Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53
सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.
http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...
न्याययंत्रणेचे अभिनंदन.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
हायकोर्टाची सल्मानच्या
हायकोर्टाची सल्मानच्या शिक्षेवर स्थगीती व जामीन मंजुर
न्यायव्यवस्थेचे अभिनंदन
न्यायव्यवस्थेचे अभिनंदन
चला घोडं एकदाचं मिठीत न्हालं
चला घोडं एकदाचं मिठीत न्हालं म्हणायचं...
आता अजुन १० १२ वर्ष फिकीर नाही सलमानला..
ऋ तुझ्या पोस्ट मधून सलमान चूक
ऋ तुझ्या पोस्ट मधून सलमान चूक नाही तर दारू चूक आहे असाच अर्थ निघतोय.. मध्येच म्हणतोस सलमान गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली ते बरोबर. तुला काय म्हणायचेय तेच स्पष्ट होत नाहीये....
दारू किती वाईट आहे हे सांगायचे असेल तर वेगळा बाफ काढ.(माबोकर माझ्यावर प्रचंड चिडणार आहेत.)
त्यावर तिथे चर्चा करुया.
फिरोज खानचा आदर्श सलमानच्या
फिरोज खानचा आदर्श सलमानच्या वडिलांनी गिरवला असता तर...............
फिरोज खान आणि सलमान खान
या लेखातला संबंधित उतारा:
काही वर्षापुर्वी जुना अभिनेता निर्माता फ़िरोज खान याचा पुत्र फ़रदीन खान याला अंमली पदार्थाच्या प्रकरणात आटक झाली होती. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांनी फ़िरोज खान यांना गाठले होते. त्या गृहस्थाने आपला पुत्र फ़रदीन निर्दोष असल्याचाही दावा केलेला नव्हता. फ़रदीन आपला पुत्र आहे आणि म्हणूनच त्याच्या भवितव्याविषयी आपल्याला काळजी आहे. पण त्याने कायदा मोडलेला असेल, तर त्याला योग्य ती शिक्षा व्हायलाच हवी. म्हणूनच कोर्टात व तपासाचे निष्कर्ष बाहेर येईपर्यंत आपण याबद्दल अवाक्षर बोलणार नाही. पिता म्हणून मुलाला कायदेशीर मदत करणे हे आपले कर्तव्य आहे. पण त्याचा अर्थ त्याचा अपराध असूनही त्यावर पांघरूण घालणे शक्य नाही, असा निर्वाळा फ़िरोज खान याने दिलेला होता. वास्तविक त्याच्याही आधी सुनील दत्त यांनी आपला पुत्र मुंबई बॉम्बस्फ़ोट प्रकरणात सापडला, तर संजयला सोडवण्यासाठी आटापिटा केलेला होता. आपली सर्व ताकद व प्रतिष्ठा मुलाला आरोपातून सोडवण्यासाठी पणाला लावली होती. गुन्हा दिसत असून व त्याचे पुरावे साक्षी समोर असताना, सुनील दत्त यांनी पुत्रप्रेमापायी कायद्याची महत्ता नाकारली होती. त्याच्या उलट उदाहरण फ़िरोज खान यांनी पेश केले. त्यांनी पुत्रप्रेम व कायद्याची महत्ता, अशा दोन्ही बाबींचा समतोल राखत दोन्हीचा आदरच केला होता. एकासाठी दुसर्याला झुगारण्याचा बेतालपणा दाखवला नव्हता. खरे तर त्याचा आदर्श नागरिक व आदर्श पिता म्हणून गाजावाजा व्हायला हवा होता. कायद्याच्या राज्यात प्रसिद्ध नामवंत व्यक्तींनी कसे समतोल वागावे, याचा फ़िरोज खान हा आदर्श वस्तुपाठ होता. दुर्दैवाने त्याबद्दल फ़ारशी चर्चाही झाली नाही. फ़रदीन वा त्याचा पिता सनसनाटी माजवत नाहीत म्हटल्यावर प्रसिद्धी माध्यमांनी जणू त्यांना दुर्लक्षितच ठेवले. लोकशाहीतील व कायद्याच्या राज्यातील ते खरे हिरो होते ना?
(No subject)
दोन प्रकारचे गुन्हे होतात
दोन प्रकारचे गुन्हे होतात कुठल्याही समाजातः
१) मुद्दाम हेतुपुर्वक केलेला गुन्हा.
२) चुकुन घडलेला गुन्हा.
जो गुन्हा मुद्दाम कुणी करतो आणि शिक्षा भोगतो त्याला क्वचित कुणाकडून सांत्वन मिळत असावे.
पण असा गुन्हा जो चुकुन घडला आणि ती व्यक्ती शिक्षा भोगते आहे त्या व्यक्तिला अनेकांकडून सांत्वन मिळू शकते. माझ्यामते सलमान ह्या दुसर्या प्रकारात मोडतो.
