स्पार्टाकस या आय डी चे लेखन

Submitted by कवठीचाफा on 9 March, 2015 - 00:57

कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
ट्रॅप संदर्भात मी स्पार्टाकस या आयडी ला विपूही केलेली होती परंतू काही वेळाने कोणतेही उत्तर न देता ती विपू डिलीट झाल्याचे कळले.
हे सर्व इथे मांडण्याचे कारण इतकेच की यामुळे मायबोली, आणि इतर मराठी संकेतस्थळांवर चुकीचा पायंडा पडू नये.

हे सगळे अतिशय रँडमरित्या घेतले आहेत. जमल्यास ट्रॅप या कादंबरीशी पडताळून पहावे.

बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.

(मायबोलीच्या धोरणानुसार धाग्याच्या मुख्य मजकुरातल्या लिंक काढून टाकल्या आहेत. प्रतिसादामधे पुराव्यासाठी भरपूर माहिती आहे -वेबमास्तर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>त्यांचे नाव लिहिणे संयुक्तिक नाही, तुम्ही ते काढावेत ही विनंती. आयडी ची ओळख पुरेशी आहे संवाद साधण्यासाठी.>> हायझेनबर्ग, सहमत. त्यांच्या प्रोफाईलवर खरं नाव आहे लिहिलेलं. ज्यांना वाटेल ते तिथे जाऊन बघू शकतात. इथे मुद्दाम लिहिण्याची गरज नाही. त्यातून काही साध्य्/निष्पन्न होत नाही.

ते नाव त्यांच्या मायबोलीवरच्या प्रोफाईल मधेच आहे. मला एरवी कुठून कळलं असतं ? एखाद्या नाव पत्ता दिला नसलेल्या सभासदाने जर हे केले असते, तर मायबोलीने तरी कुणाला जाब विचारला असता ?

दिनेश टिंबजी
तुम्ही चुकीच काहीही केल नाही. चोराचं नाव (आता कळून चुकल आहे) का लपवायचं ? याने लोकांची परवानगी घेतलीय का ? लोक एक वेळ खिलाडूपणे घेतील. पण त्या वेळी मग कुणालाच कसं खटकलं नाही आणि आता का खटकतं हा प्रश्न आहे ना. त्याचं उत्तर नको का ?

बरोबर बाळू,

असे अजिबात न घडो, पण जर श्री निरंजन घाटे, त्यांचे प्रकाशक वा स्वामित्व हक्क ज्यांच्याकडे आहे त्या व्यक्तींनी कायदेशीर कार्यवाही करायचे ठरवले तर मायबोली प्रशासन " स्पार्टाकस " हे नाव पुढे करू शकेल का ?

शिवाय त्यांच्या ब्लॉगवरच या कादंबरीचा कॉपीराईट त्यांच्याकडे आहे, वगैरे लिहिलेले आहे.

( आता या बीबीचा ओघ दुसरीकडेच वळू नये, हि किमान अपेक्षा. )

त्यांनी केल ते घडून गेल. पण कायदेशीर कारवाई होऊ नये असं वाटतं. तरूण असो, वयस्कर असो. नकोच ते. समज देणं ठीक आहे एकवेळ. बाकी, इथल्या प्रतिक्रियांना तोंड देता न येणं ही शिक्षा पन पुरेशी आहे.

लोकांची परवानगी म्हणजे इथल्या काही लोकांची नाव याने वापरली आहेत. त्यातल्या काहिंची परवानगी घेतली आहे आणि शत्रूपक्षाला व्हिलन करून टाकले आहे. मग त्या वेळी स्पार्टाकस ला प्रवचन का नाही झोडलं असा प्रश्न होता तो दिटींजी.

ओह, असे आहे का ?
माझं नाव नव्हतं ना वापरलं कुठे ? Wink

मायबोली प्रशासन याबाबतीत नेहमीच जागरुक राहिले आहे. त्यामूळे काळजी वाटली. असो ते योग्य ते करतीलच.

जे चूक आहे ते चूक आहे त्यात पुळका वगैरेचा काय संबंध.

