एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी?

Submitted by मामी on 11 August, 2015 - 09:24

रोजचा पेपर हातात घेतला की अगदी रोज बलात्कार, स्त्रियांवरील अत्याचार, लहान मुलींना शाळेत जाता येता सहन कराव्या लागलेल्या भयानक घटना असल्या किमान पाच बातम्या तरी सापडतातच. नक्की काय बिघडतंय???? का पुरुषी मानसिकता दिवसेंदिवस इतकी भयानक होत आहे ? कसं काय बदलायचं हे चित्रं ? स्त्रियांनी आपापल्या मुलांना घरीच लहानपणापासून शिकवण द्यावी हे योग्यच आहे. बर्‍याचजणी अगदी जाणीवपूर्वक हे करतातही. पण ही केवळ स्त्रियांचीच जबाबदारी नाहीये.

पुरुष म्हणून तुम्ही काय करता? जर रस्त्यात कोणी कोणाला त्रास देत असेल (आणि हे सर्रास घडतं) तर एक पुरुष म्हणून तुम्हाला लाज वाटते का? हे चित्रं बदलण्याची जबाबदारी पुरुषांना कशी घेता येईल? समाजातला (काही कारणांमुळे) सबळ घटक जो पुरुष आहे त्यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन आपल्याच गटातील लोकांची मानसिकता बदलण्याची तयारी आणि हिंमत दाखवली तर काही बदलू शकेल का? दरवेळी स्त्रियांकडून बदलाची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी ओळखून अशी घाणेरडी आणि कीडलेली पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी समाजातील समंजस आणि सेन्सिटिव्ह पुरुषांची भुमिका कशी असावी? समाजातील स्त्री आणि लहान मुलांसाठी सुरक्षित समाज कसा निर्माण करता येईल?

या धाग्यावर स्त्रियांनी कसं वागावं, कसे कपडे घालावेत, किती वाजता घरी परतावं, कोणकोणत्या जागा टाळाव्यात वगैरे मुद्दे अपेक्षित नाहीत. यांवर अनेकवेळा चर्चा झाली आहे. आता पुरुषांकडून काही चांगल्या आणि ठोस बदलांची अपेक्षा आहे. यातून काही शॉर्टटर्म तर काही लाँगटर्म अ‍ॅक्शन पॉइंटस जमले तर उत्तम. शिवाय या निमित्ताने आपलेच विचार तपासून घेऊ शकलात तरीही तो एक महत्त्वाचा टप्पा ठरेल.

माझ्या या धाग्याला पुष्टी देणारी एक बातमी आताच वाचनात आली. आणि हा धागा अजिबात चुकीचा नाही हे लक्षात येऊन समाधान वाटलं. http://www.india.com/showbiz/anupam-kher-appointed-un-ambassador-for-gen...

HeForShe : KEY MESSAGES

* Gender inequality is one of the most persistent human rights violations of our time. Despite many years of promoting gender equality, inequalities among women/girls and men/boys continue to manifest in egregious ways around the world

* HeForShe is a solidarity movement for gender equality that engages men and boys as advocates and stakeholders, to break the silence, raise their voices and take action for the achievement of gender equality

* Gender equality is not only a women’s issue, it is a human rights issue that affects all of us – women and girls, men and boys. We all benefit socially, politically and economically from gender equality in our everyday lives. When women are empowered, the whole of humanity benefits. Gender equality liberates not only women but also men, from prescribed social roles and gender stereotypes.

ABOUT THE CAMPAIGN

HeForShe is a solidarity movement for gender equality developed by UN Women to engage men and boys as advocates and agents of change for the achievement of gender equality and women’s rights. The campaign encourages them to speak out and take action against inequalities faced by women and girls.

अधिक माहिती :

https://en.wikipedia.org/wiki/HeForShe

http://www.heforshe.org/

***********************************************************************************************************
अरुंधती कुलकर्णी

पुरूषांची सामाजिक जबाबदारी -

१. सोशली वावरताना व वैयक्तिक आयुष्यात कोणा स्त्रीची संमती नसताना आणि तिच्या परवानगीशिवाय तिला स्पर्श करायला जाऊ नये. चुकून स्पर्श झाला तर माफी मागावी व हे 'संस्कार' मुलांवरही करावेत. अर्थात मैत्रीतले संकेत वेगळे असतात.

