होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतुल परचुरे उत्कृष्ट अभिनेता होता.
ज्यांनी त्याचं नातीगोती मधलं काम पाहिलं आहे त्यांना लगेच जाणवेल.
रच्याकने, नातीगोती अप्रतिम जमून आलेलं नाटक होतं. दिलीप प्रभावळकर, रीमा, मोहन जोशी आणि अतुल परचुरे!

नातीगोतीत स्वाती चिटणीस होती ना? अतुल परचुरेचं त्यातील काम अजूनही लक्षात आहे. या मालिकेत सहन करवत नाही त्यांची अवस्था :-).

आधी रीमा मग स्वाती चिटणीस. अतुल परचुरे तरुण तुर्कमधे पण होता. त्यात जसे बोलायचा तसेच आत्ता बोलतो असे वाटते मला. त्याने असले रोल करुन स्वत:चे माकड करु नये. असो.

>> होणार सून मी या घरची - ३ सारिका.चितळे 845 9 नवीन उपग्रह वाहिनी - मराठी 2015-04-10 10:19
>> शुभ वर्तमान - चांगल्या बातम्या हर्पेन 438 3 नवीन चालू घडामोडी 2015-04-10 10:19

हे दोन धागे एकाखाली एक आलेत, तर हातासरशी या धाग्यावरील "शुभवर्तमान-चांगल्या बातम्या" लगोलग पुढच्या धाग्यातही चिकटवाव्यात का? Wink Proud

ह्या मालिकेला मागेच सोडचिठ्ठी दिली होती. इथले अपडेट वाचून कोंडी फुटलेले भाग काढून पाहिले आज. शर्मिला म्हणते तसे हे भाग चांगले झाले आहेत.

पण एकंदरित ह्या मालिकेचा ग्राफ पन्नास भाग ताण ताण ताणायचे आणि मग काही भाग लॉजिकल की परत ताणायला सुरुवात असा राहिलेला आहे. ह्यांच्यात सगळे सण वरातीमागून घोडे आल्यासारखे उशीरा साजरे होतात. एक तासाच्या भागातही जे घडायला हवे असते ते शेवटच्या मिनिटापर्यंत ताणून प्रत्यक्षात पुढच्याच भागात दाखवतात हे कायम !

काल झाला रो ह चा birthday.

सर्व channelsनी शुभेच्छा दिल्या होत्या fbवर, म्हणून समजलं.

ईथे काय चाललयं ??

सगळे गाठी मारण्यात गुंतले आहेत , पण ईकडचा गुंता सुटला की नाही ??
जाणकारानी ब्याटरी मारावी Happy

आजच्या मटात बातमी आहे की शशांक केतकर आणि तेजश्री खरोखर घटस्फोट घेत आहेत. 'मटा'ने घटस्फोटाच्या अर्जाची प्रत मिळवली आहे म्हणे Uhoh

हे मटावाले फार रिकामटेकडे आहेत. याना बातम्या मिळत नाहीत तर हे इथे घुसले. पण घटस्फोटाच्या अर्जाचा नम्बर टाकलाय म्हणजे खरेही असणार.

मला नाही वाटत खरं. TRP वाढवायचे धंदे कुठल्याही थराला जाऊ शकतात. थोड्याच दिवसांनी 'सिरीयलप्रमाणेच पुन्हा समेट' अशीही बातमी येईल.

ऑनलाईनमटामधले या बातमीखालचे प्रतिसाद मनोरंजक आहेत. मटाला काय मिळालं असली बातमी प्रसिद्ध करून? अर्जाची प्रत मिळवलीय वगैरे लिहून बातमी सिद्ध करण्याची काय गरज? त्यातही 'मटाने' मिळवलीय असं खास अवतरण चिन्हात लिहिलंय. घटस्फोटाच्या अर्जाची प्रत अशी कोणालाही विनाकारण मिळू शकते का?

आपला काही या मालिकेशी संबंध नाही .. पण जान्हवी ची वागणूक श्री बरोबर , ठीक वाटली नाही. झी गौरव तत्सम समारंभात बघितलेली ( TV वरच )
CKP मुली तिखट असतात .. श्री चा स्वभाव सौम्य / शांत वाटतो. जान्हवी हि जास्त पुढे पुढे करणारी .. झाले ते उत्तमच .. तसा पण तिचे आधी पण एक लग्न ठरले होते ना ? जे तिने मोडले , श्री ला पटवल्यावर ?

