स आणि एकूण वातावरण, इंटरनॅशनल मॉडेल्स आणि ट्रेंड्स, मेंटेनन्स टिप्स यांबद्दलही कृपया लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आडीच लाख देऊन २०१२ (ऑलमोस्ट ४ वर्षे जुनी) ची ऑल्टो पेक्षा नवी नॅनो काय वाईट?
नॅनोही कमीत कमी ४/५ वर्षे तरी वापरली जाईलच की! आणि नवीन गाडीला तुलनेनी मेंटेनन्स कमी येईल.

रिट्ज, झेस्ट कि पोलो ?
आठवड्यात एकदा मुंबई, बाकी पुण्यात १०-१५ कि.मी रोज. कवचित एकांदा लांब पल्ल्याचा प्रवास.

झेस्ट आणि पोलो ची ऑन रोड स्टेबिलिटी हा प्ल्स पॉईंट आहे. (मुंबई आणि लांब पल्ल्याचा इ. प्रवास).

बाकी मग पुढे, डिझेल-पेट्रोल-व्हेरियंट्स-रनिंग-प्रॉयॉरिटीज यांची त्रैराशिके मांडून..

I didn't like Zest during test drive. Polo is good. Maruti is going to stop Ritz. Also consider Swift / Dzire / Toyota New Liwa also
Buy any car but don't compromise on Safety features for cost. Air bags, ABS EBD is must.

मेधाव्ही
santro & ritz big no

झेस्ट आणि पोलो ची ऑन रोड स्टेबिलिटी हा प्ल्स पॉईंट आहे. (मुंबई आणि लांब पल्ल्याचा इ. प्रवास).

साजिर्‍यास अनूमोदन

Honda Mobilio / Maruti Suzuki Ertiga / Chevrolet Enjoy / Mahindra Xylo
माबोकर काय सल्ला द्याल.. वर्षातुन किमान ३ वेळा गोवा जाणे होते.. इतर वेळेस मुंबै.. आणि गाडि घेतल्यावर भारत भ्रमण चा विचार आहे..

१) Ertiga ( maruti guaranty )

2) Mobilio ( last row is useful for childrens only)
but Honda engine specialist in smoothness

3) Enjoy : no idea

4) Xylo : Naka gheoo

डोंबिवली शो रूम ला टेस्ट ड्राईव्ह १० ऑ़़क्टोबर नंतर ऊपलब्ध होईल असे सांगितले आहे.

टॉप मॉडेल काहीतरी ४.३० लाख , ड्रायव्हर एअर बॅग्ज सहीत असे कळाले..

लैच कन्फ्युजन झालाय! ५०० किमीच्या आसपास ऑफिस जाणे येणे आणि दोनेक विकांताच्या ट्रीप साधारण ३५० - ४०० किमी (राउंड ट्रीप, तेही हिवाळा किंवा पावसाळ्यातच) इतका वापर राहील . Air bags, ABS EBD आवश्यक झालेत! आता ह्या वापरासाठी पेट्रोल घेऊ की डीझेल त्यात अडकलोय.

आणि शेवटच, एखाद दोन ट्रिप्स आईवडिलांसह होतील, म्हणजे ५ सीटर कार हवी, आणि ५व्याला अडचण नको.
XCent and DZire प्रचंड आवडली आहे, पण ह्या फीचर्ससह डीझेल व्हर्जन ह्या गाड्यांच बजेटच्या (६ लाख On Road) बाहेर जातंय.

आयटेन किंवा इतर कोणती गाडी व्यवस्थित राहील? मारुती स्विफ्ट एवढी आवडलेली नाही. माझा महिनेवारी वापर इतका नाहीये (कारसाठी इतका नसेल, कारण नुकतीच भारी दुचाकी घेऊन झालीये)

१० वर्ष जुनी मारुती काढून आता नवी घ्यायचीय म्हणून ही उठाठेव.

