करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
गावसकरने खडूस कॉमेंट केलीच
गावसकरने खडूस कॉमेंट केलीच ... तो म्हणतो बांगला क्वार्टरला आलं हे भारताच्या दृष्टीने वाईट झालं, इंग्लंडशी खेळणं सोप्पं गेलं असतं.
गावस्कर म्हणजे
गावस्कर म्हणजे
इंग्लंडशी खेळणं सोप्पं गेलं
इंग्लंडशी खेळणं सोप्पं गेलं असतं >> आपण धू धू धूतला असता हे नक्कीच. बांग्ला टीम जास्त चांगली आहे.
श्रीलंका देखील एकेकाळी लिंबूच होते. ही स्टोरी फारच सुंदर आहे.
http://www.thecricketmonthly.com/story/834255/the-lion-s-fairy-tale
One of the first things I remember about that is that I had to switch rooms because Sanath snored too loudly," Ranatunga says of the days his World Cup side came together under his own roof, on an Inside Sports TV show. "We didn't have everything the modern cricketers have, but my parents made sure we had enough dhal, sambol, bread and rice for the lot of us. Those kinds of things built camaraderie. We were all united. You can't get that from living and eating at hotels."
मला रनतुंगा तसाही आवडतोच. हम्बल मॅन. तेव्हाचे चार पण भारी होते लंकेचे. सनथ, कालू, रनतुंगा आणि द अरविंद डी सिल्व्हा.
जोडीला वाझ आणि मुरली
जोडीला वाझ आणि मुरली
>> आपण धू धू धूतला असता हे
>> आपण धू धू धूतला असता हे नक्कीच
असं काही सांगता येत नाही हां. त्यांनीच आपल्याला धुतला होता कपच्या आधी.
केदार, रोशन महानामा पण टाका
केदार, रोशन महानामा पण टाका त्यांच्यात!
आ.न.,
-गा.पै.
कपच्या आधी आपण स्ट्रॅटेजिकली
कपच्या आधी आपण स्ट्रॅटेजिकली मार खाल्ला असंच मला आता वाटायला लागलय.. आपण ह्यांना सहज मारु असा समज सगळे करुन घेतायेत आणि आपण आता सगळ्यांना धोपटतोय..
आयर्लेंड विरुध्द ज्या
आयर्लेंड विरुध्द ज्या पध्दतीची ११व्या ओव्हरपासुन स्ट्रॅटजी धोनीने सुरु केली ती अतिशय वेगळी होती आणि अजुन कोणत्याही टीम ने वापरली नव्हतीच. इतक्या जलदगतीने आपल्या स्पिनर्सने ओव्हर्स टाकले की ताशी १७ ते १८ ओव्हर स्पीड होता. जिथे नॉर्मली ११ ते १२च होतात. तिथे आपण ५ -७ ओव्हर्स एक्स्ट्रा टाकत होतो. यामुळे बॅट्समनला विचार करायला वेळच मिळत नव्हता. एक तर अश्विन फार्मात आहे त्यात तो आता स्पिन बरोबर स्वींग पण करु लागला आहे. या चक्रात आयर्लंडचे बॅट्समन फसत गेले.
आपल्या वेस्टिंडीज विरुद्धच्या
आपल्या वेस्टिंडीज विरुद्धच्या विजयावरील एक कॉन्स्पिरसी थिअरी - http://www.dailyo.in/sports/world-cup-2015-cricket-india-west-indies-jas...
गावसकरने खडूस कॉमेंट केलीच
गावसकरने खडूस कॉमेंट केलीच ... तो म्हणतो बांगला क्वार्टरला आलं हे भारताच्या दृष्टीने वाईट झालं, इंग्लंडशी खेळणं सोप्पं गेलं असतं
>>>>>>>
खडूस कॉमेंट?
इथे काही जणांच्या मते ईंग्लंडपेक्षा बांग्ला खरेच सरस आहे.
