निसर्गाच्या गप्पा (भाग २६)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 25 June, 2015 - 05:50


आषाढातले घनघोर बरसणारे काळे कभिन्न मेघ आणि कवी कुलगुरू कालिदास यांची मनात एक घट्ट अतूट अशी सांगड घातली गेली आहे.
आपण "आषाढस्य प्रथम दिवसे" ........ आषाढातला पहिला दिवस...... कवी कालिदास जयंती म्हणून साजरा करतो.
असा आपल्या साहित्याचा आणि निसर्गाचा खूप पुरातन काळापासूनचा संबंध आहे.
आषाढ महिन्यातल्या पहिल्या दिवशी जेव्हा एक भला मोठा कॄष्णमेघ कवी कालिदासाला चिंब भिजवून टाकतो तेव्हा त्याला त्याच्या पत्नीची आठवण होऊन, तो त्याच कृष्णमेघाला दूत म्हणून आपल्या पत्नीकडे पाठवतो.....अशी ही कवीकल्पना.
पण कालिदासाने या प्रवासी मेघाच्या मार्गाचे जे वर्णन केले आहे त् वाचून असं वाटतं की ही नुसती एक कवी कल्पना नसावी कारण हा तर या मार्गाचा चक्क एरियल व्ह्यूच ! असो............

तर नुक्त्याच सरलेल्या उन्हाळ्यानंतर, नेमेचि येणारा पावसाळा आता सुरू झालाय. उन्हाळ्याची तल्खी दूर पळाली आहे कारण या पावसाने पारा बराच खाली लुढकला आहे. सुस्नात वसुंधरेच्या हिरवाईने मन सुखावलंय! आजूबाजूचे शेतकरी बांधव आपापली शेते नांगरून पेरणीच्या लगबगीत दिसताहेत.
बाजारांमधेही शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची दप्तरे, रेनकोट, वह्या पुस्तकं खरेदीची लगबग जाणवते.
रस्त्याच्या कडेला हिरव्या गार कैऱ्यांचे ढिगारे आणि शेजारीच पोती पसरून बसलेले, आपापल्या भल्या मोठ्या विळ्यांवर खचाखच् कैऱ्या फ़ोडून देणारे, आणि वर्षाच्या बेगमीच्या लोणच्यासाठी कैऱ्या घेताना त्यांच्याशी हुज्जत घालणाऱ्या माताभगिनी!....... असं हे पावसाळ्याच्या सुरवातीचं परिचित दृश्य!

अंगणातल्या कडुलिंबावर आता कोकिळेचा वावर जाणवेनासा झालाय. तिचं कुहू कुहू ही आता शांत झालंय.
कडुलिंबाखाली ओल्या हिरव्या पिवळ्या लिंबोण्याचा खच पडलाय. परिसरात पायाखाली येताजाता चिरडल्या जाणाऱ्या या लिंबोण्यांचा सूक्ष्मसा कडसर, मधुर गंध पसरलाय. कढिलिंबही लाल चुटुक फ़ळांनी लगडलाय. पावसाळ्यातली अंधारी, ढगाळ, धूसर हवा वातावरणात भर घालतीये. कधी बघता बघता घराच्या छपरावर पर्जन्यराजा ताशा वाजंत्री वाजवायला सरू करतो........असा हा पावसाळा!

याच्याच बरोबरीने हळूहळू आसामातल्या ब्रम्हपुत्रेच्या रौद्र रूपाच्या भीषण तांडवाच्या, पुराच्या बातम्याही यायला लागतात.
जेव्हा जेव्हा मुंबईतल्या पावसाच्या थैमानाच्या बातम्या टीव्हीवर दिसतात तेव्हा तेव्हा..................या निसर्गाच्या तांडवाला आपण माणसंच कारणीभूत आहोत.........हाही विचार मनात आल्याशिवाय रहात नाही.
वैशाखमासी प्रतिवर्षि येती
आकाशमार्गी नव मेघपंक्ती
नेमेचि येतो मग पावसाळा
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा

तर आपण सर्व निसर्गप्रेमी असंच सृष्टीचं कौतुक करता करता, आपल्या अवती भोवतीचा निसर्ग जपण्याचाही मनोभावे संकल्प करु या!!