२. 'दिसली जरा बरी बाई की न्याहाळ तिला' हे सोडून द्यावे. इतर कोणी करत असेल तर त्यात काही भूषण नाही, हिरोगिरी नाही हेही आपल्या वागण्यातून व्यक्त व्हावे (आणि मुलांना समजावावे). काय करणार, बॉलिवूड पिक्चर्समुळे लोकांचे भलभलते गैरसमज झाले आहेत.

३. जसा तुम्हांला रात्री-बेरात्री किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी फिरायचा, हिंडायचा हक्क आहे तसाच तो स्त्रियांनाही आहे हे आपल्या मनात पक्के कोरून घ्यावे. कोणी स्त्री एकटी वा आणखी कोणाबरोबर अशा ठिकाणी / वेळी वावरत असेल तर त्यावरून तिला उपद्रव देऊ नये किंवा लगेच तिच्या चारित्र्याबद्दल बेधुंद आडाखे बांधून तसे वागायला जाऊ नये.

४. कोण स्त्री कशी वावरते, काय घालते, कशी वागते यावरून लगेच तिचे चालचलन, चारित्र्य यांबद्दल शेरेबाजी, तिच्याशी त्यानुसार वर्तन हेही टाळावे.

५. तुम्हांला कोणत्याही स्त्रीचा कितीही राग आला, मग भले ती तुमची बायको किंवा मुलगी का असेना, तिला सार्वजनिक ठिकाणी किंवा चार लोकांदेखत तुच्छतापूर्वक, अवमानित करणारी वागणूक देणे, तिला शिव्या देणे, तिची अक्कल काढणे हे तर टाळावेच.

६. व्यसन हे जसे एखाद्या पुरूषासाठी 'रिलीफ' (!) आहे तसेच ते बाईसाठीही आहे.जसे एखादा पुरूष केवळ तो 'दारू पितो', 'सिगरेट ओढतो', 'तंबाखू खातो' म्हणून वाईट होत नाही तसेच स्त्रीचेही आहे हे मनावर पक्के कोरून घ्यावे व त्यानुसार आपली वागणूक असावी. केवळ पबमधये जाते, बॉयफ्रेंडबरोबर रात्री बेरात्री हिंडते, अनेक मित्रांबरोबर दिसते, अमुक प्रकारचे कपडे घालते म्हणजे ती बाई चारित्र्याने खराब अशी चुकीची मते बनवून त्यांवरून तिला बदनाम करणे वा पर्सनली / प्रोफेशनली त्रास देणे टाळावे. आणि तुमच्या मते एखादी बाई चारित्र्याने (!) खराब असेलही, पण तिला तिचे आयुष्य आपल्या मनाप्रमाणे (व कायद्याच्या कक्षेत राहून) जगण्याचा पूर्ण हक्क आहे व तो हक्क तुम्ही डावलू शकत नाही हेही मनावर कोरून घ्यावे.

७. घरातील काम क्षुद्र, हलके, कमी प्रतीचे मानणे सोडून द्यावे. घरातील किंवा बाहेरील कोणतेही वैध काम हलके नसते. ते करणारी व्यक्ती हलक्या दर्जाची ठरत नसते. मुलांचे संगोपन, घरकाम, बायकोला मदत यासाठी कोणी पुरूष सहकारी वेळ देत असेल तर त्याबद्दल त्याला खिजवू नये. जमल्यास कौतुक करावे. प्रोत्साहन द्यावे. पैसे मिळवणे हे जसे पुरूषांचे काम समजले जाते (व आता बायकांचेही), तशीच घरकाम - मुलांचे संगोपन हीदेखील पुरूषांची कामे आहेत हा संस्कारही मनावर पक्का करावा. त्यानुसार वागावे. तुमच्या वागण्यातूनच पुढची पिढी अर्थबोध घेईल.

८. सार्वजनिक कार्यक्रमांत स्त्रियांची मुद्दाम होऊन टवाळी करणारे, खिजवणारे किंवा अवमानित करणारे वक्तव्य / वर्तन मंचावरून होत असेल तर जमल्यास आपली नाराजी नोंदवावी. तसे जमत नसेल तर अशा कार्यक्रमातून बाहेर पडावे.

