स्पार्टाकस या आय डी चे लेखन

Submitted by कवठीचाफा on 9 March, 2015 - 00:57

कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
ट्रॅप संदर्भात मी स्पार्टाकस या आयडी ला विपूही केलेली होती परंतू काही वेळाने कोणतेही उत्तर न देता ती विपू डिलीट झाल्याचे कळले.
हे सर्व इथे मांडण्याचे कारण इतकेच की यामुळे मायबोली, आणि इतर मराठी संकेतस्थळांवर चुकीचा पायंडा पडू नये.

हे सगळे अतिशय रँडमरित्या घेतले आहेत. जमल्यास ट्रॅप या कादंबरीशी पडताळून पहावे.

बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.

(मायबोलीच्या धोरणानुसार धाग्याच्या मुख्य मजकुरातल्या लिंक काढून टाकल्या आहेत. प्रतिसादामधे पुराव्यासाठी भरपूर माहिती आहे -वेबमास्तर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओहो!!!! तर कचा ओरिजिनल कर्नल एम् आहे तर!!! कुमार कवठा हे आपले चाफा गुप्ता नाही कुमार गुप्ता नाही नाही कवठी चाफा (हुश्श्......) हे काय हो केलेत!!!

सोन्याबापू.. Rofl

कचा म्हणजे हिमनग आहे. वरवर एक साधाभोळा, सभ्य आणि सज्जन लेखक दिसतो. प्रत्यक्षात लै डेंजर माणुस हे. मराठीतला गब्बरच म्हणाना .... Wink

अ‍ॅडमिन यांनी आपली भूमिका स्पष्टपणे विषद करणे आवश्यक आहे, पुरावा म्हणुन दिलेली पुस्तकाची पाने हा प्रताधिकाराचा भंग म्हणुन पोष्ट अप्रकाशित केली गेली असेल तर 'ते' लिखाण देखिल का अप्रकाशित होऊ नये??

हे खरं असेल तर अत्यंत दुर्दैवी आहे.

प्रशासनाने प्रताधिकार-जपणुकीपलीकडेही काहीएक मत/धोरण मांडणं अपेक्षित आहे.

पहिल्याच पानावरचा स्पार्टाकस यांचा प्रतिसाद / खुलासा वाचला आणि अगदीच राहावले नाही म्हणून हा प्रतिसाद लिहितोय. ट्रॅप पूर्ण वाचली. या आधी बेफिंची 'गुड मॉर्निंग मॅडम' आणि वर उल्लेख केलेली कादंबरी वाचलेली आहे. दोन्ही कथानक एकत्र करुन, त्यात आणखी मजकूर वाढवून ट्रॅप लिहिण्यात आलेय हे खात्रिपुर्वक सांगू शकतो. स्पार्टाकस यांचा प्रतिसाद / खुलासा पटण्यासारखा नक्कीच नाही इतकी साम्यस्थळ सापडतील. जिज्ञासुंनी खात्री करुन घ्यावी.

(पुढे प्रतिसाद लिहावा की नको या संभ्रमात असलेला)

सोनेरी गरुड

Uhoh

स्वाती +१

इकडे जी लोक जाऊदे ते नवी चांगली कथा लिहितील म्हणताहेत ते झालेल्या वाडमय (तो ड कसा लिहितात?) चोरीबद्दल काही बोलत का नाही आहेत. समजा काही परिच्छेद जरी ढापले असतील तर ज्या रेटने त्याचं श्रेय घेण्यात आलं आहे त्याच न्यायाने इथे कारवाई अपेक्शित नाही का?
I am surprised if admin thinks it is important to delete the evidence as its a copyright how come copying that originally here cannot be a copyright issue?

वेका, admin त्यांच्या परीने चौकशी करत असतील.
तसेच या दरम्यान स्पार्टाकस यांनाही साम्य असलेले आपले परिच्छेद बदलून लिहायला वेळ मिळेल.
पण तोपर्यंत बुकगंगावरच्या स्क्रीन्शॉटसनी मायबोलीवर काही आक्षेप येऊ नये म्हणून उडवले असतील.
आपण थोडावेळ वाट पाहू!

