स्पार्टाकस या आय डी चे लेखन

Submitted by कवठीचाफा on 9 March, 2015 - 00:57

कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
ट्रॅप संदर्भात मी स्पार्टाकस या आयडी ला विपूही केलेली होती परंतू काही वेळाने कोणतेही उत्तर न देता ती विपू डिलीट झाल्याचे कळले.
हे सर्व इथे मांडण्याचे कारण इतकेच की यामुळे मायबोली, आणि इतर मराठी संकेतस्थळांवर चुकीचा पायंडा पडू नये.

हे सगळे अतिशय रँडमरित्या घेतले आहेत. जमल्यास ट्रॅप या कादंबरीशी पडताळून पहावे.

बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.

(मायबोलीच्या धोरणानुसार धाग्याच्या मुख्य मजकुरातल्या लिंक काढून टाकल्या आहेत. प्रतिसादामधे पुराव्यासाठी भरपूर माहिती आहे -वेबमास्तर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो. शेंबड्या पोरालाही माझा प्रश्न स्वच्छ कलाला असता. त्याला फाटे फोडण्याची गरज नव्हती. तुमचं हे उत्तर सगळं सांगून जातं तेव्हा राहू द्यात.एक तर चूक ते चूक आणि वर आपलच खरं असा खाक्या दिसतो तुमचा. तुमच्याशी एक अक्षर बोलण्याची गरज वाटत नाही. तेव्हा तुम्हाला इग्नोर.

स्पार्टाकस या आयडीच्या वतीने दुस-या एका ठिकाणी पण काही आयड्यांनी वाचकांना उलट उत्तरं दिली आहेत. स्कोअर सेटलिंगचा आरोप केलेला आहे.

बाळू, इथे मुद्दा वाङ्मयचौर्याचा आहे. त्यावरच लक्ष राहू दे. नावडत्या आयडी/व्यक्तींना काळ्या रंगात रंगवून लेखकाने आपली मेन्टॅलिटी दाखवलेली आहे. त्याउपर आणखी काही लिहायची गरजच नाही;
ही पात्रांची नावे कोणत्या आयडीजवर बेतलेली आहेत हे लक्षात येऊन वाचकांना त्याबद्दल गंमत वाटलेली असली तरी.

लेखकाने (या आयडीने) अखेरचा नमस्कार केलाय म्हणजे देण्यासारखे आणखी स्पष्टीकरण सध्यातरी नाही. फक्त दोन कादंबर्‍या एकत्र आणताना त्यात काय फेरफार केले, अभ्यासपूर्ण संशोधन करून भर घातली ते लिहिलेले दिसते.
इतके लोक स्कोर सेटल करायला आले तर असं काय काय केलं होतं?

मयेकरजी
तुमच म्हणणं बरोबरच आहे. विषयांतराचं. पण काळ्या रंगात रंगवलेल्या पात्रांची परवानगी घेतली होती का हा मुद्दा स्पार्टाकसचं खरं नाव का दिल यावरून झालेल्या झापाझापीवरून निघाला आहे.

स्पार्टाकसचं खरं नाव द्यायचं नाही, पण स्पार्टाकसने कुणाचही नाव दिलेलं चालतं हे तर्कट झेपलं नाही. एका ठिकाणी यावरून बाळूला करमचंदी किडा चावला आहे अशी मल्लिनाथी पण झाली आहे. असो. या विषयावरऊन थांबतो.

आता खरंच बास करावं हे.
सगळेच एकमेकांवरचे स्कोअर सेटल करायला लागलेत.
स्पार्टाकस यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे.
वेनमास्तरांना ते पटते का आणि वेबमास्तर त्यावर काय कारवाई करतात ते बघणे योग्य ठरेल.
ज्यांच्याकडे त्याहीपुढचे पुरावे आहेत ते त्यांनी इथे मांडावेत किंवा परस्पर बेबमास्तरांकडे पाठवावेत.
उगाच 'तुम्ही असं का नी आम्ही तसं का' हे काल फर्स्ट रिअ‍ॅक्शन म्हणून आलं ते ठिक होतं, यापुढे खेचू नये.
किमान या धाग्यावर तरी चर्चा व्यवस्थित आणि टु द पॉईंट होऊ दे.

