आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"ग्रीसची कुतरओढ होणार या सगळ्यात. आत राहीले तरी आणि बाहेर पडले तरी"

युरो.. हे अगदी बरोब्बर बोललास बघ!

नाही रे.. मला नाही अस वाटल की तु आक्षेप घेतलास म्हणुन्..मी आपला एक संवाद म्हणुन तुझ्या पोस्टमधे तु उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देत होतो...

पण मायबोलिचे माध्यम अश्या संवादाला बरोबर नाही.. प्रत्यक्ष डिबेटींगला मजा आली असती.. लिहीण्यात फार फार म्हणजे फारच वेळ जातो..:)

कबीर, धन्यवाद. गूगलवर काही मिनिटांपुर्वीचे अपडेट्स इंग्लिशमध्ये दिसत नाहियेत. ज्या भाषेत आहेत ती माझ्यासाठी अगम्य आहे. काही लिंक्स इथे ब्लॉक्ड आहेत.

अश्या काही नॅचरल डिझास्टर्सबद्दल वाचताना HAARP बद्दल बरंच काही वाचलं होतं. उदा. http://www.globalresearch.ca/haarp-secret-weapon-used-for-weather-modifi...

पण मायबोलिचे माध्यम अश्या संवादाला बरोबर नाही.. प्रत्यक्ष डिबेटींगला मजा आली असती.. >>>> हो पण इलाज नाही. आपण सगळेच ग्लोबवर विखुरलेले आहोत. प्रत्यक्ष डिबेट करताना तिथल्या तिथे काही शोधून काढता येत नाही. काढायचं म्हटलं तर वेळ जाणारच.

आणि तुम्ही दोघेच भेटून चर्चा केली तर इथे इतक्या लोकांना कशी समजणार? Proud

तुम्ही वेळ काढून इथे लिहिताय ह्याबद्दल खरंच आभारी आहे Happy

ओमान एकंदर या युद्धात तटस्थच भूमिका निभावत आहे. परवा ४० येमेनी नागरिक वैद्यकिय सुविधांसाठी ओमान मधे आल्याची बातमी होती. त्यानंतर अनौपचारिक खबर होती की बॉर्डर वर कडेकोट बंदोबस्त आहे, आता येमेन मधून ओमान मधे यायला अजिबात परवानगी नाही. कदाचित तिथल्या अराजकामुळे इथे उत्पन्न होऊ शकणारा विस्थापितांचा संभाव्य धोका ओळखून घेतलेली ही खबरदारी असावी.
गेले जवळपास ८ महिने ते स्वतः ओमान मधे नव्हते, त्यांच्या तब्येती बाबत उलट सुलट अफवाही येत होत्या आणि सौदीने हवाई हल्ला करण्याच्या बरोबर २ दिवस आधी, अजिबात गाजावाजा न करता अचानक ते परतले.
येमेन मधे अडकून पडलेल्या भारतीयांना (यात मोठ्या प्रमाणावर येमेन मधल्या हॉस्पीटल्स मधे काम करणार्‍या नर्सेस आहेत) भारतात परत घेऊन जाण्याकरता इंडियन एअरलाइन चे एक विमान ओमान मधे थांबून मग पुढे येमेन मधे जाण्याकरता आले होते. काल बातमी होती की येमेन मधे जाण्याची परवानगी न मिळाल्याने अजून मस्कत विमानतळावरच ते अडकून पडले आहे.

हो पण इलाज नाही. आपण सगळेच ग्लोबवर विखुरलेले आहोत. प्रत्यक्ष डिबेट करताना तिथल्या तिथे काही शोधून काढता येत नाही. काढायचं म्हटलं तर वेळ जाणारच.
पण तुम्ही भारतातले लोकच एकत्र येऊन काय वादविवाद करायचा तो करा की, गूगल, स्काईप, नि इतर काही काही शोध जगातल्या लोकांनी तुमच्यासाठी लावले आहेतच.
शिवाय भारताबाहेरच्या रहाणार्‍या काय कळते असा इथे एकंदरीत बर्‍याच लोकांचा समज आहेच.

म्हणजे काय होईल, उगाच कुणि बाहेरच्या देशातले लोक इथे येऊन तुमच्या माहितीतल्या चुका काढणार नाहीत, नि तुम्हाला काय वाट्टेल ते सांगता येईल की अमेरिकेचे, सौदींचे, रशियाचे अंतस्थ हेतू काय आहेत वगैरे.

