स्पार्टाकस या आय डी चे लेखन

Submitted by कवठीचाफा on 9 March, 2015 - 00:57

कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
ट्रॅप संदर्भात मी स्पार्टाकस या आयडी ला विपूही केलेली होती परंतू काही वेळाने कोणतेही उत्तर न देता ती विपू डिलीट झाल्याचे कळले.
हे सर्व इथे मांडण्याचे कारण इतकेच की यामुळे मायबोली, आणि इतर मराठी संकेतस्थळांवर चुकीचा पायंडा पडू नये.

हे सगळे अतिशय रँडमरित्या घेतले आहेत. जमल्यास ट्रॅप या कादंबरीशी पडताळून पहावे.

बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.

(मायबोलीच्या धोरणानुसार धाग्याच्या मुख्य मजकुरातल्या लिंक काढून टाकल्या आहेत. प्रतिसादामधे पुराव्यासाठी भरपूर माहिती आहे -वेबमास्तर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडं गावाला म्हनतात

अती शहाना त्याचा बैल रीकामा.

म्हनजे चोरी केली. एका घरात नाहि, तीन तीन घरात डाका घातला. ज्यांच्या घरात डाका घातला त्यांचीच कम्प्लेट केली. आनि जी सुसंस्क्रुत मानस आहेत त्यान्च्या नावानं बदनामी करना-या जाहीराती छापल्या. त्यानाच चोर ठरवलं. बर, जे शक्ती कपूर, कादर खान, रणजीत, अमजद खान, परेश रावल, सदाशिव अमरापूरकर आहेत त्या आपल्या साथीदारांना चांगले धंदे काढुन त्यांना सेटल करूना दिलं. पिक्चर मधे नाही का आधी स्मगलर असतो मग तो सेठ होतो तसं. आता इतके उद्योग केल्यावर कधीतरी कानाखाली जाळ निघनारच की कधीतरी ! शेवटच्या रीळात हिरो लै बदडतो. असा हानतो अस्सा हानतो की जेचं नाव त्ये !
स्क्रिप्टी-नियती काय गप्प बसत नाय.

विशाल, मामी..
पाणबुडीच्या प्रवासाचे डीटेल्सही मुळ कथेतले आहेत जसेच्यातसे ं ंू

वर्षूतै, मूर्खात नाही मूर्खाबाहेर काढलं म्हणा! कवठीचाफ्याने!! Happy
आ.न.,
-गा.पै.

अहो मी पण घाबरत माझी पहिली "एस्पिओनाज लघु कथा" टाकली होती माबो वर!! पण ओरिजिनल मामला होता!!, दुसरी एक २ अंकी कथा होती त्यात संदर्भात विकिपीडिया पासुन साऱ्या लोकांस कौतिक अन श्रेय दिले होते,

स्पार्टा भाऊ, हे बरे नव्हे!! कारण तुम्ही आम्ही किती ही लिहिले तरीपण आपण "हौशी" लेखकु लोकं आहोत!!! इतके तंतोतंत् उचलण्या सारखे काही कटथ्रोट नव्हते!! अर्थात मी सद्ध्या टाइट लिप्ड आहे! माननीय प्रशासक जे कारवाई करतील ती पाहू!!

कचा चे आभार _/\_

अतिशय दुर्दैवी आहे हे.

ट्रॅप ३ च्या भागावर मी एक प्रतिसाद दिला होता की या लेखनाची स्टाईल बदलल्यासारखी वाटतेय Sad
------------
सावली | 2 January, 2015 - 12:16
उत्कंठावर्धक! मस्त. आधीचेही भाग वाचले. आणि त्या आधीच्या सिरीजही वाचल्या. सगळ्याच मस्त.

पण या भागातली तुमची स्टाईल एकदम बदलल्यासारखी का वाटतेय..? आधीच्या लेखनापेक्षा थोडी वेगळी वाटतेय.