मूळ संकल्पना आणि काही तपशील समान आले म्हणून संपूर्ण कादंबरी चोरली आहे असा आरोप करताना या सर्व संदर्भांचा कोणी साधा विचार तरी केला होता का?
<<

कस्लं भारी एक्स्प्लनेशन आहे!

संपूर्ण कादंबरी चोरली नाही. (काही भाग चोरायचा ठेवला) प्लस दुसर्‍या गोष्टीची भर नाही का घातली? वावावा! कमालीचे क्रिएटिव्ह कर्तृत्व!

विषकन्या ईबुक म्हणून उपलब्ध आहे याचाच अर्थ कॉपीपेस्ट करणे सोप्पे आहे. Wink मी उगच विचार करत होतो, की बिचार्‍याने कष्टपूर्वक पानेच्या पाने मराठी वाचून टाईप केले असावे..

*
>>
या सगळ्या प्रकारात मला स्वत:ला आता विच हंटींगचा आणि स्कोर सेटलींगचा वास येऊ लागला आहे.
<<

या डायलॉगला तर चोर तो चोर वर शिरजोर असेच म्हणावेसे वाटते. पथेटिक.

*
>>केनेथ अँडरसनच्या ज्या शिकारकथांचा मी अनुवाद केला आहे त्याच्या प्रताधिकारावरुन मी प्रशासनाला स्पष्टीकरणही दिलेलं होतं आणि ते मान्यं करुन प्रशासनाने या कथा पुन्हा प्रकाशित केल्या आहेत.<<

हे कुठे केले आहे? इतर कथा/लेखन अप्रकाशित करण्यात आल्या आहेत काय?

व्यवस्थापनाला हे असले स्पष्टीकरण पटते आहे का?

त्यावर काय कारवाई होते, कारवाई काही केलीच, तर काय केली, व यापुढे असल्या प्रकारास काय इलाज करायची पॉलिसी ठरवली आहे, हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

नुस्तं गुपचूप आयडी ब्यान वा धागे अप्रकाशित करणे पुरेसे ठरेल, असे, वा इतरही काही करणे हा सर्वस्वी प्रशासनाचा अधिकार आहे. फक्त, पुन्हा असे प्रकार घडू नयेत म्हणून काही नवी मार्गदर्शक तत्वे ठरवण्यात आली असतील तर ती जाहिर व्हावीत, असे सुचवितो.

दुर्दैवी घटना. Sad

शिकारकथांपासुनच लेखनशैली आवडली होती.
ही कादंबरी वाचली नव्हती. पण वाचायची आहे हे मनाशी पक्के ठरवलेले.

खुलासा पुर्ण पटेलसा वाटला नाही.

असो.

बाळू स्कोअर सेटलिंग म्हणजे उदाहरणार्थं स्पार्टाकस बाजूला राहून तुमच्या आणि दिनेश. च्या प्रतिसादावर जे रान उठतंय ते.
उगाच डायवर्जन फ्रॉम मेन सब्जेक्ट.

उगाच ?
तिथं या विषयावर मी मत दिलं होतं. त्याला क्रॉस करणारं मत कुठलीही शहानिशा न करता मांडण्यात आलय आणि विचारल्यावर काही एक गरज नाही असं उर्मट उत्तर दिलं जातंय. तुमच्या नावाचा असा न विचारता गैरवापर झाला अस्सता तर ? किमान अशी चोरी उघडकीला आल्यावर उल्लेख केलाच असतात की नाही ?

याला उगाच म्हणणे आणि उगाचच सल्ले देणे पटले नाही.

काय हौस असते एकेकाला शर्टावर १)बिल्ले लावून २)उसने बिल्ले लावून फिरायची !
आता इथे ३)मायबोलीच्या टीशर्टवर हा आणखी एक मुद्दा वाढला.

कोणी काय, कुठून, कसे लिहावे ह्यात प्रशासनाचा काय संबंध? कोणी काहीही लिहू शकते.

फारतर ते जसेच्या तसे कॉपी असेल तर ते लिखाण अप्रकाशित करणे एवढेच काम प्रशासन करू शकते. तो हक्क त्यांच्याकडे आहेच आणि ते येथे येणार्‍यांना ऑलरेडी माहिती आहे. मग अजून काय अपेक्षित आहे? जस्ट वन्डरिंग.

हॅविंग सेड दॅट - अ‍ॅडमिनने ते पुराव्याचे स्क्रिनशॉट काढायला नको होतेच.