सगळे जण नाराजी दर्शवून, स्प्ष्टीकरण मागून ऊत्तराच्या प्रतिक्षेत असतांना तुम्ही काही तरी गंभीर गुन्हाचा पाठपुरावा केल्यासारखे हे लावून धरले आहे.
तुमचं नेमकं काय घोडं मारलं आहे स्पार्टाकसने म्हणून जुने स्कोअर सेटल केल्यासारखे पिच्छा पुरवत आहात?

दिनेश,
त्यांनी त्यांच्या नावाने आयडी घेतलेला नाहीये. त्यांचे खरे नाव तुम्ही म्हणता तेच आहे ह्याची तरी तुम्हाला खात्री आहे का? काय्देशीर वगैरे बाबी तर नंतरच्या गोष्टी आहेत. अ‍ॅडमिन त्यासाठी समर्थ असतीलच.

दिनेशदा, मी आत्ता त्यांना फेसबुक वर शोधले. तुम्ही आणि इतर दोन माबोकर असे तीन मित्र त्यांच्या आणि माझ्या लिस्ट मध्ये असल्याचे दिसते. ते य भ हेच का? मोबाइल वरुन त्यांची फेबु वॉल मात्र मला दिसत नाहीये...

अतिशय दुर्दैवी प्रकार!

फेसबुकवर वगैरे लोक कमेंट्स टाकत असतील तर टु मच आहे. स्वतः कधी काही चुका केल्याच नाहीत का आयुष्यात? झाली असेल चुक. इथे मायबोलीवर क्षमा मागतील नाहीतर जातील सोडून. फेसबुकवर वगैरे जावून जाब विचारणे आणि एखाद्याचे वैयक्तीक किंवा प्रोफेशनल आयुष्य कायमसाठी खराब करणं कितपत योग्य आहे?
उगाच हातात दगड मिळाला म्हणुन मॉब मेंटॅलिटी दाखवून दगड फेकत सुटायच का?
वेबमास्टर करतील कि कारवाई काय करायची ते. प्रत्येकजण कशाला न्यायाधीश बनायला पाहिजे.

हायझेनबर्ग

ज्या लोकांची इथली नावं वापरली, परवानगी न घेता ते बरोबर आहे असं तुमचं म्हणणं आहे का ? आणि स्पार्टाकसचं नाव इथे आलं तर ते चूक ? जरा समजावून सांगता का ?

वरच्या प्रश्नाला त्या लोकांच्या तक्रारी नाहीत अस्सं उत्तर नको आहे. घोडं मारलं वगैरे तर बहोत दूर की बात है. तुम्ही का भावनाविवश होता एव्हढे ? हा प्रश्न स्पार्टाकस विचारतील ना.

हायझेनबर्ग, माझा कुणाशीही कसलाही स्कोअर सेटल करायचा राहिलेला नाही. त्यांच्या लेखनावरही माझ्या प्रतिक्रिया क्वचितच असतील आणि माझ्या लेखनावर त्यांच्या. विचारपूसही नव्हती कधी एकमेकांची.

प्रोफाईअलमधली नावं खोटी असू शकतात, तसा ब्लॉगही असतो ना.. मग मी कुणा य.भ. ला उल्लेखून काही लिहिलेच नाही मुळी.

आणि प्रताधिकारभंग हा गंभीर गुन्हा तूम्ही मानत नसला तरी मी मानतो.

परत सांगतोय, बीबीचा रोख बदलू नका ( ऐकण्यातले वाटताहात म्हणून सांगतोय, बाकिच्यांना सांगत नाही. )

एवढे लिहून माझे चार शब्द संपवतो. आमच्याकडे रात्र झाली.. शुभरात्री !

वत्सला, सोडून द्या हो. मलाही त्या नावाची खात्री नाही वाटत आता.

स्कोअर सेटल करणं ही काय भानगड आहे ?
स्कोअर कुणाशी सेटल होतो हाब?
निरूपद्रवी व्यक्तीशी कुणी करतं का ? हा ही प्रश्न स्पा यांनी विचारला असता तर ठीक होतं.

बाळू, स्पार्टाकस यांनी ज्या मायबोली आयडींची नावं त्यांच्या कथेत वापरली आहेत ती त्यांची चांगल्या संपर्कातली मित्रमंडळी आहेत. त्यांना आवडलं नसल्यास ते परस्परच सांगू शकतील लेखकाला तसं.

