आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.
कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.
कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.
वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.
धन्यवाद.
================================================
NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP
केश्विनी, भारत आणि चीनकडील
केश्विनी,
भारत आणि चीनकडील अमाप सोने ढापण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारातले डॉलर्समधले सोन्याचे भाव पाडले जात आहेत. जेव्हा १०० डॉलर छापले जातात तेव्हा राखीवरोकड प्रमाणानुसार (cash reserve ratio) ३ डॉलर्सचं सोनं मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात असायला हवं. ही शिस्त अमेरिका पाळत नाही. त्यामुळे डॉलर्स चहूंकडे झालेत आणि सोनं इल्ले. रशियाने आता डॉलर्सऐवजी सोन्यात व्यवहार करायची तयारी ठेवलीये. खरीच तशी वेळ आली तर डॉलर बाराच्या भावात जाईल. त्यामुळे अमेरिकी अर्थतत्ज्ञांचं (?!) धाबं दणाणलंय.
यावर उपाय म्हणजे डॉलर्स सोन्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत अशी हूल सोडणे. म्हणून सोनं घसरतंय. पण या घसरत्या किमतींचा फायदा घेत भारत, चीन, रशिया हे खरेदीदार जास्त सोनं खरेदी करून ठेवतील. त्यामुळे हे धोरण उलट परिणाम करणारं आहे.
अमेरिकी अर्थतत्ज्ञांचा विजय असो.
आ.न.,
-गा.पै.
<<सोन्याचा साठा ज्या देशाच्या
<<सोन्याचा साठा ज्या देशाच्या नागरिकांकडे आहे त्या देशाला वाचवण्यासाठी हे सोन्याने लगडलेले नागरिक आपले सोने उतरवून देतील काय?>>
----- मध्यमवर्गिय, गरिब जनता यान्चा मोठा वाटा असेल... आणि त्या सर्वान्चे कॉन्ट्रिब्युशन खुप मोठे ठरेल.
गडगन्ज श्रीमन्त देण्याची शक्यता कमी. व्यक्तीकडे खुप पैसा असेल तर तो बाहेर यायला तयार नसतो (जबर आकर्षण असते) आणि पैसा कमी असेल तर जो आहे तो (तुलनेने) सहजपणे दिला जातो. माझ्या मताला ठोस आधार नाही पण हा मनुष्यस्वभाव आहे,
खरं आहे उदय....
खरं आहे उदय....
काहीही हं गा मा.
काहीही हं गा मा.
म्यानमारमध्ये बेकायदेशीर
म्यानमारमध्ये बेकायदेशीर लाकूडतोड आणि वाहतूक करणार्या १५०हून जास्त चिनी नागरिकांना डायरेक्ट २० वर्षांची जन्मठेप, १८ वर्षांखालील दोन नागरिकांना १० वर्षांचा तुरुंगवास व एका महिलेला १५ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. चीनने ह्यावर आक्रमक होत नागरिकांना माघारी पाठवण्याची मागणी केली. म्यानमारने न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करण्यास नकार दिला असल्याने दोन्ही देशांतील संबंधांमध्ये परत एकदा तणाव निर्माण झाला आहे. काही महिन्यांपुर्वी काचिन प्रांतात लष्करी कारवाई करताना म्यानमार लष्कराने चीनच्या हद्दीत घुसून बॉम्बवर्षाव केला होता.
उत्तर नायजेरिया व कॅमेरून
उत्तर नायजेरिया व कॅमेरून मध्ये गेला आठवडाभर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यांसाठी बोको हराम ह्या दहशतवादी संघटनेने मुलं आणि मतीमंद व्यक्तींचा वापर केल्याचे आढळून आले आहे.
http://www.telegraph.co.uk/news/worldnews/africaandindianocean/nigeria/1...
इतक्या पराकोटीचा निर्दयपणा पाहून वाटतं कलीयुगाचा अंतीम चरण चालू असावा.
