निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गुगलून पाहिल्यास तू वर टाकलेल्या फोटोतील पानाफुलांचं साम्य हवायन ट्रॉपिकल प्लांट सार्खं वाटलं..

पण आता तूच सांगून टाक नांव जास्त सस्पेंस न ठेवता.. Happy

उन्हाळा उन्हाळा.............हुश्श्य......................................................................................................
................................................................................................

हे काय आहे - (हे फूल अतिशय छोटे आहे...) ???? >>>>
भुईकमळ यांनी याचे उत्तर अग्दी बरोबर दिले आहे ----<< दिवसाचा राजा ' फुलपाखरुचे आवडते.झाड..... >>>

अतिशय सुगंधी फुले असतात ही (त्यामुळे खूप फुलपाखरे आकर्षित होतात या फुलांवर ) - "दिन का राजा" असे याचे सर्वसाधारण नाव, बोटॅनिकली - Cestrum diurnum , कुळ - Solanaceae

Cestrum nocturnum - रातराणी Happy

शशांक
बागेतली फुले मस्तच.
हे मी मागे कशाचे फूल आहे ओळखा म्हणून टाकलेले.
maayboli_0.jpg

आज ओळ्ख सांगते ह्यांची.
सागरगोट्याची फूल आहेत ही -
maayboli 4.jpg

हो का असं असतं का सागरगोट्याचं फुल ? या आधी पाहिलं नव्हतं कधी. मला वाटलं सयामी लॅबर्नम की काय ?

आता हे कोणते फूल आहे?
ह्याचे नाव मला माहिती नाही.प्ण ही फूल रात्रीच उमलतात. दिवसा झाडावर फूल दिसतच नाही. फक्त कळ्या असतात. वाघळांच खाद्य असाव बहूतेक.

10430924_887799004585806_5935783096731511941_n.jpg10896867_887799137919126_4280014354582018957_n.jpg

ही ह्याची पान

10676240_887799461252427_3299223285481638841_n.jpg

ह्या कळ्या
10888513_887798984585808_544121121446767428_n.jpg

Tetu ratrich umalte. Tyachya shenga hattichya sulyansarkhya distat. He poorn bharatiy mhanje assal deshi zaad ahe.

सुप्र निग!!!!!!!!!!

उजू दोन्ही फुलं पहिल्यांदाच बघतीये छान आहेत. परवा एका शेतात अगदी दिवसाढवळ्या एका झाडावर वटवाघुळं घिरट्या घालत होती. बरीच होती.

टेटू.. मी बघितले नव्हते आधी. फोटो उजूने दाखवला होता तेव्हाही लक्षात नव्हते आले. हत्तीच्या सुळ्यासारख्या शेंगा म्हणजे मेंढशिंगीचा भाऊ दिसतोय !

मानुषी, फुलाचा रंग मस्तच आहे.

uju,
टेटुचे फोटो मस्त आहेत.
टेटूच्या फुलांना पिकल्या फणसासारखा वास येतो. त्यामुळे वटवाघळे आकर्षित होतात. फुलाची रचना अशी असते की वाघळाचे डोके आत जाऊ शकते व परागीभवन घडून येते. पुण्याच्या असपासच्या रानातही ही झाडे आहेत. एक झाड ताथवडे उद्यानासमोरही आहे.
याला हस्तीदंतफला म्हणतात. oroxylum indicum

हो, दिनेशदा! पळसाचा गालीचा मो व चहूबाजूनी ऊन त्यामुळे फोटो खूप चांगला आला नाही. ताजी फूलं मस्त लागतात व वास.... अहाहा ... मला वासाने नशा चढली Happy मोह मोहात पाडतो...

व्वा मस्त गप्पा... शशांक जी तुमची बाग खुप सुंदर आहे...
सागर गोट्याचे फुल प्रथमच पाहाते आहे..
मंजु ताई म ज्जा आहे...

मानुषी, मस्त फोटो.
माझ्या अ‍ॅडेनियमचा बहर ओसरायला आला आत्ता.
मोहाच झाड अजून पाह्यलच नाहिये मी.
मंजू, मोहाच्या फूलांची टोपली जणू मोत्याने भरलेली टोपलीच वाटतेय.

शांकली,
मी झाडावर कधी टेटू ची फळ पाहिली नाहीत. आत्ता लक्ष ठेवून बघेल.

अदीजो
टेटू च हस्तीदंतफला नाव किती समर्पक वाटतय.

मी कोण????

maayboli 3.jpg

सागर गोटे म्हणजे - Caesalpinia bonduc म्हणजे आपल्या शंकासुराचा भाऊच की .. Happy

शंकासुर - Caesalpinia pulcherrima

Pages