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर मानुषी यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौरी, वर्षू मस्तच प्रचि..
सायली माझ्या घरी पिवळ्या लिलीचा पुर्ण वाफाच आहे.. आणि गौरी तुझ्याकडली गुलाबी लिली सुद्धा आहे Wink

आहा कसला मस्त प्रचि आहे दिनेशदा .. सहि फुल आहे हे तर...

अरेवा सुंदर. काय एकसेएक सुंदर फोटो टाकलेत सर्वांनी.

मृगकिड्याला इंद्रगोप म्हणतात, वा पहिल्यांदाच ऐकले.

आजच एका मैत्रिणीने पिवळ्या लिलीचे फोटो पाठवलेत, तिच्या टेरेसमधल्या.

हेमाताई नक्की जाईन. Happy

ब्यूटी आहे कचनार नुस्ती!!
फालसा ची फुलं पहिल्यांदाच पाहिली Happy

@ सावली,
करेल हे नाव कुणाला तरी माहीत आहे हे पाहून इतका आनंद झालाय! खूप वर्षांपूर्वी कुणाकडून तरी ऐकले होते या आंब्याविषयी. अलीकडे तर नावही नीट आठवत नव्हते. करेल की फर्नेल असा गोंधळ होत होता. करेल हे पोर्तुगीज़ नाव वाटते ना?
पण पूर्वी ह्याची कलमे लावत असत ना? कारण कलमी असेल तर बाठे लावून तेच वाण मिळणार नाही..

हीरा,
वॉव तुम्हाला हे माहितेय हे वाचुन पण मस्तं वाटलं. करेल कलम आहे की नाही त्याची कल्पना नाही. कलम असेल तर मग फांदी मिळवावी का? त्याचं कलम घरी केलं तर होईल का देव जाणे.
फर्नेल पण बहुतेक गोव्याच्या बाजूची आंब्याची जात आहे. याचे कलमही बहुतेक मिळत नाही.
बाकी आंब्याच्या मालडेक्स, सालडान अशा पोर्तुगीज़ जातीही हळुहळू नाहीशा होत आहेत बहुधा. अजुनही बर्‍याच आहेत त्यांची नावं आता मला आठवत नाहीत.

गुलाबी लिली, कोळी सुरवंट आणि कांचन मस्त आहे.
ममो, तुमच्या शेतात खरच यायला हवं एकदा.

दिनेश ..........कांचन/कचनार काय सुंदर आहे!
निरु गुलजार , तुमच्या बागेत खुपच्च वेरायटी आहे ब्वा. टिना +१००
हिरवा कॅटरपिलर पाहिल्यावर मी अगदी हेच म्हणणार होते.

निरु गुलजार, काय सुंदर आहे सुरवंट! दिनेशदा, कचनार मस्त. इतक्या वेळा टेकडीवर जाते, पण फालसाच्या झाडाकडे कधी बघितलंच नव्हतं. या वेळी त्याच्या सुंदर फुलांमुळे समजलं!

मित्राच्या गावी शिरवळला गेलो होतो. नेहमी शहरी द्रुष्य पहाण्याची सवय असलेल्या डोळ्याना अस्सल ग्रामीण परिसर दिसल्यावर कॅमेरा काढण्याचा मोह आवरणे अशक्य होते....
Shirval Rural.jpg

फार पूर्वी केलेला एक प्रयत्न.... (आणि आत्ताचा चित्र मायबोलीत डकवण्याचा पहिला प्रयत्न)

>>>>आमच्या बागेतील Limacodid Moth Caterpillar...>>>>
From

तेव्हा एका इंटरनेटवर मिळालेल्या फोटोची कॉपी केलेली...

