सलमान खान वरील आरोप सिद्ध.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53

सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...

न्याययंत्रणेचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फुटपाथवर झोपणार्‍यांची चूक होती हे आणि सलमानची गाडी टायर फुटल्याने फुटपाथवर चढली त्यामुळे अपघात झाला ह्या दोन्ही गोष्टी मान्य केल्या >>> फुटपाथवर झोपणार्‍यांची चूक होती हे मान्य व्हायलाच हवं त्यांनी अभिजीत भट्टाचार्यच्या घरी रहायला जायला हवं होतं. आणि तिथे जागा पुरली नसती तर फराह खानच्या घरी जायला हवं होतं.

सलमानला झोडपणे चूक आहे.>>
कायबी काय बोल्ताय राव, सलमानला झोडपण्याची ताकद आणि हिंमत ह्या देशात तरी नाही कोणाकडेच..

दक्षिणा | 8 May, 2015 - 04:24
फुटपाथवर झोपणार्यांची चूक होती हे आणि सलमानची गाडी
टायर फुटल्याने फुटपाथवर चढली त्यामुळे अपघात झाला ह्या
दोन्ही गोष्टी मान्य केल्या, तर सलमानला दारू पिऊन सुद्धा
अॅडव्होकेटकडे जाणं बरं सुचलं. पळून जाणं बरं सुचलं. पुराव्यांची
फिरवाफिरवी वगैरे केली म्हणजे नकळतपणे त्याने त्याची चूक
स्वतःशी मान्य केली होती.>>>>>>>>>>>>अपघात घडला त्यांनंतर तिथले सडकछाप लोक सलमानला मारहान करत होते.त्यामुले त्याला तिथुन सटकावे लागले.व वकीलाच्या घरी त्याने दारु पिली असेल ,अपघातावेळी तो पुर्न शुद्धीत असावा.

दारू पिऊन
गाडी चालविणे हा पण कायद्याने गुन्हाच आहे!!>>>>>>>> पन तो गाडी चालवत होता याचा एकही पुरावा नाही.सलमानच्या मते अशोक सिंग गाडी चालवत होता.

फुट्पाथवर झोपने हा कायद्याने गुन्हा आहे>>

मग सलमान खान काय देव आहे का म्हणुन त्याने जीवे मारुन या लोकांना योग्य ती शिक्षा दिली.... ?

मग सलमान खान काय देव आहे का म्हणुन त्याने जीवे मारुन या
लोकांना योग्य ती शिक्षा दिली.... ?>>>>>>>>>ते लोक कर्माने गेले त्यन्च्या,त्यात सलमानचा दोष् तो काय?उद्या एखादा पुने मुंबै हायवेवर आडवा झोपेल व गरीबीचा हवाला देउन कायदा मोडला असे सांगेल ,हे बरोबर नाही.

"सलमानच्या मते" याचा नक्की अर्थ काय?>>>>>>>आरोपीला आपले मत मांडायचा अधीकार न्यायव्यवस्थेने दिला आहे,हा त्याचा अर्थ..

आरोपीला आपले मत मांडायचा अधीकार न्यायव्यवस्थेने दिला आहे,हा त्याचा अर्थ..

सलमान त्याच गाडीत होता ना? मग त्याच न्यायालया पुढे तस स्टेट्मेंट आहे की त्याच तस मत आहे.

@ रवी केंजळे
तुम्हाला सलमानचा एवढा पुळका का आहे हो?
आपण आत्ता असं मानून चालूया की त्याने अपघाताआधी दारू प्यायली नाही, गाडी चालवली नाही, अपघातही त्याच्यामुळे नव्हे तर त्याच्या ड्रायव्हरमुळे आणि टायर फुटल्यामुळे घडला.
मग जर तो निर्दोष होता तर पळून का गेला? बर तेव्हा लोक मारत होते म्हणून गेला असेल तर नंतर रविंद्र पाटील बरोबर स्वत: जाऊन एफआयआर का नाही नोंदवली? ड्रायव्हरनेच गाडी चालवली याचा साक्षात्कार १३ वर्षांनी का झाला? इतकी वर्ष तो ड्रायव्हरला वाचवत होता तर आता का नाही वाचवत तो ? आणि अपघातानंतर लगेच वकिलाकडे का गेला? आणि एवढा मोठा अपघात झाला, एक माणूस जीवानिशी गेला, तेव्हाही त्याला ( तुमच्या म्हणण्याप्रमाणे) वकिलाकडे जाऊन दारू प्यावीशी वाटली? आपल्यावर आळ येऊ शकतो हे माहीत असूनसुद्धा त्याने मुद्दाम दारू प्यायली का?
रस्त्यावर झोपणे ही त्या मजुरांची चूक होती मान्य आहे, पण त्यामागची परिस्थिती बघा ना? कोणत्या माणसाला घरदार सोडून रस्त्यावर झोपावसं वाटेल? काहीतरी मजबुरी असेलच ना त्यांची मग सरसकट त्यांना का दोषी धऱता तुम्ही????