९. प्रोफेशनल रिलेशन्समध्ये एखाद्या हुद्द्यावरची व्यक्ती केवळ स्त्री आहे म्हणून तिच्या कार्यक्षमतेबद्दल शंका घेणे टाळावे. तिला बढती मिळाली किंवा यश मिळाले की लगेच तिने ती / ते आपल्या रूप/रंग/संबंधांमुळे मिळवली / ले असे(च) निष्कर्ष काढणे टाळावे.

***********************************************************************************************************

अंजली

बर्‍याचजणांनी आपले अनुभव लिहीले आहेत. अनुभव म्हणून वाचतानाही थोडं अस्वस्थ वाटलं. पण काही पोस्ट्स सोडता मामीच्या 'एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी' या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. By looking at a bigger picture - खालील प्रश्नांची उत्तरं कुणी देईल का? प्रश्न भारत आणि भारताबाहेरचे देश दोन्हीकडे लागू आहेत.

१. स्वतःच्या मुलाला संस्कार म्हणा किंवा वर्तुणकीचे धडे म्हणा देताना नुसते सांगता की स्वतःच्या वागणुकीतून दाखवून देता? साधं उदाहरण म्हणजे बायकोशी बोलताना बरोबरीच्या नात्यानं, तिचा अपमान न करता, तिला / त्या नात्याचा आदर ठेवून बोलता की 'ह्या काय तरी बिनडोकसारखं बोलू नकोस', 'तुला समजत नाही त्यातलं बोलू नकोस' अशा प्रकारची वाक्यरचना असते?
२. अडनिड्या वयातला मुलगा पोर्न बघताना सापडला तर त्याला फोडून काढणार की त्याला समजून घेऊन, त्याच्याशी संवाद साधून त्याच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं देणार?
३. तो कधी मुलींबद्दल घाणेरड्या कॉमेंटस करत असताना तुम्ही ऐकल्या तर तुमची काय प्रतिक्रीया असेल? हसण्यावारी नेणार की त्याला त्याची चूक (म्हणजे त्याचं वागणं तुम्हाला चूक वाटल्यास) समजवून देणार?
४. रस्त्यात कुणी जर एखाद्या मुलीची / बाईची छेड काढत असेल तर तुम्ही काय करता? दुर्लक्ष करून निघून जाता की बघत उभे रहाता की त्या विरूद्ध काही करता?
५. ऑफिसमधे, मित्रांमधे स्त्रियांबद्दल घाणेरडे विनोद केले जातात तेव्हा तुमची प्रतिक्रीया काय असते? तुम्ही निषेध व्यक्त करता का? किंवा तुम्ही स्वतःने असे विनोद कधी केले आहेत का?
६. तुम्हाला मुलगीही असेल तर तिला एक नियम आणि मुलाला दुसरा असं तुमच्याकडून होतं का? का?
७. कुठल्याही स्त्रीनं कुठल्याही गोष्टीसाठी नकार दिला तर तुम्हाला तो अपमान वाटतो का?
८. 'बायकी बोलणं', 'बिनडोक बायका' असे शब्दप्रयोग घरात मुलासमोर केले जातात का?

एकूणच कुठल्याही स्त्रीकडे एक स्वतंत्र 'व्यक्ती' म्हणून तुम्ही बघू शकता का?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा एक अनुभव मी शेअर करतिय.सांताक्रुझहुन बेलापुरला जाणार्‍या बसचा प्रवास होता स्त्रीयांच्या सिटवर जागा न मिळाल्या मुळे मागे एका सिटवर मी बसले शेजारी एक मुलगा येऊन बसला शेजारीच असल्यामुळे दंडाला पायाना थोडाफार स्पर्ष होणार हे गृहित धरुन होते.पण पोरग जरा जास्तच रेलायला लागल.हात पाय जास्तच खेटायला लागला हे हेतुपुरस्सर आहे हे लक्षात आल्यावर त्याचे मनगट मी माझ्या हातात पकडुन म्हटले बाळा तुझ्या वयाचा घरात मुलगा आहे मला निट बसजरा तुझ्या आईला पण असाच करतोस का? तो बिच्चारा एवढा वरमला की पुढच्या थांब्याला उतरुनच गेला.

