Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52
२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाकी सिरिअल म्हणजे मूर्खपणाचा
बाकी सिरिअल म्हणजे मूर्खपणाचा बाजार आहे!!!!!!!!
तरीही लोक अजून बघत आहेत....
आमच्या एका नातेवाईकांनी
आमच्या एका नातेवाईकांनी "ऑलमोस्ट मोडलंच आहे त्यांचं खरं लग्न" अशी त्यांच्या मते खात्रीची बातमी दिली परवा. शशांक केतकर म्हणे फार फ्लर्ट नेचरचा आहे म्हणून मोडलं वगैरे...<<<< तो शशांक फ्लर्ट करायला कुठे जात असेल? येवून जावून एक मालिका करतोय (बाकी काही जाहिरातीमध्ये सहकुटुंब असतो) आणि त्याही त्याच्या आज्या पनज्या शोभाव्या अश्या वयाच्या बायांसोबत, एक जानी भेटली.. ती ज्याला त्याला काहीहि हं!! करत होती आणि अचानक याला पटली (कशी काय याच्या दाढीवर भाळली ते तिचे तिला माहित), मग हा 'फ्लर्ट' कसा काय?
शशांक केतकर एक नाटक पण करतोय
शशांक केतकर एक नाटक पण करतोय लिना भागवत आणि मंगेश देसाईबरोबर.
बाकी त्यांच ते लग्न मोडल्याच मी पण ऐकल होतं. खखोदेजा.
तेजश्री प्रधानच कुठे दिसत नाही ही सिरियल सोडता हल्ली. लग्नाआधी एक दोन सिनेमात दिसली होती. आता पुर्णवेळ केतकर वहिनींच्या भूमिकेत वाटत.
शशांक केतकर म्हणे फार फ्लर्ट
शशांक केतकर म्हणे फार फ्लर्ट नेचरचा आहे म्हणून मोडलं वगैरे.>>>
तसं चेहर्याचा आणि स्वभावाचा काही संबंध नसतो म्हणा , तरी ही तो फ्लर्ट वगैरे करत असेल अस वाटत नाही , फार सात्विक चेहर्याचा वाटतो .
शशांक केतकर आणि फ्लर्ट???
शशांक केतकर आणि फ्लर्ट??? काहीतरी चुकतय
सात्विक रादर तुपकट (तेलकट-
सात्विक रादर तुपकट (तेलकट- तेल चंपी करतो ना)...
तसं चेहर्याचा आणि स्वभावाचा
तसं चेहर्याचा आणि स्वभावाचा काही संबंध नसतो म्हणा , तरी ही तो फ्लर्ट वगैरे करत असेल अस वाटत नाही , फार सात्विक चेहर्याचा वाटतो .>>> मला पण आणि जानीशी लग्न केल्यामुळे (खरे आणि मालीकेत दोन्हीकडे) मला त्याचे दया पण येते
शशांक केतकर आणि फ्लर्ट???
शशांक केतकर आणि फ्लर्ट??? काहीतरी चुकतय <<< कुछ तो गडबड है दया.....शोधना पडेगा.
तेजश्री प्रधान सुद्धा नाटकात
तेजश्री प्रधान सुद्धा नाटकात येतेय आता…… प्रशांत दामले सोबत.
सात्विक रादर तुपकट >>> तेच गं
सात्विक रादर तुपकट >>> तेच गं अपर्णा
सात्विक म्हटल्यावर मला वरण भात तूपचं आठवत
तेजश्री प्रधान सुद्धा नाटकात
तेजश्री प्रधान सुद्धा नाटकात येतेय आता…… प्रशांत दामले सोबत<<< कार्टी काळजात घुसली !! असेच काहीसे.
हो अपर्णा…. असंच काहीतरी.
हो अपर्णा…. असंच काहीतरी.
शशांक केतकर म्हणे फार फ्लर्ट
शशांक केतकर म्हणे फार फ्लर्ट नेचरचा आहे म्हणून मोडलं वगैरे.>>> असं असेल तर मग सारख्याला वारखा मिळाला ह्या तेजूचा आधी साखरपुडा झाला होता रोहन नावाच्या एका आयटी वाल्याशी
शशांक केतकर आणि फ्लर्ट???
शशांक केतकर आणि फ्लर्ट??? काहीतरी चुकतय
>>
होतं गं असं! इतकी बोअर बायको केल्याच्या पश्चातापात होरपळून चुका करत असेल बिचारा
जाऊ द्या त्यांचं ते पर्सनल लाईफात काय करायचंय ते करतील.
इकडे मालिकेत मात्र त्यांचं काही न तुटता सुखद शेवट होवो (एकदाचा) आणि मालिका संपो म्हणजे मिळालं
मुळात जेव्हा तेजश्री आणि
मुळात जेव्हा तेजश्री आणि शशांक चं लग्न झालं तेव्हा पण ते लग्न मालिकेचा टी आर पी वाढवण्यासाठी झालय असं आलं होतं पेपर मद्धे....खखोदेजा....