या धाडसी विधानाला मी नुकतेच इथे एक उत्तर दिले आहे.
http://www.maayboli.com/node/53056
आजच्याच दिवशी २००६ साली
आजच्याच दिवशी २००६ साली क्रिकेट इतिहासातला सर्वात जास्त धावांचा पाठलाग दक्षिण अफ्रिकेने यशस्वीपणे केला होता.
ऑस्ट्रेलिया ४३४- द. आफ्रिका ४३८ एक विकेट राखुन आफ्रिकेने जिंकला .
दक्षिण आफ्रिकेचा
दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियावरील तो विजय एक भारतीय असूनही फार सुखावून जातो आठवला की!
स्लेजिंगच्या शिखरावर असलेला तो ऑस्ट्रेलिया संघ डोक्यात जात असे. त्यात ते कधीच हरत नसत. मॅकग्रा, ब्रेट ली, वॉर्न, पॉटिंग, हेडन असे सगळे मोहरे त्या काळी खेळत असत. पार थोबाड पाडले होते दक्षिण आफ्रिकेने!
जडेजा मला अजूनही
जडेजा मला अजूनही आंतरराष्ट्रीय दर्जाचा अष्टपैलू खेळाडूच वाटत नाही. अष्टपैलू खेळाडू ने त्याच्या गोलंदाजी / फलंदाजीवर सामन्यात भरीव कामगिरी करून दाखवणं अपेक्षित असतं. जडेजा एक तर परिस्थितीनुरूप बॅटिंग करत नाही आणी दुसरं म्हणजे त्याचा (गोलंदाजी आणी फलंदाजी) तेव्हढा वकूब ही वाटत नाही. युवराज हा खूप मोठा खेळाडू आहे. पण तो पर्याय उपलब्ध नसल्यामुळे त्या चर्चेला काही अर्थ नाहीये. असो.
गावसकर ईंग्लंड च्या बाबतीत नेहेमीच पर्सनल स्कोर सेटल करतो. त्याच्या प्लेयिंग डेज मधे त्याला जो काही अपमान ईंग्लंड कडून सहन करावा लागला (असेल), त्याचं तो जमेल तिथे ऊट्टं काढतो असा एक फील नेहेमी येतो. (जसा संजय मांजरेकर अनेक वर्षं द्रविड वर खार खाऊन होता, द्रविड ने त्याची जागा घेतल्यावर. पण मांजरेकर चं आडनाव मांजरेकर नसतं आणी तो मुंबईचा नसता, तर फार तर युएई वगैरे कडून खेळला असता).
असो. आज असल्या रिकामटेकड्या कॉमेंट्स करायचा फार मूड आहे.
तो प्लेजरिझम चा धागा चालू आहे का ते बघायला पाहिजे. 
पण मांजरेकर चं आडनाव मांजरेकर
पण मांजरेकर चं आडनाव मांजरेकर नसतं आणी तो मुंबईचा नसता, तर फार तर युएई वगैरे कडून खेळला असता<<<
लव्ह्ड धिस स्टेटमेंट!
गावसकरने 'सर' हा किताबही नाकारला होता. (रिचर्ड्सने मात्र तो स्वीकारला)
गावसकर (मला तरी) कधीच चांगल्या स्वभावाचा वाटला नाही. पण हे केवळ वरील प्रतिक्रियांना अनुसरून! अवांतर आहे हे माहीत आहे. तसेही, त्या लेव्हलला स्वभावाचा संबंधही 'फार' आड येतो असेही नाही.
जडेजाला नेणे आणि युवराजला न
जडेजाला नेणे आणि युवराजला न नेणे हे एका क्षणी फार महत्वाचे ठरणार आहे असे आपले मला वाटते.
बेफ़िकीर, गावसकर मलासुद्धा कधी
बेफ़िकीर, गावसकर मलासुद्धा कधी जेन्युईन वाटत नाही. त्यामुळे त्याचं क्रिकेट विषयीचं टेक्निकल मत सोडून मी फारसं काही ऐकत नाही.
