ऑनलाईन खरेदी आणि आपण

Submitted by जाई. on 9 February, 2015 - 07:11

सध्या फ्लिपकार्ट , अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील आणि तत्सम साईट्स चर्चेत आहेत. काही महिन्यापूर्वी फ्लिपकार्टने एक अतिशय स्वस्त अशी योजना जाहीर केली होती. अपेक्षेप्रमाणेच तिला जोरदार प्रतिसादही लाभला. त्याचबरोबर इडिने पाठ्वलेल्या नोटिसा वगैरे नाट्यही रंगलं. पण तो या बाफचा विषय नाही. ऑनलाईन खरेदी आता फक्त पुस्तकापुरती मर्यादित राहिलेली नाही. ह्या बाफचा विषय ऑनलाईन खरेदी करताना ग्राहक म्हणून तुम्हाला आलेले अनुभव , त्याविषयीची चर्चा, सल्ले यासाठी आहे.

**************************************************************************************************************************
मायबोलीच्या धोरणाशी सुसंगत नसलेला मजकूर (मायबोली बाह्य कमर्शियल वेबसाईटची माहीती मुख्य धाग्यावर) काढून टाकला आहे - वेबमास्तर
.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

महत्त्वाची टीप मिळाली. जेव्हा अॉनलाईन काही महागडी वस्तू खरेदी करतो मोबाईल किंवा काहीही तेव्हा सेफर साईड म्हणून प्रॉडक्टचा बॉक्स उघडण्यापासून ते पूर्ण चेक करेपर्यंत व्हिडीओ घ्यावा. म्हणजे डिफेक्टिव्ह पीस असेल तर लगेच सिध्द करता येते.

हो नाठाळ. किंमत दोन्ही मिळून वाजवीच आहे. अगदी इथे मिळेल त्यापेक्षा सुद्धा बरीच कमी.
गॉगलची वेबसाईटवरची किंमत रुपये १०४ आणि पोस्टेज १७७ घेतलं. चार आण्याची कोंबडी आणि बारा आण्याचा मसाला झालाय खरा Proud
पण किंमतीनुसार गॉगलची क्वालिटी खूपच चांगली आहे. फ्रेम पुर्ण डोळा आणि भुवई कव्हर करत असल्याने उन्हाचा अजिबात त्रास होत नाही.
इतना पैसा मे इतनाहिच मिलेगा.. Proud लेकिन जो मिला है वो नक्कीच अच्छा है.

साइजचा प्रॉब्लम झाला होता. मोठी साइज होती ती >>> सेम हिअर .
मी परत करण्याच्या भानगडीत पडले नाही .
नशिबाने वन्सबाई मिळाल्या आहेत Happy
त्या वापरतात .

पहिल्यांदाच स्नॅपडील वापरले. चार पंखे मागवले होते. वेगवेगळी साईझ. डिझाईन आणि रंग याबाबत फारच वेळ खर्चून निवड केली होती. कसे काय येतायत, तेच येतील का, तो रंग नसेल तर दुसर्‍या रंगाचे पाठवतील काय वगैरे प्रश्न होते. पण सगळे पंखे एकेक करत सुखरूप पोचले. एक पंखा आम्ही निवडलेल्या डीलराकडे नव्हता मग त्यांनी परस्पर डीलर बदलून पोचवला. दोघांच्या किमतीत पाच रुपयांचा फरक होता तो आम्हाला रिफंड केला.

आशूडी, टीप आवडली. मोबाईल ऑर्डर केलाय अ‍ॅमेझॉनवरून कालच. अर्थात आजपर्यंत अ‍ॅमेझॉनचा अनुभव अतिशय चांगला आहे. सदोष उत्पादन निघाल्याबद्दल ताबडतोब एका दिवसात पैसे परत करण्याचाही.

