ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल फ्लिपकार्ट वर पुस्तकांचा क्लिअरन्स सेल होता. बाहेरच्या प्रकाशनांची बरीच महागडी आणि काही दुर्मिळ पुस्तके प्रत्येकी ७८ रु ला होती. भरपूर खरेदी झाली. काही सुंदर कॉफीटेबल्स मिळाली. काही कादंबऱ्या.

याशिवाय phaidon 55 अशी एक सेरीज आहे. एका पुस्तकात एक फोटोग्राफर, त्याची ५५ छायाचित्रे टीपांसहित आणि थोडीफार माहिती अशी मांडणी असते. छपाईचा दर्जा सुंदर आहे. पुस्तके एकदम संग्राह्य म्हणतात तशी आहेत. त्यातलीही काही मिळाली. कधी एकदा पार्सल येतंय असं झालेलं आहे.

आलं आलं..अलिवरून पेमेंट कन्फर्मेशन आलं Wink
थँक्स दक्षे!

फ्री शिपींग असलं तरी पोस्टेज दयावं लागतं का?>>> माझ्यामते नाही. दक्षिणा नक्की काय ते सांगेल.

जाई, दक्षिने गॉगल मागवला तो फ्री शिपिंगवाला नव्हता.

रच्याकने, मला घड्याळं आवडत आहेत अलिवर Wink
पण घड्याळ २४ रुपयांचं आणि शिपिंग १६५ रुपये! तरीही २०० रुपयात घड्याळ म्हणजे मज्जाच आहे

तरीही २०० रुपयात घड्याळ म्हणजे मज्जाच आह>>> हायला !! अली एक्सप्रेस पाहायला हवि होती घड्याळ घेन्याअधि

मंजूडे मी मागवलेला गॉगल फ्रि शिपिंगचाच होता. पण त्याचं पॅकेट मोठं होतं. त्यामुळे पोस्टमनने आणून दिल्यावर बहुतेक इथले काही चार्जेस अ‍ॅप्लिकेबल असतील ते घेतले असतील. पण काजळ, गळ्यातलं वगैरे पोस्टाच्या पेटित टाकून दिलं होतं. कारण पॅकेट आकाराने खूप छोटं होतं.

मंजूडे मी मागवलेला गॉगल फ्रि शिपिंगचाच होता.>> जल्लां हे हिडन चार्जेस झाले. Uhoh
पण असो! आता ऑर्डर नोंदवली आहे, पुढे काय होईल ते.

ok thanks!

मलापण घडयाळं खूप आवडली.
फक्त एकच प्रश्न आहे की मुंबईत आपल्याला चायना-मेड स्वस्त पर्सेस, घडयाळं, कपडे असं सगळं फॅशन स्ट्रीट, लिंकिंग रोड किंवा कुठल्याही स्ट्रीट/स्टेशन मार्केटमध्ये मिळतं. कधीतरी घेतलं जातं गंमत म्हणून. त्यापेक्षा अलिची क्वालिटी वेगळी/जास्त चांगली असते का?

असं सगळं फॅशन स्ट्रीट, लिंकिंग रोड किंवा कुठल्याही स्ट्रीट/स्टेशन मार्केटमध्ये मिळतं. कधीतरी घेतलं जातं गंमत म्हणून. त्यापेक्षा अलिची क्वालिटी वेगळी/जास्त चांगली असते का? >>> मला पण हा प्रश्न पडला होता. ज्वेलरी सेट्समधले काही प्रकार मी कौपिनेश्वर मार्केटात पण पाहिले होते.

cnw मी घड्याळ वगैरे तर घेतलं नाहिये. पण गॉगल, काजळ मला क्वालिटी चांगली वाटली.
मी पुर्वी कुठल्यातरी फेमस MLM ब्रँड चं काजळ वापरलं होतं. (अ‍ॅमवे नव्हे) त्याने डोळे चांगले कोरडे पडायचे भगभगायचे. किंमत अडिचशे पेक्षा जास्त होती. अली वरून मागवलेलं काजळ (जेल आय लायनर) मी एक दिवस डोळ्यात पण घालून पाहिलं. मस्त आहे. फक्त ते इझिली जात नाही.

दक्षे, इझीली न जाणार्‍या लिपस्टिकमध्ये शिसं असतं. तसंच काही ह्या काजळात नाही ना माहित करुन घे.

हे अलि प्रकर्ण जोरदार दिसतेय. काही गडबड नसावी म्हणजे झाले!>>
बहुतेक इलेक्ट्रोनिक वस्तु घेताना काळजी घ्यावी लागेल (china माल आहे शेवटी)

अली चे भींतीवर लावायचे स्टीकर आणि ३डी फुलपाखरांचा सेट काय सॉलिड आहे.
आणि १ TB चा पेनड्राइव्ह फक्त ८०० रुपयात.

