Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
प्लिज सगळ्यानी ठरवुन २-३
प्लिज सगळ्यानी ठरवुन २-३ आठवडे ही सिरियल नको बघुया..
टि आर पी वर काहितरी परिणाम जाणवेल न झी वाल्याना..
इथे ठरवु सगळेजण मिळुन..
अग आनन्दी पण पहाणारी किती
अग आनन्दी पण पहाणारी किती टाळकी असतील अशी? ज्याने टिआरपी वर परीणाम होईल? उलट जानेमन आईआजीला भेटलीय तर पुढे काय होतेय हे बघुया, म्हणून अजून काही टाळकी यात सामिल होतील की. जसे पूर्वी आहट नावाची भूताची सिरीयल होती, ती पहाताना भिती वाटायची, पण पुढे काय होईल या उत्सुकतेने परत पाहिली जायची, तसे होईल नाहीतर याचे.
हो खरच आहे.. जाउ दे .. त्याना
हो खरच आहे.. जाउ दे .. त्याना समजे पर्यंत वाट पहावी लागेल..
>>>> प्लिज सगळ्यानी ठरवुन २-३
>>>> प्लिज सगळ्यानी ठरवुन २-३ आठवडे ही सिरियल नको बघुया.. <<<<
मी ऑलरेडी गेले २/३ आठवडे सेरियल्स बघत नाहीये झीच्या. येऊन जाऊन काल तो नाट्यपारितोषिकांचा कार्यक्रम तेवढा बघितला.
भेटली ना शेवटी जानी आ.आ ला .
भेटली ना शेवटी जानी आ.आ ला . ???
आणि कस पत्र लिहिलेलं वगैरे सगळं सान्गितलं
जानी प्रेग्नंट आहे ते कळले का
जानी प्रेग्नंट आहे ते कळले का आआला.
हो ना ! . या सगळ्या प्रकारात
हो ना ! . या सगळ्या प्रकारात वाईट ईतकच वाटतय की काहीही चूक नसताना आमच्या बाळाला भोगाव लागतयं वगैरे काहीतरी बोलात होती ती . आता हा पुढचा भाग होता का माहित नाही .
जानीच्या बाळाला की श्री
जानीच्या बाळाला की श्री बाळाला?


म्हणजे आता आआ सगळे गैरसमज दूर करणार तर.
पूर्वी आहट नावाची भूताची
पूर्वी आहट नावाची भूताची सिरीयल होती >>> रश्मी, आहट परत चालू झाली आहे. सिझन ६. तेव्हा होसूमीयाघ पेक्षा ती पाहा हवं तर. घाबरवण्याची क्षमता होसूमीयाघ मधे जास्त आहे though
ओ म्हणजे आता बाळ मुलगा, बाळ
ओ म्हणजे आता बाळ मुलगा, बाळ नवरा अस काहीसा होणार का?
बहुतेक छोटा श्री, मोठा श्री
बहुतेक छोटा श्री, मोठा श्री असे होईल वाटतय.
श्री छोट्या बाळाला म्हणेल, बघ
श्री छोट्या बाळाला म्हणेल, बघ 'आई आई' आली.
श्री छोट्या बाळाला म्हणेल, बघ
श्री छोट्या बाळाला म्हणेल, बघ 'आई आई' आली >>>>>
जानी आणि आदेचं लफडं लावून
जानी आणि आदेचं लफडं लावून द्या!
मेदे आणि देवदासीबुवांचं लावा!
पिंट्याला चित्राबरोबर टाका भिडवून द्या!
आणि दोन्ही छळवाद एकदम संपवा!
आपटे आणि बाबाजी - रब ने बना दी जोडी!
कालचा भाग चांगला झाला.
कालचा भाग चांगला झाला. जान्हवी आणि आजीचे नीट बोलणे झाले. आता आजी सगळं बरोबर करतील. आजचा भाग पण चांगलाच असणारे. श्रीरंगशी जानूचे बाबा भेट घेऊन सर्व सांगणार आहेत. मला त्यांचे काम फार आवडते या मालिकेत.
आता आजी सगळं बरोबर करतील >>>
आता आजी सगळं बरोबर करतील >>> आशुडी , याला खुळा आशावाद म्हणावा का ? (दिवे घ्या )
आता नेमकं जानीला भेटुन घरी जाताना त्याना गाडीत हार्ट अॅटॅक यायचा , नाहीतर गाडी कुठेतरी आपटायची.
( आठवा : हम आपके है कौन )
मग हे गुपित परत त्यांचं त्यांच्याकडेच
आशू, या बाफवर कोणीतरी
आशू, या बाफवर कोणीतरी श्री-जानूचे प्रत्यक्षातले संबंध बिघडलेत असं लिहिलंय... खरं आहे का हे?
