विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चिउ... अर्ध्या मॅचमधेच आपला संघ कठीण परिस्थीतीत असताना असा धीर सोडायचा नसतो उलट तेव्हाचआपल्या संघाला फॅन्सच्या सपोर्टची जरुरी असते.. मी वर म्हटले होते ना की स्पोर्ट्समधे मोमेंटम, कॉन्फिडंस व ग्रेट फॅन सपोर्ट डझ वंडर्स! >> खरय.. पण मला फारच लवकर टेंशन येत आणि पटकन मॅच संपावी अस वाट्त.. Sad

६ वी मॅच ६व्या क्रमांकावर आलेल्या धोनी ने ६रन्स मारुन ६ विकेटसने जिंकुन दिली आणि भारताने ६वा विजय मिळवला.

६ वी मॅच ६व्या क्रमांकावर आलेल्या धोनी ने ६रन्स मारुन ६ विकेटसने जिंकुन दिली आणि भारताने ६वा विजय मिळवला.>> तो आज बहोत सारे और अलग अलग ६ का दिन था!

आज धोनी रैना खेळतील जिंकवून देतील असे ते सेट झाल्यावर वाटलेलेच .. कारण झिम्बाब्वे सुरुवातीच्या ओव्हरनंतर नेहमीच मार खाते.. धोनी, रैनाचे तंत्र चेक करावे असे गोलंदाजीत धार नाहीये त्यांच्या..

धोनी व कंपनीचं अभिनंदन.
ब्रँडन टेलर नि:संशय अप्रतिम खेळला पण सीमारेषा खूप जवळ होती, विकेट संथ होती, बाऊन्स नियमित होता व हरण्या-जिंकण्याने फार मोठा फरक पडण्याचा त्याच्यावर दबाव नव्हता, हेंही लक्षात घ्यायला हवं; तसं नसतं तर उचला-उचली व रिव्हर्स स्विपचे फटके इतक्या सहज व यशस्वीपणे मारणं त्याला शक्य झालं नसतं. इथं त्याला कमी लेखण्याचा उद्देश नसून केवळ त्याच्या खेळीमुळे आपली गोलंदाजी - विशेषतः फिरकी- अगदींच निष्प्रभ वाटण्याची गरज नसावी, इतकंच.
अपल्या फलंदाजीबद्दलचा इतराना वाटणारा दबाव रैना फॉर्मात आल्याने द्विगुणित झाला असावा हाही या सामन्याचा एक फायदाच.
शामी यॉर्कर चांगले टाकूं शकत असूनही आंखूड टप्प्याच्या चेंडूंवरच अधिक भर कां देतो कळत नाही. मोहित शर्मा हा खरंच विश्वासार्ह व उपयुक्त ठरणारा गोलंदाज मिळाला आहे.

शामी यॉर्कर चांगले टाकूं शकत असूनही आंखूड टप्प्याच्या चेंडूंवरच अधिक भर कां देतो कळत नाही.
>>>
हल्ली ४ च खेळाडू बाहेर असल्याने स्लॉग ओव्हर्समध्ये एकंदरीतच यॉर्करचे प्रमाण घटलेय.. ६ पैकी ४-५ चेडू यॉर्करच मारा हे हल्ली माहीर लोकांकडूनही कमी दिसते.. काही म्हणा, हा क्षेत्ररक्षणाचा नियम बदलायला हवा.

ज्या पध्दतीने आज वेस्ट इंडीज खेळले ते बघुन त्यांनी स्वतःहुन क्वार्टरमधे येउ नये. जिंकण्याचा जोशच दिसुन येत नव्हता. प्रतिस्पर्धीला तुफान फटाकेबाजी करुन नेटरनरेट +मधे आणुन ठेवण्याची इच्छाच नव्हती. जी टोटल २० ओव्हरच्या आत क्रॉस करु शकतात त्या टोटलसाठी तब्बल ३०च्या वर ओव्हर खर्ची करुन स्वतःच्या नेटरनरेटची वाट लावुन घेतली. अश्यामधे जर आयर्लंड पाकिस्तान विरुध्द जिंकला तर पाकिस्तान आणि वेस्ट इंडीज मधे सरस नेटरनरेट ज्याचा असेल तोच आत येईल बहुदा याचा विसर वेस्ट इंडीजच्या थिंकटँकला पडलेला होता.

खरच वेस्ट इंडीज सारखी केअरलेस क्रिकेट टीम पुर्ण जगात कोणत्याही खेळामधे नसेल.