( बेस्ड स्टोरी असे म्हणणार नाही, पण 'विंडमील्स ऑफ गॉड' मधे सुरुवातीला / मधेमधे ट्रॅक बदलुन जंगलात घडणार्‍या मिटींग्स दाखवल्या आहेत त्याची नक्कीच आठवण झाली. पण त्यावर तुमची स्टोरी बेतलीये असे मला नक्कीच म्हणायचे नाहीये. )
---------------

जे काहि कॉकटेल बनवले होते, ते मात्र अगदी खिळवुन ठेवणारे होते.>>>> + १००००

विषकन्येची मागणी अचानक वाढणार आहे. मायबोली खरेदीत उपलब्ध करून देणार ते पुस्तक? डोळा मारा>>>
मीही विचार करतच होते .
(तथाकथित) ढापलेली कादंबरी इतकी पकड घेणारी होती तर मूळ मुद्दल कस असेल ?
आत घ्यावीच लागेल Happy

रच्याकने, या धाग्याच्या शब्दखुणा वाचल्यात का? त्यात केटरींग पण आहे. फिदीफिदी >>>> आणि हस्त्कला आणि कला सुद्धा Happy

हम्म्म्म.

हे खरे असेल तर अवघड आहे.

मायबोलीवर वेगवेगळ्या पानांवर लोकांची मतं वाचून स्पार्टाकस यांचे सगळे लिखाण एकदा सवडीने वाचायचे ही एक टू डू यादीत बसलेली गोष्ट झाली होती.

गुमाॅमॅ शी साधर्म्य लक्षात येऊनही केवळ स्पार्टाकस यांच्यावर विश्वास ठेवला व दुर्लक्ष केले गेले ते कादंबरीत असणार्या पाणबुडी च्या समांतर कथानकामुळे.
आता ते कथानकही चोरलेले आहे हे समजल्यावर फार विचित्र मनस्थिती झाली आहे.
वाईट वाटतयं + राग आलाय + विश्वासघात झाल्याची तीव्र भावना.
स्पार्टाकस यांचे नाव वाचुनच लेख उत्तम असणार याची खात्री असायची.
आता विश्वास ठेवणे कठीण आहे.
खुपच मोठा धकका आहे हा.
वाचकांना ट्रॅप मध्ये मस्त गुंतवलं, अनेकांना समजत असूनही कोणीही स्र्टाॅगली तक्रार केली नाही.

फार वाईट वाटले.
मलाही स्पार्टा च्या ( का
कोणाच्या ??.. !!! )सर्वच
कथा आवडल्या होत्या..
प्रत्येकीवर प्रतिसाद दिलेलेत
आता आपल्याला खूपच मूर्खात
काढल्यासार्खं वाटतंय..>>>>
सेम सेम

अरेरे.. ब्रुटस यू टू .. !!
माझी आवडती कादंबरी होती ट्रॅप.. पण यातला मेडिकल कंपनीचा प्लॉट ( विशेषतः पार्ट २,३) - कंपनीच्या प्रेसिडेंटचा अचानक मृत्यु, त्याच्या वारसाने(एलिझाबेथ / आदित्य) कंपनी संभाळणे, सगळ्या प्लँटला भेटी, बोर्ड मेंबर्सकडे संशयाची सुई, डिफेक्टिव प्रोडक्ट्सचे रिकॉल - हे सगळं सिडने शेल्डनच्या ब्लडलाईनशी जुळणारे तेव्हाच वाटले होते..
ही माझी तेव्हाची प्रतिक्रिया..
-------------------------------------------------------------
मस्त रंगलाय भाग...
मागच्या भागामध्ये शेल्डनच्या ब्लडलाईनवर बेस्ड आहे अशी शंका आलेली. या पार्टमध्ये खात्रीशीर वाटतय. होपफुली आदित्यचा सत्यापर्यंतचा प्रवास एलिझाबेथपेक्षा वेगळा असेल.
--------------------------------------------------------------

मला याच वाइट वाटत नाही की त्याची कथा सारखी आहे.कधी एखादी कथा फार आवडते आणी वापरली जाउ शकते.
शेवटी आपन जे लिहतो ते कुठे तरी ऐकले किवा वाचलेले असते. पण त्यानी सरळ नकार दिल्यामुळे मला जास्त वाईट
वाटत आहे.

गामा.. Happy

.. कचा, ही विपरीत गोष्ट उघडकीला आणल्याबद्दल धन्स रे तुला..