मार्च २०१५ पर्यंतच्या कंट्री थ्रेट इंडेक्सच्या (सीटीआय) आधारावर अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणांसाठी काम करणा-या इंटेलसेंटर या कंपनीने जाहीर केलेल्या यादीमध्ये जगभरातील १० धोकादायक देश म्हणून (१) इराक (२) सीरिया (३) नायजेरिया (४) सोमालिया (५) अफगाणिस्तान (६) लिबिया (७) येमेन (८) पाकिस्तान (९) युक्रेन (१०) मिस्त्र (इजिप्त) ह्या देशांचा समावेश आहे.

ह्यासाठी दहशतवादी कारवाया व त्यात किती जणांचा मृत्यू झाला, हिंसक आंदोलनांची संख्या, हिंसक व्हिडीओ/मेसेजेस तसेच फोटोंच्या माध्यमातून हिंसेसाठी लोकांना कसे चिथवण्यात येते यासंबधीच्या डेटाच्या सहाय्याने हा इंडेक्स तयार करण्यात आला आहे.

येमेनमधून ३५० भारतीयांची सुटका करण्यात आली हे वाचून बरे वाटले.

कामानिमित्त येमेनमध्ये रहणार्‍या व तेथे अडकून पडलेल्या देशवासियांना जिबौटीपर्यंत सागरी मार्गाने आणण्यात आले आहे. याचे कारण येमेनमधील परिस्थिती फारच बिकट असून तेथील धावपट्ट्याही शाबूत राहिल्या नाहीत.

दरम्यान सौदीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी येमेनमध्ये स्थैर्य येईपर्यंत हे हल्ले चालूच राहतील असा इशारा दिला आहे. अमेरिकी युद्धनौकाही या हल्ल्यात सहभागी असल्याचा दावा रशियन वॄत्तसंस्थेने केला आहे. अमेरिकेने मात्र या बाबतीत फक्त लष्करी साहाय्य पुरवू, प्रत्यक्ष सहभागा घेणार नाही असेच स्पष्ट केले आहे.

स्थैर्य येईपर्यंत हल्ले चालू...? वावावा ! फार छान ! याला म्हणतात सौदीची ढोंगबाजी (हिपोक्रसी).
-गा.पै.

चीनच्या नव्या AIIB (Asian Infrastructure Investment Bank) ला अमेरिका स्वीकारण्यास तयार आहे मात्रं अमेरिका त्यात सहभागी होईल की नाही हे स्पष्ट नाही. सद्ध्या असलेल्या वर्ल्ड बँक व आंतरराष्ट्रिय नाणेनिधीला पूरक ठरेल अश्या कोणत्याही संस्थेचे अमेरिका स्वागत करेल असे अमेरिकेच्या अर्थमंत्र्यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत ऑस्ट्रेलिया, तैवान (चीनशी वादग्रस्त संबंध असूनही), डेन्मार्क, नॉर्वे, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन वगैरें ४५हून अधिक देश ह्या बँकेत सहभागी होण्यासाठी उत्सूक आहेत.

फक्त जपानने मात्रं AIIBमध्ये सहभागी होण्याचा निर्णय अजून घेतला नाही. बँकेचे प्रशासन पारदर्शी हवे परंतु अद्याप त्यांच्या काही प्रश्नांना उत्तरे मिळाली नाहीत असे जपानचे म्हणणे आहे.

ग्रीसबद्दल बरीच वर्षे बातम्या येताहेत. लवकरात लवकर यातून मार्ग निघो.

धोकादायक देशांच्या यादीत, नायजेरिया आहे वाचून जरा नवल आणि जरा वाईटही वाटले. माझे अनेक मित्र तिथे आहेत आणि त्यांच्याशी माझा नियमित संपर्कही असतो. ते काही फार तणावाखाली आहेत असे वाटत नाही.

येमेन मधील साना येथील जवळपास ३२० भारतीयांची सुटका अजूनही रखडली आहे ते बुधवारी साना विमानतळावर गेले होते परंतु काही कारणास्तव त्यांना बोर्डिंग पास देऊनही परत उतरविण्यात आले . ते बहुधा गुरुवारी परत विमानाने येऊ शकतील असा आशावाद आहे.

अल शबाब नामक सोमालियात निर्माण झालेली संघटना आहे. त्यांनी ह्या विद्यापीठावर हल्ला केला. त्यांनी मोठ्या मनाने, केवळ दयाबुद्धीने मुस्लिमांना वेगळे काढून फक्त ख्रिश्चन लोकांना ठार केले. एकंदरीत १४७ ख्रिस्ती लोक मारले गेले असे बातमी सांगते.
अर्थात अतिरेकाला धर्म नसतो त्यामुळे ह्याचा आणि इस्लामचा काही म्हणजे काही संबंध नाही हे सांगायची गरज नाही!

अतिरेकाला धर्म नसतो त्यामुळे ह्याचा आणि इस्लामचा काही म्हणजे काही संबंध नाही हे सांगायची गरज नाही!

