होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे पण नवरा सांगा ना कोण ते >>
सुमेधाताई, माहित नाही. नवीनच आहे वाटत ते पात्र. मी तरी त्याला इतर कुठल्या चॅनेलवर पाहिलेलं आठवत नाहिये.

अरे हा ई (आता कलर्स) टीव्हीच्या शिरेलीत असतो. मा मा तू झा मध्ये इन्स्पेक्टर होता आणि कमलामध्ये पत्रकार. आता मी कमला बघत नाही पण एक आठवडा बघितलं, तेव्हा हा होता.

नाव नाही माहीती.

अरेरे!! माझ्या स्मरणशक्तीचा आधीच त्रास होतो त्यात नका हो कुणी भर घालू! Wink Proud

तो जर प्राणापेक्षा प्रियवाला असता तर श्रीने त्यांना दोघांना एकत्र बोलताना बघितलंय असा एक प्रेक्षकांसाठी अतिकरुण प्रसंग मालिकेत घुसडला असता ना!

आणि संवाद का लक्षात राहिला माहितेय का? कारण त्यात आआ म्हणते "बेबी होतीच तशी पहिल्यापासूनच लाघवी"
आणि मी सोफ्यावरून उठत होते, ती हा संवाद ऐकून मटकन बसले खाली! बेबी आणि लाघवी? लाघवी या विशेषणाचा अर्थ तरी काय आहे... वगैरे त्रासदायक विचार मनात येऊन गेले त्यामुळे तो दळभद्री संवाद बिचारा डोक्यात बसला झालं! Proud

बेबी होतीच तशी पहिल्यापासूनच लाघवी >>> आता ती चिड्चिड करते म्हणून नाहीतर तशी ती आहेच की गोडुली .
बाकीच्या मुळुमुळु आयांपेक्शा नक्कीच छान आहे .

बेबी आणि लाघवी>> Lol

'बेबी लहान असताना अशी नव्हती. लाघवी होती.' असं म्हणायचं असेल आआ ला. Happy

आता ती चिड्चिड करते म्हणून नाहीतर तशी ती आहेच की गोडुली .>>>>>>> बेबीचं तोंड वाईट आहे. (बोलणे)

जान्हवी मंगळसूत्र धर्मशास्त्राला मान्य नाही. त्यापेक्षा घालू नका मंगळसूत्र. असे काही लोकांचे म्हणणे आहे व मला ते मान्य आहे.
बाकी कालचा नाती वापरली नाही तर ती सुद्धा गंजतात हा डॉयलॉग लई आवडला

ये तो वरती दाखवलाय तो बेबोचा नवरा आहे???? अ ओ, आता काय करायचं अ ओ, आता काय करायचं >>> बस क्या , शुभुताई , उगाचच मेहनत केली का मी मग ? माझ्यासकट सगळे विचारत होते .. कोण आहे तो , कोण आहे तो .. म्हणून शोधला आणि डकवला फोटो .

पण बेबीला हा हिरो नाही शोभत. ती स्वभावाने कशीही असली तरी दिसायला चांगली आहे. >>> + १०००

शेवटी आई आजीला कळलं का की जानुबाई प्रेग्नंट आहे ते? आमच्या शेजारी रहाणारा चिनी माणूस विचारत होता.

ऑ!

गैरसमजाला किती वाव असावा? Uhoh
जानी समजून बसली आहे आता की या बाया श्री साठी स्थळं पहायला लागल्यात म्हणून. Uhoh

दक्षे त्या बाया श्री करता मुलगी बघतातच आहेत. तो जानू बाईचा गैरसमज नाही Happy
आत्ता ती खरी पटापट अक्शन घेईल. इतके दिवस माझ मन सांगताय / माझ मन सांगताय करत होती ( तीच मन बरोबरच सांगत होत म्हणा ) पण भोचक बेबीला श्री च लग्न दुसर्या मुलीशी लावायाचच आहे.
मालिका संपता संपता बेब्या पण नवर्याकडे नांदायला जाईल अस वाटतय

मालिका संपता संपता… Happy Happy Happy
हि मालिका कधी संपेल हे झी मराठी आणि मंदे सुध्दा सांगु शकणार नाही!

शेवटी आई आजीला कळलं का की जानुबाई प्रेग्नंट आहे ते? आमच्या शेजारी रहाणारा चिनी माणूस विचारत होता. << Lol

बेबीचा लव्ह मॅरेज होत ना?पळुन जाउअन की कय ते.

बेबीचा लव्ह मॅरेज होत ना?पळुन जाउअन की कय ते.>>>>> बेब्या कस्ला पळतोय, बेब्यानेच त्या देवला, किन्वा जो कोणी असेल त्याला जबरदस्तीने पळवुन आणला असेल.:खोखो: आणी अती झाले पण या सहा बायकान्बरोबर रहायला नको म्हणून बेब्याचा बेबुटला पळुन गेला असेल.:फिदी:

Pages