मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आई स्वयंपाक करताना रेडिओ लावायची. मी तेव्हा शिशुवर्गात होते आणि हिंदीचा गंधही नव्हता. नुसतं 'है' ' नही' लावत असे रेग्युलर मराठी वाक्यांना :इश्श:. एक गाणं लागायचं आणि बहुतेक आईचंही आवडतं होतं कारण ती पण अधुन मधुन गुणगुणत असे "ऐ दिल मुझे बता दे...."

ते ऐकून ऐकून मी मोठ मोठ्याने म्हणत असे "ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया है |" Uhoh एकिकडे भातुकली खेळणं चालू.

आता ते माझं खूप आवडतं गाणं आहे.

आशू Rofl

आयांचं ऐकून लहान पोरं जमेल तशी गाणी म्हणत असतात.
माझा मुलगा २-३ वर्षांचा असताना जोरजोरात म्हणायचा - "दिल पुकाऽऽऽले ना ले ना ले ना ले" Lol

दिल पुकाऽऽऽले <<<<< हे आईचं ऐकून ना लले? Wink

लहानपणी जुगनु नामक एका चित्रपटातलं हे गाणं, 'तेरा बिछाना मै छोडुंगा सोनिये, भेज दे चाहे जेलमे' असंच ऐकू यायचं कित्येक दिवस. बिछान्यासाठी जेलमध्ये जायची तयारी का हिरोची हे बरेच दिवस डोक्यात येत नव्हतं.

एकदा कॅसेटच्या कव्हरवर गाण्याचे मूळ शब्द कळले - तेरा पीछा ना मै छोडुंगा सोनिये

रंग बावऱ्या स्वप्नांना… सांगा रे सांगा…
कंद मुळांना… वेलींना… सांगा रे सांगा…

हे गाणं मी खूप दिवस असंच समजत होते Proud

पण मूळ शब्द काय आहेत...... मला आता काही केल्या आठवत नाहियेत. स्मित
>>
मला पण असचं झालेलं.
एकतर ते कंदमुळांना शब्द इतका परफेक्ट बसलाय. आता मी पण तसच म्हणायला लागलेय

शाळेत असतांना माझे केस बरेच लांब होते आणि टोकांकडे पातळ. शाळेत जातांना युनीफॉर्मचा भाग म्हणून वेणी घालून लाल चपट्या, सुळसुळीत रिबीनीचा बो लावायची पद्धत होती. पण तो सतत सुटायचा त्यामुळे वैतागच यायचा. 'बो लावल्यावाचूनही मृत्यु जरी आला ईथे...थांबेल तोही पळभरी...' हे ऐकलं की असं वाटायच की जर तो कोणी मृत्यु जर तसाच शाळेत आला तर त्यालाहि क्षणभर थांबून आधी बो बांधावा लागेल...

कोकणातल्या माणसांना माहित असेल - फणसाचे दोन प्रकार असतात कापा फणस आणि रसाळ ( "बरका" म्हणतात मालवणी लोक)

घूंघट की आड से दिल बरका
हा दिल बरका दिल बरका दिल बरका

आधीच हिंदीचं ज्ञान अगाध, मला कधीच संदर्भ लागन नव्हता ह्या गाण्यात रसाळ फणस कोठून आला

ते "दिल्बर का" आहे - चुकीच्या जागी तोडलंय गाताना Happy

Pages