माझ्या मते त्यांनी जी नावं वापरली ते मायबोलीवरचे आयडी (बर्‍याच लोकांचा आयडी त्यंची खरी नावे असतीलही) आहेत आणि तसे वापरण्यात अंगुलीनिर्देश हा त्यांचा हेतू असेल तर तेही चूकच. त्यांनी काही आयडींकडून परवानगी घेत्ल्याचे वाचले त्यामुळे परवानगीची शहानिशा स्पार्टाकस आणि संबंधित आयडीच करू शकतील. संबंधित आयडींना काही प्रॉब्लेम असल्यास ते अ‍ॅडमिनकडे दाद मागूच शकतात की, नव्हे एवढ्या दिवसात त्यांनी मागितली असेलही.

स्कोअर सेटल करणं ही काय भानगड आहे ? >> जे तुम्ही सद्ध्या ह्या बाफ वर चालवले आहे ते. ऊट्टे काढल्यासारखे एखाद्याच्या मागे पडणे.

दिनेश
ते स्कोअर सेटल तुम्हाला ऊद्देशून लिहिले नव्हते. विषयांतर होत असेल तर होऊ देत,लेखकाचे नावं लिहिण्याचा आणि प्रताधिकारभंगाचा काहीही संबंध नाहीये. नाव लिहिण्यमागे आणि विषयांतर होतंय वगैरे म्हणण्यामागचा तुमचा नेमका हेतू अनाकलनीय आहे.

अरेरे, फार मोठा विश्वासघात. लोक एवढ्या समरसून प्रतिक्रिया देत असताना जनाची नाही तरी मनाची वाटली असावी अशी आशा आहे. >> ++ १
भयंकर विश्वासघात केल्याची भावना येत्ये. लोकं त्यांना making of trap लिहा वगैरे सुचवत होते. हे साहेब ढापलेलं साहित्य स्वतःच्या नावावर खपवून प्रसि द्धी मिळवत होते. अत्यंत नीचपणा आहे हा! आणि हो, अ त्यंत भयंकर गुन्हा! ज्या कोणाला हा फार मोठा गुन्हा नाही असं वाटतय त्यांनी जरा प्रतधिकार भंग या विषयावर वाचन करा म्हणजे कळेल - केवढा मोठा गुन्हा आहे हा! नुस्ती गोष्ट दुसर्‍या कथेवर बेतलेली नसून कॉपी/पेस्ट केलंय - अत्यंत निषेध. अ‍ॅडमिन, काय कारवाई करताय?

मायबोलीवर हे असे पहिल्यान्दा आणि एव्हढ्या मोठ्या प्रमाणावर घडत असावे. या आधी येथे प्रसिद्ध झालेले साहित्य इतरत्र कुठेतरी कॉपी झाल्याचे वाचायला मिळायचे...

असो कॉपी, जसेच्या तसे साहित्य चौर्य प्रकार अत्यन्त निन्दा जनक आहे... जे स्वतःचे नाहीच आहे ते साहित्य स्वतःचे आहे हे दाखवण्याचा अट्टाहास कशासाठी ? खोट्याच्या आधाराने मिळालेली प्रसिद्धी किती दिवस मिरवणार?

स्पार्टाकस या धक्क्यातुन सावरल्यावर येथे खुलासा करतील अशी अपेक्षा...

ट्रॅप या कादंबरीवर झालेल्या आरोपांवरुन बुकगंगा वरुन विषकन्या ही कादंबरी विकत घेऊन मी वाचून काढली. ही कादंबरी ई-बुक स्वरुपात उपलब्ध आहे जी आयपॅड किंवा इतर कोणत्याही टॅबमध्ये डाऊनलोड केली जाऊ शकते. वाचताना मला स्वतःला मूळ संकल्पना आणि काही गोष्टींतील साधर्म्य जाणवलं, परंतु सगळी कादंबरीच चोरली आहे असा आरोप करणार्‍यांपैकी किती जणांनी विषकन्या वाचली आहे याबद्दल मला शंका येऊ लागली आहे.