अरेरे, फार मोठा विश्वासघात. लोक एवढ्या समरसून प्रतिक्रिया देत असताना जनाची नाही तरी मनाची वाटली असावी अशी आशा आहे. एवढा मोठा कंटेन्ट सातत्याने लिहीत राहणे सोपे वाटत नव्हतेच, ते किती सोपे होते ते दाखवून दिलेत. स्पार्टाकस यांनी आता काहीही खुलासा दिला, माफी मागितली तरी हे पुन्हा सांधणे शक्य नाही.
बेफिकीरांच्या पोस्टची तर कमाल गंमत वाटली. अजून विषय सुरू होत नाही तर यांना पडदा टाकायची कोण घाई! तुमच्या लेखनावरून उचलेगिरी केली तरी तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ केले असं जरी दाखवायचं असलं तरी अस्थानी कळवळा वाटला तो. लोकांनी त्यांच्या लेखनावर भरभरून प्रेम केलं तशीच आता आगपाखडही होणार. ते नैसर्गिक आहे.
हे असे प्रकार प्रशासनाच्या कितपत नियंत्रणाखाली आहेत, लेखन उडवण्याखेरीज ते काय करू शकतात याची कल्पना नाही. पण याबद्दल जे निर्णय प्रशासन घेईल ते एक उदाहरण ठरावे व भविष्यात पुन्हा असे होऊ नये ही अपेक्षा.

पण याबद्दल जे निर्णय प्रशासन घेईल ते एक उदाहरण ठरावे व भविष्यात पुन्हा असे होऊ नये ही अपेक्षा.>> +१

>>>बेफिकीरांच्या पोस्टची तर कमाल गंमत वाटली. अजून विषय सुरू होत नाही तर यांना पडदा टाकायची कोण घाई! तुमच्या लेखनावरून उचलेगिरी केली तरी तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ केले असं जरी दाखवायचं असलं तरी अस्थानी कळवळा वाटला तो<<<

मी एक गोष्ट मनापासून कबूल करतो. की सगळे मिळून एखाद्याला खूप झोडपू लागले की मला एकदम खूप वाईटच वाटू लागते त्या माणसाबद्दल! हा माझा वैयक्तीक प्रॉब्लेम असावा व कदाचित मला त्या गोष्टीसाठी उपचारांची गरजही असेल हे मी खुलेपणाने म्हणत आहे, कोणत्याही खवचटपणे नाही. भारत पाकिस्तान मॅचमध्ये भारत जिंकावा असे मला वाटतेच वाटते, पण पाकिस्तान हरला की असे वाटते की आता त्यांना त्यांच्या देशात खूप वाईट घटनांना सामोरे जावे लागेल, नको होते हरायला बिचारे! ह्या अश्या स्वभावामुळे ती एक पोस्ट मी लिहिली. तो अस्थानी व कृत्रिम कळवळा वाटत असल्यास आपले वैयक्तीक मत म्हणून मी त्याचा आदर करतो, जरी मला ते मान्य नसले तरी!

मात्र संध्याकाळी जेव्हा मी त्यांच्याच कथेच्या अंतिम भागाच्या खालील डिस्क्लेमर वाचला तेव्हा मात्र माझे डोके फिरले.

मलाही त्यांच्या कथानकाखाली आलेल्या व मी आजच रँडमली वाचलेल्या अनेक प्रतिसादांची 'कमाल गंमत' आजच वाटली, पण ते विषयांतर होईल. फक्त एक छोटेसे उदाहरण खाली कोट करतो.

>>>कादंबरीच्या विषयात कुठेही विनोदाला जागा नसताना फक्त मायबोलीकरांच्या नावांमुळे जी धमाल उडाली आहे हे मायबोलीकर वाचकांना तुम्ही दिलेलं झुकतं माप<<<

खूप्पच मनोरंजक आहे हे वाक्य!

एखादा चोर ( जो नंतर चोर आहे असं उघड होतं) ज्यांना पुरस्कार आणि क्~एरेक्टर सर्टिफिकेटं देतो अशांची अवस्था काय होत असल या विचाराने झोप येत नाही.

सुन्न होऊन गेलो आहे मी. स्पार्टाकस यांच्या लिखाणावर, कथेच्या वेगवान गतीवर, मराठी इंग्रजी वापराचा मुक्त वापर, वातावरण निर्मिती आदी बाबींवर मी लुब्ध झालो होतो हे नाकारण्यात अर्थ नाही. किंबहुना येथील माझ्या ओळखीच्या अनेक सदस्यांनी त्याचे लिखाण वाचावे अशी वेगवेगळ्या संवादांच्या माध्यमातून शिफारसही करीत राहिलो.

