मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो तेरा इशारा तो चल दू मैं सासरी >>> Lol

त्याच गाण्यात 'मजबूर दिलसे ना हो' च्या ऐवजी 'मजबूत दिलसे ना हो' ऐकलं होतं तेव्हा Proud

(सेम तमिळ शेजरीण प्रॅक्टीसिंग अनदर हिंदी साँग)

तारे तोड लाओ चांदनी से दूरके
घूंघट ही बनालो चांदनीसे पूछके
शर्मागयी तो बाहों मे ले लो
सांसो मे रहे मेरी ना सांसे
बोला ना हलके हलके
ओठ से टलके टलके

(मी इथे तिचे चुकीचे उच्चार लिहत असले तरी ती गाणं खूप छान म्हणते. मुळात माझ्याकडे ती उच्चार सुधारायलाच येते! तरीही मला हसू आवरत नाही!)

आज लॅपटॉप वर गाणं ऐकत होते ,

लेक ऐकत होता बराच वेळ , मग म्हणतो " मम्मा गणपती बाप्पचं गाणं लावलयस??"
मी म्हटलं का रे ?
म्हणतो , "गणपतीबाप्पा मोरया " असं म्हणतायेत सगळे .

गाणं होतं -- दिल धडकने दो च " गल्ला गुडियाऑ."

(चालीत म्हणून बघा Wink )

माझी लेक (वय वर्षे ३) अखंड बड्बड सुरू असते, काही तरी सुरु होतं तिचं ,
'बुळ बुळ... बुळ बुळ.... हे किसमिस'
'बुळ बुळ... बुळ बुळ.... हे किसमिस' 'लाल लाल हो जारे असं काहीतरी
मला अगोदर वाटलं कि हिने किसमिस खाल्ले अस्तील वा खात असेल. पण तस काहिच नव्हतं
थोड्यावेळाने टीवी सुरु झाला आणि हैदर मधील ते गाणं सुरु झालं 'बिस्मील बिस्मील, गुल गुल ए बिस्मील'
आणि तिचं उड्या मारणं सुरु झालं मग उलगडा झाला कोणतं गाणं होतं ते...
आणि मी न तिची आई Lol Rofl

देवानंद साठी किशोरकुमारनी गायीलेलं गाणं - मैं जिंदगी का साथ निभाता चला गया...
याच्यातली पुढचीच ओळ मी लहानपणी अशी ऐकायचो - मैं फित्र को कुंए मे ऊडाता चला गया...
इलाज नव्हता, कारण जमाना फक्त 'रेडिओ' चा होता...

कालांतराने हीच ओळ मी, मैं ईत्र को धुंए में ऊडाता चला गया... अशी ऐकू लागलो. वाचन वाढलं तसं 'ईत्र' शब्दाचा खरा अर्थ समजला. गाण्यात शब्द चपखल (अर्थ आणि मिटर च्या दृष्टिने) बसत होता...

हल्लीच टि.व्ही.वर जेव्हां 'दुनियादारी' बघीतला, तेव्हां खरा शब्द फिक्र आहे हे कळलं...
Happy

मित्र: सांग बघू विठ्ठला तू वेडा कुंभार गाण्यातला कुंभार कोणत्या मातीपासून भांडी बनवत असेल?
मी: (थोडा वेळ डोके खाजवून) काहीतरी नक्कीच फालतू असणार. सांग तूच आता...
मित्र: ह्या ह्या ह्या :G... अरे सोप्पय... देशी माती पासून... फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार Biggrin Proud Lol Lol Lol

तनु वेड्स मनु रिटर्न्स मधलं 'बन्नो तेरा स्वॅगर' मला
बन्नो तेरा सायकल लागे सेक्सी असंच ऐकु यायचं आतापर्यंत..
माबो वरचे सायकल प्रेमी गात असावेत बहुतेक Rofl

तुम क्या मिलें जानेजां प्यार जिंदगीसे होगया
अजि इज्जत ना लेनेका शुक्रिया शुक्रिया
इस नाचीजको आपने गाफिल क्यों समझा

Happy

इज्जत ना लेनेका शुक्रिया शुक्रिया>>>>>>> साती, अगदी अगदी +१००००००

त्यावेळी कसलं काय अर्थ समजायचा नाही.

तुम क्या मिलें जानेजां प्यार जिंदगीसे होगया
अजी इज्जत अफ़जाई का शुक्रिया शुक्रिया
इस नाचीजको आपने काबिल तो समझा !

इथे येऊन गेल असणार ते गाण..
लतआ आणि रफी यांच बहुतेक..

धरतीपर है आसमा..

मला काल पन आत्माच ऐकु आल..

अजि इज्जत ना लेनेका शुक्रिया शुक्रिया
इस नाचीजको आपने गाफिल क्यों समझा >>>>>>>>>>
नॉट गुड साती. कॉफी घेत होते ना मी.........

स्वॅगर(swagger) म्हणजे तोर्‍यात्/टेचात चालणे..>>
पण बाय द वे, गाण्याच्या चित्रीकरणा मध्ये कंगना स्वेटर उडवत नाचते का ते? त्यामुळे मला खरंच स्वेटर शब्द हरियाणवी भाषेत स्वॅगर सारखा बोलत असावेत असे वाटले होते

रच्याकने, कधी कधी गाणे डिरेक्ट करणार्‍याला किंवा कोरीओग्राफर ला शब्द स्वता:ला कळला नसेल तर तो ही चुकीच्या स्टेप्स देऊ शकतो.

इथे अवांतर होईल कदाचित पण,
प्रिती सागर ची लहान मुलांच्या इंग्रजी र्हाईम्ह्स ची एक audio-video cd आहे. त्यात एक गाणे आहे.

hot cross buns
hot cross buns
one a penny two a penny
if you have no daughters give them to your sons

ह्या मूळ नर्सरी र्‍हाईम मध्ये buns हा शब्द आहे. पण पडद्यावर काम करणारी नटी bums असा उच्चार करते. तिच्या ओठांच्या हालचालीवरून समजते. शिवाय लहान मुलांनाही केमेर्‍याकडे पाठ करून स्वतःच्या पार्श्वभागावर चापट मारण्याची स्टेप दिलीय. bums म्हणून Proud
गंमत म्हणजे स्क्रीन वर गाण्याच्या ओळी येतात त्यात buns असेच लिहून येते.

कंगनाच्या "बन्नो तेरा स्वॅगर..".गाण्याची हीच केस असावी काय ? Biggrin

मला तरी स्वेटर एकायला येते. पन गाणं पंजाबी ढंगाच असल्यानं ते स्वॅगर असावं.

पंजाबी उच्चार तसेही कधी कधी मिक्स न मॅच होतात....

गेस = गॅस
वगैरे वगैरे....

स्वॅगर हा ईंग्रजी शब्द आहे.. हल्ली हिंदीमधे काय काय घुसडतील ते सांगता येत नाही..
swagger: to walk or strut with a defiant or insolent air.

Pages