हो ना बी, सलमान दारू
हो ना बी, सलमान दारू प्यायलाच नाही. दारू आपोआप त्याच्या घशात आणि तिथून पोटात गेली. उगाच बिचार्याला गोवलंय.
मुळात सलमान गाडी चालवत होता
मुळात सलमान गाडी चालवत होता का इथपासुन खरी सुरवात होते.
आप्प्या ,खान मंडळी मुस्लिम
आप्प्या ,खान मंडळी मुस्लिम आहेत म्हनुन तुझा त्यांच्यावर राग दिसतोय,पन् सलमानची केस वेगळी आहे ,त्याची आई मराठी ब्राह्मण आहे,म्हण्जे सल्लू अर्धा ब्राह्मणच आहे हे लक्षात घे विप्रा.
तुमच्या मते जो गुन्हा चूकुन
तुमच्या मते जो गुन्हा चूकुन घडला आहे त्यामध्ये एका माणसाचे प्राण गेलेत हे तुमच्या लक्षात आहे ना??? तो माणूस गरिब म्हणून त्याच्या प्राणांची काहीच किंमत नाही आणि सलमानला झालेल्या (अजून झालेलीच नाहीये) शिक्षेचं एवढं दु:ख?????
सलमानच्या बाजूने बोलणार्या सर्व लोकांनी थोडी संवेदनशीलता दाखवून ज्या माणसाला कोणतीही चूक नसताना जिवास मुकावे लागले आहे त्याच्या आणि त्याच्या परिवाराच्या बाजूने विचार करून पहा!!
सलमानच्या बाजूने बोलणार्या
सलमानच्या बाजूने बोलणार्या सर्व लोकांनी थोडी
संवेदनशीलता दाखवून ज्या माणसाला कोणतीही चूक
नसताना जिवास मुकावे लागले आहे त्याच्या आणि त्याच्या
परिवाराच्या बाजूने विचार करून पहा!!>>>>>>>>>>>सुमुक्ता, जो मेला तो फुटपाथवर पसरला होता ही त्याची चूक होती ,फुट्पाथ चालणार्यांसठी असतात ,झोपायला नव्हे.
जो मेला तो फुटपाथवर पसरला
जो मेला तो फुटपाथवर पसरला होता ही त्याची चूक होती ,फुट्पाथ चालणार्यांसठी असतात ,झोपायला नव्हे.>>.ठीके मग चालणारा जर मेला असता तर काय लॉजीक लावलं असतं?
फुटपाथ गाडी चालवण्यासाठी
फुटपाथ गाडी चालवण्यासाठी असतात हे पहिल्यांदाच समजले. अड्डेकरांचे लॉजिक मस्त आहे.
आता जामिन मंजुर झालाय तर
आता जामिन मंजुर झालाय तर त्यावर चर्चा करायला हरकत नसावी बहुदा
मनमौजी | 8 May, 2015 - 03:52
मनमौजी | 8 May, 2015 - 03:52 नवीन
फुटपाथ गाडी चालवण्यासाठी असतात हे पहिल्यांदाच
समजले. अड्डेकरांचे लॉजिक मस्त आहे.>>>>>>>> अहो जोशी बुवा ,सल्लूच्या गाडीचे टायर फुटले म्हनून गाडी फुटपाथवर चढली,कट्टेकरांना कॉमन सेन्स शिकवायला हवा.
जो मेला तो फुटपाथवर पसरला
जो मेला तो फुटपाथवर पसरला होता ही त्याची चूक होती ,फुट्पाथ चालणार्यांसठी असतात ,झोपायला नव्हे.>>> तुम्ही हे वाक्य उपरोधाने बोललात असे होप करू का मी?? जर तसे नसेल तर फूटपाथ गाडी चालविणार्यांसाठी देखील नसतात!!!
आता जामिन मंजुर झालाय तर त्यावर चर्चा करायला हरकत नसावी बहुदा>>> आता काय अजून १३ वर्षांची निश्चिंती. त्या १३ वर्षात अजून ५०-६० सिनेमे करून करोडो रुपये कमावेल. मग हाय कोर्टच्या व्हर्डिक्ट नंतर सुप्रीम कोर्टात अपील करेल मग अजून पुढची १३ वर्षे निघतील
तुमच्या मते जो गुन्हा चूकुन
तुमच्या मते जो गुन्हा चूकुन घडला आहे त्यामध्ये एका माणसाचे प्राण गेलेत हे तुमच्या लक्षात आहे ना??? तो माणूस गरिब म्हणून त्याच्या प्राणांची काहीच किंमत नाही आणि सलमानला झालेल्या (अजून झालेलीच नाहीये) शिक्षेचं एवढं दु:ख?????
