होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

घाटपांडेजी, छान आहे सुभाषित. धन्यवाद. Happy

मी बघतच नाहीये ती सेरियल....
इथेच वाचतो अन मग आख्खी कथा/पात्रे डोळ्यापुढे उभी रहातात.. तेवढी पुरेत!

>>> या शपथविधी कार्यक्रमांवर सिरियल मधे बंदी घातली पाहिजे. <<<
अगदि अगदी.... मला तर भिती आहे कि आता हे उठताबसताचे शपथविधी पाहून पाहून त्याचे प्रयोग लिम्बीने माझ्यावर करू नयेत म्हणजे मिळवली! Proud

आता ती अशी शपथ आ.आ ना पण घाल्णार
आआनी अगोदरच काकाला घतली असणार .
त्यामुळे श्री पर्यन्त ही बातमी पोचायचे मार्ग शपथकोसळी मुळे बन्द !

असा का बावळट्पणा म्हणे. सांगाय्चं की. किती दिवस लपवेल आणि ? (फारच विसंगत प्रतिसाद आहे का? मी ५ महिने टी.व्ही. पहणे बंद केलय त्यामुळे आधीचा काहीच रेफरन्स नाहीये. )

असा का बावळट्पणा म्हणे. सांगाय्चं की. किती दिवस लपवेल आणि ?

>> रावी तुमच्या अपेक्षा अवास्तव आहेत. Rofl Light 1

आमच्याकडे टाटा स्कायने काहीतरी अपडेट करण्याचा देशव्यापी राडा घातल्यामुळे कुठलाही मराठी चॅनेल दिसत नाहीये. त्यामुळे इतका सुखात आहे.

सम्रा़ट किल्मिशच्या चालीवर - ये राडा कायम रहे असे म्हणावेसे वाटत आहे. Happy

हिरो हिरवीण पोटुशी राहिली की कसा तिच्या भोवती फिरून व तिला फिरवून आनंद साजरा करतो...तसे काहीसे काका आणि आआ चे वाटले Happy

मधले बरेच महिने ही सिरियल काहीच पाहिली नव्हती. पण आईकडे रहायला गेले होते दोन तीन दिवस तेव्हा पुन्हा काही भाग पाहिले गेले. मधल्या काळातला झालेला गोंधळ निस्तरण्याचा आई आजींचा प्रयत्न चालू आहे. आणि स्क्रिप्ट रायटरचे क्रेडिट की ते तो बर्‍याचशा लॉजिकल पद्धतीने, दुवे जोडून घेत निस्तरत आहेत. नाहीतर एरवी अकस्मात सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो, माफी मागितली जाते, दिली जाते आणि एका भागात सर्व गोड गोड करुन मोकळे होतात पण सध्या तसं होत नाहीये. स्टेप बाय स्टेप घोळ निस्तरण चालू आहे आई आजींचं ते आवडलं. असं ऐकण्यात आलं की मधुगंधा कुलकर्णीने मध्यंतरी सोडलेली ही मालिका पुन्हा लिहायला घेतली आहे. ते खरं असेल तर त्याचे चांगले परिणाम दिसत आहेत असं वाटतय.

मला गेल्या दोन-तीन भागांमधे सगळ्यात आवडलंय ते रोहिणी हट्टंगडींचं काम. अभिनयाचं नाणं खणखणीत असतं तेव्हा ते कोणत्याही माध्यमामधे अस्सलच उठून दिसतं याचा प्रत्यय आला. संवादफेक, मुद्राभिनय, मनात दाटून असलेला आनंद सगळ्यांपासून लपवायच्या खटपटीत तो डोळ्यांमधून दिसणे सगळंच कसबी कलाकाराला साजेलसंच.

माझं निरिक्षण फक्त गेल्या काहीच भागांपुरतं असल्याने रेग्युलर बघणार्‍यांना कदाचित पटणारही नाही. पण जे चांगलं दिसलं ते सांगावसं वाटलं.

या मालिकेत मला सगळ्यात जास्त जान्हवीच्या आईचंच काम आवडतं. बाकी सगळेच जण 'टू गुडी गुडी' आणि अगदीच कणाहीन वागतात त्यामुळे डोकयात जातात Sad

मला रोहिणी हट्टंगडींच्या कसदार अभिनयाला इथे वावच नव्हता आणि नाही असेच वाटत राहिलेय...
पण जान्हवीची आई..भुमिकेला खरा न्याय दिलाय तिने...

मला तर जान्हवीची आईच आवडते.
तिच्यासाठी मी बरेचदा बाग पाहिलेत. मस्त करते काम.
उगाच ते बँगग्र्राँउड म्युझिक नाही, अचकट विचकट भाव नाही. अशी खलनायिका आहे.

मधले भाग पाहिले नाहीत तेव्हा कोणीतरी प्रकाश टाका जरा आणि पुण्य मिळवा...

ती जान्हवी घर सोडून का जाते?
नक्की काय होतं?

श्री विघ्नेश्वर नावाने फुड प्रोडक्ट (व्हेज-नाॅनव्हेज) मार्केटमध्ये आणतो. एक राजकीय नेता (?) जो अनिल आपटे शी संबंधित असतो तो नाॅनव्हेज प्रोडक्टसाठी देवाचं नाव वापरण्यावर आक्षेप घेतो. पिंट्या त्याच्याकडेच काम करत असतो. त्याच्या चिथावणीवरून जनता श्री / गोखले गृ. उ. विरोधात भडकलेली असते. आणि त्याच्याच सांगण्यावरुन पिंट्या श्रीच्या तोंडाला काळं फासतो. जानी पिंट्याची बाजू घेते. घरातले जानीशी अबोला धरतात. जानीची आई आगीत तेल ओतत राहते. जानी चार दिवस माहेरी येते ती माहेरीच राहते. दरम्यान कला आणि बेबुडी मुळे श्री-जानीतले गैरसमज चांगलेच फोफावतात.
हुश्श..... दमले बै! Happy

शर्मिला, अनुमोदन.

