होणार सून मी या घरची - ३

Submitted by सारिका.चितळे on 14 November, 2014 - 09:52

२००० पोष्टी उलटुन गेल्या तरी आधीचा धागा चालू आहे! म्हणुन हा नविन धागा काढला!
या धाग्यावर मी केवळ वाचनमात्र असल्याने नविन धागा काढायचे टाळत होते.
पण कोणीच नविन धागा काढत नाही हे बघितल्यावर नाईलाजास्तव हा धागा काढला. आता करा इथे चर्चा!
बाकी 'विशेष सूचना' मागील प्रमाणेच.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुणे महाराष्ट्र टाईम्सला मुख्य पानावर आहे. फ्रन्ट पेज.
रच्याकने, मटाचं शेवटचं पानही फ्रंट पेज २ असतं; पुण्यात तरी.

CKP मुली तिखट असतात.........

हो असतो आम्ही तिखट. हे घ्या अजुन काही शब्द. शिष्ट, आगाउ, शेखी मार्णारे, खादाड, बेवडे, . पूढल्यावेळी सीकेपी लोकन्वर कमेन्ट मारायला उपयोगी पडतील.

मालिकेच्या धाग्यावर कलाकारांच्या, इथल्या आयडींच्या पर्सनल आयुष्यावर बोलण अलाउड नाहीये अस याच धाग्यावर मागे केव्हातरी वाचल्याच स्मरत आहे आणि मग हे? Uhoh

कुणीच विषय सोडुन देउन मालिकेत काय घडतय यावर बोलायला तयार नाहीये...

कुणीच विषय सोडुन देउन मालिकेत काय घडतय यावर बोलायला तयार नाहीये...>>
ही मालिका कोणी पाहत असेल तर मालिकेत काय घडतय यावर बोलतील ना... Happy

सहज जाता जाता.. हा कालचा किंवा परवाचा भाग असेल-
पिंट्या धावत पळत भावजींच्या ऑफ़िसात पोचतो. तिथे या शशीकला बाई बसलेल्या असतातच. तो भरपुर बोलतो आईला पण गोखले ६ आयन्चे दिव्य सुपुत्र त्याला रागवतात. त्याचा पिन्ट्याचा अभिनय खरच चांगला झाला आहे या प्रसंगात.
कला ची कांगावा कला हि भारीच दाखवली आहे.
आता श्री चा मेसेज आलाय फ़क्त हॅलो म्हणुन तर या जानु ला कळत नाहिये काय उत्तर द्यावे. आनंद आहे सगळाच!
त्यात एक अचाट संवाद होता-जानु आणि मीता चा..जानु सरळ म्हणते 'मीता गेट रिअल श्री काही माझा मित्र नाहीये नवराय तो माझा'
अग बयो पण याच बेस वरती तर तो तुला अवडायला लगला होता बस स्टॉप वरती.
घ्या.. आहे कि नाही आनंद! मुळा वरती च घाव घातला दोन्ही कडे.

>>'मीता गेट रिअल श्री काही माझा मित्र नाहीये नवराय तो माझा>><<

थोडक्यात जानूने एक मोठं ब्रम्हज्ञान सांगितलं. नवरा हा मित्र होवु शकत नाही, तो क्षणिक मित्र असतो तर अनंत काळचा नवरा असतो. Proud

मला तर कला आणि तिच्या कला आवडतात बघायला.

आणि कलेचा नवरा. कला.. आता पुरे. आणि गुडघ्याला हात लावणारा... Proud

काल घराबाहेर काढलं का कलेला? परवा थोबाडावल होतं ते पाहिलेलं मी.
पण शशिकला बाईंचा अभिनय अत्युच्च दर्जाचा झालाय त्या दोन एपिसोडमधे. करुन सवरुन कांगावा करणे त्यांनी छान वठवलय.