युरो सोडाच नाद म्हणतो मी
युरो
सोडाच नाद म्हणतो मी
जेव्हा १०० डॉलर छापले जातात
जेव्हा १०० डॉलर छापले जातात तेव्हा राखीवरोकड प्रमाणानुसार (cash reserve ratio) ३ डॉलर्सचं सोनं मध्यवर्ती बँकेच्या ताब्यात असायला हवं. ही शिस्त अमेरिका पाळत नाही. त्यामुळे डॉलर्स चहूंकडे झालेत
असा कायदा निक्सनच्या काळातच झाला. शिवाय त्यानेच असा नियम केला की कुणाहि देशाला तेल विकत घ्यायचे तर डॉलर्समधेच व्यवहार करायचा. तेल विकणारे सौदी नि इराणचा शहा, नि इतर मुसलमानी राष्ट्रे यांनी त्याला भरघोस पाठिंबा दिला. त्यामुळे सौदी अरेबिया नि इतर देशांत बरेच जणांकडे डॉलर्स झाले नि त्यांना ऐपतीप्रमाणे भारत, अमेरिका, युरोप अश्या ठिकाणी, जेथे कट्टर मुसलमानी कायदा नाही, तिथे जाऊन दारू पिणे, त्यांच्या बायकांना अमेरिकेत येऊन गाडी चालवणे, बुरखा न घालणे, वाटल्यास बिकीनी पण घालून हिंडणे असे करण्याचे "स्वातंत्र्य" मिळाले म्हणून ते खूष!
पैसा असला की अमेरिकेत नि आजकाल भारतात सुद्धा लईच धम्माल राव. नि सगळ्या गोष्टींचे वाईट परिणाम नेहेमीच फक्त गरीब, मध्यमवर्गीय लोकांवरच होतो. राज्यकर्त्यांना त्यांची काय पडलीय? अधून मधून त्यांनी मते दिली की पुरे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर ५३ डॉलर्सच्या खाली उतरले. चीनच्या शेअरबाजाराला दोन दिवसांत बसलेला तब्बल १०%चा फटका, इंधनाचा अतिरिक्त पुरवठा आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचा डळमळीत निर्णय ह्या कारणांनी इंधनाच्या दरांमध्ये प्रचंड घसरण झाली आहे. अमेरिकेतील इंधनाचे दर तर ५० डॉलर्सच्या खाली आले. २०१४च्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधन ११० डॉलर्स प्रति बॅरल पेक्षा जास्त होते. पण इराणच्या अणुकार्यक्रमाची चर्चा आणि युक्रेनमधील सत्ताबदल ह्या बॅकग्राउंडवर दर घसरु लागले होते. इंधन उत्पादक देशांनी उत्पादन वाढवणे आणि चीन/युरोपच्या मागणीतील घट हे देखिल कारणीभूत होतं. परंतु ह्या मार्चपासून दर पुन्हा वाढण्यास सुरुवात झाली होत आणि सहा महिन्यांत परत घसरण सुरु झाली आहे.
अमेरिका, सौदी अरेबिया आणि इराक विक्रमी पातळीवर इंधन उत्पादन करीत आहेत आणि त्यात घट करण्याला त्यांनी नकार दिला आहे. त्यात भर म्हणून इराणच्या अणुकार्यक्रमावर करारामुळे तोडगा निघाल्याने इराणचे इंधनही बाजारपेठेत उपलब्ध होईल. साहजिकच बाजारपेठ तेलाच्या पुरवठ्याने ओव्हरफ्लो होईल.
ह्या घसरणीचा मोठा फटका रशियन रुबल आणि अर्थव्यवस्थेला बसत आहे. काही दिवसांत रुबल अमेरिकन डॉलरच्या तुलनेत २%हून अधिक घसरला. लवकरच एका डॉलरला ६० रुबल मोजावे लागतील अशी भीती व्यक्त होत आहे. घसरणार्या रुबलपाठोपाठ रशियातील प्रमुख इंधन कंपन्यांच्या उत्पन्नातही घट झाली आहे. रशियाच्या Gazprom ह्या कंपनीचे २०१५ सालातले उप्तादन १३%ने घटले.