घटस्पोटाच्या अर्जाची प्रत ही वैयक्तित बाब आहे त्या लोकांची, त्यावर प्रोसेस चालू असताना अशी प्रसिद्धी कितपत योग्य आहे? आणि ती ही ठामपणे. Uhoh की सेलिब्रिटी शिंकले तरी बनवा न्युज अस आहे.

असो. टीआरपी साठी असेल अस काही तर अत्यंत खेदजनक प्रकार म्हणावा लागेल.

खरच आहे ..घटस्पोट हा त्यान्चा वैयक्तिक प्रश्न आहे .. म टा ला त्यात नाक घालायचे काय कारण.... इथले अप्डेट वाचुन मालिका अखेरच्या वळनावर आहे असे दिसते .. बहुतेक इथली लिन्क मिळालि असेल झी मराठी ला...

CKP मुली तिखट असतात .. श्री चा स्वभाव सौम्य / शांत वाटतो. जान्हवी हि जास्त पुढे पुढे करणारी .. झाले ते उत्तमच .. तसा पण तिचे आधी पण एक लग्न ठरले होते ना ? जे तिने मोडले , श्री ला पटवल्यावर ?

>> Angry What the XXXX??? मी सीकेपी नाहीये पण कोणाच्याही जाती-पोटजातीवरुन इथे बोलु नये कृपया. एकीकडे म्हणायचे कि आपला त्यांच्या मालिकेशीही संबंध नाही आणि दुसरीकडे त्यातल्या कलाकारांच्या वैयक्तीक आयुष्य आणि जाती पोटजाती आणि आधी जुळलेले/ फिस्कटलेले संबंध यावर चर्चा करायची? ग्रो अप अभि१.

>>>>>> राग What the XXXX??? मी सीकेपी नाहीये पण कोणाच्याही जाती-पोटजातीवरुन इथे बोलु नये कृपया. एकीकडे म्हणायचे कि आपला त्यांच्या मालिकेशीही संबंध नाही आणि दुसरीकडे त्यातल्या कलाकारांच्या वैयक्तीक आयुष्य आणि जाती पोटजाती आणि आधी जुळलेले/ फिस्कटलेले संबंध यावर चर्चा करायची? ग्रो अप अभि१.<<<<

+११

असाच एक गॉसिप बीबी वर लोकं एका नटाच्या डिवोर्स चर्चा आणि दुसर्‍या बीबी वर तीच आयडी तिसर्‍याला भाषण की हे चूक आहे वगैरे. फनी आहे ती आयडी.

मुळात खाजगी आयुष्यात कोण कुणाशी कसं वागतं हे प्रेक्षकांना कळणं अशक्यच आहे आणि आपला संबंधही नसतो काही. अर्थात एक हितचिंतक प्रेक्षक म्हणून दोघांचंही भलं होवो हीच इच्छा राहील.

* मूळ पोस्ट संपादित.

मटाचा निषेध! फ्रन्ट पेजवर ही बातमी आहे! ज्या पानावर नेपाळच्या बातम्या तिथेच ही निव्वळ गॉसिप बातमी! संपादकांनी सपशेल चूक झाली हे मान्य करायला हवं. ते घटस्फोट घेतील नाहीतर नाही घेणार, ही बातमी वर्तमानपत्राच्या मुख्य पानावर का येते?

आपला काही या मालिकेशी संबंध नाही .. पण जान्हवी ची वागणूक श्री बरोबर , ठीक वाटली नाही. झी गौरव तत्सम समारंभात बघितलेली ( TV वरच )
CKP मुली तिखट असतात .. श्री चा स्वभाव सौम्य / शांत वाटतो. जान्हवी हि जास्त पुढे पुढे करणारी .. झाले ते उत्तमच .. तसा पण तिचे आधी पण एक लग्न ठरले होते ना ? जे तिने मोडले , श्री ला पटवल्यावर ?>>>>>>>>>>>>>> हाउ मीन.

आजच्या मटाला आहे का?

मुख्य पेजवर नाहीये आमच्याकडे.

मुंबई टाईम्सला जनरली ह्या बातम्या असतात. तिथेपण नाहीये. मी सगळा पेपर अजुन वाचला नाही.

पूनम + १००
आधीच्या पोस्टमध्ये हे लिहायचेच राहिले. मटाने अशाप्रकारे ही बातमी प्रसिद्ध करुन हीन पातळी गाठलेली आहे !

Pages