अ‍ॅमेझॉनचा अनुभव अतिशय चांगला आहे.>> मला एकदा पैसे परत मिळाले आणि थोडेसे डिफेक्ट असलेले लॅपटॉप टेबल परतही नेले नाही

मला एकदा पैसे परत मिळाले आणि थोडेसे डिफेक्ट असलेले लॅपटॉप टेबल परतही नेले नाही. >> अरे वा. मस्तच की. खरंच ऑनलाईन गोष्टी घेणं परवडतं खूप. वेळ जात नाही. शिवाय दुकानदारांची मुजोरी सुद्धा सहन करावी लागत नाही. बदलून देताना कटकट करतात, पैसे परत मिळणं तर महामुश्किल.
:नामुभा:

थँक्स जाई. आता बघते फ्लिपकार्ट अमेझॉन दोन्ही. मला कुर्ती व पतियाळा-दुपट्टा सेट्स घ्यायचे आहेत.

ऑनलाईन खरेदी हा फार छान प्रकार आहे. आजकाल गर्दी, ट्रेफिक त्यामुळे बाहेर शॉपिंग नकोच वाटतं. नुसतं दुकानात १५ मिनिटं उभं राहून कपडे बघणंही तापदायक होतं इतकी गर्दी आणि उकाडा.

मला एकदा पैसे परत मिळाले आणि थोडेसे डिफेक्ट असलेले लॅपटॉप टेबल परतही नेले नाही. >> अरे वा. मस्तच की. खरंच ऑनलाईन गोष्टी घेणं परवडतं खूप. वेळ जात नाही. शिवाय दुकानदारांची मुजोरी सुद्धा सहन करावी लागत नाही. बदलून देताना कटकट करतात, पैसे परत मिळणं तर महामुश्किल. <<< दक्षिणा, असे काही नाही हो. इथेही अनेक अविस्मरणीय अनुभव येतात. अगदी 'यापेक्षा दुकानात जाऊन घेतले असते तर दुकानदारापुढे डोके तरी आपटून घेता आले असते' इतके वाटण्यासारखेही!

मला ज्वेलरी तयार करण्यासाठी ग्लास बीड्स आणि तत्सम साहित्य हव आहे.. पुण्यामधे सम्राट दुकान ( तुळशीबागेतल ) गाठणार होती .. ऑन्लाईन शोधता शोधता एक madeinindiabeads.com नावाची साईट मिळाली .. सगळ कै काफी किफायती दरात मिळून राहिल .. घ्याव का हा विचार करतेय.. तसे amazon वर ज्वेलरी किट दिसली पण हव त्या सोबत नको असलेल सामान पन मिळतय म्हणून तो बेत रद्द केला मी..
इथ कुणाला या साईट ची कै कल्पना आहे का ? कुणाच्या मित्र / मैत्रीणींनी किंवा ओळखीतन कुणी कै घेतलय का या साईट वरुन ?

ज्वेलरी कश्या प्रकारची?
बीडस वगैरे साधे असतील तर ठिके पण स्पेशलाइज्ड बीडस, स्टोन्स वगैरे घ्यायचे असतील तर खात्रीशीर दुकाने/ डिलर्स/ विक्रेते यांच्याकडूनच घ्यावे.

नीधप .. ज्वेलरी बेसिक म्हणता येतील.. टिनेज मुली वापरतात त्या प्रकारचे.. चेन पेन्डट वगैरे.. त्याकरीता लागणार्‍या बॉल चेन वगैरे..

दक्षु, welcome to the 'Ali Chaska grp' Wink

मी काही होम डेकॉर आयटेम्स आणि समरी वनपिसेस मागवले. कॉटन एकदम मस्त आहे. बेस कलर पांढरा आणि त्यावर फ्लॉरल प्रिंट असल्यामुळे यावेळेस कलरबाबत धोका झाला नाही. किंमत अलीची असल्यामुळे कचरा स्वस्त आहे. एवढा उन्हाळा वापरुन ४-५ महिन्यात फेकुन दिलं तरी वाईट वाटणार नाही. ( फेकुन कशाला, सॉफ्ट कॉटन आहे. साफसफाईसाठी तुकडे कापुन ठेवले तर मस्त आहेत. :फिदी:)
शिवाय यावेळेस जबरी प्लॅनिंग केलं. नवर्‍याच्या चायना ट्रीपची वेळ साधुन त्याच्या होटेलचा डिलिवरी अ‍ॅड्रेस दिला. पंधरा दिवसात गोष्टी मिळाल्या पण. नाही तर १/१.५ महिना डिलिवरी पिरिअड हा एकच वैताग आहे.

