आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.
कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.
कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.
वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.
धन्यवाद.
================================================
NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP
सिरियातील आयएसच्या प्रमुख
सिरियातील आयएसच्या प्रमुख कमांडर्सना ठार करण्याचे आदेश अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी सीआयएला दिले आहेत. वर्षभर अमेरिकेची लढाऊ विमाने सिरियातील आयएसच्या ठिकाणांवर कारवाई करत होती पण आता छुप्या लष्करी कारवाईला परवानगी दिली आहे. सिरियातील संघर्ष वाढणार. सिरियातील अस्साद राजवटीचे समर्थक असलेल्या इराण आणि रशियाकडून ह्या निर्णयावर प्रतिक्रिया उमटायची शक्यता आहे.
गापै, पृथ्वीच्या पोटात केवळ
गापै, पृथ्वीच्या पोटात केवळ हायड्रोकार्बनच आहेत काय? मधूनच पाणी पण असतंय, वरच्या थरात अन्न पिकवणारी मातीही असतेय. ही वसुंधरा म्हणजे गौडबंगाल आहे. किती देतेय आपल्याला.
केश्विनी, डेव्हिड पेट्रायसचं
केश्विनी,
डेव्हिड पेट्रायसचं अल कायदाविषयीचं वक्तव्य ऐकून जाम हसलो.
इराक मोहिमेचा पार फज्जा उडलाय. बगदादमध्ये सुन्नींचा प्रभाव ओसरून शियांचा बळजोर होण्यास याच पेट्रायसची धोरणं कारणीभूत आहेत. मात्र या माणसाच्या राजकारण्यांशी बऱ्याच वरपर्यंत ओळखी असल्याने त्यालाच परत गांधाराची जबाबदारी देण्यात आली. त्याकरिता इराक धडक (surge) २००७ ही यशस्वी मोहीम होती म्हणून चित्रं रंगवण्यात आलं. गांधारात याने जे काही दिवे लावले २०१२ साली त्याच्याकडून जबाबदारी काढून घेतली.
आता हाच अरण्यपंडित सांगतोय की अल कायद्याशी पाट लावा म्हणून. फार छान. अमेरिकेची घोडदौड चालू आहे. कुठल्या दिशेने ते फक्त विचारू नका.
आ.न.,
-गा.पै.
रशियाच्या विरुद्ध मुजाहीदिन
रशियाच्या विरुद्ध मुजाहीदिन तयार केले, त्यांचीच अल कायदा आणि तालिबान झाली! नंतर त्याच अल कायदाने ११ सप्टेबर घडवले. त्याच्या बदल्यात अति अत्याचार केले, त्यातन इसीस आली
आता त्याच इसीसविरुद्ध अल कायदाची मदत घेणार!
Full Circle.
वोईच तो!
वोईच तो!
अमेरिकेचे सगळेच तात्पुरते.
अमेरिकेचे सगळेच तात्पुरते. शिवाय सगळेच शहाणे, कुणीच कुणाचे ऐकत नाहीत. म्हणून तर कुणीहि उठतो नि काही हि बरळतो. नि तेहि खरे समजणारे अनेक लोक इथे आहेतच!
शेवटी जे आज राज्यकर्ते आहेत ते स्वतःचा आर्थिक फायदा कसा होईल ते बघून निर्णय घेणार! इतर जगाचे वाटोळे का होईना! त्यामुळेच लोकशाही परवडते, आठ वर्षांनी आपोआप दुसरा राष्ट्राध्यक्ष येतो, सगळे घोटाळे निस्तरत बसेल तो. आपण आपले आपले भले करून घ्यावे.
उगाच काय भारतातल्या लोकांना हसायचे बुवाबाजीच्या नादी लागतात, खुळ्या समजुतींना धरून बसतात वगैरे.
सगळे सारखेच!
चीन आपल्या भावी इंधनाची सोय
चीन आपल्या भावी इंधनाची सोय करण्यात गुंतला आहे.
यासाठी रशिया आणि चीन यांच्यामध्ये इंधन करार झाले. दिनांक २ व ३ सप्टेंटें२०१५ रोजी झालेल्या या करारांप्रमाणे रशिया नैसर्गिक वायू चीन ला पुरवणार आहे.
आताच्या अनेक कंत्राटात अनेक विविध कंपन्यांची आदान प्रदान झालेली दिसते. यात चीनी कंपन्यांनी रशियाच्या तेल क्षेत्रातलभांडवली गुंतवणुकीला हात घातल्याचे दिसून येते. उदा. यमल प्रकल्प ( Yamal project) या अंतर्गत रेशमी मार्ग कोशा अंतर्गत नोवातेक या मध्ये गुंतवणुक करण्यात आली आहे.
