होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वप्न नसावं म्हणजे झाल.. आणि येवढ कळुन त्यानी दोघिनी मिळुन श्री शी लपवु नये म्हणजे झालं...
बघुयाच आता.. बहुतेक खुप टीका होत आहे म्हणुन आटोपतं घेत असतिल..

स्वप्न नसावं म्हणजे झाल.. >>> मलाही असचं वाटतय .

आई आजीला पहाटे पहाटे साखरझोपेत दृष्टांत झाला असेल Happy

स्वप्न नसावं म्हणजे झाल.. >> तिच भीती वाटतेय.

विघ्नेश्वर मालिका लेखिकेला सुबुद्धी देऊदे आणि हे स्वप्न नसू दे.

Happy

जानी चं स्वप्न असेल असा माझा अंदाज... Happy
आईआजी चं असेल तरी कथा पुढे सरकेल...म्हणजे त्यांना शंका येणे वगैरे...पण जानीच असेल तर काही उपयोग नाही

झी मराठीवर, त्यांच्या परंपरेला अनुसरून, प्रोमोमध्ये एक आणि प्रत्यक्ष मालिकेत भलतेच दाखवतात! Happy
हे नक्की कोणाचे तरी स्वप्न वैगरे असेल. इतक्या लवकर हे गुपित ऊघड झाले तर मालिका आणखी लवकर संपेल ना!
आणखी किमान महिनाभर तरी हे गुऱ्हाळ चालेल याची खात्री. Happy

.

आज बेबीच्या कवी असलेल्या नवर्‍याची बसस्टॉपवर एंट्री झाली!! (त्याचा नावासहित उल्लेख आईआजीच्या संवादात होता. मी प्राचीन काळी ऐकला होता तो संवाद जान्हवीबरोबरचा) म्हणजे अजून एकीला मार्गी लावतील काही महिन्यांनी. मग सरूमावशीचं लग्न...तोवर ९ महिने भरतील...की बाळंतपण! हाय रे कर्मा!!!!! Proud

शनिवारी कुठल्यातरी channelवर शशांकचा interview होता. मी दोनच मिनिटं बघितलं.

एका बाईने फोनवर विचारले, श्री- जान्हवी एकत्र कधी येणार? तेव्हा शशांक म्हणाला लवकरच येणार.

फिर मैने channel बदल दिया.

अरे तो देव बेबुडीचा नवरा आहे का? Uhoh
मला काल वाटत होते की आता ह्या दोघांना बोलताना कोणीतरी पाहील आणी "हाच तो तिचा प्राणापेक्षा जवळ" असा सुतावरुन स्वर्ग गाठेल.
लेखकाला हा ट्विस्ट सुचवावा काय? Proud

तो बेबीचा नवरा होय Uhoh मलाही वाटले काही नवीन ट्विस्ट

आज बेबीच्या कवी असलेल्या नवर्‍याची बसस्टॉपवर एंट्री झाली!! (त्याचा नावासहित उल्लेख आईआजीच्या संवादात होता. मी प्राचीन काळी ऐकला होता तो संवाद जान्हवीबरोबरचा>>> प्रज्ञा९ इतक्या बारकाईने बघतेस तू ग्रेट Happy

दिवसात हजार वेळा दाखवत आहेत ट्रेलर आजेसासू-नातसून भेटीचा, पण ऐन एपिसोडला हे स्वप्न असायचं नाहीतर मनातले मांडे

हो ग विनीता. नेहेमी प्रेक्षकान्चा पचका करण्याची सवय असतेच या सिरीयलवाल्याना.:अरेरे: त्या असावा सुन्दर बन्गल्याच्या ( ई टिव्ही ) वेळी चान्गलेच अनूभवलेय.:राग:

तो बेबड्या तसाच आहे त्याला कोण बेबी म्हणणार ? त्या घरातला तोच एक पुरुष.:)
बाकीच्या बाया बसतात नुसत्या डोळ्याला पदर लाऊन. हा बसलाय का ?

Pages