आंतरराष्ट्रीय घडामोडी

Submitted by अश्विनी के on 27 March, 2015 - 03:02

आपल्याला वर्तमानपत्रं, इंटरनेट इत्यादि माध्यमांतून आपल्या आसपासच्या किंवा अगदी जगाच्या दुसर्‍या टोकाच्या घडामोडीही घरबसल्या कळू शकतात. पण आपण जिथे राहतो त्या देशाच्या बाहेरच्या जगतात नेमकं काय घडत असतं ते आपण फ़ार लक्षपूर्वक पाहत नाही कारण त्याचा सरळ सरळ आपल्यावर परिणाम होत नसतो. पण आजच्या काळात पृथ्वीच्या गोलावर सगळीकडेच काही ना काही असे घडत असते ज्याचे दूरगामी आणि भौगोलिकदृष्ट्या दूरवरच्या ठिकाणीही परिणाम जाणवू शकतात.

कुठे राजकिय उलथापालथ होत असते, कुठे बंडखोरी होत असते, कुठे एकमेकांवर हल्ले चालू असतात तर कुणा देशांमध्ये महत्वाचे करार होत असतात, कुठे नविन शोध लागत असतात, कुठे प्रगत विज्ञानाच्या गैरवापरातून कुरघोडी होत असते, कुठे रोज नव्या दहशतवादी संघटना निर्माण होऊन जगाला वेठीला धरत असतात. पण आपल्या रोजच्या जगण्यात ह्याचा काहीच संबंध नसल्यामुळे आपल्यासाठी ते नॉट हॅपनिंग असते. पण तरीही कुठेतरी आपला एक डोळा ह्या घडामोडींवर असायला हवा असे वाटते. हे प्रकर्षाने जाणवले ते कालच्या सौदी अरेबियाच्या येमेन वरील हवाई हल्ल्यांमुळे. आखाती युद्धं या आधीही जगाने पाहिली आहेत. आपल्याला आपल्या इतिहासामुळे युद्धाची दोन मुख्य कारणं माहित आहेत...एक म्हणजे भूमी बळकावणे आणि दुसरं अतिशय दुर्दैवी कारण म्हणजे धार्मिक तेढ. पण ह्यापेक्षाही जास्त युद्धांचा भस्मासूर जगाच्या काही भागांमध्ये बेचिराख करत असतो. आणि त्याचं जागतिक कारण म्हणजे एकमेकांवर वर्चस्व गाजवणे. कुणी सरळ सरळ वर्चस्व गाजवण्यासाठी युद्ध करतंय तर कुणी ताकाला जाऊन भांडे लपवल्यासारखं दुसर्या्च कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून तिसर्यााचा बळी घेऊन आपला स्वार्थ साधत असतंय.

कोणे एकेकाळी सुखाने नांदणार्‍या देशांमध्ये जर आज अराजक, अस्थैर्य असू शकतं तर तेच भारताच्याही नशिबी येऊ नये म्हणून, सावधगिरी म्हणून आंतरराष्ट्रिय घडामोडींकडे थोड्या डोळसपणे पहायला हवं. दहशतवाद तर आपण सोसतो आहोत, तोंड देतोच आहोत. पण समजा सातासमुद्रापलिकडून येऊन कुणी त्यांचं आरमार छुप्या हेतूने आपल्या शेजारी आणून ठिय्या दिला तर ते नक्कीच धोकादायक असेल.

वर्तमानपत्रं, इंटरनेटवर वाचलेल्या अश्या आंतरराष्ट्रीय घडामोडी इथे लिहित गेलं तर कदाचित काही काळाने पुढच्या घटनांची सुत्रं आपल्याला जोडता येतील उदा. तालिबानचा उगम आणि आतापर्यंतचा प्रवास आपण बघत आलो आहोत. उगमाच्या वेळची परिस्थिती आणि त्यात गुंतलेले देश व आताची परिस्थिती व त्या देशांच्या बदलेल्या भुमिका.