इथे जर सगळेच आदर्श लोक आहेत तर या सगळ्या मुल्यशिक्षणाचा नक्की उपयोग कुणाला आहे?
सगळे लोक आरुनफिरुन तेच बोलतायात

मी नाही पण आमचे बरेच नातेवाइक त्या भागात आहेत, पण हे अवांतर.
माझा मुद्दा हा आहे की नक्की कोण कुणाला कसे वागायला शिकवतय?

बुमरँग, इथे आपल्याला माहिती असलेले मुद्दे घासून पुसून लखलखित करतोय.
आपल्याला हे माहिती असेल , आपण आचरणात आणतही असाल तरी आपल्या मुलांपुढे, आपल्या सहकार्‍यांपुढे ,आपल्या वरिष्ठ किंवा कनिष्ठांकडे, आपल्या मित्रमंडळात हा विषय कसा मांडावा, मुद्दे कसे स्पष्ट करावे याबद्दल इथून प्रेरणा किंवा मार्गदर्शन घेऊ शकता.
लैंगिक अपराध किंवा उघडउघड स्त्री पुरुष भेदभाव न करणारे ९० टक्केहून अधिक भारतीय पुरुष घरात तरी स्वतःला घरातल्या स्त्रीयांपेक्षा उच्च समजतात, अपमान करतात हे भारतीय समाजातले चित्र आहेच. त्यामुळे मायबोलीवरचे पुरुषही याला अपवाद असतील असे वाटत नाही.

>>> आपल्या मुलांपुढे, आपल्या सहकार्‍यांपुढे ,आपल्या वरिष्ठ किंवा कनिष्ठांकडे, आपल्या मित्रमंडळात हा विषय कसा मांडावा, मुद्दे कसे स्पष्ट करावे याबद्दल इथून प्रेरणा किंवा मार्गदर्शन घेऊ शकता.<<<

प्रतिसादातील हा भाग आवडला.

इथे जर सगळेच आदर्श लोक आहेत तर या सगळ्या मुल्यशिक्षणाचा नक्की उपयोग कुणाला आहे?
>>>>>

सगळेच आदर्श आहेत हे तुम्ही उपरोधिकपणे लिहिले असावे, पण ते योग्यच आहे.
कारण सगळेच आदर्श असणे पुढची गोष्ट, मुळात कुठलीही एखादी व्यक्तीही पुर्णपणे आदर्श नसतेच.

पण आपला आदर्शपणाकडचा प्रवास आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चालूच राहावा यासाठी अश्या चर्चा कामी येतात.

आता ईथे जरी एखादी व्यक्ती, चला उदाहरण म्हणून मी स्वतःलाच घेतो. जरी मी प्रत्यक्ष आयुष्यात एक वाह्यात व्यक्ती असेल पण इथे मुद्दाम पब्लिक फोरम वर आदर्शवादी पोस्ट टाकत असेल, तर याचा अर्थ मला जनाची लाज आहे. मी जसा आहे ते मी लोकांपासून लपवू पाहतोय. याचा अर्थ किमान मला मी काहीतरी चुकीचे वागतोय जे चारचौघांत कबूल करू शकत नाही ईतके तरी समजलेय. मग ही तुमची आदर्शवादाकडे प्रवास करायची सुरुवात झाली. स्वत:ची चूक समजणे. साहजिकच मग ईतरांच्या पोस्ट वाचून काय करावे हे देखील समजत जाते. काय फरक पडतो जर मी इथे प्रामाणिकपणे मी वाह्यात आहे हे कबूल करत नाही, पण यापुढे वाह्यातच बनून नाही राहिलो, थोडाजरी सुधारलो, तर ते धाग्याचे यश आहे.

धाग्याचा हेतू इथे कोणाला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणे नसून सुधारणा करणे, बदल घडवणे असा हवा आणि तो हेतू अश्या चर्चांमधून कमी अधिक प्रमाणात साध्य होतो. मला स्वताला चार नवीन गोष्टी समजल्या. आणि साती यांनी वर म्हटल्याप्रमाणे येथील चर्चा आणि मुद्दे मी आणखी कुठेतरी मांडून त्याचा प्रसार करू शकतो.