आमच्याकडे कन्यादान आणि होणार सून या दोन सिरीयल लावल्या जातात. तुलनेत होणार सून बरी वाटते. कारण कन्यादानमध्ये एक शरद पोंक्षे सोडले तर बाकी कोणीच कसदार अभिनय करत नाही. या सिरीयलमध्ये मात्र रोहिणी हट्टंगडी, प्रसाद ओक, लीना भागवत व इतर सगळेच कसलेले, थिएटर बॅकग्राऊन्डवाले कलाकार आहेत. कितीही बकवास स्टोरी असली तरी हे लोक त्यांचं १०० % योगदान देत असतात. अगदी शशांक केतकर नवखा असला तरी छान काम करुन जातो. जान्हवीचे आईबाबा, बेबीआत्या सगळे सहज काम करतात. अगदी अतुल परचुरे त्यांच्या वाट्याची कॉमेडी छान करुन जातात. (याला जान्हवी अपवाद..तिचं काम ओव्हर-द-टॉप वाटतं).
इतकी मूर्ख स्टोरी अभिनयामुळे सुसह्य वाटते हे खरं. गेल्या काही भागात आईआजीची अ‍ॅक्टिंग वर्थ वॉचिंग आहे!

शर्मिला अनुमोदन. प्रसाद ओक पण उत्तम काम करतो. त्या बेबुटल्याच तर कायम वेगळच चाल्लेल असत.

पिन्ट्याला म्हणे तो राजकीय नेता धमकी देतो की मी सान्गीतले तसेच कर नाहीतर तुझ्या बहिणीला आणी तिच्या नवर्‍याला मारेन म्हणून. खरे खोटे पिन्ट्या आणी जानु जाणोत.

अगदी अतुल परचुरे त्यांच्या वाट्याची कॉमेडी छान करुन जातात>>>
अरारारा. अतुल परचुरे हा बरा अभिनेता होता. त्याने एकुणच स्वतःचे माकड करुन घेतले आहे. एकतर बँकेतला मॅनेजर दाखवुन त्याचे ते स्मितुडी, भाजी कापणे वगैरे करणे म्हणजे अक्षरशः पानचट्ट्पणाचा कळस आहे.

अतुल परचुरे हा बरा अभिनेता होता. त्याने एकुणच स्वतःचे माकड करुन घेतले आहे. एकतर बँकेतला मॅनेजर दाखवुन त्याचे ते स्मितुडी, भाजी कापणे वगैरे करणे म्हणजे अक्षरशः पानचट्ट्पणाचा कळस आहे.>>>>>>>>>>>>>+१

गेल्या काही भागात आईआजीची अ‍ॅक्टिंग वर्थ वॉचिंग आहे!>>> + १

अतुल परचुरेवर ही वेळ आली त्याबद्दल त्याची दया येते Sad

आमच्याकडे इतके दिवस टाटास्काय नव्हते त्यामुळे मी कुठल्याच मालिका बघत नव्हते. फक्त इथे येऊन इथल्या गमतीजमती वाचत असे. सध्या साबासाबू घरी आल्याने टाटास्काय घेतले आहे त्यामुळे गेले काही दिवस नाईलाज म्हणून मालिका पहाव्या/ ऐकाव्या लागताहेत.
या पार्श्वभूमीवर माझी एक भोभा शंका: जान्हवीने श्रीला लिहिलेल्या पत्रात ती प्रेग्नंट असल्याचे तिने कळवलेले असते. ते वाचुनही श्रीने पत्र फाडले असे तिला ठामपणे वाटते आहे. मग तरीही आपण प्रेग्नंट असल्याचे त्याला सांगू नका म्हणून ती सगळ्यांना शपथा का घालत सुटली आहे? Uhoh

>>>> इतकी मूर्ख स्टोरी अभिनयामुळे सुसह्य वाटते हे खरं <<< खरयं , अभिनय चांगलाच आहे सगळ्यांचा.
पण स्टोरी इतकीही "मूर्ख" वगैरे नाही, वास्तवात मी याचे पेक्षाही भयानक एपिसोडस बघितले/अनुभवले आहेत. त्यामुळे स्टोरीचे नवल न वाटता, दर दिवशी रेंगाळत रेंगाळत पुढे सरकतात त्याचा वैताग येतो.

मग तरीही आपण प्रेग्नंट असल्याचे त्याला सांगू नका म्हणून ती सगळ्यांना शपथा का घालत सुटली आहे? ____
आणि शपथा घालून अस किती दिवस लपणार आहे . कमाल आहे

श्या हा शपथमोड कार्यक्रम एकदा होऊन जाऊदेत. कोणी कोणाला काय शपथ घातली हेच लक्षात राहात नाहिये दिग्दर्शकाच्या म्हणुन हा सगळा सावळा गोंधळ.

शर्मिला +१. अगदी चांगले कलाकार आहेत म्हणूनच पाहावीशी वाटते. अगदी पिंट्या, तो जान्हवीचा मित्र यांचापण अभिनय चांगला असतो. जान्हवीचे बटबटीत आणि काठीटाईप ड्रेस बदलले तर तीही आवडू शकते, गाण्यात आकाशी ड्रेसमधे किती गोड दिसते. शशांक लाईट मूडमध्ये छान काम करतो, सिरीयस प्रसंगी ठीकठाक.

Pages