स्पार्टाकस या आय डी चे लेखन

Submitted by कवठीचाफा on 9 March, 2015 - 00:57

कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
ट्रॅप संदर्भात मी स्पार्टाकस या आयडी ला विपूही केलेली होती परंतू काही वेळाने कोणतेही उत्तर न देता ती विपू डिलीट झाल्याचे कळले.
हे सर्व इथे मांडण्याचे कारण इतकेच की यामुळे मायबोली, आणि इतर मराठी संकेतस्थळांवर चुकीचा पायंडा पडू नये.

हे सगळे अतिशय रँडमरित्या घेतले आहेत. जमल्यास ट्रॅप या कादंबरीशी पडताळून पहावे.

बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.

(मायबोलीच्या धोरणानुसार धाग्याच्या मुख्य मजकुरातल्या लिंक काढून टाकल्या आहेत. प्रतिसादामधे पुराव्यासाठी भरपूर माहिती आहे -वेबमास्तर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्पार्टाकस,
असे लंगडे स्पष्टीकरण देऊन काय साधत आहेत हे अद्याप कळत नाही. प्रकरण संकेतस्थळांच्या बाहेर जाऊ नये असे वाटते, अन्यथा ट्रॅप आणि भुताळी जहाजे यांच्या लिंक निरंजन घाटे आणि बाळ भागवत यांच्यापर्यंत पोहोचवणे सहज शक्य आहे. त्याच बरोबर इथे जरी स्क्रिनशॉट टाकलेले चालत नसतील तरी ब्लॉगवर टाकणे सहज शक्य होते, यापैकी एकही केलेले नाही. पण स्पार्टाकस विचहंटींग आणि स्कोअरसेटलींग म्हणत असतील तर ते तसे करावे का ?

लोकहो आता स्पार्टाकस ह्यांना त्यांच्या ह्या आयडीने तरी काही वाचता येणार नाही.. जो पर्यंत ते नवीन आयडी घेऊन येत नाहीत.. आणि आले तरी इथे काही लिहितील असे वाटत नाही.. तस्मात ह्या धाग्यावर अजून पोस्ट न टाकणे योग्य होईल..

ते चक्क पळ काढत आहेत, बाकी काही नाही. कुठल्याही मराठी संस्थळावर न लिहिण्याच्या त्यांच्या प्रतिज्ञेने मराठी साहित्याची हानी वगैरे काही होणार नाहिये. त्यामुळे त्यांचा अखेरचा नमस्कार स्विकारण्यात यावा.

आपण तर स्पष्ट बोलतो ! ओरिजिनल लेखन नसले सुचत तर रसिक जाणकार वाचक व्हावे!! ते उत्तम!! अन बरेचदा होते ही तसेच ! आपल्याला एखाद्या विषयाबाबत राइटर्स ब्लॉक येतो पण त्याच विषयावर जर कोणी धाराप्रवाही लेखन केल्यास आपल्याला कमेंट मधे वैल्यू एडिशन करता येतेच्!! गेला बाजार फारच लिहायचेच असले तर सरळ भाषांतर भावांतर करावे!!! प्लॉट डोळ्यासमोर असतो रायटर्स ब्लॉक चा बी विषय नाही अन लेखन आनंद ही मिळतो!

(फ़क्त त्यात्या लेखकाला श्रेय दिलेच पाहिजे देवाणु)

फारच दुर्दैवी प्रकार आहे हा. आता पुढे इथे कुठलही साहित्य वाचताना मनात शंका येणार की हे खरच लेखकाचचं लिखाण आहे का?
असो. अ‍ॅडमिनच्या निर्णयाचे स्वागत.

अ‍ॅडमिन निर्णय योग्य आहे. पण "ट्रॅप" प्रताधिकाराचा भंग याअंतर्गत येते की नाही हे सांगाल का प्लीज? म्हणजे ट्रॅप जर प्रताधिकाराचा भंग ठरत असेल तर ती कादंबरी अप्रकाशित किंवा डिलीट कराल ना?

लोकहो आता स्पार्टाकस ह्यांना त्यांच्या ह्या आयडीने तरी काही वाचता येणार नाही.. जो पर्यंत ते नवीन आयडी घेऊन येत नाहीत..
>>>

आयडी शिवाय वाचता येते ना?