वे.इंडीज वि. युएई सामन्याच्या मध्यंतरातल्या चर्चेत इयान बिशप म्हणाला , 'West indies should go clinically about this and win this match with good margin'; वे.इंडीजने नेमका तसाच खेळ केला व बाद फेरीत जाण्याच्या आशा तेवत ठेवल्या !
वे.इंडीजच्या कप्तानाविषयीं लिहील्याशिवाय रहावत नाही; आज होल्डींग 'मॅन ऑफ द मॅच होता' पण इतर सामन्यांतही त्याने कप्तानाला साजेशी कामगिरी केली आहे. मॄदुभाषी असलेला हा पोरगा संघातल्या ज्येष्ठ क्रिकेटपटूंच नेतृत्व ज्या समर्थपणे करतो आहे तें कौतुकास्पदच ! बिशप त्याच्याबद्दल म्हणाला तें खरंय- 'He is respectful of people & cricket !' लॉईडनंतर वे.ईंडीजला एक योग्य व दीर्घकालीन नेतृत्व मिळालंय असं वाटतंय.
<< ६ पैकी ४-५ चेडू यॉर्करच मारा हे हल्ली माहीर लोकांकडूनही कमी दिसते..>> मलींगा अजूनही याला अपवादच आहे !
पाक वि. आयर्लंड सामना रंगणारसं दिसतंय.

वेस्ट इंडीज चा नेटरनरेट = -0.053
पाकिस्तानचा नेटरनरेट = -0.194

जास्त फरक नाही पाकिस्तानने २५०+ धावा केल्या तर त्यांचा रनरेट+ मधे जाणार. मग जिंको वा हारो त्यांना काहीच फरक पडणार नाही

२३७ जिंकायच्या आहेत पाकिस्तानला ते जिंकले तर वेस्ट इंडीज आणि पाकिस्तान दोन्ही आत

समजा जर पाकिस्तान हारली आणि तिला क्वालिफाईड व्हायचे असेल तर तिला किमान २०० रन्स ३५ ओव्हर्सच्या आतच करावे लागतील तरच तिचा नेट रनरेट -०.०३७ होईल वेस्ट इंडीजचा -०.५३ आहे.

समजा जर पाकिस्तान हारली आणि तिला क्वालिफाईड व्हायचे असेल तर तिला किमान २०० रन्स ३५ ओव्हर्सच्या आतच करावे लागतील तरच तिचा नेट रनरेट -०.०३७ होईल वेस्ट इंडीजचा -०.५३ आहे.
>>>>>>>>

हे कुठे दिलेय नक्की?

काहीतरी गंडलेय यात... कारण जर पाकिस्तान ३५ ओवरलाही २०० ला सर्वबाद होत हरते तरी रनरेट कॅलक्युलेट करताना ३५ ओव्हरने नाही तर पुर्ण ५० ओव्हरने भागतात..

जर असे नसेल तर रनरेट कॅलक्युलेट करायचा नियमच गम्डलाय असे म्हणेन.. Happy

असो,
इन्शाल्लाह आज पाकिस्तान जिंकावी.... (चान्सेस सध्या त्यांचेच आहेत, वर्ल्ड चॅपम्पियनसारखे खेळत आहेत, .. आतापर्यंत)
त्यानंतर त्यांनी क्वार्टरला ऑस्ट्रेलियालादेखील मात द्यावी...
इथे भारत बांग्लाला धोपटेनच यात शंका नाही..
आणि मग पुन्हा एकदा सेमीला भारत-पाक.. Happy

तरी रनरेट कॅलक्युलेट करताना ३५ ओव्हरने नाही तर पुर्ण ५० ओव्हरने भागतात.. >>>

अरे लहान मुला आधी गणित शिकुन घे रे बाबा. मग नियम वाच मग प्रयत्न कर. मनात येईल असे बोलु नये.

अरे लहान मुला आधी गणित शिकुन घे रे बाबा. मग नियम वाच मग प्रयत्न कर. मनात येईल असे बोलु नये.
>>>>
गणितापेक्षा माझे लॉजिक जब्बर्रदस्त आहे.

जर एखादा संघ ५० षटकात २५० धावा मारतो... ५ ची धावगती..
आणि चेस करणारा संघ २०० धावा २५ ओवरमध्ये मारून सर्वबाद होत हरतो.. तर त्यांचा रनरेट २००/२५ = ८ असा जिंकणार्‍या संघापेक्षा जास्तीचा कॅलक्युलेट कसा होऊ शकतो...

तो २००/५० = ४ असा कमीच हवा..

असे नसेल तर खरेच रनरेट कॅल्युलेट करायचे लॉजिक गंडलेय.. आयसीसीला माझी गरज आहे Happy

नशिब आयसीसीला तुझी गरज नाही. नाहीतर भारतीयांना फुटबॉल हॉकी सारखे इतर खेळ बघावे लागले असते.
म्हणुन श्रीकृष्ण म्हणाला "जे झाले ते चांगल्यासाठी झाले, जे होत आहे तेही चांगल्याकरीताच होत आहे आणि जे होणार आहे ते चांगल्याकरीताच होणार आहे"

कबीर पण नाही, खरेच तुम्ही म्हणता तसे चुकीच्या पद्धतीने रनरेट कॅलक्युलेट होत असेल तर मला त्या नियमाची लिंक द्या.. मी त्यांना सुधारणा सुचवू इच्छितो.. ते लोक एवढी बेसिक मिस्टेक करतील असे वाटत नाही..