धन्यवाद.
================================================

NATO : NORTH ATLANTIC TREATY ORGANIZATION
UN : UNITED NATIONS
IAEA : INTERNATIONAL ATOMIC ENERGY AUTHORITY
UNHCR : UNITED NATIONS HIGH COMMISSIONER FOR REFUGEES
IMF : INTERNATIONAL MONETARY FUND
CTBTO : COMPREHENSIVE NUCLEAR-TEST-BAN TREATY ORGANIZATION
INTERPOL : INTERNATIONAL CRIMINAL POLICE ORGANIZATION
EU : EUROPEAN UNION
WEC : WORLD ENERGY COUNCIL
SAARC : SOUTH ASIAN ASSOCIATION FOR REGIONAL CO-OPERATION
ASEAN : ASSOCIATION OF SOUTH EAST ASIAN NATIONS
AIIB : ASIAN INFRASTRUCTURE INVESTMENT BANK
FBI : FEDERAL BUREAU OF INVESTIGATION
CBDR : COMMON BUT DIFFERENTIATED RESPONSIBILITIES
UNFCCC : UN FRAMEWORK ON CLIMATE CHANGE
COP : CONFERENCE OF PARTIES
ISA : INTERNATIONAL SOLAR ALLIANCE
MTCR : MISSILE TECHNOLOGY CONTROL REGIME
NSG : NUCLEAR SUPPLIERS GROUP

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अशाच अर्थाचा धागा केदार यान्नी (२००८ मधे) सुरु केला होता...

http://www.maayboli.com/node/4562?page=4

आन्तर-राष्ट्रिय घडामोडीन्वर चर्चा वाचायला आणि चर्चेत भाग घ्यायला आवडेल... Happy

अरेरे उदय! केदारचा धागा माझ्या लक्षातच नाही आला जुना असल्यामुळे. नाहीतर तिथेच कंटिन्यू केलं असतं.
-----

साउथ चायना सी मधल्या चीनच्या सागरी उत्खनन व कृत्रिम बेटांच्या हालचालींमुळे फिलिपाईन्सने आग्नेय आशियाई देशांनी ह्या सागरी क्षेत्रातील आपले प्रकल्प पुन्हा सुरु करावेत असे आवाहन केले होते. फिलिपाईन्सच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या त्या विधानावर चीनच्या परराष्ट्र विभागाने साउथ चायना सी च्या हद्दीवर चीनचा सार्वभौम हक्क असल्याची प्रतिक्रिया दिली व ह्या हद्दीत प्रकल्प सुरु करण्याची घोषणा म्हणजे चीनच्या सार्वभौमत्वावर गदा असल्याचे म्हटले आहे.

साउथ चायना सी वर चीन हक्क सांगत असला तरी फिलिपाईन्स, व्हिएतनाम, ब्रुनेई, मलेशिया व तैवान हे चीनच्या विरोधात आहेत. फिलिपाईन्स व व्हिएतनाम ने संयुक्त राष्ट्रसंघात आरोपपत्रंही दाखल केल्यावरुन चीनने त्या आरोपांबद्दल त्यांची बाजू मांडावी अशी सूचना संयुक्त राष्ट्रसंघाने केली आहे.

मित, ओमान तटस्थ आहे ना सद्ध्यातरी?

येमेनवरील हल्ल्यांबद्दल - येमेनच्या किनारपट्टीवर सौदी व इजिप्तच्या युद्धनौका, सौदीचे दीड लाख सैनिक येमेनच्या सीमेवर, इजिप्तमध्ये झालेल्या 'अरब लीग'च्या बैठकीत 'अरब संयुक्त लष्करा'साठीचे सूतोवाच ह्यावरुन येमेनचाही सिरिया होऊ शकतो असं वाटतंय. सतत ३ दिवस चालू असलेल्या हल्ल्यांमुळे येमेनच्या सामान्य नागरीकांचे हाल होत असतील.

संयुक्त अरब लष्कराची स्थापना ही गल्फमध्ये भयानक उलथापालथींचा संकेत असू शकते. सिरिया, इराक पाठोपाठ येमेन मध्येही सौदी व मित्रदेश (आणि अमेरिकेचा पाठिंबा) विरुद्ध इराण (आणि रशियाचा पाठिंबा). हे लोण किती पसरणार कोण जाणे.