भिंतीवरची घड्याळे पण खास आहेत.

स्वस्त घड्याळे ईथेही मिळतात. पेन्ड्राईव्ह १ वर्षभर चालला आणि मग उडाला तरी हळहळ वाटणार नाही. बाकी पुरुषांचे कपडे जरा झ्याक-प्याक जास्त दिसताहेत.

हो अश्वी त्या भितीनेच मी फक्त वरून वापरलं, आणि एकदाच डोळ्यात घालून पाहिलं. त्याचे कंटेन्ट्स कुठे तपासू माहित नाही त्यामुळे आता फक्त लायनर म्हणून वापरेन. Happy

मध्यंतरी पेपरमधे या अलिबाबाबद्दल मोठा लेख वाचला होता. (अलिबाबाचा अजगर)

मी बर्‍याच जणांशी चर्चा करुन एल जी चा एल ई डी स्नॅप डील वरुन खरेदी केला. मुद्दाम पैसे ( कॅश ) ऑन डिलिव्हरी पर्याय निवडला होता.

शोरुम मध्ये

प्रिंटेड किंमत - २८९०० ( क्रेडीट ) स्कीम सहीत होती.
कॅश डिस्कॉउट धरुन - २५०००/- शोरुम किंमत होती.
जुना टिव्ही १००० वजा करुन २४०००/- शोरुम किंमत होती

स्नॅप डिलवर

स्नॅप डीलची सेम मॉडेलची डिसकाऊट धरुन किंमत - २३२३२/- दिली
स्नॅप डील वर २५०००- २२२३२= रुपये १७६८ फायदा झाला.

सोबत १२०० रुपयांना जुना टीव्ही विकुन मिळाले.

दिनांक - १७/३/२०१५ - बरीच झटापट करुन फ्लिपकार्ट वर बुकिंग होत नव्हते.
दिनांक - १८/३/२०१५ - स्नॅप डिलवर तेच प्रॉडक्ट सकाळी ९ वाजता खरेदी केले. लगेच एस एम एस आला.
दिनांक - १९/३/२०१५ कॅश ऑन डिलिव्हरी असल्यामुळे त्यांनी व्हेरीफिकेशन करुन डिलिव्हरी २२ ते २४ तारखेपर्यंत मिळेल असे कळवले,'

दिनांक - २१/३/२०१५ २१ तारखेला डिलिव्हरी हैदराबाद वरुन पुण्याला आल्याचा मेसेज आला.
२१ तारखेला पाडवा असल्यामुळे सुट्टी होती. मला २२ ला डिलिव्हरी मिळेल असे समजले.
दिनांक - २२/३/२०१५ - हुश्य्य डिलिवरी मिळाली. ंमीच स्वतः टेबलावरच ठेवायचा असल्यामुळे असेंब्ली करुन सुरु केला.

दक्षिणांना अलीने आपली ब्रांड अँबॅसिडर म्हणुन नियुक्त करायला हरकत नाही. (दक्षिणांचीच हरकत असेल तर गोष्ट वेगळी)

दक्षिणांचीच हरकत असेल तर ब्रॅड अ‍ॅम्बेसिडर मला करा. बादवे कुणी ब्रॅड अ‍ॅम्बेसिडर या शब्दाला मराठी प्रतिशब्द शोधलाय का माबोवर ?

मी टीव्ही, एसेलार क्यामेरा या गोष्टी इबे वर घेतल्या आहेत. तिथे आठवडी बाजारात इलेक्ट्रोनिक वस्तू फार स्वस्त मिळतात. फक्त थोडा धोका पत्करायची तयारी हवी. कारण या वस्तूंना निर्मात्याची हमी नसते तर विकणाऱ्याची असते. मी टीव्ही घेताना दुकानात किंमत पाहिली ती ५५००० होती. फ्लिपकार्ट, स्नॅपडील वर डिस्काउंट नंतर ४६००० होती. आणि इबेवर २६००० ला मिळाला. एका वर्षात काही झाले तर बदली करून द्यायची हमी होतीच. शिवाय असा विचार केला की काही होण्याची शक्यता तशी कमी आहे आणि झाले तरी जोपर्यंत २०००० च्या खाली खर्च येईल तोपर्यंत तोटा तरी नाहीच.
दोन्ही गोष्टी अगदी व्यवस्थित आहेत. काहीही तक्रार नाही.

Pages