तसेच रशियाच्या काही बलाढ्य कंपन्यांनी चीन मध्येही गुंतवणुक केली आहे. सिनोतेक ने रशियाच्या इंधनातील अग्रगण्य सिबुर समुहा सोबत जाण्यासाठी धोरणात्मक निति मान्य करून सह्या केल्या.
मागच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ही असे एक मोठे कंत्राट चीन ने रशिया बरोबर केले. यात रशिया चीनला ३० वर्षे नैसर्गिक वायू पुरवणार आहे. याची किंमत सुमारे चारशे बिलियन डॉलर्स इतकी होती.
त्या आधी ऑस्ट्रेलिया येथील पण अमेरिकन कंपनी काढणार असलेला कडून सुमारे पन्नास बिलियन डॉलर्सचा वायू पुढील तीस वर्षांसाठी खरेदी केला आहे.
ही सर्व गुंतवणूक नैसर्गिक वायूसाठी होते आहे.
निनाद, सगळीकडे युद्ध कधीही
निनाद, सगळीकडे युद्ध कधीही भडकू शकेल असे वातावरण असल्याने बरेच देश बराच काळ पुरतील असे इंधनाचे साठे करुन ठेवत असावेत. त्यातून साऊथ चानया सी वरुन चीन अमेरिका युद्धाची कधीही ठिणगी पडू शकते आणि ह्याची चीनला चांगलीच कल्पना आहे.
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी
अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी चलनाचे अवमुल्यन न करण्याचा निर्णय २० प्रमुख देशांनी घेतला आहे. तुर्कीमध्ये अंकारात ४-५ सप्टेंबरला दोन दिवसांच्या जी-२० गटाच्या बैठकीत चीनमधील आर्थिक घसरणीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला. बैठकीच्या सुरुवातीपासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, अमेरिका, जपान व इतर देशांनीही चीनच्या अर्थव्यवस्थेवरुन चीनवर दडपण ठेवले.
ह्या दबावापुढे झुकून चीनला चलनाच्या विनिमय दरासंदर्भात करार करणे भाग पाडल्याचे वृत्त आहे. ह्या कराराद्वारे चीनने पुढील काळात युआनचे जाणूनबुजून अवमुल्यन न करण्याचे मान्य केले आहे. चीनच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुख झोऊ झिओचुआन ह्यांनी ह्याला दुजोरा दिला. चीनचे अर्थमंत्री लोऊ जिवेई ह्यांनी पुढील ४-५ वर्षे देशाची अर्थव्यवस्था ७%च्या आसपास विकासदर राखण्याची अपेक्षा असल्याचे सांगितले.
चलन अवमुल्यन टाळण्याचे जाहीर करणार्या जी-२० देशांनी व्याजदराचाही मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या निवेदनात केवळ चलनाचे व्याजदर कमी ठेवणे आर्थिक विकासासाठी सहाय्यक ठरु शकत नाही असे सांगण्यात आले.
ह्या कराराद्वारे चीनने पुढील
ह्या कराराद्वारे चीनने पुढील काळात युआनचे जाणूनबुजून अवमुल्यन न करण्याचे मान्य केले आहे. पन मग दुसरी खेळी काय असणार याचा अधीच विचार केला पाहिजे.
चीनने असे मान्य केले म्हणजे दुसरे काहीतरी त्यांच्या धोरणात असणार असे वाटते. फार धूर्त धोरणी आहे ते.
नक्कीच असेल. एकीकडे डबघाईला
नक्कीच असेल. एकीकडे डबघाईला आलेली अर्थव्यवस्था आणि दुसरीकडे साऊथ चायना सी मध्ये खूप मोठा खर्चाचा प्रोजेक्ट असं दोन टोकाचं मॅनेज करतायत ते.
जर्मनीसह युरोपातील इतर
जर्मनीसह युरोपातील इतर सत्ताधारी नेते स्थलांतरितांचा वापर स्वार्थासाठी करत आहेत असा घणाघाती आरोप फ्रान्सच्या जहाल विरोधी पक्षनेत्या मरिन ली पेन ह्यांनी केला. ह्या मागे परोपकाराची भावना आहे ह्यावर त्यांचा विश्वास नाही. जर्मनीची लोकसंख्या घटत चालली असून जन्मदर कमालीचा घसरला आहे. जर्मनी वेतनातही घट करण्याची योजना आखत आहे. त्यासाठी जर्मनीत मोठ्याप्रमाणावर एकत्रीत दाखल होणार्या निर्वासितांमधून गुलाम कामगार तयार करण्याचा जर्मनीचा प्रयत्न सुरु असल्याचेही त्या म्हणतात.