टीना, अलीबाबा साईट वर शोध ज्वेलरीसाठीचं मटेरिअल. फक्त बल्क ऑर्डर द्यावी लागेल. जर व्यवसायासाठी हवं असेल तर ही साइट उत्तम.

व्यवसायासाठीही मटेरियल ऑर्डर करायचे तर एकदम बल्क ऑर्डर मागवू नका. आधी अगदी छोटी सॅम्पल ऑर्डर मागवा.
चायना माल आहे किती ऑथेन्टिक असेल कुणास ठाऊक!

मनिमाऊ , नीधप .. बल्क मधे नकोय म्हणूनच इतर साईट्स चा हा खटाटोप.. आणि मी सांगितलेल्या साईट्स वर अलीएक्स्प्रेस पेक्षा कमी मधे मिळतय मला हव तस..

ऑनलाईन कपडे घेताना नीट वाचून घ्या. कधीकधी फक्त मटेरियल असतं, पण मॉडेलच्या अंगावर त्याच मटेरियलचा शिवलेला सूट असतो आणि खाली लहान अक्षरात फक्त मटेरियल मिळेल असं लिहिलेलं असतं. आपल्याला वाटतं तयार ड्रेस आहे. कधीकधी अनारकली फक्त टॉप्स असतात, त्याबरोबर सलवार-दुपट्टा येत नाही, पण फोटोत सगळं असतं. त्यामुळे पॅकेजमध्ये काय काय इन्क्लूडेड आहे आणि काय नाही याची खात्री करूनच ऑर्डर द्या.

स्नॅपडीलवर चांगली डिल्स मिळतात कधीकधी. पेन ड्राईव्ह घेतले आहेत तिथून.

मने फुल्टू अलिचा चस्का लागला आहे मला. काल पण थोडी ऑर्डर सोडली आहे Proud
मला एक सांग कपडे खरेदी करताना काय टिप्स देशिल? पार्सल आल्यावर पैसे द्यावे लागतात का पोस्टेज चे? माझ्या गॉगलच्या पोस्टेजसाठी १७७ रूपये घेतले.

दक्षे, म्या बी मागणी नोंदवली आजच अलिएक्सप्रेसवरून. क्रेकाने ऑनलाईन पेमेंट केलं.
मला एक सांगा अलिएक्सप्रेसअनुभवींनो, ऑर्डर प्लेस केल्याचं कन्फर्मेशन येत नाही का ईमेलवर?

मंजुडी, मी पण आजच ऑर्डर केलीये अलिएक्सप्रेसवर क्रेकाने. इमेल वर कन्फर्मेशन आलंय आणि क्रेका चा समस ही.

ऑर्डर प्लेस केल्याची ईमेल नाही येत. पण तुझं पेमेंट सक्सेसफुल झाल्याची आणि सेलर ने प्रॉडक्ट शिप केलं की ईमेल येते. अलि च्या साईटवर साईन इन आहे तिथे खाली माय ऑर्डर्स मध्ये तुला तु जेजे ऑर्डर करशील ते ते सर्व दिसतं. ओपन डिस्प्युट केलंस तर ट्रॅकिंग नंबर मिळतो आणि सेलर्स शिपिंग मेथड वर क्लिक केलंस की तिथे तो ट्रॅकिंग नंबर द्यायचा आणि मग आपल्याला कळतं की आपलं प्रॉडक्ट कुठे पोचलंय. मोस्टली चायनातून बाहेर पडायला बर्‍यापैकी उशिर लागतो.

बाकी गोष्टी हातात येईतो फार पेशन्स ठेवावा लागतो.

मी काजळ मागवलं होतं ते येईल येईल म्हणून मी दुसरी काजळ पेन्सिल बरेच दिवस घेतली नाही. मग कंटाळून घेतली, मग २-३ दिवसापुर्वी ते काजळ मिळालं.

मी रोज काही ना काहीतरी ऑर्डर करते, म्हणजे मला रोज काहीना काही तरी मिळेल.

मला वेड लागले अलि चे Proud Wink

जाई Proud

इथे वाचून अलीएक्स्प्रेस बघितली. कपडे खूपच स्वस्त आहेत की! एक-दीड महिना पेशन्स ठेवणं मात्र कठीण काम आहे. फ्री शिपींग असलं तरी पोस्टेज दयावं लागतं का?

Pages