फेरफटका, गावसकर (इतर
फेरफटका, गावसकर (इतर अनेकांपेक्षा अधिकच) स्वार्थी आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. त्या तुलनेत कपिलदेव फार महान ठरतो.
बाकी, सध्या आपली मॅच अजून व्हायची असल्याने आणि आपण क्वार्टर फायनलला आधीच पोचलेलो असल्याने बहुधा अश्या गप्पांबाबत हरकत घेतली जाणार नाही.
गावसकर (इतर अनेकांपेक्षा
गावसकर (इतर अनेकांपेक्षा अधिकच) स्वार्थी आहे असे माझे वैयक्तीक मत आहे.>> +१
संदीप पाटीलच्या षटकारमध्ये
संदीप पाटीलच्या षटकारमध्ये 'गावसकरने एकोणतिसावे शतक केल्यावर' अग्रलेख आला होता.
सर 'डॉन' गावसकर!
पुढे कधीतरी गावसकरची जागा रवी शास्त्री घेईल असे वाटल्यामुळे (आणि त्यामुळे आपण आपली जागा अबाधित ठेवू शकू असे वाटल्यामुळेही) संदीप पाटीलने गावसकर खालोखाल रवी शास्त्रीचे कौतुक सुरू केले.
वेंगसरकर बिचारा नेहमीच सावलीत राहिला.
पण प्रामाणिकपणे, तेंडुलकर, सेहवाग, गांगुली, द्रविड हे कॉम्बो अफाट होते राव!
असो! परवा शास्त्रीने विराटला झापले हे वाचून मात्र शास्त्रीबद्दल थोडासा आदर निर्माण झाला. मे बी, त्याच्या मैदानातील कामगिरीमुळे नसेलही, पण पॅव्हेलियनमधील कामगिरीमुळे का होईना, आदर वाटला.
विराटसारख्यांना झापलेच पाहिजे.
शास्त्रीबुवा वेळ पाहून तोंड
शास्त्रीबुवा वेळ पाहून तोंड उघडतात. श्रीनिवासन च्या जागी दालमिया आल्याबरोबर त्यांना साक्षात्कार झाला की ती वर्ल्ड-कप च्या आधीची ट्राय-सिरीज उगीच खेळवली. शास्त्री च्या खेळाविषयी काय लिहू? वन-डे मधे ओपनिंग ला आल्यावर ३५ बॉल्स मधे ३ वगैरे त्याचे पराक्रम पाहिल्यावर आणी लोकांनी प्रतिमा-दहन वगैरे रिती-रिवाजाप्रमाणे पार पाडल्यावर वयाच्या ३० व्या वर्षी तर तो निवृत्त सुद्धा झाला होता (नसता झाला, तरी फार काळ त्याला खेळवला असता असं तेव्हा तरी वाटत नव्हतं).
"तेंडुलकर, सेहवाग, गांगुली, द्रविड हे कॉम्बो अफाट होते राव!" >> +१. मी ह्या रांगेत कुंबळे चा पण समावेश करीन. फायटींग स्पिरीट अफाट होतं त्या माणसाचं. आणी अर्थातच वन-डे चा विषय असल्यामुळे युवराज ला नाही वगळता येणार.
>>>शास्त्रीबुवा वेळ पाहून
>>>शास्त्रीबुवा वेळ पाहून तोंड उघडतात. श्रीनिवासन च्या जागी दालमिया आल्याबरोबर त्यांना साक्षात्कार झाला की ती वर्ल्ड-कप च्या आधीची ट्राय-सिरीज उगीच खेळवली. शास्त्री च्या खेळाविषयी काय लिहू? वन-डे मधे ओपनिंग ला आल्यावर ३५ बॉल्स मधे ३ वगैरे त्याचे पराक्रम पाहिल्यावर आणी लोकांनी प्रतिमा-दहन वगैरे रिती-रिवाजाप्रमाणे पार पाडल्यावर वयाच्या ३० व्या वर्षी तर तो निवृत्त सुद्धा झाला होता (नसता झाला, तरी फार काळ त्याला खेळवला असता असं तेव्हा तरी वाटत नव्हतं).<<<
अक्षरशः
+१
आधीच्या साहेबांनी साठ ओव्हर्स
आधीच्या साहेबांनी साठ ओव्हर्स खेळून छत्तीस केल्या होत्या.