.व वकीलाच्या घरी त्याने दारु पिली असेल ,अपघातावेळी तो पुर्न शुद्धीत असावा.>>>>> वकील इतका मूर्ख होता की हिट अँड रन केस मध्ये पळून आलेल्या संशयित गुन्हेगाराला त्याने दारु पाजली (किंवा पिऊ दिली).??????

सलमानला निर्दोष सिद्ध करण्याकरिता अजून किति लोकांना तुम्ही चूकीचे आणि मूर्ख ठरविणार आहात??

मीनाक्षी कुलकर्णी | 8 May, 2015 - 04:55 नवीन
@ रवी केंजळे
तुम्हाल सलमानचा एवढा पुळका का आहे हो?
आपण आत्ता असं मानून चालूया की त्याने अपघाताआधी दारू
प्यायली नाही, गाडी चालवली नाही, अपघातही
त्याच्यामुळे नव्हे तर त्याच्या ड्रायव्हरमुळे आणि टायर
फुटल्यामुळे घडला.
मग जर तो निर्दोष होता तर पळू का गेला? बर तेव्हा लोक
मारत होते म्हणून गेला असेल तर नंतर रविंद्र पाटील बरोबर स्वत:
जाऊन एफआयआर का नाही नोंदवली? ड्रायव्हरनेच गाडी
चालवली याचा साक्षात्कार १३वर्षांनी का झाला? इतकी
वर्ष तो ड्रायव्हरला वाचवत होता तर आता का नाही वाचवत
तो ? आणि अपघातानंतर लगेच वकिलाकडे का गेला? आणि
एवढा मोठा अपघात झाला, एक माणूस जीवानिशी गेला,
तेव्हाही त्याला ( तुमच्या म्हणण्याप्रमाणे) वकिलाकडे जाऊन
दारू प्यावीशी वाटली? आपल्यावर आळ येऊ शकतो हे माहीत
असूनसुद्धा त्याने मुद्दाम दारू प्यायली का?
रस्त्यावर झोपणे ही त्या मजुरांची चूक होती मान्य आहे, पण
त्यामागची परिस्थिती बघा ना? कोणत्या माणसाला
घरदार सोडून रस्त्यावर झोपावसं वाटेल? काहीतरी मजबुरी
असेलच ना त्यांची मग सरसकट त्यांना का दोषी धऱता
तुम्ही????>>>>>>>>>>>>>>पुळका नाही मी योग्य व्यक्तीची बाजू घेतोय.टेंशनमध्ये माणूस दारू पितो ,तशी त्याने अपघातानंतर तणावाखाली दारु पीली असेल वा वकीलाकडे पिली असेल.

दक्षु रॉक्स!:फिदी:

नवीन साक्षात्कार घडलेत आज.

१) चूक दारुची होती, सलमानची नव्हे.

२) फुटपाथ हे गाड्या-घोडे चालण्याकरता असतात.

३) काल मायबोलीवर घसरगुन्डी असल्याचे कळले, आज सी-सॉ पण पाहिला. बाग पूर्ण झाली.:फिदी:

घसरगुन्डी म्हणजे आपले विधान सतत बदलणे आणी सी- सॉ म्हणजे दोन्ही डगरीवर पाय किन्वा हात ठेवणे. एक माबोकर निष्णात ठरलेत यात.

अच्छा म्हणजे झालेल्या गुन्ह्याची चर्चा ओव्हर द सिप ऑफ व्हिस्की/रम का?
जब मिल बैठेंगे ३ यार, सलमान वकिल और दारू... ??? क्या बात Proud

चला आता पुळका बहाद्दर आलेच आहेत इथे तर. चिंकारा शिकार प्रकरण पण काढू बाहेर. तिथे काय आहे तुमचा युक्तिवाद? चिंकारा स्वतःहून सलमानने झाडलेल्या गोळिसमोर आल्याने त्याची चूक की काय? Uhoh

@ रवी केंजळे
बाकीच्या प्रश्नांच पण उत्तर द्या की हो? आणि जर त्याच्यामुळे अपघात घडलाच नव्हता तर टेन्शन कसलं आलं त्याला?

टेंशनमध्ये माणूस दारू पितो ,तशी त्याने अपघातानंतर तणावाखाली दारु पीली असेल वा वकीलाकडे पिली असेल.>>
यावर अजुन काय बोलायचं
असोच...
गेट वेल सून...

नाही ग दक्षिणा, तो चिन्कारा शुटिन्ग बघायला आला असेल. कदाचीत सल्लु आणी सैफ चे ऑटो ग्राफ मागीतले असतील हाच काय तो त्याचा गुन्हा.:अरेरे:

दारुत वाइट काय आहे?मी पन् बिअर वा व्हिस्की घेतो.कुनाच्या घरी जाऊन दारु पिणे गुन्हा नाहि.सलमानने स्वत:च्या घरी जाऊन पिली असेल वा वकिलाकडे ,यात काहीही आक्षेपार्ह नाही.

Pages