मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्रपट : मि. एक्स.

अलिफ से अ‍ॅपल तू .....
.....
......
इश्क का बॅटर तू .

( ए फॉर अ‍ॅपल , म्हणून वाटलं असेल बरोबर Sad )

बो लावल्यावाचूनही मृत्यु जरी आला ईथे...थांबेल तोही पळभरी... >> Lol
'मान वेळावूनी धूंद बोलू नको' हे गाणे मी 'मान वेडावूनी दूर होऊ नको' असेच कायम ऐकायचे. हल्ली हल्ली च मला अ‍ॅक्च्युअल वर्ड्स कळले. पण 'मान वेडावूनी दूर होऊ नको' हेच एक्दम डोक्यात बसले आहे की तेच बरोबर वाटते.

वादा न तोड ... वादा न तोड - हे गाण माझ्या बहिणीने (लहानपणी साधारणत ३-४ वर्षाची असताना) एकले तेव्हा ती आइला म्हणाली - हे बघ ते "शाळा नको... शाळा नको..." म्हणतायेत Happy

'टपोरी पिंगा, टपोरी पिंगा, ' म्हणजे काय असा प्रश्न खूप दिवस होता,
त्यात 'तुझ्या पिंग्याने मला बोलावलं...' त्यातला पिंगा ही व्यक्ती असावी किंवा पिंगे आडनावाचा माणूस..
कुणी खूलासा करेल काय? Proud

पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा गं पोरी पिंगा, असं आहे ते.

पिंग्याने बोलवलं कसं हा प्रश्न आहेच Happy हा तो टपोरीवाला पिंगा असू शकेल Wink

य असा प्रश्न खूप दिवस होता,
त्यात 'तुझ्या पिंग्याने मला बोलावलं...'

<<<<<<<<<
तुझ्या पिंग्यानं मला भुलवलं ....... असं आहे बहुधा ते!

कितना प्यारा वादा है हिम्मतवाली आखों का
हे असेच ऐकायचो मी , मग उशीरा ट्यूब पेटली आणि ते इन मतवाली आखों का असे कळले.

मी सुरुवातीला सुद्धा हिंमतवाली एकायचे, म्हणायचे मग तुनळी व गूगल बाबा पैदा झाल्यावर कळले.
ते इन मतवाली आहे. तसही जितू ला पसंद करणे म्हणजे हिंमतच आहे ना, तो पांढरा शर्ट, पांढरी टाईट पँट. आणि तो बायकी नाच. इतकं सगळं काय खायची गोष्ट आहे. डोळ्यांची हिंमतच लागेल ना. Proud

असच दुसरं गाणं म्हणजे, उसने जाना की तारीफ. Proud
मला तर नसरत फतेह अली बोबडेच वाटतात बर्‍याच गाण्यात. आणि त्यांचा पुतण्या सुद्धा वाटतो.

कालच माझ्या मैत्रिणीला गाताना ऐकल... नाही जरी सरी तरी भिजते अन्ग घामाने.... हसुन हसुन पुरेवत झाली माझी... उन्हाळ्याचा परिणाम झाला असावा... Rofl

कुठल्याही गाण्यात जेव्हा 'जुल्मी' हा शब्द येतो, तिथे तो मला कायमच 'फिल्मी' का ऐकू येतो, समजलेलं नाही...
उदा:-
डोळे हे 'फिल्मी' गडे, रोखूनी मज....
'फिल्मी' संग आँख लगी, 'फिल्मी' संग....
बलम पिचकारी... 'फिल्मी' ये हाजीर जवाबी हो गयी...

जरा जास्तच फिल्लमबाज असल्याचा परिणाम का ! Happy

'जुळून येती....' वर प्रयोग करून बघा.. तुम्हाला ते 'फिळून येती....' असं ऐकू आलं तर तुमच्या 'जु' मधे अडचण (Problem ) आहे असा निष्कर्ष निघतो.. Proud
Light 1

मानसीचा चित्रकार तो, तुझे निरंतर चित्र काढतो या गाण्याचे शब्द मला लहानपणी असे ऐकू यायचे

मानसीचा चित्रकार तो, तुझे नंतर चित्र काढतो!

याचा मी करून घेतलेला अर्थ म्हणजे तो चित्रकार मानसी नावाच्या बाईचे चित्र काढत आहे त्यामुळे तिचं चित्र झालं की तुझे (म्हणजे हिरॉईनचे) चित्र काढेल, तोपर्यंत तू धीर धर असे हिरॉईनची समजूत घालणारे गाणे वाटले होते Happy

तनु वेड्स मनु रिटर्न्स मधे लिहिल्याप्रमाणे मला
बन्नो तेरा स्वॅगर ऐवजी बन्नो तेरा स्वेटर लागे सेक्सी असं ऐकु यायचं ..
बर त्यात ती स्वेटर घालुन दाखवली पण आहे ना Lol

mala te-

banno teri akhiya sur me gaali

banno tera mukhada laath khaaye

asa aikayalaa yaayacha Happy

"सुन साहिबा सुन" गाण्यात ओळी आहेत...


तू जो हाँ कहे तो, बन जाए बात भी
हो तेरा इशारा तो चल दू मैं साथ भी

लहानपणी हो तेरा इशारा तो चल दू मैं सासरी असे ऐकू यायचे.
सासरी यायला उतावळी झालेली प्रेयसी Proud (क्यायच्याक्याय) Lol Lol

Pages