माझ्यामते सर्वच पुरुष हे स्त्रीयांना भोगवस्तू समजतात,फारच कमी पुरुष े संवेदनशील असतात स्त्रीयांच्या बाबतीत.जगभरात हीच परीस्थीती आहे, प्रगत देशात स्त्रीयांच्या सेफ्टीचा प्रश्न जास्त गंभीर नाही ,याचे मला खालील कारण वाटते.
प्रगत देशांमध्ये जातीव्यवस्था अजिबात नाही व त्यायोगे येणारा अरेंज मॅरेजसारखा गाढव प्रकार तर अजिबातच नाही.त्यामुळे लग्नायोग्य झालेल्या तरुण तरूणींना व कुठल्याही विवाहोत्सुक व्यक्तीला आपला जोडीदार स्वतः शोधावा लागतो.त्यामुळे स्त्री पुरुषांनी एकत्र वेळ घालवने हे तीथे वाईट समजले जात नाही.स्त्रीपुरुष अपरीहार्यपणे एकत्र येतात, एकमेकांना समजून घेतात,बर्याचदा लैगिक संबंध ठेवतात.पटले जमले तर् लग्न करतात,अगदी बहूतांश प्राणी प्रजातीत प्रचलीत 'मेट सिलेक्शनची' हीच प्रक्रिया आहे,ती तिकडे फॉलो केली जाते,याऊलट.....
भारतात जातीव्यवस्था व त्यामुळे येणारा अरेंज मॅरेजसारखा गाढवप्रकार बोकाळला आहे.त्यात धर्मामुळे योनीशुचीतेचा व कौमार्याचा अतीप्रमाणात बाउ केला जातो.त्यामुळे स्त्री पुरुष एकत्र येत नाहीत,त्यांच्यात कसलीच जवळीक निर्माण होत् नाही.लग्न झालेल्या बहुतांश जणांना आपला जोडीदार पसंत नसतो.त्यामुळे खासकरुन पुरुषांना स्त्री म्हणजे अप्राप्य वस्तू वाटते.पुरुषांचा sex drive स्त्रीयांपेक्षा कीतीतरी पटीने अधीक असल्याने लैंगिकतेचे दमन झालेले असे पुरुष मग लैंगिक गुन्हे करतात.
यासाठी खालील पर्याय आहेत
१एकजिनसी समाज निर्माण करणे

२अरेंज मॅरेज हा गाढव प्रकार बंद करणे

३योनीशूचीतेच्या खुळचट कल्पनेतून समाजाने बाहेर येणे

४ स्वैराचार नव्हे पण काही प्रमाणात मुक्त लैंगिकता स्विकाराने

आहे तयारी हे करायची??नसेल तर मग अवघड आहे.

ऋन्मेष, छान लिहिले आहेस. चांगला विषय आहे धाग्याचा. काहिकाहि पोस्टस फेबु वर टाकाव्याश्या वाटताहेत. अकु यांच्याही.

sarcosuchus imp... ह्यांची पोस्ट काही अंशी पटली.
पाश्चात्य देशात, तुम्ही कोणते काम करता त्यानुसार सामाजिक दर्जा ठरत नाही. आणि स्त्री-पुरूष संबंधांमधे, सामाजिक दर्जा हा factor तितकासा आड येत नाही.
उदा. एखादी उच्चशिक्षित बाई, एखाद्या हॉटेल मधील भांडी घासणार्या पुरूषाबरोबर लैंगिक संबध ठेवू शकते, लग्न न करता त्याच्या बरोबर राहू शकते. त्यामुळे त्या पुरूषाला ती अप्राप्य वाटत नाही. आणि तिला एकटीला गाठून तिचा गैरफयदा घेण्याची निकड भासत नाही. (ह्याला अपवाद असतातच. ) पण सर्वसाधारण समाज व्यवस्था खुली आहे. अशी खुली समाज व्यवस्था जेव्हा भारतीय समाजात दिसू लागेल, तेव्हा स्त्रीयांवरील अत्याचार कमी होतील असं वाटतं. तोवर कठोर कायदे आणि त्यांची कडक अंमलबजावणी ह्यावरच भिस्त ठेवायला लागणार.
पण जगात, कोणत्याही गोष्टीचे फक्त फायदे उपभोगता येत नाहीत. अशी खुली समाज व्यवस्था स्वीकारली तर त्याचे तोटेही सहन करायला लागणार. छोट्या छोट्या कारणांनी होणारे घटस्फोट, single parents चं वाढतं प्रमाण, कुटुंबाची बदलेली व्याख्या ह्या त्या समाज व्यवस्थेसोबत येणार्‍या गोष्टी पण स्वीकारायला लागतील.