ह्या सगळ्या घोळामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक प्रमुख इंधनकंपन्यांनी नवे प्रोजेक्ट रद्द करायला सुरुवात केली असून कर्मचार्यांची संख्या व खर्चातही कपात केली आहे. गेल्या काही महिन्यांत मोठ्या कंपन्यांनी जवळजवळ ४०हून अधिक इंधन प्रकल्प थांबवले आणि गेल्या तीन महिन्यांत इंधनक्षेत्रातील तब्बल ५० हजार कर्मचार्यांवर नोकरी गमावण्याची वेळ आली आहे.
हे धोकादायक आहे..
हे धोकादायक आहे..
वर लिहिलेय की रशियाने आता
वर लिहिलेय की रशियाने आता सोन्यात व्यवहार करण्याची धमकी दिलीय त्यामुळे अमेरिकेचे धाबे दणाणलेय आणि खाली लिहिलिये की इंधनामुळे रुबल घसरतोय, रशियनांचे धाबे दणाणलेय. नक्की काय झालेय, कोणाकोणाचे धाबे दणाणलेय कळेल काय? की आता सगळ्यांचीच वाट लागणार?
आंतरराष्ट्रिय बाजारातल्या तेलाच्या आणि सोन्याच्या घसरत्या किंमती, त्यांचे शेअरबाजारावर होणारे परिणाम पाहुन यापुढे शेअरबाजारात पक्षी म्युच्युअल फंड इत्यादी थोड्या सेफ पण पैसे वाढवणा-या मार्गांमध्ये गुंतवणुक करावी की नाही? की येत्या काही वर्षात या गुंतवणूकीला काही अर्थ उरणारच नाही?
हिम्या - अजून थोडे लिही की.
हिम्या - अजून थोडे लिही की. स्पेसिफिक्स? का धोकादायक आहे?
साधना, जगभरात किंवा देशात काय
साधना, जगभरात किंवा देशात काय चालू आहे ह्यावर शेअरबाजारात बुल्स ऑर बेअर ते ठरणार. शेअर बाजार म्हणूनच खात्रीचा कधीच म्हणता येणार नाही.
----------------
'आयएस' आता भारतात हल्ले घडविण्याच्या तयारीत आहे का? इराक व सिरियामध्ये हिंसाचाराचा डोंब उसळवणारी IS ही दहशतवादी संघटना आता भारतात हल्ले करायच्या तयारीत असल्याचे अमेरिकी सुरक्षा यंत्रणांना हाती लागलेल्या कागदपत्रांतून दिसते आहे. अमेरिका व मित्रदेशांवर हल्ला केल्यास युद्ध तीव्र होईल आणि गटांमध्ये विभागलेल्या तालिबानी संघटना, अल कायदा ह्यांना एकत्र करुन एकच मोठी संघटना उभारायचा प्रयत्नही सुरु असल्याचा दावाही ह्या कागदपत्रांद्वारे केला गेला आहे. ह्यामुळे ISची दहशत वाढेल व अमेरिका विरोधात संघर्ष अधिक तीव्र होईल. नंतर अमेरिकेने IS व संलग्न संघटनांवर हल्ला चढवल्यास अंतिम युद्ध पेटेल असे ह्या संघटनेचे म्हणणे आहे.
आशियात अस्थिरता माजवण्यासाठी 'खिलाफत'साठी एकाच संघटनेच्या छत्राखाली दहशतवाद्यांची मोठी शक्तीशाली फौज उभरण्यासाठी ISची ही सर्व तयारी आहे.