जर्मनी युरोपच्या अर्थकारणावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत इतर देशांना हजारो निर्वासित स्वीकारण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जगातील दु:खांसाठी दारं उघडण्याची फ्रान्सची इच्छा किंवा क्षमता नाही. फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सर्कोझी ह्यांनीही युरोपने सर्वच निर्वासितांचे स्वागत करण्याची आवश्यकता नसल्याची भूमिका मांडली आहे.
हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन ह्यांनी स्थलांतरितांचा लोंढा कायम राहिल्यास युरोपातील ख्रिस्ती धर्माच्या मूल्यांचा पाया नष्ट होण्याची भीती व्यक्त केली आहे. ऑस्ट्रियाने देखिल १२००० निर्वासितांना स्वीकारल्यानंतर पुढे अतिरिक्त लोंढे स्वीकारण्यात असमर्थता दाखवली आहे.
जर्मन चॅन्सलर अँजेला मर्केल ह्यांनी स्थलांतरितांसाठी सीमा खुल्या करताना जास्तीचे अर्थसहाय्य करीत असल्याचे जाहिर केले असले तरी ह्या निर्णयाला खुद्द जर्मनीतूनही विरोध होतो आहे. जर्मनीतील सत्ताधारी आघाडीचा भाग असलेल्या 'क्रिस्तियन सोशल युनियन'च्या नेत्यांनी मर्केल ह्यांचे धोरण युरोपात चुकीचे संदेश पसरवणारे असल्याचे म्हटले आहे.
जर्मन अर्थतज्ज्ञ रेनहार्ड क्रुसियस यांनी स्थलांतरितांच्या आगमनातून पुढे निर्माण होणार्या समस्या युरोपिय महासंघाची शकले उडवतील असा इशारा दिला आहे. निर्वासितांच्या मुद्द्यावरचे एकतर्फी उदार धोरण आणि युरो वाचवण्यासाठी सुरु असलेला निरर्थक संघर्ष ह्यामुळे युरोपिय देशांची एकजूट उद्ध्वस्त झाली असल्याचेही ते म्हणाले.
युरोपिय देशांपाठोपाठ अमेरिका व ऑस्ट्रेलियावरही टीकेची झोड उठते आहे. ऑस्ट्रेलियाच्या स्टॉप द बोट्स धोरणावर संयुक्त राष्ट्रसंघासह स्वयंसेवी संस्थांनी स्पष्ट नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, आंतरराष्ट्रीय पातळीवरुन आलेल्या दडपणानंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी आपले सरकार अधिकाधिक सिरियन स्थलांतरितांना स्वीकारण्यास तयार असल्याची घोषणा केली.
----
- एकंदर IS अप्रत्यक्षरित्या अख्ख्या जगाला पिडतंय.
- भारताने वर्षानुवर्षं बांगलादेशी घुसखोर झेलले पण जगाने त्याची कधी दखलच घेतली नाही.
त्या प्रदेशात असूनही, श्रीमंत
त्या प्रदेशात असूनही,
श्रीमंत अरब देश मात्र निवासितांची काहीही जबाबदारी उचलायला तयार नाहीत.
सौदी अरेबियाने दाऊद्च्या
सौदी अरेबियाने दाऊद्च्या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी विशेष कक्ष उघडला आहे. आजच्या (८-९-२०१५) सकाळची पहिल्या पानावर बातमी.
यूरोपात मोठ्या संख्येने जे
यूरोपात मोठ्या संख्येने जे migrants जात आहेत त्यात बहुसंख्य मुस्लिम आहेत. ते मुस्लिम राष्ट्रांत शरण न घेता फर्स्ट वर्ल्ड असलेल्या यूरोपियन देशांत शरण घेत आहेत. त्याना तिथे राहू देणं हे मानवतेच्या दृष्टीने योग्य आहे. पण यामुळे या देशांतील मुस्लिमांची संख्या वाढली तर तिथे पुढेमागे कट्टरवाद वाढू शकतो. शरिया कायदा लावा अशी मागणी होऊ शकते.
यामुळे या स्थलान्तरिताना विरोधही होत आहे. परिस्थितीचा फ़ायदा घेऊन युद्धाची झळ न पोचलेले लोकही यानिमित्ताने यूरोपात स्थायिक होऊ पहात आहेत असाही एक आरोप होतो आहे.
