आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.
कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.
कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.
वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.
धन्यवाद.
================================================
NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP
गापै , तुम्हाला मराठी
गापै , तुम्हाला मराठी प्रतिशब्द माहित नसलेला एखादा इंग्रजी शब्द आहे का?
गापै, धन्यवाद.
गापै, धन्यवाद.
धन्यवाद गा पै, भारीच आहात कि
धन्यवाद गा पै,
भारीच आहात कि तुम्ही ..
विकु
'सेंकाकू' बेटांच्या वादात
'सेंकाकू' बेटांच्या वादात चीनची जपानवर हल्ला चढवायची तयारी - अमेरिकेत वास्तव्याला असलेल्या जपानच्या विश्लेषक काईल मिझोकामी ह्यांचा दावा.
चीनच्या 'पिपल्स लिबरेशन आर्मी'ने जपानचे लष्करी सामर्थ्य आणि कमकुवत बाबींचा अभ्यास केला असून त्यानुसार चीनचे लष्कर जपानवर हल्ला चढवू शकते.
जपानवर सायबर हल्ला करुन युद्धाची सुरुवात होवू शकते. जनजीवन विस्कळीत करण्यासाठी चीनने हे हल्ले केल्यावर समुद्राखालून जपानला जोडणारी इंटरनेटची केबलही तोडू शकते असे मत मिझोकामी यांनी व्यक्त केले. ह्यात जपानचे मोठे नुकसान केल्यावर चीनची आर्टिलरी कमांड जपानवर बॅलेस्टिक आणि क्रुस मिसाईल्सचा मारा करुन जपानी सुरक्षेला हादरा देवू पाहील. हे युद्ध भडकल्यावर अमेरिका जपानच्या सुरक्षेसाठी युद्धात उतरेल. पण अमेरिकेलाही हादरे देण्याचे सामर्थ्य चीनच्या लष्कराकडे असल्याचे मिझोकामी ह्यांनी म्हटले आहे.
त्याचबरोबर जपानचा व्यापार रोखण्यासाठी चीन सागरी मार्गे जपानला येणार्या व्यापारी जहाजांची अडवणूक करु शकतो. जपान ६०% धान्याची तर ८५% ऊर्जेची आयात करतो. ही आयात रोखण्याची योजना केली गेल्याचे मिझोकामी ह्यांचे निरिक्षण आहे. त्यासाठी जपानचे दळणवळण उपग्रहही नष्ट केले जाण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्ष युद्ध भडकल्यावर चीन 'डाँगफेंग-१० आणि 'डाँगफेंग-२०' ह्या आंतरखंडीय मिसाईल्सचा, तसेच 'डाँगफेंग-२१डी' ह्या विमानवाहू युद्धनौकाभेदी मिसाईल्सचाही वापर करण्याची शक्यता आहे. हा वापर अमेरिकाविरोधातही होवू शकतो. जपानमध्ये तैनात असलेल्या 'यूएसएस रोनाल्ड रिगन' ह्या विमानवाहू युद्धनौकेचा वेध घेवून चीन ह्या संघर्षाची तीव्रता वाढवू शकतो.
ह्या आधीही अमेरिकेतील विश्लेषकांनी चीन आणि जपानमध्ये युद्धाची शक्यता वर्तवली होती. सेंकाकू बेट तसेच 'ईस्ट चायना सी'वरील हक्कावरुन पूर्व आशियात संघर्षाची ठिणगी पडू शकते असेल पेंटँगॉनशी संलग्न एका लष्करी विश्लेषकांच्या संघटनेने म्हटले होते. सद्ध्या तरी चीन 'साऊथ चायना सी'च्या वादात गुंतला असून फिलिपाईन्स व व्हिएतनाम चीनपुढे आव्हान उभे करत आहेत. त्याचबरोबर चीनला तिथेच गुंतवून ठेवण्यासाठी अमेरिका आणि जपान ह्यांनी फिलिपाईन्सबरोबरच्या नौदल सरावात सहभाग घेतला आहे.