आज बांग्ला न्यूझीलंड चालू
आज बांग्ला न्यूझीलंड चालू आहे.. सध्या बांग्लाचा खेळ बघता ते एकदम शुद्धीत खेळत आहेत आणि न्यूझीलंडला जड जाणार आहेत..
सौम्या सरकार आज पण चांगला खेळतो आहे.
महमुदल्लाह चे सलग दोन शतक !
महमुदल्लाह चे सलग दोन शतक ! ऑस्सम मॅन !!
बांग्ला भारी खेळत आहे.
McClenaghan ची बॉलिंग बघताना मला आपल्या राजू कुळकर्णीची आठवण येत आहे. आज कितीदा पडला McClenaghan
बांग्ला न्यूझीलंडला जड
बांग्ला न्यूझीलंडला जड जाणार.. कदाचित न्यूझीलंड हारु सुद्धा शकते आणि तसे झालेच तर आपल्याला श्रीलंके विरुद्ध खेळायला लागणार
आईशप्पथ ! २८८ . NZ ची पूर्ण
आईशप्पथ ! २८८ .
NZ ची पूर्ण मदार ब्रॅन्डनवर आहे. जर तो आज लवकर आउट झाला, अगदी ५० करून तरी NZ हरू शकेल. गप्टील, ब्रॅन्डन काय करतात बघू. अगदी इन्ट्रेस्टिंग झाली आहे मॅच.
Wow , excellent play by
Wow , excellent play by Bangladesh , impressed !!
बांग्लाकडे दोन चांगले बॉलर
बांग्लाकडे दोन चांगले बॉलर नक्कीच आहेत.. आणि सपोर्टींग बॉलर्स पण चांगले आहेत... न्यूझीलंडची गोची होणार हे नक्की.. मॅकल्लम चालला तर ठिक नाही तर बाकीच्यांनी सिरीज मध्ये काहीच खेळ केलेला नाहीये.. जे अत्यंत धोकादायक आहे.
केदार तुला राजु कुलकर्णी
केदार तुला राजु कुलकर्णी आठवतो? सही..:)
खरय .. काय मस्त खेळले बांगला.. आज न्युझिलंडची खरी परीक्षा आहे.. बहुतेक आपण श्रिलंकेबरोबर खेळणार अस वाटतय...
गावस्करला स्वार्थी म्हणणार्यांना एकच सांगावेसे वाटते.. तो जेव्हा आपल्या संघात आला तेव्हा आपली फलंदाजी ..खास करुन सलामी फलंदाजी फारच तकलादु होती. तो संघात आल्यावर जरा अपल्या फलंदाजीला कणा आहे असे वाटु लागले. तेव्हा तो बाद झाला की घासलेटची लाइन लागायची . म्हणुन बहुतेक वेळा तो आउट व्हायचेच नाही या बचावात्मक मानसिकतेनेच खेळायचा. त्याला लोकांनी त्याचा सेल्फिशपणा म्हणायला सुरुवात केली.
सुरुवातीचा आक्रमक गावस्कर कोणाला आठवत नसेल तरी मला स्पष्ट आठ्वतो.. फिरकी गोलंदाजीला सुंदर पददालित्य वापरुन.. पुढे जाउन चोपतानाचा गावस्कर बघणे म्हणजे पर्वणी असायची.. वेस्ट इंडिजचे लान्स गिब्स्,शिलिंगफोर्ड्,पॅडमोर्,रफिक जुमादिन यांना त्याने तितक्याच शिताफीने ठोकले जितक्या शिताफीने त्याने त्यांच्या रॉबर्ट्स, होल्डिंग, मार्शल व गार्नर या चौकडीचा सामना केला.