--------

स्पार्टाकस ह्यांचे स्पष्टीकरण अपूरे आहे. लिखाणावर जर ग्रेट, सुपर अश्या प्रतिक्रिया आल्यावर आनंद होत असेल तर ती चोरी आहे कळल्यावर रागाच्या प्रतिक्रिया येणारच. ते म्हणतात त्यांच्याविषयी स्कोअर सेटल करत आहेत. का बुआ? कोण असे कशाला करेल? तुम्ही ओळ न ओळ कॉपी केली आहे (काही पॅरेग्राफ) तुम्ही क्लिनली माफी मागा, मायबोलीकर नक्कीच तेवढे उदार आहेत. पण माफी मागा, वरच्यासारखे लिहू नका.

आणि मला वाटतं त्यांच्या आयडी वगैरे बॅन करायची गरज नाही, एव्हरीबडी डिजर्व्हस अ सेकंड चान्स. (क्लिनली माफी मागितल्यावर)

केदार,
"केनेथ अँडरसनच्या ज्या शिकारकथांचा मी अनुवाद केला आहे त्याच्या प्रताधिकारावरुन मी प्रशासनाला स्पष्टीकरणही दिलेलं होतं आणि ते मान्यं करुन प्रशासनाने या कथा पुन्हा प्रकाशित केल्या आहेत."

या वाक्यावरून एकंदर जे काही घडले त्यात त्यांची काहीच चूक नाही अन प्रशासन त्यांच्या बाजूनेच आहे असे भासविण्याचा प्रयत्न नाही वाटत का?

गप्पा मारताना वाहत्या धाग्यावर लिहिलेली कविताही माबोवर उडवली जाते, प्रताधिकाराचा भंग म्हणून. ट्रॅपचा शेवटला भाग तरी या क्षणी मला दिसतोय. कुणी काय प्रकाशित्/अप्रकाशित केलंय इथे? अशा परिस्थितीत पॉलिसी डिसिजन काय येतेय त्याची उत्सुकता नसावी?

*

*अनुवाद करताना मूळ लेखकाची परवानगी लागते बहुतेक. ती नसली तर नुसता मूळ पुस्तकाचा उल्लेख पुरेसा होतो का?

अहो इब्लिस हे त्यांनी लिहिले आहे, त्यांचे लिहिणे म्हणजे प्रशासनाचा स्टॅन्ड आहे का? त्यांच्या त्या वाक्याने ते जे भासवत आहेत ते न कळण्याइतके येथील वाचक आहेत का?

आणि जर प्रशासनाला ते खरेच मान्य असेल तर मग काय प्रॉब्लेम आहे? लेखकाने योग्य ती काळजी घेतली असावी त्या लेखांबाबत.

माझ्यामते प्रशासनाने मागे जी यादी दिली होती ती पुरेशी आहे. कॉपिराईट लॉज कॉपी / पेस्टला प्रतिबंध करते आणि मागेही प्रशासनाने लिहिले आहे की मायबोलीला सायबर लॉज आणि कॉपीराईट लॉज फॉलो करावे लागतात. ही साईट अपवाद आहे का? म्हणून लिहिले अजून काय स्टॅन्ड घ्यावा? तो ऑलरेडी घेतला आहे असे IMHO

पण तो पुरावा अ‍ॅडमिनने काढल्यामुळे त्यांनी "प्रताधिकाराचा भंग" म्हणजे काय हे त्यांना अजून माहीत नसल्याचे दर्शविले आहे. ज्यामुळे त्यांच्या एकूण भूमिकेबद्दल गोंधळ उडाला आहे.

स्पार्टाकस यांचा आयडी गोठवला आहे.

इंटरनेटवर वाङमयचौर्य पूर्णपणे थांबवणे अशक्य आहे. पण मराठीतले एक जबाबदार संकेतस्थळ म्हणून मायबोलीने स्वतःपुरते तरी अशा प्रकाराना आळा घालण्याचे प्रयत्न करत राहणे आवश्यक आहे. स्पार्टाकस यांचे स्पष्टीकरण येण्याअगोदर काही करणे योग्य नव्हते. त्यांचे आलेले स्पष्टीकरण मोघम आहे आणि विशिष्ट वाक्यांबद्दल, परिच्छेदांबद्दल (जिथे त्यांनी वाङमयचौर्य केले असा आरोप आहे) त्यांनी काहीच युक्तीवाद केलेला नाही. ज्या वाक्यांचा पुरावा म्हणून उल्लेख आहे तशी अनेक वाक्ये आहेत (एखाद दुसरे नाही)

केनेथ अँडरसनच्या ज्या गोष्टींबद्दल उल्लेख आहे त्याचे प्रताधिकार नक्की कोणाकडे आहेत याबाबत स्पष्टता नसल्यामुळे त्यांना परवानगी दिली होती. त्याबद्दल जर ठोस माहिती मिळाली तर योग्य तो निर्णय घेता येईल.