अमेरिका व युक्रेनच्या संयुक्त युद्धसरावामुळे रशियाच्या सीमेवर तणाव निर्माण होणार असल्याने रशियाने सरावाविरोधात इशारा दिला आहे. अमेरिका युक्रेनला पुरवत असलेल्या शस्त्रास्त्र सहाय्यासंबंधात युक्रेनमध्ये ही शस्त्रास्त्रे वापरण्याबद्दल ट्रेनिंग दिले जाणार आहे. ह्या बॅकग्राउंडवर नाटो आणि अमेरिकेच्या लष्करी हालचालींवर रशियाने जोरदार टीका केली आहे कारण नाटोने गेल्या वर्षात रशियाच्या सीमेजवळ शेकडो लष्कर सराव व नाटो सदस्य देशांच्या लढाऊ विमानांनी हजारोवेळा बाल्टिक समुद्र भागात उड्डाणं केली असं रशियाचं म्हणणे आहे.

रशियाने युक्रेनला दिलेल्या अब्जावधी कर्जाची पुनर्रचना वा मुदतवाढ करण्यास नकार दिला.

सगळ्या जगातच इन्सिक्युरिटीची परिस्थिती....

हे सगळे लिहीताना भारतावर होणारा परिणाम आणि भारताने घेतलेली भुमिका यावर देखील 2 ओळी लिहावे.
नाहीतर लष्कराच्या भाकर्या भाजणे इतकेच स्वरूप प्राप्त होण्याचे संकेत आहे.
वैयक्तिक मत
बाकी चर्चा चांगली आहे

हे सगळे लिहीताना भारतावर होणारा परिणाम ......... होण्याचे संकेत आहे.
भारतावर काही परिणाम होत नाहीत. नको तिथे तोंड घालायची भारताची पद्धत नाही. आता साउथ चायना सी मधे काही व्यापारी प्रकल्प करणे कठीण होईल, पण तिकडे नाही गेले तरी काही बिघडायचे नाही. बाकी मध्यपूर्वेत जे काय चालू आहे तिथे भारताचे काही हित धोक्यात असले तरी भारतीय मुकाट्याने परत येतील.
असल्या गोष्टीत फार लक्ष घालण्यापेक्षा, क्रिकेट, बॉलीवूड वर चर्चा करावी

असल्या गोष्टीत फार लक्ष घालण्यापेक्षा, क्रिकेट, बॉलीवूड वर चर्चा करावी>>> झक्की, बस क्या! Lol

नाईल नदीवरील धरण

आपल्याकडल्या नद्यांच्या पाणीवाटपावरुन राज्या-राज्यांमध्ये किती भांडणं होतात. मग इजिप्त व अफ़्रिकेतील ११ देशांना वाद न होता पाणी पुरवणे किती कठिण? नुकताच इजिप्त, इथिओपिया व सुदान दरम्यान नाईलच्या मुद्द्यावरुन महत्वपुर्ण करार झाला. इथिओपियामध्ये "ग्रेट रेनेसन्स’ नावाचं प्रचंड मोठं धरण बांधण्यास सुरुवात झाली आहे आणि नाईलचं पाणीही वळवण्यात आलं. ह्यावर इजिप्तने पुर्वी आक्षेप नोंदवला होता पण इथिओपियाने इजिप्त किंवा सुदान पैकी कोणालाही पाणीपुरवठ्याचा धोका नाही असे आंतरराष्ट्रीय तद्न्यांच्या पथकाच्या निर्वाळ्याने म्हटले. इजिप्तच्या नव्या राष्ट्राध्यक्षांनी सामोपचाराने इथिओपियाची विकासासाठीची ही भूमिका मान्य करुन हा करार केला. हे धरण अफ़्रिकेतील सर्वात मोठे धरण ठरणार आहे आणि तब्बल ६००० मेगॅवॅटची वीज निर्मिती होईल.

एवढ्या मोठ्या धरणामुळे त्यांच्याकडे पण विस्थापितांचा प्रश्न निर्माण झाला असेल का असं उगाच वाटलं. पण बिचार्‍या आधीच दुष्काळाने हैराण असलेल्या ह्या भागांमुळे पाण्याचे व्यवस्थापन हे जास्त महत्वाचे आहेच.

बाळू Lol आपण काय थांबवणार! आणि आपल्यापर्यंत येऊ पहात असेल तेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीवरुन, उलथापालथींवरुन काय करु शकतो त्याचा अंदाज येऊ शकतो थोडीफार माहिती असेल तर. युद्ध हे मॅनमेड डिझास्टर आहे, तेव्हाही हानी कमी कशी करता येईल त्यासाठी प्रत्येक राष्ट्राचे मिटिगेशन प्लान्स असतातच आणि ते अपडेट करावे लागतच असतील बदलत्या परिस्थितीप्रमाणे. हे झालं निगेटिव्ह घडामोडींबद्दल.

