स्पार्टाकस या आय डी चे लेखन

Submitted by कवठीचाफा on 9 March, 2015 - 00:57

कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
ट्रॅप संदर्भात मी स्पार्टाकस या आयडी ला विपूही केलेली होती परंतू काही वेळाने कोणतेही उत्तर न देता ती विपू डिलीट झाल्याचे कळले.
हे सर्व इथे मांडण्याचे कारण इतकेच की यामुळे मायबोली, आणि इतर मराठी संकेतस्थळांवर चुकीचा पायंडा पडू नये.

हे सगळे अतिशय रँडमरित्या घेतले आहेत. जमल्यास ट्रॅप या कादंबरीशी पडताळून पहावे.

बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.

(मायबोलीच्या धोरणानुसार धाग्याच्या मुख्य मजकुरातल्या लिंक काढून टाकल्या आहेत. प्रतिसादामधे पुराव्यासाठी भरपूर माहिती आहे -वेबमास्तर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता कळल.
बर या चोराला सपोर्ट करना-याना पन शिक्शा द्या. मित्र बित्र असल म्हनुन वाचवा म्हनत असतील. दुसरा कोन असता तर गळाच चिरला असता की.

स्पार्टाच्या एव्हरेस्ट वरच्या कथा/नॉन-फिक्शनमध्ये सुद्धा मी शंका उपस्थित केली होती की इन्टू थिन एअर आणि यात काय फरक आहे. त्यावर स्पार्टा म्हणाले की त्यांनी बरेच काही रेफर करून ही मोउंट एव्हरेस्ट कथा लिहिली आहे. मला तरी तसे काही आढळले नाही. बरे बुर्कीव्ह, बक वेदर्स आणी लु कासिस्चच्या पुस्तकांचे संदर्भ घेतले म्हटले तरी या सर्वांची पुस्तके त्यांच्या वैयक्तिक अनुभवावर आधारीत आहेत. जर फार जुनी ऐतिहासिक घटना असेल तर एखादा संशोधक त्यावर संशोधन करुन पुस्तक लिहितो. जी घटना गेल्या वीस वर्षात घडली आहे, ज्यात सहभागी लोकांनी वेगवेगळ्या नजरेने किमान ७-८ पुस्तके लिहिली आहेत त्या घटनेवर स्वतः तिथे उपस्थित नसताना केवळ ही सर्व पुस्तके वाचून त्याचे मराठीकरण करणे योग्य आहे का? उद्या मी चीनवरची दहा प्रवासवर्णने वाचली व एक पुस्तक लिहिले कधीच चीनमध्ये न जाता, तर ते योग्य ठरेल का?

उदा: http://www.maayboli.com/node/46774 इथे अनेक संवाद आहेत. स्पार्टा स्वतः तिथे उपस्थित होते का? नसतील तर हे संवाद एकतर कुठल्यातरी पुस्तकातून घेतले आहेत किंवा त्यांनी प्रत्यक्ष उपस्थितांची मुलाखत घेतली असली पाहिजे. तशी मुलाखत घेतल्याचे कुठे लिहिले नाहिये (मोघम उल्लेख आहे की काही जणांना भेटलोय. त्यात बहुतेक ते डलासमध्ये बक वेदर्स च्या टॉकला गेले होते तो संदर्भ असावा. क्रॉकरला भेटलो आहे असे कुठे लिहिलेले नाही, बुक्रीव्ह स्वर्गवासी झाला ९७ साली म्हणजे एव्हरेस्ट दुर्घटनेनंतर १ वर्षात). हे कदाचित प्रताधिकार कायद्याचा भंग करणारे नसावे मात्र एथिकली बरोबर आहे का?

स्पार्टा, यु टु...?
असो. जे काहि कॉकटेल बनवले होते, ते मात्र अगदी खिळवुन ठेवणारे होते.

अरेरे ! दुर्दैवी प्रकार आहे.

स्वाती, सिंडरेला, नीधप, भारती ह्यांना अनुमोदन. कंटेंटबद्दल प्रशासन कधीही ढवळाढवळ करत नाही हे मायबोलीचे धोरण सगळ्यांना माहीत आहे पण प्रतिधिकाराबाबत तातडीने येऊन पोस्ट टाकली त्याबरोबर झालेल्या प्रकाराबद्दलही (कुठल्याही बाजूने) किमान एक ओळतरी लिहायला हवी होती.

झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे आणि तो शोधुन काढल्याबद्दल (अर्थात शोधुन म्हणता येणार नाहीच कारण कवठीचाफा यांनी ही कादंबरी आधीच वाचली असल्याने त्यांना याबद्द्द्ल कल्पना आली) कवठीचाफा यांचे आभार मानतो. कल्पना उचलणे वेगळे आणि पॅराचे पॅरा जशासतसे उचलणे वेगळे आहेत. ट्रॅप आणि विषकन्या दोन्ही वाचुन दोघांच्या कल्पना एक आहेतच हे कळुन येते.
मिलिटरी कॉन्फरन्स मधले जी वाक्य आहेत तीच ट्रॅप मधे आहे.
२ पाकिस्तानला एक पानबुडी आणि एक भारताला ही कल्पना
बिघडलेली पाणबुडी पाकिस्तानला द्यायची ही कल्पना
४ बिघडलेली पाणबुडी कराची बंदराजवळ बुडवायची जेणेकरुन नंतर पाकिस्तानाला सतत भिती राहील की आपल्या समुद्रात अण्वस्त्र बुडाले आहे.
विषकन्या पान १५ ( हे पान प्रिव्ह्यु मधे देखील दिसत आहे कृपया बघावे)वर कॅप्टन अचानक रात्री विकिला फोन करतो तेव्हाचे संभाषण देखील तंतोतंत जुळते. नायक त्याला मुंबई - पुणे इथे जात आहेस का विचारतोय. तिथे पण त्याला सकाळचे हॅलिकॉप्टर मिळते. पुस्तकात विमान मिळते
६ कॅप्टन एम
७ पुस्तकाच्या प्रकाशकाचे नाव "रवी बेहेरे"

अशी बरीच साम्यता दिसुन आली आहे कृपया याचे स्पष्टीकरण द्यावे

मि पन एक स्टोरि लिहिनार होतो. सेम अशिच सुचलि होती. पन इथ येऊन वाचल तर आधिच कुनाला तरि सुचलि होती हे कळल. आता काय उपयोग नाहि. नसत वाचल तर कम्प्लीट तरी झालि असति. द्रुष्टी आड स्रुष्टी .

आम्हाला एक सर होते. ते भुताळि जहाज नावाची गोष्ट ऑफ परेडला सांगायचे. ती भा रा भागवत का कुनाची होती. किशोर मधे पन यायचि. वाचा म्हटले होते. पन ते सांगायचे ते ध्यानात राहिल होत. आता थोड वाचल तर या दोस्ताला पन तसच सुचलय. अस होऊ शकत. जगात असुन असुन किती गोष्टि असनार ? काय वेगळ वेगळ लिहिनार ? कुनाच ना कुनाच सेम येनारच की | हिंदी पिक्चरमधे पन नाही का स्टार्‍टींगला हिरोचे आईवडील ढप्प होताता. हिरो फक्त साखळी, घोडा, बूट, मोजे, हातावरचं गोंदन एव्हढच बघुअन तेह्वतो अन लास्टला त्याच्या समोर तेच येत आनि मग व्हिलन ढप्प. कधि कधि साइड हिरोईन जीव देती एव्हढा फरक असतो. तेव्हा कोन काय बोलत का ?

अ‍ॅड्मिन याना पण शहानिशा करायची असेल , खर काय आहे याचा त्यानी खुलासा मागितला असेल, गोश्टी इन प्रोसेस असतिल जरा वेळ देवुयात अ‍ॅडमिनला!
असाच प्रकार १-२ वर्शापुर्वी घडला होता ना! बहुतेक चित्र होती!

खुप वाईट आहे हे सगळे. मी दुपारीच बूकगंगा वर पाहिले आणि खुप धक्का बसला. स्पा कडून अशी अपेक्षा नवति.

आता काहिही चांगले वाचताना हे चोरलेले तर नाही ना असे वाटत राहील.

याच ट्रॅप मधे अजुन एक मेडीकल कथानक आहे. ते ही दुसरीकडुन घेतले आहे का ? शंका येउ लागली आहे.
दोन कथा एकत्र करुन एक कथा केली आहे की अजुन तिसरी कथा मिक्स केली आहे ?

१ कोणताही बिझिनेसमन अचानक एव्हरेस्टवर काहीही तयारी न करता जात नाही. जेव्हा त्याला मारले जाणार आहे. ते ही तो आर्मिच्या कामाकरीता ? आर्मी आपल्या शिकलेल्या लोकांकडुन काम घेईल कि या बिझिनेसमॅन कडुन?
२ आदित्यला आर्मी कशाबद्दल मदत करत आहे निव्वळ रमाकांत पैसे देतोय म्हणुन ? हे स्पष्टीकरण पटत नाही.
३ अवघे काही लाख रुपये ट्रान्स्फर केले जात आहे. ते ही इतक्या मोठ्या मिलिटरी मिशन साठी ? तुम्ही न्युक्लिअर रिअ‍ॅक्टर वापरुन मिसाईल बनवत आहेत तिथे ही रक्कम अतिशय तुटपुंजी आहे हे कोणीही सांगु शकते.
४ शेवटचा प्रसंग तर अत्यंत बालिश आहे. जो सरळ सरळ मायबोली बेफिकिर यांच्या एका कथेच्या शेवटावरुन बेतलेला वाटत आहे. त्या कथेत ते दिलेले स्पष्टीकरण बरोबर वाटत आहे. पण या कथेत मिलिटरीची लोक इतकी स्पष्टाकरण देतील का ? मुळात आर्मीची लोक स्पष्टीकरण सोडा साधे नीट बोलायला तयार नसतात. (माझा आर्मीवाल्यांबरोबर रोजचा वावर आहे)