आता पहिल्या वर्ल्ड कप मधे त्याने ६० षटकात नाबाद ३६ धावा केल्या ही गोष्ट खरी आहे पण मला वाटत तो त्याचा पहिला किंवा दुसरा एक दिवशीय सामना होता. त्या वेळेला इंग्लंडचे खेळाडु व इंग्लांडमधे काउंटी क्रिकेट खेळत असलेले इतर देशातले खेळाडु यांच्याव्यतिरीक्त कोणालाच एकदिवशीय सामने खेळायचा सराव नव्ह्ता किंवा ज्ञान नव्हते. त्या सामन्यात इंग्लंडने ६० षटकात आपल्याबरोबर ३३० का काहीतरी रन्स केल्या होत्या. त्या वेळेला टेस्ट मॅचमधे तेवढ्या धावा करायला बहुतेक संघ १५० च्या वर षटक घ्यायचे. त्यामुळे भारतिय संघ जो त्यांचा पहीलाच एकदिवशीय सामना खेळत होते बहुतेक.. त्यांना तो स्कोर काहीच्या काही वाटला.. व ६० षटकात तो पार करणे अशक्यच आहे असे त्यांनी मनात समजुन करुन घेतली व त्या सामन्याचा मग बॅटींग सराव तरी व्हावा असा विचार करुन गावस्कर तो डाव खेळला. आज एकदिवसिय सामन्यात २ वेळा विश्व विजेतेपद व ४० वर्षांनंतर.. कपिल देव, तेंडुलकर, धोनी, विराट कोहली असे एक सो एक एक दिवशिय हिरे आपण जगाला दिल्यावर.. गावस्करच्या त्या खेळीची खिल्ली उडवणे सोप्पे आहे पण आपल्या संघाचा एक दिवसीय सामन्याचा त्यावेळचा अनुभव व एकंदरीत त्यावेळची आपल्या संघाची पार्श्वभुमी बघता फक्त त्या खेळीचा उल्लेख करुन व बाकीच्या गावस्करच्या कारकिर्द्रिचा सुलभतेने विसर पाडुन.. गावस्करला नावे ठेवणे मला पटले नाही .
कोणीतरी वर असे म्हटले आहे की कधीतरी त्याचा इंग्लंडमधे कोणीतरी अपमान केला होता व त्याचा राग त्याला अजुन आहे.. अरे? का राग नसावा त्याला? का म्हणुन त्याने अपमान सहन करुन घ्यायचा? फक्त ते गोरे आहेत म्हणुन? सौरव गांगुलीने आपल्या संघात एक कणा आणला अस आपण बहुतेक मानतो .. समोरचा कोणी जरी असला तरी घाबरणार नाही कोणाच्या बा..ला अस अॅटिट्युड गांगुलीने आपल्या टिममधे आणले व त्याचे श्रेय आपण गांगुलीला गर्वाने देतो. गावस्कर पण त्या बाबतीत गांगुलीसारखाच होता. मग गावस्करच्या बाणेदार अॅटिट्युडलाच नाव का बरे ठेवायची?
आणी गावस्कर इंग्लंडच्या टीम बद्दल जे बोलला त्यात काहीच वावग नव्हत.. सगळ जग इंग्लडच्या टीमबद्दल तेच बोलत आहे..आणी १०० टक्के ते खर आहे.. तेव्हा गावस्करला सिंगल आउट का करायचे?असो. प्रत्येकाची मर्जी!
रिअली प्राऊड ऑफ बांग्ला! काय
रिअली प्राऊड ऑफ बांग्ला! काय फाईट देताहेत.
Pages