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात
पाकिस्तानच्या सिंध प्रांतात गेल्या काही दिवसांत उष्माघातामुळे ६०० हून अधीक बळी गेले आहेत. ह्या भागात आणीबाणीची घोषणा झाली असून कराचीसह काही भागांमध्ये लष्करी तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
फ्रान्सच्या तीन
फ्रान्सच्या तीन राष्ट्राध्यक्षांवर अमेरिकेने नजर ठेवल्याची माहिती विकिलिक्सने प्रसिद्ध केल्यावर फ्रान्समध्ये संताप उसळला आहे. ह्या हेरगिरीमुळे अमेरिका हा फ्रान्सचा मित्र नसल्याची टीका फ्रान्सच्या विरोधी पक्षनेत्या आणि राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार असलेल्या मारी ली पेन ह्यांनी केली आहे. अमेरिकेबरोबरील व्यापारी चर्चा त्वरीत थांबविण्यात यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. ब्रिटन व जर्मनीच्या राष्ट्रप्रमुखांवरही नजर ठेवण्यात आल्याच्या वृत्तामुळे ह्या देशांनीही नाराजी व्यक्त केली होती.
'हेरगिरी न करण्याचे वचन अमेरिकेने दिले होते. अमेरिकेने आपले वचन पाळायला हवे होते' अशी प्रतिक्रिया फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाहून दिली गेली आहे.
मित्र राष्ट्रांमध्ये हेरगिरी कधीही मान्य केली जाऊ शकत नाही अशी टीकाही केली गेली आहे.
'टॉप सिक्रेट' म्हणून प्रसिद्ध झालेल्या माहितीत अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष जॅक शिराक, निकोलस सर्कोझी आणि सद्ध्याचे राष्ट्राध्यक्ष फ्रांकोईस हॉलान्दे ह्यांच्यावर नजर ठेवली होती.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत भारताने मांडलेला लख्वीवरील कारवाईसाठी मांडलेला प्रस्ताव चीनने रोखला होता आणि त्यावर गंभीर चिंता व्यक्त करून हा प्रश्न सर्वोच्च पातळीवर चीनकडे उपस्थित केला जाईल असे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले होते.
आता नेपाळला सहाय्य करण्यासाठी काठमांडू येथे आयोजित करण्यात आलेल्या परिषदेत चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी सहभागी झाले आहेत. त्यांच्याशी भारतीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज ह्यांनी भेट घेतली व लख्वीबाबत चीनने घेतलेल्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. तो लख्वी म्हणजे कुणी सामान्य दहशतवादी नसून १६६ बळी घेणार्या मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आहे अशा शब्दांत त्यांनी चीनकडे भारताची भूमिका स्पष्ट केली. लख्वीला पाठीशी घालण्याच्या चीनच्या निर्णयाचा भारताबरोबरील संबंधांवर विपरित परिणाम होऊ शकतो ह्याची जाणीवही चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना करुन दिली. भारत व चीन दोघेही दहशतवाद्यांच्या कारवायांचे बळी ठरत आहेत, त्यामुळे चीनने दहशतवाद्यांमध्ये चांगले आणि वाईट असा भेदभाव करु नये अशी अपेक्षाही व्यक्त केली.
ह्यावर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपला देश सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात आहे असे सांगून लख्वी प्रकरणात आपण जातीने लक्ष घालू असे आश्वासन दिले. तसेच चीन व भारताचे दहशतवादाच्या विरोधातील सहकार्य यापुढेही कायम राहिल असा विश्वास वँग यी ह्यांनी व्यक्त केला.
----------
माझ्या डोक्यात काही उटपटांग प्रश्न आले :-P. दहशतवाद्यांची टॉपमोस्ट संघटना आय.एस. ही चीनकडे वळली तर चीन काय करेल? 'इस्ट चायना सी' व 'साउथ चायना सी' मधे स्वतः दादागिरी करणारा चीन दहशतवादाविरोधात नक्की काय करतोय? जगातील सगळ्या बुद्धीमत्तेचा प्रवाह अमेरिकेच्या दिशेने वाहत असताना चीन व उत्तर कोरिया हे देश अतीअद्ययावत शस्त्र सामग्री कशी, कुठे व कधी डेव्हलप करतात? चीनचं तर निदान नाव तरी येत असतं वादांमध्ये. उत्तर कोरिया तर एका कोषात असल्यासारखा भासतो पण महाडेंजरस देश म्हणून ओळखला जातो व तसा तो आहे ही.