आता नेमकं जानीला भेटुन घरी
आता नेमकं जानीला भेटुन घरी जाताना त्याना गाडीत हार्ट अॅटॅक यायचा , नाहीतर गाडी कुठेतरी आपटायची.
मग हे गुपित परत त्यांचं त्यांच्याकडेच>>> नाही होणार अस कारण काल काका आई आजीशी बोलताना दाखवलाय की जानी त्याला प्रेगनंट बायकांच्या विभागात दिसली.
नाही गं मंजू, अफवा आहेत त्या.
नाही गं मंजू, अफवा आहेत त्या. व्यवस्थित चाललंय त्यांचं. मध्यंतरी मालिकेत जो कचरा झाला होता त्यावरून टीआरपी घसरला होता म्हणून आता गाडी रूळावर आणणार आहेत.
थँक्स आशू.
थँक्स आशू.
लोकांना रडवून पैशे मिळवतात.
लोकांना रडवून पैशे मिळवतात. पाप कि हो हे पाप!
>>> लोकांना रडवून पैशे
>>> लोकांना रडवून पैशे मिळवतात. पाप कि हो हे पाप! <<<<

हे मात्र पटत नै हो घाटपांडे काका.....
पैशे कमवायला, दरवेळेस सगळ्यान्नीच जोकर सारखे लोकान्ना हसवावे असे थोडिच आहे? अशाने सगळेच जोकर बनले तर?
बाकी अजुन तुमच्या बोलिभाषेतून तरी "पापपुण्याचा" प्रभाव ओसरला नाही, हे पण बर नै बरका....
माझ्यात ही सिरियल पुन्हा
माझ्यात ही सिरियल पुन्हा बघायची हिम्मत अजूनही आली नाहिये. सांगितल्याचं दाखवता दाखवता काहीतरी ट्विस्ट काढून फसवणूक करतील आपली, अशी भीती वाटते.
आता फसवणूक केली त्यांनी तर जनता माफ नहीं करेगी!
आता सर्व मालिकांमध्ये
आता सर्व मालिकांमध्ये इंटरेस्टिंग track ठेवणार आहेत. IPLमुळे असं करणार, लास्ट वीकमध्ये म.टा. ला आले होते.
लोकांनी मालिका बघाव्यात म्हणून, नाहीतर लोकांना option आहे क्रिकेटचा.
लिंटिं अहो मी अजूनतरी ठार
लिंटिं अहो मी अजूनतरी ठार अश्रद्ध नाहीये यनावालांसारखा
बाकी पापपुण्यावर सुभाषित आठवत
अष्टादश पुराणेषु \ व्यासस्य वचनद्वयं|
परोपकाराय पुण्याय| पापाय परपीडनं|
हि मालिका अजूनही चालू आहे
हि मालिका अजूनही चालू आहे ????????
अजूनही ती जानु तो जांभळा ड्रेस & ते ३ पदरी मंगळसूत्र घालते का हो ?
येस्स!
येस्स!
टीआरपी वर परीणाम झाला म्हणून
टीआरपी वर परीणाम झाला म्हणून अचानक ट्रॅक बदलला की काय ? इतके दिवस जानीच्या बाबांना सुचलं नाही जावयाला भेटावं ??
आता आ आ जानीच्या आईला शिक्षा करणार - अशी लाईन फिरत होती......
काल काय झालं कोणीतरी प्लीज
काल काय झालं
कोणीतरी प्लीज अपडेट्स द्या...मी मिसलं काल
काल कान्ताकाकाला पत्ता लागतो
काल कान्ताकाकाला पत्ता लागतो जानुच्या प्रेग्नन्ट असल्याचा. कारण तो तिला प्रे. बायकान्च्या सेक्शनमध्ये जाताना बघतो. आई आजीना तो विचारतो आणी मग खुश होतो. पण आई आजी त्याला हे दोघातच ठेवायला सान्गतात आणी त्या आधी त्या घरात गोडाचे जेवण बनवायला सान्गतात, घरच्याना आश्चर्य वाटते पण आई आजी लपवतात. इकडे जानुचे बाबा श्री कडे सत्य सान्गायला येतात, जानु आणी तिच्या आईचे बोलणे होते. तिची आई महाभोचक असल्याने पुढे येणार्या आरोपान्ची मानसीक तयारी आधीच करते. जानु बाबा कुठे आहेत हे विचारते, मग ती फोन करते. तिला बाबा श्रीकडे आहेत हे कळल्यावर ती सालाबादप्रमाणे त्याना शपथ घालुन काही न सान्गण्याची विनन्ती करते. श्री जाम वैतागतो, कारण ते आधी तिच्या तब्येतीविषयी बोलत असतात, पण नन्तर काहीच बोलत नाहीत
Pages