पाकिस्तान तालिबानशी संबंधित असलेल्या एका पाकिस्तानी नागरिकाकडून अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांना उर्दू भाषेतील कागदपत्रे सापडली. ह्या कागदपत्रांचे भाषांतर व विश्लेषण करण्यात आले. हावर्ड विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी स्वतंत्रपणे ह्या कागदपत्रांचे भाषांतर केले आणि गुप्तचर यंत्रणेशी संबंधित अनेक माजी अधिकार्यांनी त्याचे विश्लेषण केले. त्यातील भाषा व काही उल्लेखांवरुन ही ISशीच संबंधीत कागदपत्रे आहेत. पुर्वी हाती लागलेल्या ISच्या कागदपत्रांशी त्याचे साधर्म्य आहे.
अमेरिकेशी थेट युद्ध करुन ISला आपली ताकद व वेळ फुकट घालवायचा नसून अरब देशांमध्ये सशस्त्र उठाव करुन शक्ती दाखवायची आहे.
नुकतंच भारतीय लष्कराचे वरिष्ठ अधिकारी लेफ्टनंट जनरल डी.अॅस. हुडा ह्यांनी भारताच्या दिशेने पुढे सरकणारी ISची पावले हा चिंतेचा विषय असल्याचे म्हटले आहे. ISला रोखण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांना एकत्रितपणे काम करावं लागेल असे ले.ज. हुडा ह्यांनी म्हटले होते.
परत एकदा यासिन भटकळच्या त्याच्या बायकोशी झालेल्या फोनवरील संभाषणाचा संदर्भ लागतो आहे.....दमास्कसच्या सहाय्याने लवकरच बाहेर येईन.
एमएच-३७० ह्या रहस्यमयरित्या
एमएच-३७० ह्या रहस्यमयरित्या गायब झालेल्या विमानाचे अवशेष आग्नेय अफ्रिकेतील मादागास्कर देशाजवळ असलेल्या 'ला रियुनियन' ह्या बेटाजवळ सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. मलेशियाचे वाहतूक उपमंत्री अब्दुल अझिझ काप्रावी ह्यांनी ह्या वृत्ताला दुजोरा दिला. ह्या बेटाजवळच्या समुद्रात विमानाच्या पंखाचा भाग असलेले 'फ्लॅपरॉन' मिळाले असल्याचे सांगितले गेले. अमेरिका व फ्रान्सच्या अधिकार्यांनीही हा सापडलेला भाग एमएच-३७०चा असल्याची शक्यता वर्तवली आहे.
http://www.theguardian.com/world/live/2015/jul/30/mh370-possible-breakth...
१९७१ च्या 'बांगलादेश मुक्ती
१९७१ च्या 'बांगलादेश मुक्ती संग्रामा'त पाकिस्तानी सैन्याच्या मदतीने अनेक निष्पाक नागरिकांची हत्या घडविल्याच्या आरोपावरुन बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी'चे वरिष्ठ नेते सलाहुद्दीन कादर चौधरी ह्यांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे.
सद्ध्याचा बांगलादेशातील विरोधी पक्ष असलेल्या BNP तेव्हा उघडपणे पाकिस्तानच्या बाजूने उभी राहिली होती. पाकिस्तानी सैनिक घडवत असलेल्या नरसंहारात BNPचे नेते व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. त्यांची स्वतःची सशस्त्र टोळीही होती. ह्या युद्धात पाकिस्तानी सैनिक, BNP आणि जमात-ए-इस्लामच्या कार्यकर्त्यांनी ३० लाखांपेक्षा जास्त जणांची हत्या केली व २ लाख महिलांवर अत्याचार केला.
चौधरी ह्यांच्यावर एकूण २३ आरोप होते. त्यातल्या ९ मध्ये ते दोषी आढळले. त्यात चितगाव येथील २०० नागरिकांच्या हत्या प्रकरणाचा समावेश आहे. त्यावेळची बांगलादेशातील आयुर्वेदीक औषध कंपनीचे मालक असलेल्या सिंघ यांना त्यांच्या घरातून खेचून पाकिस्तानी सैनिकांकडून त्यांची हत्या घडवल्याचाही आरोप आहे.