या आणि अश्या बर्‍याच ठिगळ जोडल्यासारख्या प्रसंगामुळे २-३ कथानकांना एकत्र करुन लिहिलेली असेल अशी शक्यता वाटत आहे.
यावर स्पष्टीकरण अपेक्षित आहे

>>
असाच प्रकार १-२ वर्शापुर्वी घडला होता ना! बहुतेक चित्र होती!>> फोटो/ प्रचि होते. नॅटजिओच्या वेबसाईटवरून कॉपी करून खपवलेले.

विषकन्याची सुरूवात आणि ट्रॅपचा पाचवा भाग म्हणजे कॅप्टन नितीन देशमुखची एन्ट्री यात सुद्धा खुप साम्यस्थळे आहेत.
उदा. इथे नितीन आहे तिथे चेतन आहे. तिथे चेतनला त्याच्या बॉसची सेक्रेटरी 'अमृता' पार्टी मागते तर इथे नितीनला 'अर्चना', बरं ही अर्चना सुद्धा त्याच्या बॉसची सेक्रेटरीच आहे बहुदा. इथे पण तो कॅप्टनचा मेजर होतो आणि तिथे सुद्धा. इथे सुद्धा त्याच्या बॉसचे सगळे युनीट बॉससकट अपग्रेड झालेले आहे आणि तिथे सुद्धा.

आणि गंमत म्हणजे यातल्या कित्येक ओळी जशाच्या तशा चोप्य पस्ते केलेल्या आहेत. विषकन्या न वाचता सुद्धा तिथली वाक्ये जशीच्या तशी इथे उतरवणे म्हणजे चमत्कारच म्हणायचा. दिव्यदृष्टी म्हणतात ते असेच काहीसे प्रकरण असावे बहुदा !

माझे लेखन टुक्कार असल्याने स्पार्टाकस मला नेहमी मायबोली सोडून ब्लॉगवर लिहायचा सल्ला द्यायचे. अर्थात असे बरेच जणांनी केले असेल पण ते हे सातत्याने करायचे. अर्थात याचा मी कधीच राग नाही केला. पण आज मात्र एक सांगवेसे मनात आले, माझे लेखन ओरिजिनल आहे Happy

शेवटचे मेरे पास मा है सारखे वाचावे.

निव्वळ एका पॅराचे भाषांतर दोन विद्वानांनी केले तरी त्यादोन भाषांतरात जमिन आस्मानचा फरक असतो.
दोघांचे मराठी वेगवेगळे असते वाक्याची रचना वेगवेगळी असु शकते. परंतु इतके तंतोतंत साम्य अजिबात नाही.
कृपया असले प्रकार करणे थांबवाच आता. त्यापेक्षा आम्ही विशाल यांच्या क्रमश: कादंबर्या (ओरिजनल) ५० वेळा परत वाचत राहु Light 1 भले ते पुर्ण न करेनात

आणि गंमत म्हणजे यातल्या कित्येक ओळी जशाच्या तशा चोप्य पस्ते केलेल्या आहेत. >>>> हो ! अगदी दोन कॉफी आणि पेस्ट्री सकट ! Happy

पेक्षा आम्ही विशाल यांच्या क्रमश: कादंबर्या (ओरिजनल) ५० वेळा परत वाचत राहु दिवा घ्या भले ते पुर्ण न करेनात >> ऋग्वेद तुला हजार वेळा अनुमोदन Proud

विशल्या ऐकतोयस ना? Proud

फारच धक्कादायक आहे हे. पण ही इतकी ढळढळीत केलेली चोरी उघडकीला येईल याची तमाही न बाळगणे इतका ओव्हर कॉन्फिडस? आणि हे उघडकीला आल्यास किती नाचक्की होईल याचाही विचार नाही? आणि आता लेखकाकडून काही खुलासाही नाही.

मला पाणबुडीच्या प्रवासाचे डिटेल्स खूप आवडले होते. ते सगळे कॉपी पेस्टच होते की काय? हा हन्त हन्त !