"ट्रॅप" ने गती पकडली त्यावेळेपासून स्पार्टाकस हे नाव मायबोली सदस्यामध्ये चांगलेच लोकप्रिय होत गेले हेही मी पाहिले आणि एका तरुण लेखकाच्या नावाचा असा कौतुकाने उल्लेख होत आहे हे पाहून मलाही अर्थात आनंद झालाच होता. नंतर स्पार्टाकस यानी कथेतील एका पात्राला "अशोक पाटील" हे नाव दिले...अर्थात माझी परवानगी घेऊन. त्याना नकार देण्यात कसलीच अडचण नव्हती....अगदी सहजगत्या त्यानी विचारले अन् मीही तितक्याच सहजतेने "जरूर वापरा" असेही त्याना कळविले. कथानकाने पुढचा टप्पा गाठला....आणि एकदाची ती कादंबरी संपली...त्यांचे अभिनंदन कित्येकांनी आनंदाने केले....तसे करणे हे ते नैसर्गिकच होते. पुढील लिखाणासाठी शुभेच्छाही भरपूर देण्यात आल्या.

....आणि आता कवठीचाफा यानी सत्य प्रकट केल्यानंतर जे काही अस्वस्थ आणि प्रक्षुब्ध वातावरण इथल्या सदस्यांत पसरले आहे ते वाचल्यानंतर सर्वांना संताप का येऊ नये असेच वाटत राहिले आहे. स्पार्टाकस यानी वाङमयचौर्याचा आरोप धाग्याच्या सुरुवातीसच नाकारला असला तरीही त्यावर कुणाचा विश्वास बसलेला नाही हे तर उघडच आहे.

इथे उमटलेल्या अनेक प्रतिक्रियातून बेफिकीर यानी त्यांच्या लेखनाबद्दल अतिशय संतुलित भूमिका घेतल्याचे दिसल्ये. प्रतिसादात प्रकटलेल्या विचाराबद्दल त्यांचे अभिनंदन करणे खूप अगत्याचे वाटते मला. इतके वादळ उठूनही, शिवाय त्यांच्या लेखनाचाही स्पार्टाकस यानी वापर केल्याचे सिद्ध झाल्यानंतरही त्यानी जो शांतपणा दाखविला आहे तो अत्यंत स्पृहणीय आहे.

धन्यवाद अशोकराव! ह्या घटनेबाबत माझ्या रिअ‍ॅक्शन्स दिवसभरात वेगवेगळ्या वेळी वेगळ्या असल्या तरी त्या प्रत्येकवेळी प्रामाणिक होत्या ह्यावर विश्वास दाखवल्याबद्दल! सकाळी मी फक्त हा धागाच वाचला होता. संध्याकाळी दोन भाग चाळले आणि डिस्क्लेमर वाचला. असो! तेच तेच लिहीत नाही. तुम्हाला आदरपूर्वक धन्यवाद!

स्पार्टायकस यांना webmaster यांनी खुलासा विचारला आहे.
पण webmaster या आयडीवर क्लिक केल की हे पान हरवल आहे, तुम्हाला दुसर पान शोधायच आहे का असा मेसेज येतोय.

यतिन भट आहे ना नाव त्यांचे ? त्यांनी जे केले ते खरेच दुर्दैवी. त्यांच्या लिखाणाचा आणि माझ्या वाचनाचा वेग कधी जुळू शकला नाही, म्हणून फारसे वाचले नव्हते.

भट साहेब, विश्वासघात केलात हो मायबोलीकरांचा.

त्यांच्या ब्लॉगवर कुणाच्याच प्रतिक्रिया नाहीत ! फेसबुक पेज वर मात्र आहेत.

दिनेश,
त्यांचे नाव लिहिणे संयुक्तिक नाही, तुम्ही ते काढावेत ही विनंती. आयडी ची ओळख पुरेशी आहे संवाद साधण्यासाठी.
हा काही जीवन मरणाचा प्रश्न नाहीये, फेसबुकवर सुद्धा पोस्ट करून त्यांच्या मायबोलीशी संबंधित नसणार्‍या मित्र परिवाराला त्यांच्याबद्दल काही समज/गैरसमज निर्माण होण्याएवढी महाभयानक चूक किंवा गुन्हा त्यांनी केली आहे असे काही नाही.

मायबोलीकरांनी त्यांच्या किंवा कुणाच्याही फेसबुकवर मायबोलीवरचे वाद विवाद न्यावेत हे मला खटकते पण तो विषय मायबोलीच्या स्कोप बाहेरचा आहे.

हायझेनबर्ग
तुम्हाला का पुळका येतोय ?

या आयडीने काहिंची परवानगी घेऊन तर काहींची न घेता नावं वापरली आहेत.तेव्हां तुम्हाला सुचलं नाही का हे प्रवचन ? की तुम्हीचे ते ?

Pages