ङ = shift + g

साती Proud
स्पार्टाकस, वर उल्लेख केलेलं लेखन 'मी वाचलेलं नाही' हे तुमचं स्पष्टीकरण अतिशय तोकडं आहे. जर लोकं अख्खेच्या अख्खे पॅरेग्राफ तंतोतंत जुळतायत म्हणतायत म्हणतायत तर त्यावर तुमचं काय म्हणणं आहे हे अपेक्षित आहे.

साती , परीच्छेद नाहीत ते बदलायचे म्हंटलं तर कादंबरी उरणार नाही .

विशल्या मी गब्बर होय रे ?? Happy

या प्रकरणाची अधिक शहानिशा करण्याचा काही प्रश्नच नसताना अ‍ॅडमिन यांनी स्पार्टाकस यांची ट्रॅप कादंबरी आधी अप्रकाशित करायला हवी होती. त्याऐवजी पुरावे म्हणून दिलेले स्क्रीन शॉट्स उडवले यात काय लॉजिक आहे? शिवाय अल्पना म्हणाली तसं पुरावे अप्रकाशित करण्याव्यतिरिक्त चोरीबद्दल काही तरी कमेंट वाचायला आवडलं असतं.

ओरड झाल्यावर ब्दलले पॅरा तर झालं?
खपून गेलं असतं त्र चाल्लं असतं का?

पुरावे दिल्याब्द्दल प्रताधिकार भंग म्हणून जागरूक बद्ल आणि खर्‍या चोरीबद्दल डोळ्यावर कातडे?

दुर्दैवी प्रकार. Sad अ‍ॅडमिन्/नेमस्तक यांनी शहानिशा (?) होई पर्यंत श्री. स्पार्टाकस यांचा आयडी निलंबित करावा जेणेकरुन ते आपल्या लिखाणामध्ये काही बदल करु शकणार नाहीत.

आता पुढील उपाय:
१. स्पार्टाकसनी खरोखर चूक केलेली असल्यास मान्य करावी आणि माफी मागावी. प्रश्न मिटेल. काही माबोकर वगळता (आपले ते हे हो!) बाकीचे नक्कीच मोठ्या मनाने माफ करतील अन्‌ पुढील चांगले लिखाण सर्वाना वाचता येईल.
२. स्पार्टाकसनी आपला नवा आयडी काढावा नि तिथे ओरिजिनल लिखाण डकवावे. स्पार्टाकस हा आयडी इतिहासजमा करावा.

निरंजन घाट्यांची का नको?>>हरकत नाहीच, पण तो निर्णय अॅडमिनचा!

काही माबोकर वगळता (आपले ते हे हो!) बाकीचे नक्कीच मोठ्या मनाने माफ करतील अन्‌ पुढील चांगले लिखाण सर्वाना वाचता येईल >>

डोळ्यावरची पट्टी जितक्या लवकर काढाल तितक्या लवकर मन साफ होईल आपले .

परीच्छेद नाहीत ते बदलायचे म्हंटलं तर कादंबरी उरणार नाही .>>> मुळ कादंबरी मधील कथानक जसेच्या तसे घेतलेय आणि ते मान्य करायला स्पार्टाकस तयार नाहीत हा माझा आक्षेप आहे.

(स्पार्टाकस यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत असलेला)

सोनेरी गरुड

नीधपशी सहमत ! >>पुरावे दिल्याबद्दल प्रताधिकार भंग म्हणून जागरूक बद्ल आणि खर्‍या चोरीबद्दल डोळ्यावर कातडे?>>
अजब अनाकलनीय आहे हे प्रताधिकार प्रकरण मुळातच एकूणच . उदा. एखादी मूळ अन्यभाषिक रचना देऊन पद्यानुवाद करणं किंवा त्यावर लिहिणं ही एक creative सलामी देणं असतं ,मूळ रचनाकाराला श्रेय देऊन किंवा देण्यासाठी केलेली एक समांतर निर्मिती. ते आक्षेपार्ह , आणि साहित्यिक चौर्यकर्म मात्र अधिक चलाखीने केल्यास खपूनही जाईल !

Pages