निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चनस, अग टिनु नावाचा आयडी आहे इथ अजुन एक.. अरेरे तुला मला संबोधुन बोलायचे आहे का ? >> हो तुच गं.. तुच फोटो टाकलेत ना वर .. जरा लाडाने म्हटले.. उगाच गोंधळ घालु नको बरं Proud

मायक्रो मोड मधे गेल्यावर मधे एक छोटासा चौकोन दिसायला लागतो. तेवढाच भाग क्लीयर दिसायला लागला ( आणि बहुदा तो चौकोन हिरवा झाला ) कि क्लीक करायचे. असे सर्वसाधारण तंत्र असते. त्याला थोडा वेळ लागतो, पण बहुतेक किटक शहाणे असल्याने तेवढा वेळ न हलता डुलता गप्प एका जागी बसलेले असतात.

पण तो मायक्रो(micro) मोड नसून मॅक्रो(macro) मोड असं आहे. ज्या मॅक्रो मोडात आपण सहसा फुलातले पराग, सूक्ष्म कीटक यांचे अगदी जवळून फोटो काढतो.

व्यवहारात दोन्ही शब्दांचे अर्थ पूर्णपणे वेगळे असले तरी ह्या एकाच मोड साठी वेगवेगळ्या कॅमेरा कंपन्या Micro अथवा Macro असे शब्द वापरतात..

व्वा काय मस्त धावतोय धागा. क्या बात है..
कोणा कोणाला छान म्हणु अस झालय..
निरु तुमच्या येण्यानी हा धागा अजुन हिरवा झालाय..:)
इन्द्रगोप नाव खुपच गोड आहे.. इकडे तीला लाल गाय म्हणतात..
खारु ताई पोपट ची डेट खुप आवडली..
जागु तुला पिवळ्या लीली च्या बिया सावली कडुन शक्य असेल तर ठीक आहे नाही तर मी पुन्हा कुरियर करते..:)

टीने, तुझे सगळे फोटो मस्त .

सायली कित्ती दिवसानी आलीस इथे. छान वाटलं तुझी पोस्ट बघुन.

बाकी ही नवीन भाग चांगलाच बहरतोय.

वॉव.. रिअली निरू मुळे या भागाला वेगळं वळण मिळालंय.... Happy
जागु मस्त आलेत फोटू, तुझ्या अंगणात तर काय काय असेल, याचा तुलाच शोध लगणारे आता बहुतेक.. Happy

व्यवहारात दोन्ही शब्दांचे अर्थ पूर्णपणे वेगळे असले तरी ह्या एकाच मोड साठी वेगवेगळ्या कॅमेरा कंपन्या Micro अथवा Macro असे शब्द वापरतात......ओह...असं आहे का? मला नव्हतं माहिती.
मग दिनेशचंही बरोबरच.
मला आपलं मायक्रो इकॉनोमिक्स आणि मॅक्रो इकॉनोमिक्स आठवले.+१००

आज खूप दिवसांनी इथे आले आणि कायकाय वाचू असं होऊन गेलं!
प्रस्तावना,सर्व फोटो आणि माहितीही अतिशय छान!
विशेषतः नीरु गुलजार यांचे फोटो अप्रतिम.
उशिरा गप्पा वाचल्याने सर्वांना वेळच्या वेळी न्याय देता नाही आला याची खंत वाटते आहे.

Ceropegia jainni
Ceropegias are uncommon small herbs that appear only during the monsoon months, blooming for just a couple of weeks, in very remote habitats. Since their habitats become even more inaccessible in the rains, sightings of these flowers are rare and adventure for shooting.
Nikon D90, Tamron 180 macro
f16, 1/60, ISO 400, Aperture Priority, Spot Metering, Hand held..
Ceropegia jainni Aashu_0.jpg

Ants Trophallaxix at Saguna Baug (Neral) - Trophallaxis - the mutual exchange of regurgitated liquids between adult social insects or between them and their larvae.
Nikon D7100, Tamron 90 mm VC Macro with Nikon R1C1
f11, 1/60, ISO 200, Aperture Priority, Spot Metering, Hand heldAnts Aashu.jpg

निरू गुलजार, तुम्ही टाकलेले फोटो जबरदस्त आहेत. वर कुणीतरी म्हटलंय तसं नि.ग. ला एक वेगळे परिमाण मिळालं ह्या फोटोंमुळे.

निरु गुलजार,
मी फोटोवरुन ( आणि फोटो संबंधीत माहीती व येऊर यावरुन) अंदाज बांधतेय की हे युवराज गुर्जर यांचे फोटो आहेत. असतील तर प्लिज त्यांचे नावही घालाल का? ( नसल्यास ज्या कुणाचे फोटो आहेत त्यांचे नाव )
म्हणजे तुम्ही तुमच्या भावाचे फोटो आहेत असे लिहीलेच आहे पण ते नाव नाही. अशा फोटोज बरोबर फोटोग्राफरचे नावही असावे असे मनापासुन वाटते.

हो.. बरोबर... युवराज गुर्जर...
वरचे 3 मॅक्रो फोटो त्यानीच काढलेले आहेत...

ग्रेट एंट्री निरू. युवराज गुर्जरांचे लेख (आय थिंक लोकप्रभामध्ये) वाचायचे मी. लकी यु. तुम्हाला घरीच बेस्ट प्रशिक्षक मिळाला आहे.

केवळ अप्रतिम आहेत फोटो!!!
सावली, तुझी प्रोफेशनल नजर ,जबरदस्त आहे Happy एकदम तेरे कॅमेरे जैसी !!

निरू गुलजार, तुम्ही टाकलेले फोटो केवळ अप्रतिम .....

युवराज गुर्जर >>>>> ग्रेट फोटो, शब्द नाहीयेत कौतुक करायला .....

सावली, तुझी प्रोफेशनल नजर ,जबरदस्त आहे Happy एकदम तेरे कॅमेरे जैसी !! >>>>> येस्स.....

Pages