हे वाचा: अर्थात हे एक मत आहे.
हे वाचा:
अर्थात हे एक मत आहे.
http://www.zdnet.com/article/are-indian-h-1b-workers-a-threat-to-america...
पण अमेरिकनांना काय? आजकाल सगळ्याच गोरे नसलेल्या लोकांबद्दल कुणिही काहीहि, खरे, खोटे बोलावे नि कुणाचे ना कुणाचे तरी डोके भडकते, नि उठून लगेच गोळीबार! आजूनहि काळ्या लोकांचा द्वेष संपला नाही, पण त्याला प्रसिद्धि जास्त मिळते म्हणून आता नजर इतरांकडे.
<<ह्यावर चीनच्या
<<ह्यावर चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी आपला देश सर्व प्रकारच्या दहशतवादाच्या विरोधात आहे असे सांगून लख्वी प्रकरणात आपण जातीने लक्ष घालू असे आश्वासन दिले.>>
------ राष्टसन्घात विरोध केला जातो हे त्यान्च्या पर-राष्ट्रमन्त्र्यन्च्या पुर्व सहमतीने झाले असणार. आता लक्ष घालुन अजुन काय नवे शिधणार आहेत ?
चिन पुर्ण विचार करुन भुमिका घेतो. आय एस आय चिनच्या वाटेलाही जाणार नाही... अमेरिकेला हिणवण्यासाठी चिन स्वतःला पाकचा all weather friend म्हणवतात...
दहशतवादी भारताला त्रास देणार असतील तर चिन सोयिस्कर डोळेझाक करतो... अशाच प्रकारची डोळेझाक २००१ पर्यन्त अमेरिका करत आला आहे.
दहशतवादी भारताला त्रास देणार
दहशतवादी भारताला त्रास देणार असतील तर चिन सोयिस्कर डोळेझाक करतो... >>> खरं आहे. म्हणूनच चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांचे ते आश्वासन म्हणजे वेळ मारुन नेणे आहे. तोंडावर जाऊन सांगितल्यावर तसे बोलणे भागच पडले असेल.
चीनने नुकतीच वू-१४ ह्या
चीनने नुकतीच वू-१४ ह्या अमेरिकन क्षेपणास्त्रांना चुकवू शकेल अशा अण्वस्त्रक्षम यंत्रणेची चाचणी केली. त्या अनुशंगाने चीनच्या लष्करी ताकदी बद्दल व चीनच्या धोरणांबद्दल सकाळ्मधे आलेल्या लेखाचा दुवा देतो आहे.
http://online5.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5053063239529273562&Se...संपादकीय&NewsDate=20150626&Provider=-&NewsTitle=चिनी आक्रमकतेचे नवे रूप
ग्रीसने आंतरराष्ट्रीय नाणे
ग्रीसने आंतरराष्ट्रीय नाणे निधीचा हप्ता चुकवला तर राष्ट्र दिवाळ्खोरीत जाण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक शेयरबाजार पडले.
(या पुर्वी अर्जेंतिना दिवाळखोरीत गेला होता.)
आंतरराष्ट्रीय नाणे निधी हे नाव आंतरराष्ट्रीय असले तरी त्यावर अमेरिकेची आणि युरपची जवळपास मक्तेदारी आहे हे ध्यानात ठेवले पाहिजे.
याची स्थापना ब्रिटनच्या ब्रेटन वुडस कमिशनच्या सल्ल्याने झाली होती. जगावर राज्य गाजवायचे असेल तर आता आर्थिक सत्तेतूनच गाजवता येईल असे सल्ले या कमिशन ने १९४४ मध्ये ब्रिटनला दिले. मग राजकिय सत्तेचे व्यवस्थापन आर्थिक साधनांनी करण्यासाठी याची स्थापना झाली.
१९५१ पासून यावर फक्त युरोपिय समुदायाचे(च) मॅनेजिंग डायरेक्टर्स आले आहेत हे नोंद घेण्याजोगे आहे.
