न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी. ७ फेब्रुवारी २००९

Submitted by अनिलभाई on 12 January, 2009 - 16:23

न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. अर्थात बाराकरांचा जी. टी. जी.

ए.वे.ए.ठी. ला न येण्याची कारणे लिहायला हक्काची जागा.
मग कधी करायचा ए.वे.ए.ठी.
(एकाच वेळी एकाच ठिकाणी) जमणे.
खालील न येण्याची कारणे स्वाती आंबोळे ह्यानी गोळा केली आहेत. व बाकी मायबोलीकरानी त्यात भर टाकली आहे. वाहुन जावु नये म्हणुन येथे देत आहे.

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी देशात मज्जा करायला जाणार आहे.

पत्ता
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

भेटायची वेळ : ७ फेब २००९, सकाळी ११.०० - ११.३०

जानेवारी २०१० च्या ए.वे.ए.ठी. खालील ठिकाणी..
http://www.maayboli.com/node/12363

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लालूच्या बटाट्वड्यांसाठी तरी जायलाच पाहिजे होतं! ए-वन ब. व. करते! एक महत्त्वाचा सल्ला : ती दिसली रे दिसली की स्वतःपुरते (आणि नंतरसाठी चार आणखी) वडे बाजुला काढून (लपवून) ठेवले तरच खायला मिळतील. Happy अन्यथा डब्याचं झाकण उघडल्यावर फडशा उडेल. Happy

मज्जा करा. खमंग गॉसिप माझ्यापर्यंत पोचेल अशी व्यवस्था करा.

चला इथे मिनि ए वे ए ठि सुरु झालं पण<<<<<

तुमचं जरा उशिराच चालू झालं. आमचं दुपारीच चालू झालंय.;)
वड्यांची चव बघता बघता तू नी रुनी तिथेच फन्ना उडवाल. ठेवा आमच्याकरता शिल्लक.

वड्यांच्या नुसत्या नावाने पाणी सुटलय तोंडात. बरं वडे तळताना तिघीजणी कुठले गाणे म्हणता आहात ? Wink

सिंडे, झोप आता, उद्या उशीर करशील.:फिदी:
पांशा: पापूचं पाणी तर उद्या करणारेस, अन कबाब ची तयारी तर ऑलरेडी झालीये.. एवढं जागायचं कशाला मी म्हणते? :पांशा

लगदा नाही गं बोबडकांदे, रगडा Proud

पन्ना, उद्या सगळे एकत्र जमायच्या आत सायोला रगडा म्हणायला शिकव बरं Wink

रगडा रटरट्तोय होय!! Happy

आमची ही पावभाजी तय्यार!! भेळेची कापाकापी-चिराचिरी उरकली!! Happy

सचिन, पार्ट टाईम नोकरी मिळतेय का बघ त्या दुकानात Proud
बादवे, तू येणारेस हे ऐकून माझं पोरगं खूष आहे रे!! सायोच्या मुलीसमोर तुझे गोडवे गाऊन झालेंत "हि इज अ कूल गाय!!"

ह्या पावसाची @#%$%%$#% !!!!
पण जाऊ द्या, त्या निमित्तानी झक्कींच्या घर आतुन बघायला मिळेल Wink (मागच्या मागे सगळ्यांना कलटी देण्यात येणार आहे असं कळलं होतं)

सायो, पन्ना, अरे त्या सँट्या ला लहान मुलांत कसलं पाप्युलर करताय?? जरा ओळखीच्या लग्नोत्सुक मुली असतील तर त्यांच्या पाप्युलर करा, तो जाने!!! Wink

झक्की उठले का? गुढ्या-तोरणे उभारली का? बॅकयार्डत मांडव टाकला का?(ताडपत्रीचा टाका.) मेलबॉक्सला फुगे लावले का?

नयनीश, ते काम तु चांगल करशील Proud
आम्ही पूढची सोय करुन ठेवतोय. Proud

मेलबॉक्सला फुगे लावले का? >>>>> Lol हे मी पण विचारणार होतो.
नयनीश, ते काम तु चांगल करशील >>> या बाबो!! मी का म्ह्नुन? माझी लग्नोत्सुक मुलींशी ओळख असल्याचं काय कारण. अरे अशी स्फोटक विधानं करु नको हां, या वेळी फक्त बायकोच नाही तर आई बाबा पण बरोबर आहेत Wink .