आणि तसं असेल तर मालिका संपवता संपवता लग्न पण संपवायचं असेल तर अशा अफवा पसरवत असतील कदाचित..
असो...
TOI ला मागे हेच वाचलं होतं की
TOI ला मागे हेच वाचलं होतं की शशांक फ्लर्ट नेचरचा आहे पण मलाही खरं वाटत नाही.
आत्ता दाखवताहेत कि श्री ने
आत्ता दाखवताहेत कि श्री ने पत्र का फाडलं हे विचारायला जान्हवी श्री ला सरळ सरळ फोन करते.
वाटलं आतातरी मालिका गै.समजातुन मुक्त होईल.
पण नेमकं दाखवत आहेत कि त्याच वेळेस त्या कुकिजवाल्या काकाला मायग्रेनचा अॅटॅक आला आणि श्रीबाळ फोन बेडरुममध्ये सोडुन पळाला आहे त्याच्याकडे.
कहर म्हणजे जान्हवीचे ते मिसकॉल्स बेबी बघते. ती चीप बाई आता ते मिसकॉल्स डिलीट करेल.
पुन्हा गै.समज..
बेबुडी फारच वैतागवाणी आहे,
बेबुडी फारच वैतागवाणी आहे, अगदी नोबितासारखी. माझ्या फार डोक्यात जाते.
चीप बेबी.. वरती ते कोण आवरा
चीप बेबी.. वरती ते कोण आवरा आवरा म्हणतंय ना.. त्यांनीच बघा हो..
अरे मधे ती अॅड यायची ना
अरे मधे ती अॅड यायची ना सिरियल विषयी तक्रार करण्यासाठी वेबसाईट दाखवायचे.... ती वेबसाईट माहितेय का कोणाला?
मला या सिरियलचा अगदी अगदी कंटाळा आलाय.
बेबुडी फारच वैतागवाणी आहे,
बेबुडी फारच वैतागवाणी आहे, अगदी नोबितासारखी>>>>


सगळ्या प्रतिक्रिया फुल टूssssss टाईमपास आहेत. केवळ आणि केवळ सगळ्यांना चटपटीत प्रतिक्रिया देता याव्यात म्हणूनच फक्त ही सिरीयल चालूय अशी आतल्या गोटातली बातमी आहे.
अजून ही चिवटपणे ही सिरीअल बघणार्यांची स्थिती सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशी झालीय म्हणे
वरती ते कोण आवरा आवरा म्हणतंय
वरती ते कोण आवरा आवरा म्हणतंय ना.. त्यांनीच बघा हो..>>
तसंही मी आवर्जुन बघत नाही. फक्त इथे आवर्जुन वाचते.
दक्षिणा, स्वप्न नाही पडलं. आधीचं आवरा सगळ्या गंमतीशीर पोस्टसाठी मजेने लिहिलं होतं. नंतरचं आवरा पियुच्या पोस्ट नंतर आहे. नीट बघ.
बाकी बेबी कॅरेक्टर खरोखर
बाकी बेबी कॅरेक्टर खरोखर चीप.
नोबिता >>>> तो ही परवडला.
हो तो जियान त्रास देतो म्हणून
हो तो जियान त्रास देतो म्हणून नोबिता दोरेमोन च्या मागे लागून त्याला पिडतो. या बेबीला कोण त्रास देतोय?
या बेबीला कोण त्रास देतोय?>>
या बेबीला कोण त्रास देतोय?>>
नाही..ती त्रास देतेय...
>>>>या बेबीला कोण त्रास
>>>>या बेबीला कोण त्रास देतोय?>>
>>>>नाही..ती त्रास देतेय...
तिला कोणीच त्रास देत नाहीये ह्याचा त्रास झाल्याने ती त्रास देतेय
ती ( बेबुडी) त्रासात असल्याने
ती ( बेबुडी) त्रासात असल्याने सगळ्याना त्रास देऊन स्वताच स्वताला त्रास करुन घेते.फार त्रासमय जीवन आहे तिचे.
ते बेबुडी मला शेंबडी सारख
ते बेबुडी मला शेंबडी सारख वाटतय वाचायला.
किती भोचक आहे पण ती श्रीच्या फोनला एकतर हात लावायचा आणि आगाऊपणा करुन त्यातुन त्या जान्हवीचा नंबर ब्लॉक करायचा. वरतुन श्रीला इमोशनल ब्लॅकमेल करायच की मला या सगळ्याचा स्ट्रेस येतो. खरच स्ट्रेस आला असता तर काहीतरी परिणाम दिसले असतेच की पण नाही स्ट्रेस घेतात हे आणि आजारी पडतात भलतेच
विघ्नेश्वर पावणार बहुतेक.
विघ्नेश्वर पावणार बहुतेक.
नाही.........................
नाही...........................जानी आणि श्री ची परत चुकामुक होणार नक्की....
ईतक्या स्वस्तात प्रेक्षकांना सोडणार नाहिते हे लोक...
माझी न मैत्रिणीची बेट लागली आहे यावर
बघु आज कय होतय
Pages