२०१३ साली स्पेशल कोर्टाने त्यांना फाशीची शिक्षा ठोठावली होती आणि त्याला चौधरींनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता त्यांच्याकडे राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याचा पर्याय उरला आहे. पंतप्रधान शेख हसिना ह्यांनी १९७१च्या वंशसंहार प्रकरणाचा वेगाने खटला चालविण्यासाठी २०१० मध्ये विशेष कोर्टाची स्थापना केली होती. ह्या कोर्टाने आतापर्यंत १५ जणांना फाशीची शिक्षा दिली आहे. त्यात बांगलादेशातील कट्टरपंथी संघटना जमात-ए-इस्लामच्या वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे.
आयसिसकडून लिबियात चार
आयसिसकडून लिबियात चार भारतीयांचे अपहरण
http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5051159380757515643&Se...
असंतोषात खदखदणार्या
असंतोषात खदखदणार्या बुरुंडीच्या राष्ट्राध्यक्ष Pierre Nkurunziza ह्यांचे निकटचे सहकारी व बुरुंडीचे भूतपूर्व आर्मी चीफ Gen Adolphe Nshimirimana ह्यांची हत्या करण्यात आली.
http://www.bbc.com/news/world-africa-33751885
सश्या, त्या चार भारतियांपैकी
सश्या, त्या चार भारतियांपैकी दोन जणांची सुटका करण्यात आली आहे. उरलेल्या दोघांसाठी भारताचे प्रयास चालू आहेत.
कॅलिफोर्नियात एकापाठोपाठ १८
कॅलिफोर्नियात एकापाठोपाठ १८ वणवे भडकले आणि जवळजवळ १८ हजार एकरांहून जास्त वनक्षेत्र व नागरी भागाची राखरांगोळी झाली. वणव्यांचा मुकाबला करण्यासाठी ८०००हून अधिक अग्निशमन दलाचे जवान आणि मोठ्या प्रमाणात हेलिकॉप्टर्स तैनात झाली.
लडाखमध्ये भारत व चीनच्या
लडाखमध्ये भारत व चीनच्या लष्कराची चर्चा सुरु. भारतीय लष्कराचे कर्नल बी.एस. उप्पल आणि चीनचे कर्नल स्वांग झोनली ह्यांच्यात ही चर्चा आहे. भारताचे पंतप्रधान चीनला गेले होते आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर आले होते तेव्हा दोन्ही नेत्यांच्या चर्चेत चीनच्या सैन्याकडून भारताच्या भूभागात केल्या गेलेल्या घुसखोरीचा मुद्दा ऐरणीवर आला होता. त्यानंतर दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये संघर्ष पेटू नये म्हणून भारत व चीनच्या लष्करी अधिकार्यांच्या नियमित भेटीगाठी व चर्चा सुरु ठेवण्याचा निर्णय झाला होतो. लडाखमधली ही चर्चा ह्याच प्रयत्नांचा एक भाग असल्याचे समोर येते.
काळा पैसा देशाबाहेर
काळा पैसा देशाबाहेर पाठवणार्या जगातील टॉप पाच देशांपैकी भारताचा क्रमांक चौथा, असे बीबीसी म्हणतेय. उस्तुकतेपोटी मुळ रिर्पोट वाचला तर त्यात विकसनशील देशांच्या यादीत पाचवा क्रमांक म्हणालेले आहे. २००२ पासुन ते २०११ पर्यंत एकुण ३४३,९३२ मिलीयन अमेरीकन डॉलर्स भारताबाहेर बेकायदेशीरपणे गेले आहेत.
जगातील दोन नंबरच्या ग्रीन
जगातील दोन नंबरच्या ग्रीन हाऊस गॅस एमिट मराठी शब्द?) करणार्या अमेरिकेत क्लायमेट चेंजवर तोडगा म्हणून ऊर्जा संयंत्रांवर CO२ emission कमी करण्याचे बंधन घातले आहे.