हे सर्व पाहून प्रश्न पडतो की यावर काहीच उपाय नाही का ज्यामुळे या बांधवांची परवड थांबेल आणि यूरोपची ख्रिस्ती identity ही शाबूत राहील?
केश्विनी, निनाद सीरीयन
केश्विनी, निनाद सीरीयन रेफ्युजींसठी भारताचे अधिकृत धोरण जाहीर झाले आहे का?
नंदिनी, जॉर्डनने आतापर्यंत
नंदिनी, जॉर्डनने आतापर्यंत लाखो सिरियन स्थलांतरितांना आसरा दिला आहे, त्यांची काळजी घेतली आहे. कालच जॉर्डनमधील आपले राजदूत अनिल त्रिगुणायत जॉर्डनच्या प्लानिंग अँड इन्टरनॅशनल को-ऑपरेशन मंत्री इमाद फख्री ह्यांना भेटले व रेफ्युजींच्या मदतीसाठी रोख ०.५ मिलियन डॉलर्स जॉर्डन सरकारला देण्याचा भारताचा निर्णय कळवला.
This aid is part of a pledge made at the 3rd Pledging Conference on Syria held in Kuwait in March.
श्रीमंत अरब देश मात्र
श्रीमंत अरब देश मात्र निवासितांची काहीही जबाबदारी उचलायला तयार नाहीत.
योग्य मुद्दा!
खरे तर श्रीमंत अरब देशांविरुद्ध ब्र हि काढण्याची कुणाची हिंमत नाही - तेलाशिवाय कुणाचेच चालत नाही. नाहीतर जगभर दमदाटी करत फिरणार्या अमेरिका रशिया यांना हे शक्य आहे. खरे तर युरोपच्या सगळ्याच मोठ्या राष्ट्रांनी एकत्र येऊन असेच म्हंटले पाहिजे की हे निर्वासित सौदी अरेबिया किंवा इराणने घ्यावेत.
येईलच! आपले ते हे 'सेव्ह
येईलच! आपले ते हे 'सेव्ह गाझा' वाले पुरस्कारात बिझी होते ... आता लगेच येतील.
हा धागा मी पहिल्या दिवसापासून
हा धागा मी पहिल्या दिवसापासून पाहातोय. ६ महिन्यात २२ पाने झाली. आता असे वाटतेय की विषयवार सूची जर बनवता आली व त्यातच लिंक देता आली तर .....
चीन आपल्या चलनाचं आणखिन स्रळ
चीन आपल्या चलनाचं आणखिन स्रळ अवमुल्यन करणार नाही. असे केले तर त्याच्या निर्यातिवर निर्बंध येवु शकतात. या साठी मागच्या दाराने केलेले अवमुल्यन ते स्विकारतिल. असे अवमुल्यन चलनात तरलता (लिक्वीडीटी) वाढवुन केले जाते.
अमेरिकेने केलेलं क्यु.ई किंवा युरोपीयन युनियन करत असलेले क्यु ई (बॉंड बाईंग प्रोगराम), व्याज दरात प्रचंड कपात हे सगळे करुन ते साध्य करतिल.
शाम, तुमचा हेतू किंवा प्रयास
शाम, तुमचा हेतू किंवा प्रयास चांगलेच आहेत. पण ह्या विषयाला लिमिट नाहिये. ह्याची सूची बनवून हा विषय बंदिस्त नाही करता येणार. एक तर जगात जे घडतंय, घडत राहिल त्याला अनेक वळणं लागत राहतील. इथले प्रतिसाद विविध सोर्समधून मिळालेल्या माहितीवर आधारित आणि वेगवेगळ्या इंटरप्रिटेशनवर आधारित असतील. कितीतरी घडामोडी नजरेतून सुटल्यामुळे/वेळ न मिळाल्यामुळे/काही अपरिहार्य कारणामुळे इथे लिहिल्याही जाणार नाहीत. जेव्हा नजरेत येतील तेव्हा कुठल्यातरी मधल्याच टप्प्यावर इथे नोंद केली जाईल. त्यामुळे हा एक्सरसाईज इथे घेणं म्हणजे तुमची मेहनत व्यर्थ घालवल्यासारखं होईल असं वाटतंय.
स्तोत्रांच्या बाफवर वरीलपैकी कुठलेही अडथळे नव्हते त्यामुळे तिथे तुमचे प्रयास १००% फळाला आले
....... असं आपलं मला वाटतंय. कृपया गैरसमज नसावा
@अश्विनी के बरोबर आहे तुमचे
@अश्विनी के
बरोबर आहे तुमचे म्हणणे.