या निधी वर आपल्या देशाचा आर्थिक फायदा होईल असेच धोरण विकसनशिल देशांवर लादल्याचे आरोप आहेत.
या निधिमध्ये अमेरिकेचे मतदानाचे वाटे सर्वात मोठे आहेत. अमेरिकेचा १७.६९% कोटा आहे. ज्याचा मतदानाचा वाटा मोठा तो आपल्या दिशेने निधीची धोरणे वाकवतो.
ग्रीस याला बराच बधला होता. २००८ साली मंदीमुळे प्रमुख कर्जे घ्यायला सुरुवात झाली. निधीची अनेक जाचक धोरणे त्यांनी मान्य केली होती.
निव्वळ व्याजाचे पैसे देण्यासाठी नवीन कर्ज घेतली होती. अर्थात त्यावरही व्याज असणारच होते. म्हणजे अगदी सावकारीच! पण मुळ अर्थव्यवस्थेत पैसा नसणे, भरपूर बेकारी, सरकार कडून अनेक धोरणातून खैरात. यामुळे गती मिळाली नाही. आणि हळूहळू सगळीच कर्जे थकली आहेत.
आता ग्रीस मधली सगळी एटिएम बंद केली आहेत कारण आहेत नाहीत ते पैसे लोक काढून घेत आहेत. ५ जुलै पर्यंत बँका बंद असणार आहेत कारण देशात खेळते भांडवल कमी पडते आहे.
निवडणुका झाल्यावर आलेले नवीन सरकार आता पुढे वाकायला तयार नाही त्यामुळे ग्रीस दिवाळखोरीतून (आपले?) पैसे बुडू नयेत म्हणून प्रमुख देशांची तारांबळ उडाली आहे.
Officials in Pakistan's MQM
Officials in Pakistan's MQM party have told the UK authorities they received Indian government funds, the BBC learnt from an authoritative Pakistani source
A Pakistani official has told the BBC that India has trained hundreds of MQM militants over the past 10 years.
The Indian authorities described the claims as "completely baseless". The MQM also strongly denied the claims.
निनाद, ग्रीसबद्दल आता खूप
निनाद, ग्रीसबद्दल आता खूप उत्सुकता आहे. आजचीच डेडलाईन आहे ना?
अमेरिका-इराण अणुकराराची पण आजचीच डेडलाईन ना?
भरत, ह्म्म.
भारताने चीनच्या पाकिस्तानातील दहशतवाद्यांना अर्थसहाय्य देण्याबद्दल नुकत्याच ब्रिस्बेन येथे झालेल्या FATF meet मधे बूच मारून ठेवलंय.
http://m.timesofindia.com/India/India-blocks-Chinas-bid-to-save-Pakistan...
हो अश्विनी आजच ग्रीसचा शेवटचा
हो अश्विनी आजच ग्रीसचा शेवटचा दिवस आहे. काही तरी घडेल आणि ग्रीस पैसे देउ शकेल अशी आशा आहेच.
आज घड्याळात एक सेकंद वाढणार आहे. चंद्राच्या बलाने पृथ्वीचे वेग अनियमीत होतात. त्यामुळे पुर्वापारचे पृथ्वीच्या परिवलनावर चालणारे घड्याळ वेळ चुकवते. आता सध्या अणू आधारीत वेळ निर्धारीत करणारी घड्याळे वापरात असल्याने हा फरक जास्त ठळक झाला आहे. आज रात्री एक सेकंद वाढवून हा फरक नियंत्रित केला जाणार आहे.
आपल्या जीवनात याचा अणुमात्रही फरक पडेल असे दिसत नाही
केश्विनी, ग्रीससारख्या
केश्विनी,
ग्रीससारख्या चिमुकल्या अर्थकारणावर आंनाने एव्हढं लक्ष केंद्रित करण्याची कारणं तपासून बघायला पाहिजेत. आज या घडीला युक्रेनदेखील ग्रीससारखेच व्याजाचे हप्ते फेडू शकत नाही. मग युक्रेन का बरं दिवाळखोरीत नाही?