ज्या मायबोलीकरांनी सतर्कपणे ही गोष्ट दाखवून दिली त्यांचे आभार.

भुताळी जहाज या मालिकेत पण तुम्ही ओशन ट्रेगल पुस्तकातले उतारे जशेच्या तसे नकलून काढले होते . मी एका धाग्यावर तशी शंका पण उपस्थित केली होती पण तुम्ही मी त्या पुस्तकातून फक्त संदर्भ घेतले आहेत असा केविलवाणा बचाव केला होतात . पण अनुवाद /स्वैर भांषांतर वेगळे आणि स्वतःचा लेप खऱ्या लिखाणावर चढवणे वेगळे . तुम्ही पुस्तकातली वाक्य जशीच्या तशी नकलून काढलीत . याला सभ्य भाषेत साहित्यिक चोरी म्हणतात . त्यामुळे त्यावेळेपासूनच तुमच्या लिखाणातला रस हरवला त्यामुळे तुमची कादंबरी वाचली नाही . पण लोक म्हणतायेत की तुम्ही निरंजन घाटे यांच्या पुस्तकातल्या ओळी जशाच्या तशा चोप्य पस्ते केल्या आहेत . एकाचवेळेस एकच कथा दोन लोकांना सुचू शकते हे मान्य (खर तर तुमच्या केस मध्ये हे मान्य करणे पण अवघड जात आहे )पण जशीच्या तशी वाक्य कशी येऊ शकतात ? या मुद्द्याला तुम्ही सोयीस्कर टांग मारली आहे या चमत्काराचे स्पष्टीकरण तुम्ही तुमच्या वाचकांना देणे लागता असे वाटते . कारण तुमच्या लिखाणाची आतुरतेने वाट बघणारा असा एक वर्ग आहे त्याचा तुम्ही विश्वासघात केला आहे . पण सगळ्यात मोठा घात आहे तो ओरिजनल लिखाण करणाऱ्या लेखकांचा . लोक तुम्हाला म्हणतायेत की लिखाण चालू ठेवा पण माझा अनाहूत सल्ला आहे की असे प्रकार करणार असाल तर लिखाण करू नका कारण तुमच्यामुळे यापुढे कोणीही चांगले लिखाण केले तरी ते संशयाच्या भोवऱ्यात राहणार आहे . एकूणच आंतरजालीय लिखाणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभ करण्याची कामगिरी तुम्ही बजावली आहे . धन्यवाद . लोभ नसावा .

वेबमास्तर,
संपूर्ण प्रकरणात आपली भूमिका खरंच आदर्श आहे.
आरोपीला स्पष्टीकरणाची संधी देऊन, शहानिशा करून केलेल्या योग्य त्या कारवाईबद्दल धन्यवाद!

आरोपीला स्पष्टीकरणाची संधी देऊन, शहानिशा करून केलेल्या योग्य त्या कारवाईबद्दल धन्यवाद!>>+१

पण आयडीबरोबर ते सर्व लेख्पण गोठवले पाहिजे.

पण आयडीबरोबर ते सर्व लेख्पण गोठवले पाहिजे. >>> प्रताधिकाराचा भंग होतो म्हणून ना ? काम वाढणार आहे.

वेबमास्तर,
संपूर्ण प्रकरणात आपली भूमिका खरंच आदर्श आहे.
आरोपीला स्पष्टीकरणाची संधी देऊन, शहानिशा करून केलेल्या योग्य त्या कारवाईबद्दल धन्यवाद!

वाङमय चौर्य आहे हे सिद्ध करणारे स्क्रीन शॉट्स ठेवायला हवे होते. Fair Use Doctrine प्रमाणे तो प्रताधिकाराचा भंग होत नाही.