विषयानुसार अनुक्रमणिका बनविण्याचा विचार स्तोत्रांच्या बाफवर काम करत असताना सुचला होता. पण कसे करायचे ते लक्षात येत नव्हते.
म्हणून मी फक्त प्रयोग म्हणून हे सर्व करतोय.
Visual Basic किंवा VBA वापरून फक्त काही सेकंदात त्या पानावरील सर्व commentid मिळतील असा प्रयत्न करतोय व तो यशस्वी झालाय.
त्या पानावरील सर्व सभासदांची यादीही काही सेकंदात मिळवायची व ती commentid समोर घ्यायची असा प्रयोग करतोय व तोही यशस्वी झालाय.
आणखीन एक micro लिहून एका टिचकीद्वारे त्यातून विषयानुसार नविन यादी व ती सुध्दा लिंकासहित आपोआप तयार करण्याचा प्रयत्न आहे व तोही यशस्वी झालाय.
फक्त पोस्ट समोर विषय लिहिण्याचे काम फक्त mannually करायला लागणार आहे व त्याला पर्याय नाही.
नविन पान सुरू झाले की आधिच्या पानावर हे सर्व प्रयोग करायचे व आधिच्या database मधे भर घातली की नवीन यादी तयार अशी त्यामागची कल्पना होती.
असो. हे मी करू शकलो यातच मला समाधान आहे. job satisfaction मिळालेले आहे. तेव्हा थांबतो.
_/\_
धन्यवाद, शाम भागवत! आपण
धन्यवाद, शाम भागवत! आपण घेतलेल्या परिश्रमांचं कौतुक आहे.
आ.न.,
-गा.पै.
शाम, तुमचं इनिशिएटिव्ह,
शाम, तुमचं इनिशिएटिव्ह, युक्ती आणि प्रयास खरंच भारी आहेत. तुम्ही जी पद्धत वापरली/शोधून काढली ती राखून ठेवा. करु आपण कुठेतरी त्याचा वापर
@अश्विनी के तुमचा बाफ असेल तर
@अश्विनी के
तुमचा बाफ असेल तर नक्कीच करू. कारण तुमच्या बाफवर धुरळा नसतो. शिवाय जर कोणी प्रयत्न केला तर तुमच्या विनंतीला मान दिला जाऊन तो ताबडतोब थांबतो देखील. या बाफवर व स्तोत्रांच्या बाफवर हे प्रत्ययास आलेलेच आहे. अर्थात तुम्हीच तुमच्या वर्तुणूकीने हे स्थान मिळवलेले आहे हे मान्य करायलाच पाहिजे._/\_
तसेच माझ्या कौतुकाबद्दल सर्वांचेच आभार.
_/\_
शाम भागवत खुपच ग्रेट काम केले
शाम भागवत खुपच ग्रेट काम केले तुम्ही... आवडले.
क्रियेटिव्ह आहात!
शाम. या सॉफ्ट्वेअर चे कॉपी
शाम. या सॉफ्ट्वेअर चे कॉपी राईट घेऊन ठेवा. किंवा पेटंट. मग अमेरिकेत विकायला सोपे जाईल. काय वाट्टेल ते विकत घेतात इथले लोक! विशेषतः अॅपल साठी पण लिहीता आले तर उत्तम. बक्कळ पैसा न काय!
हाहाहाहा.
हाहाहाहा.
निर्वासितांच्या लोंढ्यांबरोबर
निर्वासितांच्या लोंढ्यांबरोबर ISचे दहशतवादीही युरोपात दाखल होवू लागल्याचे स्पष्ट झाले असून युरोपची सुरक्षा धोक्यात आल्याचे दिसू लागले आहे. लिबियातील ISवरील कारवाई थांबवली गेली नाही तर युरोपमध्ये पाच लाख निर्वासित पाठवून मानसिक आक्रमण करू अशी धमकी ISने दिली आहे.
निर्वासितांचे लोंढे शिरत असलेल्या हंगेरीच्या माध्यमांनी IS चे दोन दहशतवादी दाखल होण्यात यशस्वी ठरल्याचा दावा केला आहे. पण युरोपातील नक्की कोणत्या देशात ते शिरले आहेत त्याचा तपशील दिला नाही.
गेल्यावर्षी इटलीत सुमारे १ लाख ७० हजार निर्वासित दाखल झाले. ह्यावर्षी त्यांची संख्या खूप जास्त असल्याची भीती व्यक्त केली जाते.
Pages