सलमान खान वरील आरोप सिद्ध.

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 May, 2015 - 02:53

सलमान खानवरील आरोप सिद्ध झाले असून एका सविस्तर निर्णयाद्वारे त्याला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे.

http://www.ndtv.com/india-news/2002-hit-and-run-verdict-salman-khan-prov...

न्याययंत्रणेचे अभिनंदन.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिंकाराची शिकार सलमानने केलेली नाही. >> हो ना ते बावळट ध्यान (चिंकारा) धावत येऊन सलमानच्या गोळीत घुसलं. Lol

अपघात घडल्यानंतर तिथले सगळे सडक्छाप लोक एकत्र येऊन त्याला मारहान करत होते ,अश्यावेळी तो कशाला जखमींची मदद करायला थांबेल? >>> तुम्ही महान आहात हो ... रविंद्र पाटील हा पोलिस होता, त्याच्या सहाय्याने जमावाला शांत करून जखमींना मदत करता आलीच असती, पण तसं न करता तो सरळ त्याची जबाबदारी झटकून पळून गेला.. मुळात मदतीसाठी पण चांगली नियत आणि सदसदविवेकबुद्धी लागते.. जी अपघातावेळी नव्हती, चिंकारा शिकारीवेळी नव्हती. गर्लफ्रेंडला मारहाण करतानाही नव्हती आणि नंतरही कधीच दिसली नाही..( कृपया इथे बीईंग ह्युमनेचे दाखले देऊ नका.. ती संस्था भलेही आत्ता बरं काम करत असेलही पण त्याची स्थापना कोणत्या हेतूने झाली आहे. ते माहिती आहे मला)... हम साथ साथ है मध्ये त्याचे जे कॅरेक्टर दाखवलं आहे, तसा १ टक्का जरी तो ख-या आयुष्यात वागला असताना तर त्याला ( आणि त्याच्या घरच्यांनाही) बरच चांगल आयुष्य जगता आलं असतं.. btw तुम्हाला ती म्हण माहीत्ये का हो आडातच नाही तर पोहो-यात कुठून येणार?

anyway ही चर्चा आतापुरती थांबवते.. मी आता ऑफीसमधून निघत्ये सो मला तुमच्या पुढच्या प्रतिसांदावर काहीच बोलता येणार नाही आज तरी.. ( स्पष्ट केलेलं चांगलं नाहीतर तुम्ही त्यावरूनही मला काहीतरी बोलाल. ) उद्या मी ऑफीसमध्ये येऊन बाकीची उत्तरं नक्कीच देईन...

काय ना त्या बिचार्‍या सहृदयी सुलक्षणी सकल जनांसी आधारु सलमानच्या तुम्ही मागे लागताय. ऐश्वर्या रायमुळे आला बिचार्‍याला राग, मग दारु आपली आपलीच त्याच्या घशात शिरली, बाहेर निघताना त्याला कुणीतरी खोटे लायसंस हातात दिले, लोक तो येणार म्हणल्यावर अनधिकृतपणे फुटपाथवर झोपले, याला गाडी गाडी खेळायची होती तर कुण्णी खेळुन दिली नाही, परत बिचार्‍यालाच लोकांनी मारले मग वकिलाकडे तो त्या जखमी लोकांना मदत मागायला गेला तर परत दारु घशात शिरली, बर याला काहीच कळत नव्हते, खरतर याच्या ड्रायव्हरचीच चूक झाली होती पण हा कित्ती कित्ती निर्मळ याने आपल्या अंगावर गुन्हा घेतला.

तो बिचारा संजय दत तर आणखी कमनशीबी. त्याला एकाने विचारले तुझ्याकडे माझे धोतर, लुंगी, दंतमंजन ठेऊ का असे विचारले. प्रेमळ संजुबाबाला काय माहीत ना त्यात एके४७ आहेत? त्याचीपण या समाजाने गळचेपी केली.

निष्कर्शः वाईट ऐश्वर्या, वाईट दारु, वाईट रस्त्यावर झोपणारे, वाईट सारासार विचार करणारा समाज, वाईट सामान ठेवणारे लोक.

बिइंग इन्ह्युमन कुठले!!

रविंद्र पाटीलने त्याची साक्ष फिरवली होती, कोर्टानेच त्याला बेभरवश्याचा साक्शीदार म्हनुन घोषीत केले होते.

रवी, तुम्हाला तर सगळंच माहितीय असं दिसतयं.. त्या वेळी घडलेल्या प्रत्येक घटनेची इत्यंभूत माहिती सरळ क्रमाने द्या बघू...