सलमानच्या बाजूने बोलणार्या सर्व लोकांनी थोडी संवेदनशीलता दाखवून ज्या माणसाला कोणतीही चूक नसताना जिवास मुकावे लागले आहे त्याच्या आणि त्याच्या परिवाराच्या बाजूने विचार करून पहा!!>>
म्हणूनच मी काल लिहिले की मला हा विषय संभ्रमात पाडणारा आहे. दु:ख दोन्हीकडून होते आहे. फक्त एकतर्फी होत नाही आणि तर दोन्ही बाजूने मी विचार केला की जो गेला त्याचे काय आणि आता ज्याला शिक्षा होते आहे त्याचे काय. दोन्हीच्या चपलेत पाऊल ठेवून बघितले आहे.
काही होणार नाही आपल्या देशाचं
काही होणार नाही आपल्या देशाचं
अपघात होऊन गाडी फुटपाथवर गेली
अपघात होऊन गाडी फुटपाथवर गेली हे का लक्षात घेत् नाही कुनी?फुट्पथवर् पसरलेले अपघाताने पसरले न्हवते ,ती त्यांची चूक होती.
आपल्या भारत देशात
आपल्या भारत देशात गल्यागल्यातून वाहने फिरतात. गाड्या नाचतात. भर्र पळतात. फक्त एक सलमानच नाही की ज्याने फुटपाथवरुन गाडी पळवली. हे त्याचे कमनशीब की त्याच्याहातून अपघात झाला. जसे सलमान वागला तसे अनेक जण वागतात भारतात. एकतर लोकांना माज असतो किंवा पर्वा नसते काही होण्याची. एकतर दुसर्या कुणाचा जीव जातो नाहीतर स्वतः मरतो.
आणि दुसरे असे की ही घटना रात्री घडली. जिथे घडली तिथे कितपत उजेड होता माहिती नाही.
जे काही झाल तो नक्कीच गुन्हा आहे. सलमानला शिक्षा व्हायलाच हवी. तरीही दोन्ही बाजूने दु:ख होत आहे.
हा बीबी फारच मनोरंजक झाला
हा बीबी फारच मनोरंजक झाला आहे.
हसावे की रडावे की चिडावे ईथल्या प्रतिसादांना तेच कळत नाहिये....
एक माणुस दारु पितो, दारु पिउन गाडी चालवु नये हे माहित असुनही गाडी चालवतो...तेही भरधाव वेगाने....या सगळ्यामुळे अॅक्सिडेंट ला स्वतः कारणीभुत होतो....आणि फुट्पाथवर झोपलेल्या निरपराध लोकांना चिरडतो..वर त्यांना मदत न करता पळुन जातो....
आणि हे सगळं होउनही ईथे काही लोक म्हणतात की त्याची चुक नाही....फुटपाथवर झोपणारे मुर्ख....
ईतके संवेदनाशुन्य कसे काय होउ शकतो आपण.....त्या फुट्पाथवरच्या लोकांमद्धे आपलं कोणी असतं तरी आपण असच बोललो असतो का ?...
आणि हा अपघात रात्री न होता....दिवसा झाला असता तरी हेच बोललो असतो का ?
असोच........
अगदी बरोबर बोललात बी. उगाच
अगदी बरोबर बोललात बी. उगाच बिचार्या सलमानला गोवलंय यात. इतर सुटले तसंच यालाही सोडुन द्यायचं किनै?
रच्याकने, माधुरीचा नाच बघितला का? (टीव्हीच्या सलमान असलेल्या भागावर हात ठेऊन)
फुटपाथवर झोपणारे मुर्ख..>> हे
फुटपाथवर झोपणारे मुर्ख..>>
हे अस इथे अजून कुनीही लिहिलेले नाही स्मिता.
धन्य धन्य झालो मी, कृत कृत
धन्य धन्य झालो मी, कृत कृत झालो मी
....बौद्धिक दिवाळखोरी काय असते हे समजले आज.
कृत कृत झालो मी >> कृतकृत्य
कृत कृत झालो मी >> कृतकृत्य
नमस्कार, आजतक वरून येे हैं जज
नमस्कार,
आजतक वरून
येे हैं जज के 5 सवाल
1. कॉन्सटेबल रविंद्र पाटिल के बयान को सेशन कोर्ट ने क्यों नहीं माना?
2. सेशन कोर्ट ने ड्राइवर अशोक सिंह के बयान को क्यों दरकिनार किया?
3. कमाल खान का बयान क्यों नहीं दर्ज किया गया?
4. दुर्घटना के बाद सलमान खान ड्राइवर की सीट की ओर से उतरे थे, क्योंकि गाड़ी की बाईं तरफ के दरवाजे जाम हो गए थे. सेशन कोर्ट में एक्सपर्ट की इस राय की क्यों अनदेखी की गई?