विषकन्येची मागणी अचानक वाढणार आहे. मायबोली खरेदीत उपलब्ध करून देणार ते पुस्तक? Wink

मला पाणबुडीच्या प्रवासाचे डिटेल्स खूप आवडले होते. ते सगळे कॉपी पेस्टच होते की काय? > जवळपास

साती | 9 March, 2015 - 18:39

डिविनिता, मायबोलीकरांची माफी का मागावी?
निरंजन घाट्यांची का नको?

<<

आँ?
बेफिंनी काय पाप केलंय? की ते घरचेच आहेत, त्यांच्या खिशातून काढलं थोडं तर काय बिघडलं असं काही आहे?

***

नावडत्या मायबोलीकरांची नांवे / आयडीज आपल्या कथांमधे व्हिलन म्हणून, व 'आवडीच्या' लोकांना इन्स्पेक्टर वगैरे करून घेणार्‍या व्यक्तीच्या लेखनाबद्दलच नव्हे, त्या व्यक्तीबद्दलही नीट बोलावेसे मला तरी वाटणार नाही. बरं झालं पितळ उघडं पडलं ते. Happy

स्पार्टाकस,

नाऊमेद होऊ नका. वाचकांना थराराचा आनंद देण्याच्या मोहापायी हे घडून गेले असावे. अरिफ झकारिया सारख्या बड्या हस्तीही ह्या मोहातून सुटल्या नाहीत.
ह्या योगायोगा संदर्भात तुम्ही खुलासा करावा हे अपेक्षित आहेच पण झाल्या प्रकाराची प्रांजळपणे कबुली दिल्यास मायबोलीकर तीही स्वीकारतील आणि तुम्ही पुन्हा तुमची प्रतिभा ह्या व्यासपीठावर नव्याने सिद्धं करू शकताच.
आपल्या कृतीची जबाबदारी आपणच घेणे हे सुज्ञ माणसाचे लक्षण आहे आणि ती एखादी कलाकृती असेल तर चाहत्यांप्रती जबाबदारी अजूनच वाढते.
जो पर्यंत ही कादंबरी मायबोलीवर प्रकाशित आहे तोपर्यंत संबंधित ओरिजिनल कलाकृतीच्या निर्मात्यांना/लेखकांना क्रेडीट देण्यास तुम्ही बांधील आहात.

<<मला पाणबुडीच्या प्रवासाचे डिटेल्स खूप आवडले होते. ते सगळे कॉपी पेस्टच होते की काय? हा हन्त हन्त !>>>

मामी, नक्की नाही सांगता येणार पण ते डिटेल्स अ‍ॅलिस्टर मॅक्लेनच्या कुठल्यातरी कादंबरीत वाचल्यासारखे वाटले मला. मे बी 'द गोल्डन गेट' किंवा 'फिअर इज द की' Uhoh
... नक्की आठवत नाही Sad

बेफिंनी काय पाप केलंय? की ते घरचेच आहेत, त्यांच्या खिशातून काढलं थोडं तर काय बिघडलं असं काही आहे?>>>एवढा आदर दाखवताय!!! रुला दिया आपने तो! Proud

आँ?
बेफिंनी काय पाप केलंय? की ते घरचेच आहेत, त्यांच्या खिशातून काढलं थोडं तर काय बिघडलं असं काही आहे?
>>

अहो, त्यांनी अगोदरच मोठ्या मनांनी माफ केलंय की!

बेफ़िकीर | 9 March, 2015 - 11:48
लोकहो,

कृपया हा विषय इथेच थांबवा अशी विनम्र विनंती!

फार वाईट वाटत आहे. ह्याही गोष्टीचे की स्पार्टाकस ह्यांच्या लेखनाबाबत ही बाब पकडली जावी आणि त्यानंतर त्यांच्याबाबत राग उफाळून यावा.

स्पार्टाकस - एक मस्त कादंबरी लिहून ह्या सगळ्यावर पाणी ओतून टाका स्मित

मी आपले लेखन वाचलेले नव्हते पण मला स्वाती आंबोळेंनी सांगितले होते की आपण सुंदर लिहिता. तुम्ही म्हणता तसे निव्वळ संदर्भ, प्रेरणा इतकेच असेल तर कृपया लगेचच काहीतरी छान विषय निवडून लिहायला घ्यावात अशी मैत्रीपूर्ण विनंती! स्मित

>>
कित्ती चांगले आहेत ते!

ओह!! मामी + १००

मलाही स्पार्टा च्या ( का कोणाच्या ??.. !!! )सर्वच कथा आवडल्या होत्या.. प्रत्येकीवर प्रतिसाद दिलेलेत

आता आपल्याला खूपच मूर्खात काढल्यासार्खं वाटतंय.. Uhoh

Pages