निर्लज्जपणाचा कळस..
मटा मधील बातमी..:

पनवेलच्या फार्म हाउसवर सेलिब्रेशन

सलमानच्या सुटकेमुळं त्याचे कुटुंबीय, नातलग, बॉलिवूडमधील मित्रमंडळी व चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सलमानच्या सुटकेचा आनंद साजरा करण्यासाठी खान कुटुंबानं त्यांच्या पनवेल येथील फार्म हाउसवर आज रात्री पार्टीचं आयोजन केलं आहे. इथं सलमानच्या सुटकेचं जंगी सेलिब्रेशन केलं जाणार आहे, अशी माहिती सलमानचे वडील सलीम खान यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली

वर कोणीतरी लिहिलय की "आडात नाही तर पोहोर्यात कुठुन येणार"...खरच पटलं

sorry to say.. पण मलाही तुमचा आयडी हा तुमचा वाटत नसून प्रसिद्ध वाचाळवीर KRKR (कमाल आर खान) यांचाच वाटत आहे... ( no offence at all.. कृपया या वाक्याचा धर्म किंवा जातीशी संबंध जोडू नये तर बोलणा-यांचा पिंड आणि वक्तव्ये लक्षात घेऊन ही कमेंट समजून घ्यावी.)

सलमानच्या सुटकेमुळं त्याचे कुटुंबीय, नातलग, बॉलिवूडमधील मित्रमंडळी व चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. >>>> ??? म्हणजे नक्क्की काय ?
सल्मान खान सुटला ?

सलमानला बदनाम करण्यासाठी काही गरीब माणसे व एक काळवीट ह्यांनी संगनमताने केलेला कट आहे तो. हा कट यशस्वी व्हावा म्हणून एका गरिबाने जीवसुद्धा सोडलेला आहे. किती तो मत्सर सलमानचा!

काळवीट तर मला वाटते टणाटण उड्या मारत सलमानला म्हणाला असेल, अरे मार रे मला, मार!

काही वर्षापूर्वी एका मन्त्र्याच्या ( राष्ट्रवादी की कॉन्ग्रेस माहीत नाही पण मन्त्री अदिवासी होता ) नातेवाईकानी बारामतीच्या जन्गलात अशाच हरणान्ची शिकार केली होती. ते पण गाजले होते. सकाळ की लोकसत्ता मध्येच आले होते ते.

बेफी, मार म्हणलं नाही ते.... सलमानने चालवलेल्या गोळीत स्वत:हून येऊन घुसलं..
आत्मघातकी पथकातलं होतं भौतेक Proud

निर्लज्जपणाचा कळस..
मटा मधील बातमी..:
पनवेलच्या फार्म हाउसवर सेलिब्रेशन
सलमानच्या सुटकेमुळं त्याचे कुटुंबीय, नातलग, बॉलिवूडमधील
मित्रमंडळी व चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
सलमानच्या सुटकेचा आनंद साजरा करण्यासाठी खान कुटुंबानं
त्यांच्या पनवेल येथील फार्म हाउसवर आज रात्री पार्टीचं
आयोजन केलं आहे. इथं सलमानच्या सुटकेचं जंगी सेलिब्रेशन केलं
जाणार आहे, अशी माहिती सलमानचे वडील सलीम खान
यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली
वर कोणीतरी लिहिलय की "आडात नाही तर पोहोर्यात कुठुन
येणार"...खरच पटल>>>>>>>>>>यात निर्लज्जपणाचा काय संबंध ?आपल्या मुलाची सुटका झाली याचा वडीलांना आनंद होनारच, नॅचरल आहे ते.बादवे ते त्यांच्या फार्महाऊसवर काय करतात हा त्यांचा वैयक्तीक प्रश्न आहे,ते तुमच्या पैश्याने तर् पार्टी करत नाहीत ना!त्यांचा कष्टाचा पैसा आहे ते काहीही करतील ,त्यांना निर्लज्ज म्हणायचा कुनालाही अधिकार नाही.

रवि कृपया तुम्ही चिंकारा बद्दल बोला हो.
अब इन ऑखोंको और इंतजार मुनासिब नही.

नाहीतर मान्य तरी करा की सलमान दोषी आहे.
अब हो जान्दो आर्यापार

दक्षिणा | 8 May, 2015 - 06:30 नवीन
रवि कृपया तुम्ही चिंकारा बद्दल बोला हो.
अब इन ऑखोंको और इंतजार मुनासिब नही.
नाहीतर मान्य तरी करा की सलमान दोषी आहे.
अब हो जान्दो आर्यापार>>>>>>>>त्याने शिकार केलेली नाही असे त्याचे म्हनने आहे व ते योग्य असावे.

Pages