सुमारे तीन महिन्यांपूर्वी अमेरीकेच्या फुल्टन या पाणबुडीसंदर्भात एक लेख वाचनात आला. ही पाणबुडी अमेरीकन सरकारच्या अधिकार्‍यांना पत्ता लागू न देता रशियात स्मगल करण्यात आली या संदर्भात तो लेख होता. या लेखाचा आधार पकडून रशियन सरकारकडून भारताला मिळणारी अण्विक पाणबुडी कशा तर्‍हेने भारतात आणता येऊ शकते ही कल्पना डोक्यात आल्यावर या कादंबरीची मूळ संकल्पना तयार झाली. उरलेली कथा या मूळ संकल्पनेच्या भोवताली रचलेली आहे.

ज्यांनी विषकन्या वाचली आहे आणि वाचलेली नाही त्यांच्यासाठी -

विषकन्या कादंबरीत भारताकडे येणारी पाणबुडी ही बेरींगच्या सामुद्रधुनीतून आणि चीनच्या दक्षिणेकडून मुंबईत पोहोचते असा उल्लेख केलेला आहे. या मार्गाने पाणबुडी आणण्यात असलेला धोका ट्रॅपमध्ये स्पष्ट करण्यात आलेला आहे.

सुएझ कालव्यातून ज्या पद्धतीने वाहतूक केली जाते ती कॉन्व्हॉय पद्धत याचा विषकन्या मध्ये उल्लेख कोणाला आढळला का? हे डीटेलींग मी इंटरनेटवरील माहिती वाचून केलं आहे.

पाणबुडीच्या प्रवासाचं डीटेलींग करताना दोन बंदरांमधील अंतर आणि त्यासाठी लागणारा वेळ याचा अंदाज करण्यासाठी मी ही साईट वापरली -

http://ports.com/sea-route/

या साईटवर आपल्या दोन्ही बंदरांचे डीटेल्स आणि पाणबुडीचा वेग ही माहिती दिल्यावर प्रवासास लागणारा वेळ दिसू शकतो. दोन्ही पाणबुड्यांच्या प्रवासाचा अंदाज घेण्यासाठी आणि डीटेलिंग करण्यासाठी मी हे तंत्रं वापरलं होतं आणि त्यावरून लागलेल्या वेळेचा अंदाज बांधला होता. विषकन्या मध्ये हे कोणाला आढळलं का?

हे डीटेल्स कॉपी केले होते हा आरोप कशाच्या आधारावर केला आहे?

पाणबुडीच्या मार्गाच वर्णन करताना केप ऑफ गुड होपच्या परिसरातील वादळाचा कोणता संदर्भ विषकन्या मध्ये आढळतो? मुळात विषकन्यामध्ये केप ऑफ गुड होपशी काही संबंध आला आहे का?

याच पाणबुडीच्या संदर्भात उल्लेख आलेल्या वेगवेगळ्या मिसाईल्सच्या प्रकारांचा आणि अ‍ॅटॉमिक न्यूक्लीयर मिसाईलचा साधा उल्लेखतरी विषकन्यामध्ये आला आहे का? या संदर्भात इतर कोणती कादंबरी चाफा किंवा आणखीन कोणी वाचली आहे का?

विषकन्या हे कथानाक वाचल्यास ते भारतात राजीव गांधी आणि पाकिस्तानमध्ये बेनझीर भुट्टो पंतप्रधान असतानाच्या काळातलं आहे हे समजून येऊ शकतं. त्या काळात उल्लेख केलेली रशियन पाणबुडी १९९० मध्येच रशियन नौदलातून निवृत्त करण्यात आली.

ज्या अत्याधुनिक पाणबुडीचा ट्रॅपमध्ये उल्लेख आहे, ती आजही रशियन नौदलात कार्यरत असलेली अणुपाणबुडी आहे हे कोणाला माहीत आहे काय?

मूळ संकल्पना आणि काही तपशील समान आले म्हणून संपूर्ण कादंबरी चोरली आहे असा आरोप करताना या सर्व संदर्भांचा कोणी साधा विचार तरी केला होता का?