कारण असं की युक्रेन युरोचा भाग नाही, पण ग्रीस आहे. ही सगळी धडपड युरो या चलनास वाचवण्यासाठी चालू आहे. आज ग्रीस आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची कर्जे बुडवून युरोच्या बाहेर पडला तर बाकीचे युरोतले देशही हेच करतील.
ग्रीसमधल्या परिस्थितीवर एक टोकाचा उपाय म्हणून नाणेनिधीने तिथल्या भ्रष्ट लोकप्रतिनिधींना हाताशी धरून दैनंदिन पेढीव्यवहार (बॅंकिंग) बंद पाडले. त्यामुळे लोकांना वापरायला रोकड मिळेनाशी झाली आहे. लोकांचे दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत. मग अशी जनता नाणेनिधीकडे दीनवाणेपणे यावी अशी योजना आहे.
ग्रीक जनता ठामपणे उभी राहिली तर नाणेनिधीला सुंदरपैकी धडा शिकवू शकतात. व्हर्सायच्या तहानुसार जर्मनीवर लादलेली कर्जे हिटलरने एका घोषणेद्वारे धाडकन रद्दबातल केली होती.
ब्रिक्सपेढी हा देखील नाणेनिधीस तुल्यबळ पर्यायी होऊ शकतो का? यावर अधिक चर्चा व्हावी अशी अपेक्षा आहे.
आ.न.,
-गा.पै.
गापै, जगाचे आर्थिक व्यवहार
गापै, जगाचे आर्थिक व्यवहार किंवा पत ही कुणा एकाच समुहाच्या हाती एकवटण्याचे हे धोके आहेतच. त्याचसाठी ब्रिक्स किंवा येवू घातलेली एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB) हे पर्याय असणं आवश्यक आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने सुमारे १.७ अब्ज डॉलर्सच्या कर्जाची परतफेड करु न शकलेल्या ग्रीसला 'डिफॉल्टर' यादीमध्ये टाकले. 'डिफॉल्टर' लिस्टमध्ये गेलेला ग्रीस हा पहिलाच प्रगत देश आहे. हे कर्ज फेडले जात नाही तोवर ग्रीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कसलीही मदत मिळणार नाही.
http://timesofindia.indiatimes.com/world/europe/Greece-defaults-on-debt-...?
ह्याचा भारतावर काय परिणाम होईल?
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Greece-crisis...
नीती आयोगाचे व्हाईस चेअरमन श्री. अरविंद पनगारिया ह्यांच्या म्हणण्यानुसार भारतातील अर्थव्यवस्थेला अगदी थोडाच काळ फरक पडेल.
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/India-well-pr...
रशिया किंवा अजून कुठल्या
रशिया किंवा अजून कुठल्या देशावर कधी, कुठले व कितपत निर्बंध घातले गेले आहेत हे कुठल्या साईटवर खात्रीलायकरित्या समजू शकेल? अगदी नजिकच्या काळातील अपडेट्स पण हवे आहेत.
केश्विनी, इथे एक यादी आहे :
केश्विनी,
इथे एक यादी आहे : http://www.bscn.nl/sanctions-consulting/sanctions-list-countries
हे संकेतस्थळ पिंजून काढावं म्हणून सुचवेन. काही प्रश्न असल्यास त्यांना संपत्रातून संपर्क साधता येईल.
आ.न.,
-गा.पै.
गापै, अत्यंत आभारी आहे. मला
गापै, अत्यंत आभारी आहे. मला ज्या गोष्टीबद्दल माहिती हवी होती तिचा निसुटता उल्लेख आहे. त्यामुळे कितपत अॅप्लिकेबल आहे, मुळात अॅप्लिकेबल आहे का ते कळत नाहिये. तसेच w.e.f. तारिखही दिसत नाहिये. ते टेबल २६ मे ला अपडेट केलेले आहे. अजून डिटेलवार ती साईट पाहीन. भारताची कुठली ऑफिशियल साईट (लिंक) आहे का? मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स किंवा MEAची?
बिच्चारे ग्रीस राष्ट्र!