sarcosuchus imp... ह्यांची पोस्ट पटली.
कौमार्याचा अतीप्रमाणात बाउ केला जातो.>>>>>>>>>

या कारणामुळे आमची आई मला व बहिणीला सायकल पण शिकु द्यायची नाही खेळात भाग घेऊ द्यायची नाही अर्थात हे त्या वेळेस कळायचे पण नाही.

si,
तुमची पोस्ट थोडीच बरोबर आहे.
पण पूर्ण नाही.
अगदी प्रेमविवाह करणारेपण , निवडीबाबत पूर्ण अधिकार मिळालेलेपण दुसर्‍या स्त्रियांबद्दल वाईट दृष्टी दाखवत नाहीत असे नाही.
एकाच जातीत्/सामाजिक उतरंडीवर असलेले पुरुष त्याच पायरीवरच्या स्त्रीवर शारिरीक्/मानसिक अत्याचार करत नाहीत असे नाही. (उलट असे अत्याचार जास्त आहेत)
कौमार्याचा बाऊ उलट भारतापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात इस्लामी देशांत केला जातो.
स्वखुशीने, लिव इन रहाणारे पुरुष देखिल स्त्रीजोडीदारावर शारिरीक्/मानसिक अत्याचार करतात.

याचे कारण आपल्या पुरुषांना पहिल्यापासूनच 'बायका' हा इन्फेरियर रेस असल्याचे शिकवलेले असते.
'बायकांसारखे रडू नकोस' 'पोरींसारखा भावूक होऊ नकोस' ' बायकांची अक्कल माहित्येय' असे उदगार वेळोवेळी ऐकलेले असतात.
त्यामुळे घरात/ जगात आपण सुपेरियर आहोत हा भाव ९९ टक्के तरी भारतीय पुरुषांच्या डोक्यात असतो.
तोही लैंगिकता/ दांभिकता यांचा मनाला स्पर्शही व्हायच्या अगोदरच्या वयात.
म्हणजे पुरुषाने बायकांपेक्षा श्रेष्ठ असणं ही 'बट नॅचरल' गोष्ट आहे असेच इथे मुलांच्या मनात ठसवले जाते.

माझ्या मते समस्त मानवजातीत बाईचं नाव सुद्धा पुरुषाचं नाव मधे असल्याशिवाय पुर्ण होऊ शकत नाही.. ते वडील असु दे किंवा नवरा...इथुनच त्या टिपीकल संस्कारांची सुरवात होते का ... की तिला जगण्यासाठी एका पुरुषाची नितांत गरज आहे.. किंवा ही गोष्ट सुद्धा हेच सांगते का... की तो महत्वाचा आहे.. आईचं नाव कुठेच येण्याची गरज नाही..

मला घर घ्यायचं होतं, एकटीने. ४ लाखांचं कर्जं होतं. पण बँकेने को-अ‍ॅप्लिकंट असल्याशिवाय देणार नाही सांगितलं. पती किंवा पिताच पाहिजे होता. आई पण नोकरीला होती पण ती ही नाही चालली. HDFC home finance चे नियम !

लोकहो,

हरतर्‍हेचे प्रयत्न करूनही हा धागा 'समानता' ह्याच विषयाकडे वळवला जात आहे ह्याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे अशी विनंती! तसा तो वळवला जाताना एकांगी ताशेरे येऊ लागतात व त्यातून तमाम पुरुषजात खलनायक ठरवण्याची घाई केली जाते असा पूर्वानुभव! खूप अवघड आहे का विषयाला धरून लिहिणे?

वरच्या काही प्रतिसादांमध्ये 'पुरुषी मानसिकतेत सुधारणा झाल्यास स्त्रियांवरील लैंगीक अत्याचार कमी होतील' ह्या अर्थाचे काहीतरी आहे काय?