गौरी, लिली, आणि फलसा दोन्ही फोटो मस्त.
निरु, गुलजार सुरवंट आणि इतर ही कीटकांचे फोटो मस्त. गावाकडचा फोटो ही सुपर्ब
दिनेश, कांचन मस्त आहे आपल्याकडे असतो त्या पेक्षा थोडा निराळा आहे ना !
वी टी२२०, मस्त आलयं सुरवंटाचं चित्र.
वर्षु, तुझ्या फुलांच्या फोटोंमुळे मन प्रसन्न होऊन जातं

हे माझ्या कडून रविवारसाठी खास.

From mayboli

वर्षू ते डँडेलिऑन.. त्याची पिवळी फुले पण खुप सुंदर असतात. ते तूझ्या फोटोत आहे ते फळ ! त्यावर जोरात फुंकर मारली तर त्या बिया मस्त उडतात. त्याची पाने खातात.

मनीमोहोर, असले कांचन मी भारतात बघितले नाही. हाँग काँग ऑर्किड म्हणून एक झाड असते, पण त्याचीही फुले वेगळीच असतात.

निरु गुलजार, किटकांचे फोटो मस्त! किती वेगवेगळे किटक आहेत. गावाकडचा फोटो छान टिपलाय.
बाकीच्याचे फोटोही आवडले.

डॅन्डिलायन ची पाने सॅलडमधे वापरतात. पाने अणि मूळं नेटिव अमेरीकन, चायनिज आणि जुने युरोपियन मेडिसिनमधे हर्बल रेमेडी म्हणून वापरतात. फुलांची वाईन बनवतात. मधमाशा आणि इतर अनेक उपकारक किटकांसाठी कडक हिवाळ्यानंतरचा पहिला नेक्टर पुरवणार्‍या महत्वाच्या फुलांमधे डॅंडिलायन येते. मात्र लॉनसाठी त्रासदायक वीड. माझा शेजारी अजिबात यार्ड चांगले ठेवत नाही. लोकांच्या यार्डमधे डॅफोडिल्स तशी याच्या यार्डमधे डॅंडिलायन असे आम्ही म्हणतो.
दिनेशदा सेंट ऑगस्टीनला एका रेस्ट्रॉरंटच्या आवरात हाँगकॉन ऑर्किडची झाडे होती. कांचनसारखी पाने म्हणून वेट स्टाफकडे चौकशी केली तेव्हा नाव कळले.
IMG_4885 (400x300).jpg
माझ्या नवर्‍याने काढलेला फोटो.

आह्हा.. सुंदर आहे मॉथ..
हाँ, डँडेलिन.. वाचल्यावर आधी ऐकलेलंय ते आठवलं.. Happy
छानै फोटो हाँगकाँग ऑर्किड

नविन भागाबद्दल सर्वांचे अभिनंदन!!!! Happy

मानुषीताई मस्त फोटो व मनोगत Happy

निरू गुलजार आणि सर्वांचेच फोटो मस्तच!!! Happy

जागू, या लिलीच्या बिया माझ्याकडे आहेत. त्या बियांनी पण रोपे येतात. तुला हवी असेल तर मी देऊ शकते.>>>>>सावली, मलासुद्धा पाहिजे पिवळ्या लीलीच्या बिया/रोपे Happy

आमच्या घरी गेले 3 महिने हा बर्ड फिडर टांगला होता. अतिशय आशेने रोज वाट पहात होतो. गेल्या आठवडय़ात प्रतिक्षा फळाला आली. 2 पाहुण्यांनी हजेरी लावायला सुरुवात केलीय. त्यांची भीड चेपे पर्यंत फोटो काढण्यासाठी वाट पाहिली. आजचा त्यांचा सहभोजनाचा फोटो..
Squirrel n Parrot.jpg

Pages