हे १०० % खर आहे

दिनेश, नायजेरिया चक्क तिसरा आहे ह्या यादीत. माझ्या बिल्डिंगमधले दोन जणं होते पुर्वी तिकडे. तणाव नव्हता त्यांनी व्यक्त केला, पण त्यातल्या एकाने नायजेरिया सोडून गांबियाला नोकरी धरली (फॅमिली नेली होती). तिथेही वैतागून भारतात वापसी. दुसर्‍यांनी फॅमिली भारतातच ठेवून नायजेरियात २ वर्षं कशीबशी काढून पुढे मस्कतला शिफ्ट झाले. तिथे ४ वर्षं काढून आता भारतात वापसी. आणि अख्खा नायजेरिया धोकादायक नसेलच. आत्ता ह्या निमित्ताने मुद्दाम प्रवास करण्यायोग्य असे झोन्स दाखवणारा मॅप पाहिला (२ एप्रिलला अपडेट केलेला) https://www.gov.uk/foreign-travel-advice/nigeria. तुमचे मित्र जिथे राहात असतील तिथे खरोखरच काही काळजी करण्याजोगी परिस्थिती नसावी. देव करो आणि त्यांच्या केसालाही धक्का न लागो. मध्य आणि दक्षिण नायजेरिया त्यामानाने सेफ वाटतोय त्या मॅपमध्ये.

बोको हराम ह्या दहशतवादी संघटनेविरोधात संघर्ष सुरु केलेल्या नायजेरियात गेली सोळा वर्षं राज्य केलेल्या पक्षाची सत्ता बोको हरामची समस्या सोडवू न शकल्यामुळे नुकत्या झालेल्या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकांत पिछेहाट होऊन देशाचे माजी लष्करप्रमुख व ८०च्या दशकात लष्करी राजवट चालवणार्‍या मुहम्मद बुहारी ह्यांचा विजय झालाय. उत्तर नायजेरियात (बहुतेक तो डेंजर झोनमधला प्रदेश असावा) चाड व नायजरच्या संयुक्त लष्कराने बोको हरामवर जोरदार हल्ले चढवले आणि नायजेरिया व नायजरच्या सीमेवरचे मलाम फातोरी हे शहर बोको हरामच्या ताब्यातून परत मिळवलं आहे.

शेंडेनक्षत्र, फार भयंकर आहे ते.
लीलावती, आपली जहाजं एडन बंदरात शिरु शकली नाहीत तरी लहान बोटींनी त्या बाहेर नांगरलेल्या जहाजांपर्यंत नेऊन सुटकेचे प्रयत्न चालू आहेत हे देखिल आशादायी आहे.

सुरेख, Sad इतर डेस्टिनेशन्स कोणते आहेत त्याची यादी दिसत नाहिये.

---------

गेल्यावर्षी क्रिमिआ रशियात विलिन झाल्यावर आता क्रिमिआ हा रशियाचाच भाग आहे आणि नाटोने युक्रेनसाठी क्रिमिआ परत घेण्यासाठी काही प्रयत्न केल्यास तो रशियावर थेट हल्ला ठरेल आणि त्याला सर्वशक्तीनिशी (अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो Sad ) प्रत्युत्तर देण्यात येईल असे रशियन परराष्ट्रमंत्री सर्जेई लाव्हरोव्ह ह्यांनी गेल्या डिसेंबरपासून म्हटले आहे व त्या नंतरच्या बातम्यांप्रमाणे अजून रशियाची अधिकृत भुमिका तीच दिसते आहे. http://www.jamestown.org/programs/edm/single/?tx_ttnews[tt_news]=43711&c... बाल्टिक देशांत अस्थिरता निर्माण करुन नाटोची कारवाई त्या देशांतील रशियन नागरिकांवर अतिक्रमण दाखवणे, सायबर हल्ले असेही त्यांचे पर्याय असू शकतील.

पानावरील उजव्या बाजुला (जिथे 1 of 10 लिहलेले आहे) त्या खालिल बाणावर क्लिक करुन पुढिल पानावर जाता येईल.

सुरेख, धन्यवाद. इतर डेस्टिनेशन्स का सुरक्षित नाहित ह्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यातली काही निसर्गामुळे आलेली असुरक्षितता आहे. पण आपल्याकडे दुर्दैवाने स्त्रियांच्या असुरक्षिततेचं कारण आहे.

इराणचा अमेरिका व अन्य देशांशी होऊ घातलेला आण्विक करार ही गेल्या आठवड्यातली सगळ्यात महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड म्हणावी लागेल. यामुळे इराणवर लादले गेलेले प्रतिबंध दूर होतील. भारताची बरीचशी तेल आयात इराणकडून असल्याने भारतासाठीही ही महत्त्वाची घटना आहे.

Pages