आतापर्यंतच्या माझा इतर लेखनात प्रत्येक वेळी मी वापरलेल्या संदर्भ ग्रंथांचा मूळ लेखकाच्या नावासकट मी स्पष्ट उल्लेख केलेला आहे. केनेथ अँडरसनच्या ज्या शिकारकथांचा मी अनुवाद केला आहे त्याच्या प्रताधिकारावरुन मी प्रशासनाला स्पष्टीकरणही दिलेलं होतं आणि ते मान्यं करुन प्रशासनाने या कथा पुन्हा प्रकाशित केल्या आहेत.

या सगळ्या प्रकारात मला स्वत:ला आता विच हंटींगचा आणि स्कोर सेटलींगचा वास येऊ लागला आहे.

या सगळ्यानंतर मायबोलीच काय, पण इतर कोणत्याही मराठी संस्थळावर काहीही लेखन करण्याची माझी इच्छा नाही, कारण ते पूर्वग्रहदूषीत नजरेनेच पाहिलं जाईल याची मला खात्री आहे.

तस्मात,
अखेरचा नमस्कार!

स्पार्टाकस, मिलिटरी मीटिंगरुमच्या तपशिलांबद्दल सुद्धा खुलासा कराल का? मयेकरांनी टाकलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तर ओळन ओळ सारखी होती.

स्पार्टाकस, मिलिटरी मीटिंगरुमच्या तपशिलांबद्दल सुद्धा खुलासा कराल का? मयेकरांनी टाकलेल्या स्क्रीनशॉटमध्ये तर ओळन ओळ सारखी होती. >> ++१

स्पार्टाकस, विच हंटींग किंवा स्कोअर सेटलिंग वगैरे जरा बाजूला ठेवूया. मी विषकन्या वाचलेली नाही पण ज्यांनी वाचली आहे ते म्हणतायत की तुम्ही पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ तंतोतंत कॉपी केले आहेत. डीटेल्समध्येही कमालीचं साम्य आहे त्यावर काय म्हणणं आहे तुमचं? सगळाच योगायोग आहे का?
इथे तुमचं लिखाण इतक्या लोकांनी डोक्यावर घेतलं आहे आणि आवडीने वाचलं आहे त्यांच्याकरता काही पटेल असा खुलासा करा. पुढे कुठे लिहायचं आणि कुठे नाही हा तुमचा प्रश्न आहे आणि त्याचा आदर आहेच.

स्पार्टाकस, ट्रॅप कादंबरी जेवढी आवडली तेव्हडाच हा चौर्याचा गदारोळ आवडत नाहीये. मयेकरांनी टाकलेला स्क्रीन्शॉट पाहिला. त्यात वाक्य, शब्द एवढेच नाही तर वाक्यांचा क्रमही तोच आहे. एवढा योगायोग कल्पनातीत आहे. आपण दिलेले दोन्ही खुलासे वाचले. दोन्हीतही आपण तंतोतंत जुळणार्‍या मजकूराविषयी काहीच भाष्य केलं नाही.
काहीही असो, माबो सोड्ल्यामुळे कायद्याचा ससेमिरा (मागे लागणार असेल तर) चुकवता येणार नाही. तेव्हा , कम क्लीन! कम बॅक!! आणि अधिक काळजीपूर्वक लिखाण करा.

बाळू, स्पार्टाकस यांनी ज्या मायबोली आयडींची नावं त्यांच्या कथेत वापरली आहेत ती त्यांची चांगल्या संपर्कातली मित्रमंडळी आहेत. >>> तुम्ही खात्री केली आहे का या आयडींशी बोलून ? स्पार्टाकस यांनी पण याबाबतीत खुलासा केलेला नाही. मी वाचलं आहे की जे शत्रूपक्षात आहेत त्यांचा व्हिलन म्हणून उल्लेख केला आहे. त्यांची परवानगी न घेता.

म्हणून स्पेसिफिक प्रश्न होता तो. ज्यांना स्पार्टाकसचं खरं नाव दिल्यामुळं वेदना होत आहेत त्यांना त्यावेळी का झाल्या नाहीत एव्हढाच मर्याद्दीत प्रश्न आहे.

मग त्या आयडींनी तक्रार केली का ? त्यांना चाललं का या प्रश्नांना अर्थ उरत नाही. वेदना फक्त एकाच्या बाजूने कशी ?