५०० किमी महिन्याचं रनिंग म्हणत असाल तर डिझेल करता कमी होईल माझ्यामते अन पेट्रोल करता थोडसंच जास्त ;). तरीही जर रोज वापरणार नसाल गाडी तर पेट्रोल बरी. तसेही पेट्रोल चे रेट्स सध्या स्टेबल अन फार वरही नाही असे आहेत.

सहा लाख ऑन रोड मध्ये, (पेट्रोल) होंडा जॅझ, ब्रिओ, मार्वत्ती मध्ये बरेच पर्याय, नवीन येऊ घातलेली फिगो इ पर्याय (+ अजून बरेच) आहेत.

जागा + सेडेट ड्रायव्हिंग असेल तर जॅझ पाहा. अगदी भरपूर जागा आहे. वेल इन बजेटही. पण सिटीड्राईव फार काही मजेची नाही, कारण होंडा एंजिन्स च्या बॉटमएंड्ला टॉर्क यथाथताच आहे. मिड अन टॉप रेंजमध्ये (अर्थात हायवेजवर) या गाड्या मस्त चालतात.
सिटीतही अगदीच काही डेड नसतात अर्थात. फ्रिक्वेंट डाऊनशिफ्ट मात्र लागतो. (सेम अप्लाईज टू ब्रिओ)

डिझायर पेट्रोलही बसेल (बहुतेक).

एकदम टॉपनॉच इंटीरीअर क्वालिटी अन क्लास हवा तर पोलो

एक्विपमेंट ची भरमार हवी असेल तर आयटेन ग्रँड, एलीट आयट्वेंटी

राईड क्वालिटी, सिटींग पोश्चर एकदम छान, पण ठीक ठीक इंटीरीअर (रादर काँम्प्रोमाईझ्जड) तर टोयोटा एतिऑस लिव्हा पण पाहा

टाटाकडे जायचं असेल तर बोल्ट/ झेस्ट हेही पर्याय आहेत. पेट्रोल स्मॉल कार्स मध्ये टर्बोचार्ज्ड एंजिन्स असणारी ही फक्त २ मॉडेल्स आहेत. आफ्टरसेल्स च्या नावानी चांगभलं.

जनरली १.२ लिटर्स चे एंजिन्स सिटीत (विन एसी) १२/१३/१४ पर्यंत मायलेज देतात. अन हायवेवर १७/१८/१९ पर्यंत. अर्थात हे आपापल्या ड्रायव्हिंग स्टाईलवरही अवलंबून आहेच.

(अर्थात हे माझ निरिक्षण आहे)

दिवाळी येऊ घातलीय, त्यामुळे मस्त बार्गेन करून ऑफर्स मिळवा. हॅपी मोटरींग.

डिटेल प्रतिसादाबद्दल धन्यवाद योकू Happy ! जवळपास हाच विचार करत करत डिझायर, Grand I10 आणि XCent शोर्ट लीस्ट केलीय आत्तापर्यंत. मुद्दलात १० वर्ष ओम्नीच चालवत असल्याने कोणतीही गाडी घेतली तरी मला ड्रायव्हरच्या दृष्टीने प्रचंड आरामदायक वाटणारे Proud त्यामुळे ड्रायव्हिंग क्वालिटी, पोश्चर, सिटी रायडींग वगरे थोडेफार कोम्प्रोमाइझ होऊ शकेल.

पोलोचा टेस्ट ड्राइव्ह घ्यायचाय, फक्त आफ्टरसेल्स सर्विसबद्दल काहीही आयडिया नाही. नुकत्याच प्रदूषण पातळीसंबंधी झालेल्या घोटाळ्यामुळे त्यांनी भारतात काय काय केले असेल ह्याची भीती वाटते.

सेम विथ होंडा. इंजिन क्वालिटी चकाचक आहे, पण बाकी आफ्टरसेल्स सर्विसबद्दल नॉट शुअर.

ह्युंदाईची आफ्टर सेल्स सर्विस मारुतीच्या जवळपास जाणारी असल्याचे ऐकलेय आणि मारुतीच्या तुलनेत फीचर्स आणि एक्विपमेंट क्वालिटी बरी आहेत, शिवाय आंतरजालावर रिव्ह्यू चांगले वाटले.