जर कुठल्या वाळवंटी देशात पाण्याचे व्यवस्थापन करुन किंवा इतर बदल घडवून पिकं घेतली जात असतील तर त्यातूनही शिकण्यासारखे असतेच ना! Happy

Lol

Lol

भाग घेतला नाही त्यामुळे युद्धाची दाहकता किती तरी पटीने कमी नाही का झाली ?

झक्की, बस क्या!
हो बस.
भारतीय लोक हुषार असले तरी अहिंसा पाळणारे, अत्यंत अल्पसंतुष्ट वृत्तीचे आहेत.
कबीरानेच सांगून ठेवले आहे -
सहज मिले वो दूधसम, मांगा मिले सो पानी, कह कबीर वह रक्तसम, ज्यामे खींचातानी!!
तेंव्हा तुका म्हणे उगी रहावे, जे जे होइल ते ते पहावे, चित्ती असो द्यावे समाधान.

म्हणून मूलभूत संशोधन, क्रांतिकारक शोध असे सगळे परदेशीय लोक करतात, भारतीयांना मग ते आपोआपच मिळते. संगणकाच्या बाबतीत तर चोरी सुद्धा चीन, सिंगापूर, कोरिया ने केली नि हुषार भारतीयांना मात्र त्याचे ज्ञान स्वस्तात. पुनः हुषार असल्याने परदेशात जाऊन परदेशीयांचे पैसे घेऊन यायचे.

असे भारताचे परराष्ट्र धोरण पूर्वापार पासून चालत आलेले आहे. उगाच नाही भारत ५००० वर्षांपूर्वी पासून अजून टिकून आहे, बाकीचे देश पूर्वीपासून हव्यासाने इथे तिथे जाऊन युद्धे करत बसले नि आता काय आहे त्यांच्याकडे? रोम गेले, मुघलांची सत्ता गेली, ब्रिटिशांची गेली, रशियाची गेली. भारत घट्ट बसून आहे.

नाईलची एक शाखा, ब्लु नाईल इथिओपियातून वाहते. या देशात जो पाऊस पडतो, त्याचेच पाणी पुढे इजिप्तमधल्या नाईलला मिळते. त्यामूळे इजिप्तने समजुतदारीने वागायलाच हवे होते.

इजिप्तमधे आहेत त्यापेक्षा देखणी पिरॅमिड्स सुदानमधे आहेत, पण ती एवढी दुर्लक्षित आहेत कि त्याबाजूने जाणारी रेल्वेही तिथे थांबत नाही. ऐतिहासिक काळात इजिप्तमधे जे टनावारी सोने होते, तेही सुदानमधूनच आणले होते. एकंदरीत ऐतिहासिक न्याय म्हणायचा हा.

तसेही इजिप्तचे अस्वान धरण खुप मोठे आहे. बॅक वॉटर जवळ जवळ ५५० किमी आहे ( साधारण मुंबई ते गोवा )

दिनेश, तुम्ही अफ्रिकेत बराच काळ राहिले असल्याने बरच काही माहित असेल. सुदान अजूनही दुष्काळाने ग्रासलेलाच देश आहे का?

हे पहा झक्की साहेब

जो शिखरावर जातो तो घसरून पडण्याची शक्यता असते. जो पायथ्याला असतो त्याला ही भीती नसते. असा सूज्ञ विचार जे करतात ते टिकून राहतात.

महापुरे झाडे झक्की जाती, तेथे लव्हाळ बाळू वाचती
तुका म्हणे

पॅराजंपे, हे सगळे परत मलाच काय सांगताहात? मला माहित आहे. मी लिहीलेच आहे वरती.
झक्की, आ चंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे
आणि ते राहीलच, जर अशीच परराष्ट्रनीति ठेवली तर. अगदी ताजे उदाहरण - २००८ साली जगात लुडबुड करणार्‍या अतिलोभी अमेरिकन लोकांची वाट लागली, सगळ्यांचे पैसे खड्ड्यात गेले. भारताला काही झाले का? उलट यांचे पैसे संपले, आता सगळे स्वस्तात करायचे म्हणून आणखी भारतीय लोकांना संधि मिळाली.