हायसेनबर्ग
मी स्कोअर सेटल का करत आहे याचं उत्तर पण देऊन टाका. स्कोअर सेटल करायला स्पार्टाकसने माझं काही नुअकसान केलं आहे का हे कळवा. तुम्ही हे स्पार्टाकसच्या सांगण्यावरून लिहीत अस्सलात तर. नसल्यास हा अंदाज कसा काय बांधला आहे याचा खुलासा व्हावा.

स्पार्टाकसचा खुलासा थातूर मातूर आहे. जो भाग जुळत नाही तो आणखी तिसरीकडून घेतला असणार.

सायो | 9 March, 2015 - 19:51

स्पार्टाकस, विच हंटींग किंवा स्कोअर सेटलिंग वगैरे जरा बाजूला ठेवूया. मी विषकन्या वाचलेली नाही पण ज्यांनी वाचली आहे ते म्हणतायत की तुम्ही पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ तंतोतंत कॉपी केले आहेत. डीटेल्समध्येही कमालीचं साम्य आहे त्यावर काय म्हणणं आहे तुमचं? सगळाच योगायोग आहे का?
इथे तुमचं लिखाण इतक्या लोकांनी डोक्यावर घेतलं आहे आणि आवडीने वाचलं आहे त्यांच्याकरता काही पटेल असा खुलासा करा. पुढे कुठे लिहायचं आणि कुठे नाही हा तुमचा प्रश्न आहे आणि त्याचा आदर आहेच.>>>+१

स्पार्टाकस, एका ३० वर्षांपुर्वी घडलेले कथानक आजच्या काळात पुन्हा सांगताना / लिहिताना बदल अपेक्षितच असतात. ट्रॅप मध्ये केलेले पाणबुडीचा प्रकार, प्रवासाचा मार्ग यातील बदल सहज लक्षात येतात. पण दोन पाणबुड्या आणणे, त्यातील एक कराची बंदरात बुडवणे, तिच्यावरील भारतीय नौसेना अधिकारी खलिस्तानवादी असणे ही आणि अशी आणखी किती साम्यस्थळ दाखवावीत तुम्हाला? हेच बेफिंच्या कादंबरी बद्दल लिहिता येईल. असो.

तुमच्या पटेल अश्या खुलाश्याच्या प्रतिक्षेत (कारण ट्रॅप आणि इतर लिखाण आवडले होते)
सोनेरी गरुड

स्पार्टाकसने एवड्।य चो-यामा-या करूनही त्य्च्या बाजूने लिहील तरच ते स्कोअर सेटल करणं नाही असं म्हणायचं आहे का ? तस असेल तर मी याच्यावर कायदेशीर कारवाई नको अस मत दिल आहे ते स्कोअर सेटल करन्याचा भाग आहे का ?
स्पार्टाकस, या त्या आयडीकरवी किल्ला लढवू नका.

हायसेनबर्ग या आयडीने दिलेल्या प्रतिक्रिया या स्पार्टाकसच्या वतीने आहेत का ? असल्यास स्पार्टाकसचा खुलासा वाचून असं वाटू लागल आहे की हा आयडी ऐकण्याच्या पलिकडचा आहे. अहंकारी आणि उर्मट आहे.

याच्यावर कायदेशीर कारवाई नको या मताचा फेरविचार करायला पाहीजे. चौर्यकर्म तर झालच आहे. ते कबूल केल असतं तर उठून दिसलं असतं.

>>तुम्ही खात्री केली आहे का या आयडींशी बोलून ? >> बाळू, तुमचं समाधान करण्याकरता इतकी उठाठेव करण्याची मला गरज वाटत नाही. तुम्हाण्ला शंका वाटत असल्यास तुम्ही करू शकताच.

उठाठेव न करताच काहीही मतं मांडण्याची उठाठेव पण केली नाही तर जास्त चांगलं होईल. आपले दोन्ही स्टेटमेण्ट्स निट वाचून मग या विषयावर पुढचं मत लिहा. नाहीतर तुमच्या असल्या बडबडीकडे लक्ष द्यायची मला तरी गरज वाटत नाही.

Pages