बिच्चारे ग्रीस राष्ट्र! अमेरिकेसारखे १७ ट्रिलियन डॉलरचे कर्ज करून स्वस्थ बसता येत नाही त्यांना
अमेरिका मात्र पुनः आपल्या आर्थिक परिस्थितीच्या जोरावर इकडे तिकडे दादागिरी करत हिंडतात!
अमेरिकेवरच बहिष्कार टाकावा. . जगातली अर्ध्याहून अधिक अशांतता, अतिरेकीपणा, युद्धे एकदम बंद पडतील.
तसेहि इथे काही विशेष वेगळे नाही जे इतर देशांना करता येणार नाही.
Adani Enterprises has
Adani Enterprises has suspended engineering work at USD 16.5-billion Carmichael mine in Australia on account of delay in approvals. In a BSE filing, the firm said that for the past 6-12 months, Adani has maintained a level of investments, jobs and sub-contractor engagement for its mine, rail and port projects in Australia in anticipation of finalising approvals and decisions.
The project budget was based, understandably, on the anticipated approval timelines and milestones, it added.
"As a result of changes to a range of approvals over that time, it's necessary to synchronise our budget, project timelines and spending to meet those changes. Accordingly, we have suspended detail engineering work. However, the remaining activities related to the projects are still continuing," the filing said.
गार्डियन वृत्तपत्र मात्र म्हणते आहे की क्वीन्सलँड प्रशासनाने मात्र या दिरंगाईबाबत इन्कार केला आहे.
Indian mining giant has cited ‘critical’ need to finalise ‘approvals and timelines’ as its reason for halting engineering work – but mining minister’s office says ‘all state regulatory processes have been completed to schedule’
A senior engineering source told Guardian Australia that Adani had cited state government delays when stopping work by WorleyParsons and Aecon on the rail joint venture, Aurecon on the port expansion and SMEC on other work.
But the source said the move “made no sense” as a savings measure and the state government’s insistence no delays had occurred raised further questions about the company’s future intentions.
“If there are no delays, why isn’t the engineering going ahead?” he said, adding that Adani’s move raised the question it could be preparing to retreat from the project.
The Greens senator Larissa Waters said the project was “economically and environmentally reckless [and] clearly now in its death throes”.
“The wheels are falling off this project because global coal prices have tanked and renewable energy technology is surging ahead,” she said.
“Five years in and Adani still can’t find anyone to finance this white elephant. The only person who was short-sighted enough to want finance this white elephant was Campbell Newman, with taxpayers’ money, which Queenslanders booted him out for.”
Industry sources said the move to suspend preparatory work by WorleyParsons and Aecon, Aurecon and SMEC at this stage of a project was unheard of and made no sense as a savings measure even amid delays.
Adani is also facing legal challenges from Indigenous landholders and conservation groups, one of which is likely to push state government decisions on mining lease and environmental approvals back until the end of the year at least
जानेवारी २०१५ मध्ये क्वीन्सलँड राज्यात निवडणुका होऊन सत्तांतर झालेले आहे.
एकाच बातमीकडे बघायचे दोन
एकाच बातमीकडे बघायचे दोन दृष्टिकोण
India’s efforts to get a censure issued against Pakistan over its inaction against terrorist organisations like Jamaat-ud-Dawa (JuD) and Laskhar-e-Toiba (LeT) at an international forum — the Financial Action Task Force (FATF) in Brisbane, Australia — has drawn a blank with countries like China, Russia, New Zealand and Australia opposing the move.
However, the FATF has referred the matter to one of its regional bodies — the Asia Pacific Group (APG) on Money Laundering.
---
NEW DELHI: Pakistan's enforcement of UN financial sanctions against terrorism will be closely monitored by Financial Action Task Force (FATF) through its associate body, the Asia Pacific Group on Money Laundering (APG), after India successfully blocked China's attempt at a recent FATF meet in Brisbane to save non-FATF member Pakistan from such scrutiny.
According to sources in the government, India, with the support of allies like the US, managed to derail China's bid which was backed by Australia to shield Pakistan on terror financing. The FATF meet agreed with India's argument that Pakistan, despite not being part of FATF, was part of APG which works in close collaboration with FATF, and its enforcement of targeted financial sanctions against terrorism should be subject to monitoring by FATF through the APG.