सभासदत्व नसतानाही मायबोली वाचता येते फक्त प्रतिसाद देता येत नाही. आणि माझ्या माहितीप्रमाणे बरेचजण इथले लिखाण वाचुनच इथे सभासद झालेत.
बरेच दिवसांनी मायबोलीवर काहीतरी वाचण्यायोग्य आल्यामुळे मी तर लोकांना आवर्जुन वाचा असे सांगत होते स्पार्टाकस यांचे लिखाण. आता एकुणातच सगळा प्रकार बघता आणि त्यावरचे त्यांचे स्पष्टीकरण बघता स्वतःचीच फसवणूक झाल्याची भावना येतेय मनात. असो.

मयेकर जर हा धागा सार्वजनिक असेल तरच त्यांना वाचता येईल..

हा धागा आपली मायबोली ह्या ग्रुप मध्ये काढलेला आहे त्यामुळे कचाच सांगु शकतील की धागा सार्वजनिक आहे की नाही ते.

कादंबरीचे नावच ट्रॅप होते

त्यामुळे स्पार्टाकस यांचा प्रतिसाद येईतोवर आशा होती की झालेल्या गोष्टीबद्दल, मी बघत होतो माझ्या ट्रॅप मधे माबो वाचक फसताहेत की नाही सदृष्य काहीतरी प्रतिसाद आणि माफी किंवा किमानपक्षी दिलगिरी तरी व्यक्त केली जाईल

पण ह्या आयडीने घोर निराशा केली.

लेखन शैली चांगली होती क्रमशः लिखाण कुठे थांबवावे म्हणजे वाचकांची उत्कंठा टिकून राहू शकते ह्याबाबत त्यांचे ठोकताळे / आडाखे मस्त होते ....

पण सपशेल फसायला झाले राव Sad

स्पार्टाकस यांचा आयडी गोठवला आहे.>>>>

पण मग आता त्या आयडी वरुन ती व्यक्ती काही activity करु शकणार की नाही(म्हणजे प्रतिसाद देणे वगैरे)?

सगळे प्रतिसाद +१
काल हा धागा वाचून बराच वेळ अस्वस्थ होईला झालं कारण ट्रॅप ही आत्तापर्यंत मी वाचलेली सर्वात सुंदर कादंबरी होती.
विषकन्या कधी वाचली नव्हती. नाव बघता वाचली असती असही वाटत नाही. काश ट्रॅपच ओरिजनल असती Sad असो!

हा धागा कवठीचाफा या आयडीने काढल्यानेच अगदी धागा पाहिल्या पाहिल्या धक्का बसला. कारण तिथे 'नसेल असं, खोटं असेल हे' वगैरे मनाची समजूतही काढता येत नव्हती.
चाफ्याने सांगितलं म्हणजे खरच असणार आणि हे असलं 'खरं; ट्रॅपबद्दल आणि स्पार्टाकसबद्दल आहे हे सगळं वाटून आणखी वाईट वाटत होतं Sad

असो!
वेमा, ट्रॅपही इथुन जायला हवीच की. आयडी गोठवून उपयोग काय?

ट्रॅप वाचायची जबरदस्त इच्छा होती पण ..... Sad
धन्स चाफ्या....तुस्सी ग्रेट हो! __/\__
हा धागा कवठीचाफा या आयडीने काढल्यानेच अगदी धागा पाहिल्या पाहिल्या धक्का बसला. कारण तिथे 'नसेल असं, खोटं असेल हे' वगैरे मनाची समजूतही काढता येत नव्हती.
चाफ्याने सांगितलं म्हणजे खरच असणार>>> रियाला हजार मोदक Happy

इथे अनेकांनी ताबडतोब स्पार्टाकसांचे लेखन अप्रकाशीत करावे तसेच हा धागाही टाळेबंद करावा इ. सुचवले आहे.

का? अंतिम निष्कर्ष निघाला का? काय आहे तो?

वेमा
आयडी गोठवण्यापेक्षा हा प्रताधिकाराचा भंग होता की नाही ते स्प्ष्ट करून जर प्रताधिकाराचा भंग असेल तर हे लेखन अप्रकाशित करावे. जर नियमाप्रमाणे प्रताधिकाराचा भंग होत नसेल तर लेखन आणि आयडी दोन्ही मायबोलीवर रहायला हवे.

विषकन्या आणि ट्रॅप -५ , केवळ गंमत म्हणून परत वाचायले घेतले .