मारुतीवाले काहीच बार्गेन करत नाहीत Proud दुष्ट लोक्स! ह्युंदाईवाले एक्स्चेंज बोनस तगडा देऊन राहिलेत शिवाय, इन्शुरन्स माफ केलाय. आता हे घेऊन मारुतीशी निगोशिएट करण्याचा (निष्फळ ?) प्रयत्न करून पाहिल.

डीझेल इंजिनात अजूनही रोज वापरणार नसलो तर प्रॉब्लेम होतात का?

अनिरुद्ध, होंडाचा गेले वर्षभर वापर आहे. नो इश्यूज आतापर्यंत. ११००० किमी झालेत ब्रिओ ला. अगदी खेड्यांच्या रस्त्यांवरूनही चालवली. मेंटेनन्स ही परवडेबल. आताच दुसरी पेड सर्वीस झाली. वेल इन बजेट. ३.५/४ के खर्च आला. तोही मेनली ऑईलचेंज मुळे.

पोलो माझ्या मॅनेजरकडे आहे. पोलो पेट्रोल १.२ हायलाईन. दोन वर्षांपुर्वी त्याला ६ का ७ लाखाला पडली. पण त्याचं ड्राईविंग फक्त सिटिंत होतं. प्रत्येक सर्वीसिंग ला ६ ते ८ हजार लागतात, ही माहिती काढलीय मी त्याच्याकडून Wink

ह्युंदाई/ मारूती नो प्रॉब्लेम अर्थातच

मीही होंडा कडे वळलो कारण माझ्या बाबांकडे मारूती आहेच आधीपासून.

डीझेल इंजिनात अजूनही रोज वापरणार नसलो तर प्रॉब्लेम होतात का?>>>
नाही पण जर रनिंग जास्त नसेल तर डिझेल वर्सेस पेट्रोल मध्ये पेट्रोल विन्स. कारण, इनिशिअल पे जास्त करावं लागतं. ऑलमोस्ट १ ते १.२५ लाख जास्त द्यावे लागतात. इन दॅट केस सरळ हिशोबात रन जास्त नसेल तर... Uhoh

मी ह्युंदे चा फॅन आहे. आधी माझ्याकडे आय-१० स्पोर्ट्स होती.
आता सध्या वर्ना फ्लुईडिक आहे. दोन्ही मधे कधीही रस्त्यात उतरायची वेळ आणली नाही गाड्यांनी.
सर्व्हिसम्धेही काही त्रास वगैरे किंवा अडचणी आल्या नाहीत. आणी हो रुटीन सर्व्हिसशिवाय वेगळी दमडी खर्चावी लागली नाही, हा बोल्ट पडला, पाईप फाटला, आवाज येतोय, वायर शॉर्ट झाली असले प्रकार देव आणी ह्युंदे कृपेने झाले नाहीत.
दिलेल्या सुविधांमधे मी नेहमी त्यांना ९+ रेट करत आलोय त्यांच्या सेवेबद्दल.

मारुतीचं मला " कोणतीही गाडी घ्या (कितना देती है साठी) त्यांचे हॅचबॅक काय नी सेडान काय टायर आपले तेच.
हेमावैमआकोअंधायेन.

जेबॉ, तेच मला मारूतीचं नाही आवडत. अग्दी लेटेस्ट एस-क्रॉसलाही अलॉईज अन आतले दरवाज्याचे बटन्स स्विफ्ट्चे दिलेत. प्राईस मात्र लई भारी घेतात. १.६ डीडीआयएस एंजिनच्या टॉप मॉडेल करता चक्क १४ लाख + (ओटीआर)! बाबौ! इतकं असूनही गाडी ५ सिटर.
त्यापेक्षा एक्सयूव्ही का नको घ्यायला. ७ सीटर. नको असेल तर मागच्या सिटा पाडून टाकून बूट स्पेस तयार.