भरत, शक्य झाल्यास शक्य
भरत, शक्य झाल्यास शक्य तेवढ्या मराठीतून घडामोडींच्या बातम्या द्याल का?
बहुशः मराठीतच लिहितो. इथेही
बहुशः मराठीतच लिहितो. इथेही प्रयत्न केला होता. पण यात अनेक पारिभाषिक शब्द आहेत. काहीतरी विचित्र लिहिण्यावाचण्यापेक्षा मूळ इंग्रजी मजकुरातूनच अर्थ नीट पोचलेला बरा.
ह्म्म. मलाही कधी कधी कठिण
ह्म्म. मलाही कधी कधी कठिण जातं मराठीतून ट्रान्स्लेट करुन लिहिणं. मग थोडक्यात लिहिते आणि लिंक देवून टाकते. अगदीच जमलं नाही तर थोडं कॉपी पेस्ट आणि थोडं भाषांतर.
इंडोनेशियामध्ये १ जुलैपासून
इंडोनेशियामध्ये १ जुलैपासून परदेशी चलनाच्या वापरावर निर्बंध लागू केले गेले आहेत. त्यामुळे हॉटेल, भाड्याने प्रॉपर्टी घेणे, वेतन, विमान प्रवास अश्या कुठल्याही व्यवहारांमध्ये अमेरिकी डॉलर किंवा इतर कुठलेही परकिय चलन वापरता येणार नाही. 'इंडोनेशियन रुपया' ह्या स्थानिक चलनाची जोरदार घसरण चालू असल्याने, ती थांबवण्यासाठी हा उपाय केला गेला आहे. नियम तोडणार्यास १ वर्षाचा तुरुंगवास किंवा १५००० डॉलर्स दंड ठोठवण्यात येणार आहे.
पायाभूत सुविधा, ऊर्जा प्रकल्पांचे बांधकाम करणार्या कंपन्या, तसेच परदेशी नागरिकांना वेतन देणार्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांना हा नियम लागू नाही.
सद्ध्या एका अमेरिकी डॉलरसाठी तब्बल १३३८४ इंडोनेशियन रुपये द्यावे लागतात.
इजिप्त सरकारने आय.एस. विरोधात
इजिप्त सरकारने आय.एस. विरोधात युद्धाची घोषणा केली आहे.
बुधवारी आय.एस.ने सिनाई प्रांतातील वेगवेगळ्या ठिकाणी आत्मघाती व कारबॉम्बस्फोट घडवले. काही मिनिटांच्या फरकात केल्या गेलेल्या ह्या स्फोटांमध्ये ६०हून अधिक इजिप्शियन सैनिकांचा बळी गेला. इराक, सिरिया व लिबिया ह्या देशांमध्ये उत्पात घडवणार्या आय.एस.ने इजिप्तमध्ये प्रथमच एवढा मोठ हल्ला केला. काही महिन्यांपुर्वी IS ने इजिप्तमधून अपहरण केलेल्या नागरिकांचा लिबियामध्ये शिरच्छेद केला होता आणि इजिप्तच्या लढाऊ विमानांनी लिबियामध्ये घुसून ISच्या ठिकाणांवर हल्ले चढवले होते. पण आता इजिप्तमध्ये थेट सैनिकांवर हल्ले केल्याने सीसी सरकारला हे पाऊल उचलावे लागले आहे.
दरम्यान, इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू ह्यांनी ISच्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि इजिप्तच्या लष्करी कारवाईचे समर्थ्न केले आहे. ISचे दहशतवादी इस्रायलच्या सीमेजवळ धडकल्याचे सांगून सीमेवरील गस्तही वाढवली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा ह्यांनी क्युबाबरोबर राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित करत असल्याची अधिकृत घोषणा केली. २० जुलैला दोन्ही देशांचे दूतावास कार्यरत होतील. ऑगस्टमध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी क्युबाला भेट देतील. क्युबाचे परराष्ट्रमंत्री ब्रुनो रॉड्रिग्ज २० जुलैला वॉशिंग्टनला भेट देतील.
Pages