१.प्रकाशकाचे नाव रवि बेहरे >>> आणि चौकडीतल्या चांगल्या व्यक्तिचे नाव "निरंजन" गुप्ता .
२.अम्रुता आणि अर्चनाचं वर्णन ९९% त्याच शब्दात
३.अम्रुता/चेतन आणि अर्चना/नितिन याना कर्नल साहेबाची विशिष्ट ढब अचूक माहित होती .
४. फक्त दोन पेस्ट्रीज मागवल्यावर अम्रुता आणि अर्चना दोघानीही आश्चर्य व्यक्त केलं
५.आता , चेतन आणि कर्नल त्यांच्या ऑफिसमध्ये कॉफि आणि पेस्ट्रीस मागवतात आणि ( त्या खाउन ) कोन्फरन्स रूम्मध्ये जातात . तिथे शीतपेय असतात .
पण नितिन आणि ब्रिगेडिअर कॉफि आणि पेस्ट्रीस मागवतात , लगेचच कॉन्फरअन्स रूम्मध्ये जातात आणि तिथे नितिन शीतपेय पितो .
हे गूफ-अप , ट्रॅप-५ वाचताना लक्शात आणून दिल होत.
कदाचित उचलेगिरी करताना सुसंगति राहिली नाही , हे आता जाणवतयं .
६.मिलीटरी इंटेलिजन्स विभागाची कॉन्फरन्स रूम - हे वर्णन अगदी कॉपी-पेस्ट .
७.ब्रिगेडिअर आणि चेतन्/नितिन्मधल प्रेमळ संभाषण : एखाद्या दिवशी खड्ड्यात पडशील , शिव्यांचा शब्द्कोष.

मॅनेजर ऑफिसमध्ये नाही , त्यामुळे वेळ जरा (सत्)कारणी लावला Happy

पण आता विषकन्या पूर्ण वाचायचा मोह आवरत नाहीये. वाचूनच ठरवता येइल ( माझ्यापुरतचं) कितपत विश्वासघात Sad

ओह, असे आहे का ?
माझं नाव नव्हतं ना वापरलं कुठे ? डोळा मारा>>>

दिनेशदा , तुम्ही विचारलच म्हणून सांगते ,

<<<<<<<

"मिस पाठक, तुम्ही एका जबाबदार वकीलावर संशय घेत आहात! याबद्दल मी तुमच्यावर खटला दाखल करु शकतो!" अ‍ॅड. पत्की पूर्वीच्याच शांतपणे म्हणाले, "पण मी तसं करणार नाही! मि. आदित्य पाठकनी माझ्यासमोर या विलवर सही केली आहे! त्या प्रसंगी हजर असलेले विटनेसेस् मी तुमच्या पुढे उभे करु शकतो! हे विटनेसेस आहेत रिटायर्ड हायकोर्ट जज मि. अशोक पाटील, रिटायर्ड क्रिकेटर मोहींदर अमरनाथ आणि रिटायर्ड कर्नल दिनेश शिंदे! या विलवर मि. पाठकांच्याबरोबर त्यांच्याही सह्या आहेत! हे विल कोर्टात रजिस्टर झालेलं आहे! तुमची इच्छा असल्यास याची कॉपी तुम्ही कोर्टातून मिळवू शकता!"
>>>>>>

ट्रॅप -८ मधून साभार Happy

स्पार्टा स्टाइलने माबोमधल्या आयडींचे नावे पेरुन "महाभारत" आणि "रामयण" ची भेळ करता येइल.. Wink Light 1
आणि त्याने बहुतेक प्रताधिकार भंगही होणार नाही..व्यासांनी किंवा वाल्मिकींनी कॉपीराईट घेतल्याचे ऐकिवात नाही...
शिवाय त्यातल्या सगळ्या टाइपचे लोक्स इथे नक्किच सापडतिल..

अवांतर शंका,,
आपल्याकडे बॉलिवुड मध्ये प्रचंड प्रमाणात उचलेगीरी/चोरी चालते, कथा आणि कल्पना तर जाउद्या अक्षरशः सिन कॉपी केलेले पण पाहिलेत, अर्थातच बॉलीवुड वाले काही इतके साळ्सुद नाहित की ते प्रवानगी घेउन असं काही करतिल.
त्यावेळी देखिल अशाच तिखट प्रतिक्रिया असतात का? जशा स्पार्टाबद्द्ल आल्यात Uhoh

Pages