>>>> मला घर घ्यायचं होतं, एकटीने. ४ लाखांचं कर्जं होतं. पण बँकेने को-अ‍ॅप्लिकंट असल्याशिवाय देणार नाही सांगितलं. पती किंवा पिताच पाहिजे होता. आई पण नोकरीला होती पण ती ही नाही चालली. HDFC home finance चे नियम !<<<<<
माझ्या मते (विचारतो कोण तुझ्या मताला लिम्ब्या? ) इथे "स्त्रीमुक्ति/बंधन / पुरुषी वर्चस्व" वगैरेचा संबंध नाही.
मलाही लोन घ्यायचे होते, बॅन्केने लिम्बीलाही को अ‍ॅप्लिकाण्ट बनवायला सांगितले जेव्हा तिची कमाई "शून्य" होती, तर स्पाऊस किंवा लग्न झालेले नसल्यास पालकांपैकी कोणी असे को अ‍ॅप्लिकाण्ट म्हणून लागते.
याचे कारण निव्वळ व्यावहारिक असुन, कर्ज घेणार्‍या व्यक्तीच्या (वरील उदाहरणात मी) जर एकट्याच्याच नावाने कर्ज असेल, व ती व्यक्ति गचकली तर कर्जाची परतफेड कोण करणार, तसेच हायपोथिकेटेड प्रॉपर्टीवर नंतरचा हक्क कुणाचा असेल, जेणेकरुन कर्जफेड न झाल्यास बँकेस प्रॉपर्टीच्या ताब्या व विक्रीबाबत अधिक अडचणी येऊ नयेत इत्यादी बाबत बँकेचे इंटरेस्ट्स सुरक्षित करण्यासाठी (हीत जपण्यासाठी) वरील अटी घातल्या जातात.
उगाच याबाबतही "नवरा बायको" नात्यातील पुरुषी वर्चस्व वगैरे बाबींची शन्का घेऊ नका.
हां, आता कर्ज घेणार्‍या समलिंगी जोडप्यातील स्पाऊस(?) व्यक्तिंबाबत बँक काय करते, किंवा काय करावे, किंवा काय करेल, याबाबत मी भाश्य करू शकत नाही.

>>> त्यातून तमाम पुरुषजात खलनायक ठरवण्याची घाई केली जाते असा पूर्वानुभव! <<<<<
ते जाऊद्याहो बेफिकीरसाहेब. मुळात स्त्रीपुरुष या शब्दांऐवजी, नर मादी हे शब्द वापरले तर व जोडीने "मानव" हा देखिल मुळात एक पशूच आहे हे मान्य केल्यास बृयाच प्रश्नांची उकल होण्यास मदत होऊ शकते.
अर्थात पशू असलेला प्राणी "मानव' म्हणुन बनण्याकरता कालौघात प्राप्त परिस्थितीप्रमाणे "नरमादी" बाबतचे जे जे संकेत म्हणा वा नियम म्हणा वा ते त्या त्या काळच्या वास्तवास धरुन होत गेले हे किमानपक्षी मान्य असेल, तर सर्वस्वी "पुरुषास" दुषणे देण्याचे कारण उरणार नाही. असो. खूप गहन विषय आहे हा माझ्या मते. मला खूप विचार करावा लागेल त्यावर. तोवर तुमचे चालुद्यात.

अहो लिंबुकाका, वर त्यांनी लिहिलंय ना की पालकांपैकीही आई नोकरदार असूनही चालणार नव्हती.
पिता किंवा पतीच हवे होते म्हणून.

बघा, झाली की नाही वेगळीच चर्चा सुरू Happy आता एच डी एफ सी कशी चूक हे ठरेल. मग पुढचे सगळे आलेच. हा विषय स्त्री व पुरुषांना सर्वांनी समान मानण्या न मानण्याबाबतचा आहे.

पती किंवा पिताच पाहिजे होता. आई पण नोकरीला होती पण ती ही नाही चालली. HDFC home finance चे नियम !>>>

एक पुरुष म्हणून तुमची सामाजिक जबाबदारी काय असावी? हा प्रश्न वरिल अनुभवास गैरलागू होतो का?