जानूने एक मोठं ब्रम्हज्ञान सांगितलं. नवरा हा मित्र होवु शकत नाही, तो क्षणिक मित्र असतो तर अनंत काळचा नवरा असतो.> Biggrin

हो गीता च ती पण लग्ना मुळे मीता झाली.
आधी चांगली गप्पा टप्पा करायची नॉर्मल होती आता फ़क्त भांडते आणि फ़क्त मनीष ची आई हाच विषय म्हणुन ती मिटलेली मीता. Happy

(बा द वे-हिच्या नावात माझा गोंधळ होतो..सो चुकुन मीता लिहील ;))

>>>> तेजश्री प्रधान पुढे काहीतरीच होता तो शशांक. बरे झाले तिने वेळीच निर्णय घेतला ते.
निर्णय तिने नाही त्याने घेतलाय .... He must be having some better options in hand

आपल्या देशात किती तरी प्रश्न आहेत.
पण महाराष्ट्रातील तमाम बायकांच्या पुढचा प्रश्न म्हणजे,

श्री ला कसं कळणार जान्हवी प्रेग्नंट आहे ते?

च्यायला हवं तर बारशाचा खर्च मी करेन, पण कुणीतरी समजावा त्याला..

माझ्या पूर्ण आयपीएल ची वाट लावलीय

सध्या बरी चालली अाहे सिरीयल. मला गीता आणि मनिषचे सीन्स आवडतात. ती खूपच छान काम करते गर्ल नेक्स्ट डोअर टाईप रोलचं. काल जान्हवी आणि तिचा आनंद शेअर करतानाचा सीनही मस्त झाला. अस्सल मैत्रिणी वाटत होत्या. शशिकलाबाई तर कायमच रॉकिंग.

मला वाटतयं सोहळा होयच्या आधी आईआजी गचकणार, मग पुन्हा समज-गैरसमज, मालिका लीप घेईल, मग श्रीबाळाच्या दुसर्‍या बायको पासून झालेल्या अपत्याची जानुच्या अपत्याशी भेट.... टिपिकल एकता मसाला Wink

अरे बापरे ! आई आजीना ही बातमी कळून , (खराखुरा) एक महिना होउन गेला , तरी अजून श्री पर्यन्त बातमी नाही .
ही तर सरकारी टेबल वरची फाईल वाटतेय . या टेबल्वरून त्या टेबलवर जायला इतका वेळ Sad

प्राजक्ता शिरिन तु म्हणतेस तसं होण्याचे फुल चान्सेस आहेत. Lol तसंही पाणी घालायचं म्हणलं शिरेलीत तर कोणतीही हापामु कारणं पुरतात.
आणि ते सोहळा वगैरे प्रकरण डोक्यात जाण्याजोगं आहे. किती वेळ आहे यांना हे सगळं करायला. हे म्हणजे डायरेक्ट उंदिर मारण्यापेक्षा त्याला खेळवून खेळवून सोहळा रंगवून मग त्याला मारण्यातला प्रकार झाला. Proud

आई आजी नाही मरत
त्यांनी नव्हतं का सांगितलं मी असलेली सिरिअल अनेक वर्ष चालते.

पण समजा ते पात्र मेलेलं दाखवलं तर जानीच्या बाळाचा पायगुण वगैरे पाण्यचे हौद भरता येतील मालिकावाल्यांना

जानूचं घरी येणं, श्री ला बाळ होणार आहे ही बातमी त्याला कळणं हे असं सहज होता कामा नये, तो एक सोहळा व्हायला हवा असं आईआज्जीचं मत आहे. पण तत्पुर्वी त्या अमेरिकेला गेल्यात स्वतावर इलाज करायला. त्यामुळे जानूला वाटतय की त्या परत आल्या की मगच श्री ला कळावं. (तिला खरंतर श्री ला भेटून सर्व सांगायची घाई झाली आहे ऑलरेडी) समहाऊ शी इज होल्डिंग ऑन टू हर्सेल्फ.

Pages