बाराकरान्नो, आम्ही आज सगळी मज्जा मिस्स करणार आहोत. Sad
काल आम्ही ज्यान्च्याकडे मुक्कामाला येणार होतो (बागराज्यातील) [माझा आत्तेभाऊ] त्यांच्या अपार्टमेंट बिल्डींगला आग लागली. त्यांचे घर सुरक्षित आहे पण त्यांन्नी बिल्डींग सील केली आहे.

त्यामुळे तेच आता आमच्याकडे आले आहेत.

त्यामुळे तुम्ही मजा करा आणि त्याचे शुटींग करा आणि यु ट्युब वर टाका म्हणजे आम्ही बघु (याची देही याची डोळा पण वेगळ्या वेळी !!)

अरे वा,मीच पोचलेली दिसतेय सगळ्यात आधी.
बा रा एवेएठि एकदम दणक्यात संपन्न झालं. फेब्रुवारीत बर्‍याच जणांना भेटले होतेच. पण यावेळी अ‍ॅडमिन, सा खि सहीत अश्विनी, अडम, बो विश, विकु यांना भेटून आनंद झाला. वृत्तांत आणि डिटेल मेनू येईलच मागून सावकाश.

आम्ही पण पोचलो. अजय आणि अश्विनी पुढच्या वाटेला लागलेत. सगळ्यांना भेटुन खूप धम्माल आली, मेनु तर अप्रतीम. अनेक पुस्तकांची, मसाल्यांची, चटण्यांची लूट घरी आणली Proud

वा वा मस्तच! टाका टाका, डीटेल वृत्तांत टाका.

बिचार्‍या अश्विनीला ती न येण्याबद्दल आणि सा. खिचडी न आणण्याबद्दल इतकं टोचून बोलल्या-विचारल्या गेलं की शेवटी तिने शेवटी 'सा. खि. आणते पण पोष्टी आवर' असा विचार केलेला दिस्तोय! Proud

मग सिंडीच्या भिजलेल्या साबुदाण्याचं काय झालं? Happy

हो, मेन्यू तर दणकूनच होता. काय खाऊ नी किती खाऊ असं झालं. भाताच्या व्हरायटींना तर हातच नाही लागला अजिबात. जोडीला खमंग गॉसिप्स. Proud
मृ, तुला मिस केलं आम्ही. यायचं जमवलं असतंस तर..
नाही, अश्विनी येणारचं होती पण तिला ते गुलदस्त्यात ठेवायचं होतं.

बारा ए वे ए ठि मस्त पार पडलं ! गॉसिप्स, पुस्तकं, मसाले,कॅसेट्स इ ची मनसोक्त देवाण घेवाण झालीच. विनय ने तब्येत बरी नसतानाही उभ्या उभ्या विनोदाचा प्रोग्राम केला, सहीच झाला. बाकी नाच गाणी ला वगैरे कुणाला वेळ नव्हता मात्र , कारण खाण्यात सगळे बिझी!! खाण्याचं तर काय विचारता !! खाऊन थकलो पण खाणं संपलं नाही, पिशवी भर प्याक करून घेऊन आलो, आता पार्ल्यात सगळ्यांचा तोच मेनु आज अन उद्या पण बहुतेक! Happy नयनिश , आई बाबांना दगडू तेली मसाल्याबद्दल स्पेशल थँक्स सांग.
झक्की, सौ. ना धन्यवाद कळवा , इतक्या लोकांची सोय केल्याबद्दल !!

सौ झक्कींचे खरेच खूप खूप आभार. विषेश उल्लेखनीय गोष्ट म्हणजे झक्कींनी न चुकता, न अडखळता एका झटक्यात सौं झक्कींचे नाव कर्रेक्ट सांगितले Happy

आभारप्रदर्शनः
हो,हो, झक्की नी सौ. झक्कींना पेशल धन्यवाद. घर उपलब्ध करुन दिल्याबद्दल.
पावसाने मेहेरबानी केली त्यामुळे ड्राईव्ह वे, बॅकयार्ड मनसोक्त वापरता आलं. श्री. शोनूंनीही ग्रिलींगचं काम हाती घेतल्याबद्दल धन्यवाद. विनयचे घसा बसलेला असतानाही केलेले उ उ वि मस्तच. फक्त ते 'पांशा' जोक राहिलेच. Wink
विकूंनी माझ्या लेकाला रमवल्याबद्दल त्यांचेही आभार. नयनीश व कुटुंबियांचे मसाल्याबद्दल आभार... हुश्श...
कुणी राहिलं का अजून?

Pages