धन्यवाद वेमा. पण ज्या तत्परतेने पुरावे नष्ट केले तेवढ्याच तातडीने ही वादग्रस्त कादंबरी त्यावरच्या सर्व कौतुकाच्या प्रतिसादांसकट डिलीट करायला हवी. कितीही कृत्रिमरीत्या सरमिसळ केली तरी काही परिच्छेद जसेच्या तसे उचलले आहेत हे उघड आहे. हा प्रताधिकाराचा भंग आहे. नसल्यास लेखकाने मूळ लेखकांची मिळवलेली लेखी परवानगी इथे सादर करावी. जर याबाबतीत प्रशासनाची खात्री झाली असेल तर बहुमत लक्षात घेऊन ही कादंबरी डिलीट करावी जेणेकरून यावरून धडा घेता येईल.
पापाचा द्वेष करा पाप्याचा नव्हे या न्यायाने आयडी गोठवण्यापेक्षा आधी कादंबरी डिलीट करायला हवी होती असं मला वाटतं.

माननीय वेबमास्टर,

आपण अत्यंत न्याय्यपणे सर्व प्रक्रिया हाताळलीत हे पाहून खूप आनंद झाला. आभार मानतो आपले.

मयेकरांनी टाकलेला स्क्रीनशॉट आहे कुठे ? का तो उडवला गेलाय ?
पण ट्रॅप कादंबरीकात स्पार्टाकस ला अख्या मायबोलिनी डोक्यावर घेतलं एवढ मात्र खर. सहसा मायबोलीवरच
कांदबरी वाचन मी करत नाही .पण स्पार्टाकस च कौतुक जिकडे तिकडे वाहत्या धाग्यावर वाचल्यामुळे मी तीन-चार भाग वाचले आणि त्यांची लेखनानी जबरदस्त भारावून गेले .त्या करता मी त्यांच्या विपुत जाऊन तुम्ही भारतातल्या रायटर्स असोसिअशन कडे जाऊन तुमच्या कथेच रजिस्ट्रेशन करा. म्हणजे कोणी तुमची कथा चोरणार नाही अस सुचवलं होत. त्या करता माझ्या कडून मदत पण देऊ केली होती पण त्या विपु ला साध उत्तर द्यायचं पण त्यांनी सौजन्य दाखवलं नाही निदान आत्ता नको नंतर कधी तरी अस तरी ते म्हणू शकले असते.

ते आणि तस सौजन्य त्यांनी का दाखवलं नाही हे आत्ता मला समजतंय. वरिजनल लेखन त्याचं होतच कुठे ? Happy
आणि कोपी पेस्टच असल्याने धडाक्याने कादंबरीचे पुढचे पुढचे भाग येत होतेच त्याच पण मायबोलीकरांनी कौतुक केल आहेच Happy

असो पण चोरी इतकी बेमालूम होती त्या करता त्यांच कौतुकच ( ?) करायला पाहिजे. काही म्हणा कुठलेही चोर ( पैसे चोर/वाग्मय चोर )हे प्रचंड हुशार असतात. आपल्याला आपले पैसे आपण कुठे ठेवलेले आहेत हे माहित असूनही, हातोहात रेल्वेत मध्ये /रस्त्यावर पर्स कापल्या जातात कि अवाक व्हायला होत. इथे तर ती " विषकन्या " अशा नावाची एक कादंबरी आहे .त्या कांदबरीचे लेखक कोण ? ती कुठल्या वर्षी लिहिली गेली इत्यादी इत्यादी फारच कमी लोकांना माहित असल्यानेच त्याची चोरी इतका काळ लपून राहिली.
आपले पैसे चोरले गेलेत हे आपल्याला ताबडतोब किवा काही तासात कळत इथे ते कळायला वेळ लागला इतकच .
पण दोन्ही चोरांची शिताफी अफाट आहे Happy

दुर्दैवी प्रकार Sad

एक शन्का आहे .
समजा जर बेफिना आम्ही गुमॉमॅ आणि ट्रॅपच्या साधर्म्याबद्दल वेळीच कळवले असते आणि त्यावर त्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली असती , तर प्रशासनाने काय भूमिका घेतली असती?

गुमॉमॅ मधली वाक्य चोरली नसतिल पण सर्वाना आठवण यावीत इतके साधर्म्य होते .

आज बेफि आहेत , उद्या त्यान्च्या जागी कोणी दुसरे असतिल .

प्रशासन नियम स्पष्ट करणार का ?

Pages