Obama announced Monday that power plant owners must cut carbon dioxide emissions by 32 per cent from 2005 levels by 2030.
Power stations account for about 40 per cent of US emissions of CO2 -- the most abundant greenhouse gas and the main contributor to manmade global warming.
http://m.ndtv.com/world-news/qualified-praise-for-barack-obamas-clean-po...
चीनच्या हवाई सुरक्षेला
चीनच्या हवाई सुरक्षेला अमेरिका व जपानबरोबरच भारताचाही (:अओ: :खोखो:) धोका असल्याचा २०३० सालापर्यंतचा अहवाल चीनच्या लष्करी अभ्यासगटाने दिला आहे. ह्या तीन देशांचा मुकाबला करण्यासाठी चीनच्या हवाई दलाने आधुनिकीकरणाचे धोरण आखले आहे. त्यात हाय स्पीड एअर लॉंच क्रूझ मिसाईल्स, लार्ज ट्रांस्पोर्ट प्लेन्स, अप्पर ॲटमॉस्फेअर एअरशिप, नेक्स्ट जनरेशन फायटर, अनमॅन्ड ॲटॅक एअरक्राफ्ट, एअरफोर्स सॅटेलाईट व प्रिसिजन गायडेड बॉम्ब्सचा समावेश आहे.
सरळ सरळ चीनच्या ह्या उलट्या बोंबा आहेत आणि त्यांची ही तयारी भारतासह आशियाई देशांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. इकडे आमची राफेल अजून आली नाहित, थोडीशी विमाने घ्यायचे ठरून बाकीचा करार रद्द पण झाला. मग ह्यांना आपल्याकडून कसला धोका दिसू लागला? एक तर हा कांगावा असावा किंवा खरोखर धोका वाटत असेल तर तो का वाटतोय? कधीच आपणहून आक्रमण न करणार्या भारताचा धोका वाटणे ही नवलाची गोष्ट आहे. मधल्या दोन्ही लष्करांच्या मिटिंगमध्ये नक्की काय बोलणी झाली ते कळलं नाहिये.
<मग ह्यांना आपल्याकडून कसला
<मग ह्यांना आपल्याकडून कसला धोका दिसू लागला? >
भारताचा चीनशी असाही सीमावाद आहेच. त्यात भरीस भर, भारत द. चीन मधल्या चीन विरोधी देशांशी जवळीक वाढवतोय. ह्यावेळी जपानला मलबार नौदल कसरतींसाठी आमंत्रण धाडले आहे. भारत चीनला शत्रु देशाशी मैत्री करणारा धोकादायक देश (म्हणुनच शत्रु) मानतो, हे उघड सत्य आहे. पुर्वेकडील सीमांच्या सुरक्षेसाठी भारत ५४ नवी ठाणी उभारणार आहे, तसेच भारत-तिबेट सीमा सुरक्षा पोलीसदलाची (आय. टी. बी. पी.) १२ नवी बटालीयन्स उभारणार आहे. भारताचा आत्ता पर्यंत असणारा चीन बद्दलचा बचावात्मक पवित्रा हळु हळु बदलतो आहे. हे सर्व चीनीपण ध्यानात घेतच असणार, असा माझा एक अंदाज.
रांचो, ही मैत्रीची गृहितकं
रांचो, ही मैत्रीची गृहितकं अनाकलनीयच असतात. कुणी अमेरिकेचा मित्र असतो पण रशियाकडून शस्त्र खरेदी करतो. इराणवरून तर इस्रायल, सौदी आणि रशियात समिकरणं बदलली. अचानक अमेरिकेवरचा त्यांचा विश्वास डळमळीत झाला.