दिनेशदा,

सहज आठवलं की इंग्रजी राज्यात इजिप्त आणि सुदान एकंच होते ना? मग आज सुदान का वेगळा आहे? बहुतेक तेलामुळे असा माझा अंदाज.

आ.न.,
-गा.पै.

जर्मन विंग्स च्या अपघातग्रस्त विमानाचा को पायलट, "अँड्रीयात्झ लुबिझ" हा एक मनोरुग्ण होता आणि तो
वैमानिक व्हायच्या आधी औषधोपचार घेत होता हे आता तापासा नंतर पुढे आले आहे. त्याच्या आत्महत्या करण्याची प्रवृत्तीवर तो आधी औषध घेत होता.

जर्मनी सारख्या देशात कित्येक महीने औषध घेउनही त्याच्या मध्ये फरक पडला नाही हे खुपच भयावह आहे आणि त्या पुढे असे लोक आंतरराष्ट्रीय प्रवासी सेवेची विमान चालवतात हे त्याच्या पेक्षाही जास्त भयावह आहे.

अश्विनी के, छान धागा काढलात. नवीन नवीन विषयांबद्दल माहिती मिळेल. तसही सद्ध्याचे माबो वर मोदी सरकार विरुद्ध सरकार ह्यांचाशिवाय काही विषयच वाचायला मिळत नाहीत. कोणताही धागा असला तरी तो शेवटी त्याच विषयांवर येतो! ह्या धाग्याच्या निमित्ताने जरा चांगले विषय समजतील अशी आशा आहे.

रच्याकने - आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्दल नुसते वाचले आणि त्या अनुशंगाने भारताबद्दल चर्चा केली नाही तर ते "लष्कराच्या भाकर्‍या भाजण्यासारखे" होईल? हे झेपलं नाही बुवा. मराठी माध्यमाच्या इयत्ता ८ वी पासुनच्या वर्गात परत जाउन बसावं लागणार आहे मला Wink

@कबीरः येमेन संघर्षात भारत काही करणार नाही कारण आत्ता तिथे आपले हितसंबंध जुळलेले दिसत नाहियेत. दुसरे त्यात मुळातच जोरदार तिढे आहेत तिथे आपण काय करणार.
आपण सध्या तरी हिंदी महासागरातील आपली बैठक घट्ट करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तिथे हे लवकरच पोचेल प्रकरण.

टण्याभाऊ हे अपेक्षित होते. बाकी काहींना काय बोललो कळले नाही असो.
येमन महत्त्वाचे नाही तर तिथून होणारी वाहतूक महत्त्वाची आहे. आपल्याला सौदी नाही इराण मुख्य आहे.
सगळ्याच घटना भारताशी संबंधित नाहीत पण ज्या असू शकतील त्यावर चर्चा व्हावी वाटत होते

कबीर, साउथ चायना सी वरच्या माझ्या पहिल्याच पोस्ट मधे भारतावर होऊ शकणार्या परिणामांचा उल्लेख आहे. मला वाटलेलं तुम्ही वाचलं असेल. ज्या घडामोडींमधे माझ्या लक्षात येइल तिथे लिहीन. इतरही लिहितीलच.

ऑस्ट्रेलियामध्ये गेल्या वर्षी झालेल्या 'जी २०' देशांच्या परिषदेदरम्यान ३१ 'व्हीव्हीआयपीं'ची गोपनीय माहिती (जन्मतारीख, पासपोर्ट क्रमांक, व्हिसाचे डिटेल्स इत्यादि) ऑस्ट्रेलियाच्या इमिग्रेशन मंत्रालयाच्या एका कर्मचार्‍याच्या चुकीमुळे भलत्या व्यक्तीला इमेलद्वारे पाठवली गेल्याचे आता इतक्या दिवसांनी उघड झालं. अशी चूक घडल्याचं ऑस्ट्रेलियाने संबंधीत व्यक्ती/देशांना कळवले नाही.

या व्यक्तींच्या यादीमध्ये भारताचे पंतप्रधान मोदींसह अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन, जर्मनीच्या चॅन्सेलर अँजेला मर्केल इत्यादिंचा समावेश आहे.

Pages