आणखी एक गंमत सांगतो,

तुम्ही म्हणता तसा नियम असेल ना तर आफ्रिकेने एखाद्या लिंबू संघाला ४०० मारल्यावर ते जिंकूच शकत नाहीत या स्थितीत ते ५० ओवर खेळून २००-२५० मारण्याऐवजी १० ओवर मध्ये हाणामारी करून १०० मारायला बघतील., भले सर्वबाद झाले तरी १००/१० = १० चा रनरेट..

पण तसे नसते, नसावे.. १०० ला ५० ने भागूनच २ चा रनरेट होतो..
आणि म्हणून ते पुर्ण ओव्हर खेळून २५० बनवायला बघतात जेणेकरून २५०/५ = ५ चा रनरेट तरी व्हावा..

म्हणून म्हणालो, मला हे अतार्किक आणि इनलॊजिकल वाटते..
असा नियम असेल तर बघू इच्छितो Happy

ऋन्मेश तुला रनरेट आणि नेट रनरेट यातला फरक कळतो का ?

नसल्यास गुगल महाराजांच्या पायी लोटांगण घाल बघु.

कबीर नेट रनरेट हा रनरेटच्या फरकावरूनच काढला जातो...
पाकिस्तान २०० धावा मारून ३५ ओवरला सर्वबाद झाली तरी तो ५० ओवरनेच भागून त्यांचा ४ रनरेट होणार.. तो आयर्लंडपेक्षा कमीच असणार.. म्हणून नेट रनरेट निगेटीव्हमध्येच असणार..
ते या २०० धावा ३५ ओव्हरमध्ये मारतात कि १५ ओव्हरमध्ये हे काही मॆटर करत नाही.. जर ते सर्वबाद होत हरले तर..

आणि हे जर असे नसेल तर खरेच हा नियम गंडलाय... म्हणून प्लीज असेल लिंक या नियमाची तर द्या..

अजुन एक विजय-सोहळा बघण्यासाठी बरेच पत्ते पिसुन झाले आहेत. काही कौटुंबिक पातळीवरचे पत्ते पिसणे बाकी आहे पण ते वेळेवर बघु!
lets hope for the bestest!!!!

वेदर पुढीलप्रामाणे आहे:

Partly cloudy. Medium (50%) chance of showers, most likely in the afternoon and evening. Winds N 15 to 25 km/h increasing to 25 to 40 km/h during the morning then shifting SW 20 to 30 km/h during the afternoon.

खुप छान नाहीये वेदर त्या दिवशी.... पण शेवटी हे मेलबर्न आहे.. Happy

कबीर हे थोडे गूगाळून, आजच्या सामन्यापुरते..
WI need to win in ~36 overs to ensure that they qualify even if Pakistan loses by the narrowest of margin, hope they know that.

३६ ओवर्समध्ये जिंकायचे होते जेणेकरून पाक अगदी काठावर जिंकले तरी कोई वांधा नाही, वेस्टैंडिज योग्य प्रकारेच खेळली.

इथून फक्त एकच शक्यता त्यांना बाहेर काढू शकते ते म्हणजे पाक-आयर्लंड सामना टाय होणे आणि ते एकेक गुण मिळवत पुढे जाणे.

** मध्यंतरी भारत-आयर्लंड सामन्याच्या वेळी उगाच भारताने आयर्लंडला हरवत पाकिस्तानला मौका दिला असे चित्र उभे केलेले.
पण प्रत्यक्षात भारताने वेस्टईंडीजला मौका दिला होता. Happy

जिंकले एकदाचे पाकिस्तान (द आफ्रीकेच्या नानाची टांग. ते तेव्हा मुर्खपणाकरुन हारले नसते तर आज पाकिस्तान मरत मरत आत आली असती. असो)

१८ मार्चला श्रीलंका विरुध्द द आफ्रिका
१९ मार्चला बांग्लादेश विरुध्द भारत
२० मार्चला ऑस्ट्रेलिया विरुध्द पाकिस्तान
२१ मार्चला न्युझीलंड विरुध्द वेस्ट इंडीज

द आफ्रीकेच्या नानाची टांग. ते तेव्हा मुर्खपणाकरुन हारले नसते तर आज पाकिस्तान मरत मरत आत आली असती.
>>>
उलट बरे झाले ते तसे झाले, अन्यथा पाकिस्तान आलीच असती पण रनरेट विंडीजपेक्षा कमी भरल्याने चौथी झाली असती आणि भारत-पाक सामन्यासाठी मला सेमीच्या जागी फायनलची वाट बघायला लागली असती Wink


अवांतर - १९ मार्चला आमच्या ऑफिसमध्ये ज्याला ज्याला सुट्टी घ्यायचीय त्याने शनिवार भरत सुट्टी घेण्याची परवानगी मिळाली आहे Happy

Pages