5. जज ने पूछा कि गाड़ी के अंदर बैठे चार लोगों की बात कोर्ट में गवाही के दौरान आई या केस में यह पहले से दर्ज थी?
6. धारा 304 (2) के बारे में पहले क्यों नहीं सोचा गया? जब सुनवाई तो जेल क्यों?
हे प्रश्न हायकोर्टाने विचारले होते.
1. कॉन्सटेबल रविंद्र पाटिल के बयान को सेशन कोर्ट ने क्यों नहीं माना? > रविंद्र पाटील यांनीच सलमान खान ड्रायव्हिंग करत होता असे सांगितले होते. याकडे का दुर्लक्ष केले ?
2. सेशन कोर्ट ने ड्राइवर अशोक सिंह के बयान को क्यों दरकिनार किया?>> १३ वर्षानंतर कुठल्या हिशोबाने त्याची जबानी नोंदवायला हवी होती? आणि प्रत्यक्ष रविंद्र यांनी अशोक गाडीमधे नव्हता अशी जबानी दिल्यानंतर अशोकच्या १३ वर्षानंतर आलेल्या जबानीची किंमत काय?
3. कमाल खान का बयान क्यों नहीं दर्ज किया गया? > बहुदा कमाल खान यांचे स्टेटमेंट घेतले होते.
4. दुर्घटना के बाद सलमान खान ड्राइवर की सीट की ओर से उतरे थे, क्योंकि गाड़ी की बाईं तरफ के दरवाजे जाम हो गए थे. सेशन कोर्ट में एक्सपर्ट की इस राय की क्यों अनदेखी की गई? >> सरकारी काँस्टेबलची जबानी महत्त्वपूर्ण की एका अपराधीची?
या ऐवजी असे प्रश्न का विचारले गेले नाही?
१. घटनास्थळावरून सलमान खान पळुन का गेला?
२. ड्रायव्हर अशोक गाडी चालवत होता तर हे १३ वर्षात सलमानच्या जबानी मधे का आले नाही? आताच कसा साक्षात्कार झाला?
३. सलमान जर गाडी चालवत नव्हता तर त्याने स्वतःचे ड्रायव्हिंग लायसन्स का दिले ते ही खोटे? अपघात झाला तर गाडीमधे ड्रायव्हिंगसीट वरच्या व्यक्तिला लायसन्स दाखवण्याची गरज असते. त्याच्यामागे अथवा बाजूला बसलेल्या व्यक्तींना ड्रायव्हिंग लायसन्स विचारले जात नाही.
४. दारुचे नमुने रक्तामधे आढळले आहे. ते काय दर्शवते?
५. टायर फुटले होते तर त्याचा आवाज कुणालाही आला कसा नाही. नाही आला असे मानले गेले तरी प्रथम तपासणीत त्याचा उल्लेख का नाही?
देशात न्याय मिळतो यावरच प्रश्नचिन्ह दिसू लागले आहे
धन्यवाद
एक माणुस दारु पितो, दारु पिउन
एक माणुस दारु पितो, दारु पिउन गाडी चालवु नये हे माहित असुनही गाडी चालवतो...तेही भरधाव वेगाने....या सगळ्यामुळे अॅक्सिडेंट ला स्वतः कारणीभुत होतो....आणि फुट्पाथवर झोपलेल्या निरपराध लोकांना चिरडतो..वर त्यांना मदत न करता पळुन जातो....
आणि हे सगळं होउनही ईथे काही लोक म्हणतात की त्याची चुक नाही....फुटपाथवर झोपणारे मुर्ख....
ईतके संवेदनाशुन्य कसे काय होउ शकतो आपण >>> अहो फूटपाथवर झोपणारे गरीब असतात, सेलेब्रिटी नसतात, Being Human सारख्या चॅरिटिज चालवत नाहीत, मग त्यांना कोण विचारणार??? आपली संवेदना फक्त श्रीमंत, प्रसिद्ध, आणि सो कॉल्ड सोशल वर्क करणार्यांसाठीच !!
फुटपाथवर झोपणार्यांची चूक
फुटपाथवर झोपणार्यांची चूक होती हे आणि सलमानची गाडी टायर फुटल्याने फुटपाथवर चढली त्यामुळे अपघात झाला ह्या दोन्ही गोष्टी मान्य केल्या, तर सलमानला दारू पिऊन सुद्धा अॅडव्होकेटकडे जाणं बरं सुचलं. पळून जाणं बरं सुचलं. पुराव्यांची फिरवाफिरवी वगैरे केली म्हणजे नकळतपणे त्याने त्याची चूक स्वतःशी मान्य केली होती.
फारच विषयाला धरून बोलल्याबद्दल माफ करा
फारच विषयाला धरून
फारच विषयाला धरून बोलल्याबद्दल माफ करा>>
Pages