कोणतीही गाडी घ्या (कितना देती है साठी) त्यांचे हॅचबॅक काय नी सेडान काय टायर आपले तेच
>>

येग्झाक्टली. थोडंस V सीरीज मध्ये थोडेफार फीचर्स देतील आणि Z सीरीजमध्ये पूर्ण फीचर्स. ते पण महागडे.

१.६ डीडीआयएस एंजिनच्या टॉप मॉडेल करता चक्क १४ लाख + (ओटीआर)! बाबौ! इतकं असूनही गाडी ५ सिटर.
>>

ऑ? खरच की. आज पाहिलं, एस क्रॉस अपर व्हर्जन १४ लाख! भारी आहेत आणि घेणारी पण भारी असतील Wink

Yes Maruti is like that only. I purchase Dzire Zxi @ 7.88 lacs with all features. However if you see Lxi it will be very cheap. Earlier I was planning for Polo or i20 but Maruti's exchange offer was much better. (1.9 lacs for 2010 Alto K10) + tie with SBI for car loan. Dzire Zxi is very good car. Have all safety features, specious interiors. Overall nice driving experience.

खरं पहायला गेलं तर गाडीमधे कंफर्ट शोधायला लोकं मागच्या ५/१० वर्षात लागलेत, त्यापुर्वी * गाडी घेण्याअगोदर अ‍ॅव्हरेज किती ? हा मोठा प्रश्न असायचा. भारतीय मानसिकतेत तेच भिनलय आणी मारुती वाले त्याचाच फायदा उचलत आहेत.
पैसा मस्तपैकी वाजवुन घ्यायचा पण त्या पैश्याना वाजवी अस मुल्य पुरवायच नाही. टायरचं तेच मधल्या सोयि-सुविधांच पण तसच, पण जेव्हापासुन बाहेरच्या गाड्यांनी सुविधा पुरवायला सुरुवात केली तेव्हा ह्यांच्या मदतीला कितना देती है ? हेच आल म्हणुन चालतय.

म्हणूनच तर मार्वत्तीच्या ८/१० लाखांवरच्या गाड्या खपतच नाहीत. सगळीचकडे तेच ते असल्यावर मग अजून काय होणार. + आता बाकी कंपन्यांची मॉडेल्स जास्त चांगली आहेतच. कंझ्युमर ला जास्त पर्याय उपलब्ध आहेत प्रत्येकच सेगमेंट मध्ये.

त्यात त्यांची डिझेलची भट्टी फियाट्च्या १.३ एंजिनानी एकदाची जमली. तर लग्गे हात सगळ्याच मॉडेल्स चे डिझेल व्हेरीएंट्स त्याच एंजिनाचे काढलेत. रेश्योही बदलले नाहीत बर्‍याच गाड्यात तर. असोच. पर्याय आपला आपला Wink

आज ऑफिसला येताना पुढे फॉर्च्युनर होती अचानक हा धागा आठवला आणी ते मारुतीचे टायर पण. मनात विचार आला जर का फॉर्चुनर मारुतीची गाडी असती तर तिलाही ते वॅगन-आर चे/सारखे टायर लावले असते, मग गाडी मुडदुस झाल्यासारखी दिसली असती.

मार्वेतीचं अजून एक पिल्लू. बलिनो २०१५
- सेम स्विफ्ट्चे एंजिन्स. १.२ के सिरीज पेट्रोल (८२बिएच्पी) आणि सेम १.३ फियाटचं (७३ बिएच्पी) डिझेल.
आता पाहायचं किती पार्ट्स दुसर्‍या मॉडेल्स बरोबर शेअर केले जातात ते.
- ही गाडी, प्रिमिअम हॅच म्हणून असणार आहे. स्पर्धक - एलिट आय२०, पोलो, पुंटो, नवीन आलेली फोर्ड फिगो, टाटा बोल्ट इ.
- एसक्रॉसप्रमाणेच याचेही व्हेरिअंट्स असतील. अल्फा, झिटा, डेल्टा आणि सिग्मा.
- किंमत - ६ ते ९ लाख!
- नेक्सा शोरूम्समधूनच ही गाडी विकल्या जाईल.

Pages