>>>>> अहो लिंबुकाका, वर त्यांनी लिहिलंय ना की पालकांपैकीही आई नोकरदार असूनही चालणार नव्हती.
पिता किंवा पतीच हवे होते म्हणून. <<<<<
बरोबर आहे तुमचे सातीताई, पण, पूर्वापार जेव्हा नियम घडले तेव्हा सहसा स्त्री कमावती नसायचि, व पालक म्हणून त्या त्या घरच्या "कर्त्या" पुरुषास जबाबदार धरले जायचे. आजही संस्कार वगैरे बाबत "बापाच्याही " नावाने शिव्या असतातच त्यातलाच प्रकार हा झाल.
मूळ कारण असे की कुठुनही का होईना, बॅन्केने दिलेल्या कर्जाबाबत कर्जदार मेल्यास कर्जफेडीची हमी "कोणती व्यक्ती' हमखास घेऊ शकेल याबाबत आहे. व हिंदु विवाह कायद्याप्रमाणे (नेमके कायदे चु.भु.द्या.घ्या.) विवाहित स्त्री नवर्‍यावर अवलंबुन असते असे गृहित धरतो, सबब बायकोने दिलेली हमी नवर्‍यास मान्य असल्याबद्दल परत आईच्या शिवाय वडिलांचीही हमी /शपथपत्र वगैरे घ्यावे लागेल, असा द्रविडि प्राणायाम करण्या ऐवजी डायरेक्ट पिताच हमीदार म्हणून मागत असतील.
वरील पोस्टकर्ती कर्जे घेण्याचे वेळेस विवाहित असेल, तर खात्रीने नवर्‍यास (स्पाऊस) हमीदार म्हणून कोअ‍ॅप्स्लिकाण्ट करुन घेतले असेल, व तिथे आईवडिलांचा संबंधच बँकेने विचारात घेतला नसेल.
पण त्याव्यतिरिक्त यास कायदेशीर पळवाटा असू शकतात जसे की नवरा असतानाही पिता व मुलगी यांचे एमोयू किंवा अ‍ॅग्रीमेंट चालुन गेले असते. अर्थात तसा सल्ला देणारा व बँकेच्या खनपटीस बसुन करवुन घेणारा वकिल मात्र हवा. असो. अधिक विषयांतर नको.

>>>> हा विषय स्त्री व पुरुषांना सर्वांनी समान मानण्या न मानण्याबाबतचा आहे. <<<<
बेफिकीरसाहेब, अहो माझ्या स्क्रिनप्रमाणे मी बरोब्बर "17 August, 2015 - 15:09" या वेळेस टाकलेली पोस्ट विषयाला धरुन व विषयास नेमक्या रुळावर आणायचा प्रयत्न करणारीच आहे, असे नै का वाटत तुम्हालाही? (ब्रुट्स यू टू च्या चालीवर वाच्ले तरी हरकत नाही)

आत्माराम इथे गल्लत होते आहे असे नाही वाटत तुम्हाला? तुम्ही बेफिकीरान्चे विधान तिथुन इथ कॉपी पेस्ट केले. पण दुसर्‍या धाग्यावर पण बेफीनी त्याचा ( नेमाडेन्च्या वाक्याचा) इन्डायरेक्टली निषेध केलेला तुम्हाला दिसला नाही का?
http://www.maayboli.com/node/44509

मी बेफीन्ची बाजू घेत नाहीये, पण निदान एक बाजू छापुन त्याचे विचीत्र अर्थ दुसर्‍याना लावता येतील आणी त्या सदस्याविषयी लोकान्चे गैरसमज होतील असे तरी निदान लिहु नका.

आणी कोणाचे दुसर्याशी वै. वाद असतील तर या धाग्यावर कृपया ते काढु नका. आपले मत मान्डा. आम्हाला वाचायला आवडेल.

>>जरी मी प्रत्यक्ष आयुष्यात एक वाह्यात व्यक्ती असेल पण इथे मुद्दाम पब्लिक फोरम वर आदर्शवादी पोस्ट टाकत असेल, तर याचा अर्थ मला जनाची लाज आहे. मी जसा आहे ते मी लोकांपासून लपवू पाहतोय. याचा अर्थ किमान मला मी काहीतरी चुकीचे वागतोय जे चारचौघांत कबूल करू शकत नाही ईतके तरी समजलेय>>

ओक्के ओक्के.... म्हणजे इथे लोकांना उपदेश देताना आपण तसेच वागतोय वगैरे नैतिक बंधन नाही का अपेक्षित? मग चालू द्या!

Pages