आणि आपण आपल्या सीमांचं रक्षण जास्त सिरियसली घेतलं तर त्यात चूक काय? आतापर्यंत सॉफ्ट टारगेट वाटलो असू आपण. आता तसे राहणार नाही म्हणजे दुसर्यांवर आक्रमण करू असे होत नाही. पण चीन स्वत: दुसर्यांच्या कुरापती काढत असल्याने दुसरेही बलवान होवून तसेच करतील असे वाटत असावं त्यांना. भारताच्या आणि चीनच्या मेंटॅलिटीमध्ये जमिन अस्मानाचा फरक आहे हे कुणीतरी समजवा रे त्या चिन्यांना
Green house gas emissions =
Green house gas emissions = हरितवायू उत्सर्जन?
जिज्ञासा, त्या हाऊसचं काय मग?
जिज्ञासा, त्या हाऊसचं काय मग? हरितगृहवायू उत्सर्जन?
>>भारताच्या आणि चीनच्या
>>भारताच्या आणि चीनच्या मेंटॅलिटीमध्ये जमिन अस्मानाचा फरक आहे हे कुणीतरी समजवा रे त्या चिन्यांना स्मित>> असं कसं? ते कायम त्यांच्या "चीनी चष्म्यातुनच" पहाणार ना सगळं?

कधी नव्हे ते भारताने चीनच्या आडून आडून चाललेल्या कुरापतींना जशास तसे उत्तर दिले आहे. चीन जसा पाकिस्तानशी घट्ट मैत्री राखुन आपल्याला ही मित्र म्हणतो, तसच आपणही चीनच्या शत्रुंना मित्र म्हणतोय हे चांगलेच आहे. आर्थिक पातळीवर आपण चीनच्या जवळपासही जाऊ शकत नाही. पण सामरिक पातळीवर आपण बोटचेपी भुमिका न घेता त्याला उत्तर देतोय हे उत्तम आहे.
खरं तर सद्ध्या आर्थिक पातळीवरही चीन चे बारा वाजत आहेत. तरीसुद्धा ते आपल्याला भारी आहेत पण गेल्या आठवड्यात आलेल्या गर्तेतुन बाहेर पडायला चीन काय करतो हे बघायची उत्सुकता आहे. त्यासाठी पाकिस्तान चा काही उपयोग नाही कारण पैशासाठी ते कृष्णविवर आहे!!
चीनने युरोपात केलेल्या आर्थिक
चीनने युरोपात केलेल्या आर्थिक गुंतवणुकिंविषयी हा लेख तुमच्या वाचनात आला आहे का? नसल्यास जरूर वाचा. आपल्यासाठी "दिल्ली अभी बहोत दूर है!!".
http://www.loksatta.com/sampadkiya-news/next-millennium-for-asia-1126105/
जगाच्या अर्थकारणात हे असे चाललेले असताना आपले नेते संसद बंद कशी ठेवता येईल ह्याच्या मागे लागलेले असतात. नवीन धोरणे आखुन देशाच्या विकासासाठी मार्ग तयार करायचा सोडून दोन महिन्यांनी असलेल्या निवडणुकांवर केंद्रीत राजकारण खेळत बसतात. अशा वेळी मोदी सामरिकदृष्ट्या महत्वाच्या देशांना भेटी देऊन संबंध सुधारत आहेत हाच जरा काय तो दिलासा. पण त्यालाही आपल्याकडे लोक नावं ठेवतात. असो, देशांतर्गत कटकटींबद्दल इथे बोलायचा उद्देश नाही त्यासाठी बरेच धागे वाहत आहेतच. अवांतराबद्दल क्षमस्व.
त्यासाठी पाकिस्तान चा काही
त्यासाठी पाकिस्तान चा काही उपयोग नाही कारण पैशासाठी ते कृष्णविवर आहे!! > कमेंट बेहद आवडली.
तारीक खोसांच्या डॉन मधल्या लेखात त्यांनी मुंबई वरचा हल्ल्याचा कट पाकीस्तानातच शिजल्याच म्हटलय. आख्खा लेखच वाचनीय आहे.
http://www.dawn.com/news/1198061/mumbai-attacks-trial
Pages