कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
ट्रॅप संदर्भात मी स्पार्टाकस या आयडी ला विपूही केलेली होती परंतू काही वेळाने कोणतेही उत्तर न देता ती विपू डिलीट झाल्याचे कळले.
हे सर्व इथे मांडण्याचे कारण इतकेच की यामुळे मायबोली, आणि इतर मराठी संकेतस्थळांवर चुकीचा पायंडा पडू नये.
हे सगळे अतिशय रँडमरित्या घेतले आहेत. जमल्यास ट्रॅप या कादंबरीशी पडताळून पहावे.
बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.
(मायबोलीच्या धोरणानुसार धाग्याच्या मुख्य मजकुरातल्या लिंक काढून टाकल्या आहेत. प्रतिसादामधे पुराव्यासाठी भरपूर माहिती आहे -वेबमास्तर)
बाsssप रे! मी ट्रॅप किंवा
बाsssप रे!
मी ट्रॅप किंवा स्पार्टाकस यांचे अन्य लिखाण वाचलेले नाही. परंतु अल्पावधित बर्याच मायबोलीकरांचे ते आवडते लेखक झाले आहेत. दुसर्या कुणाच्या (निरंजन घाटे हे विज्ञान कथांच्या संदर्भातील आदरणिय नाव आहे) कथा/कादंबर्यांमधिल उतारे आपल्या कादंबरील वापरणे हे वाड्मयचौर्य गणले जाते.
स्पार्टाकस यांची प्रतिक्रीया आल्यावरच खरे-खोटे काय ते कळेल
अरेरे ! स्पार्टाकस ह्यांनी
अरेरे ! स्पार्टाकस ह्यांनी ह्या विषयावर भाष्य करावे.
ती पाणबुडीची कल्पना (एक
ती पाणबुडीची कल्पना (एक मुद्दाम पकडण्यसाठी आनलेली व एक खरी खुरी दुसर्या मार्गाने आणायची) आधीही वाचल्यासारखी वाटत होती पण पुस्तकाचे नाव आठवत नव्हते..
(No subject)
सर्वप्रथम, मी निरंजन घाटे
सर्वप्रथम,
मी निरंजन घाटे यांची विषकन्या ही कादंबरी वाचलेली नाही.
अशी कोणतीही कादंबरी आहे याची मला कल्पनाही नाही.
ट्रॅप ही कादंबरी लिहीताना मी पाकीस्तानची राजकीय परिस्थिती आणि तिथली लष्करशाही विरुद्ध नागरी लोकशाही यांचा संदर्भ वापरलेला होता. त्या अनुषंगाने तो उल्लेख आलेला आहे.
भुताळी जहाज या मालिकेतील लेखांबद्दलही मी तेव्हाच हे स्पष्टं केलं होतं की मी रिचर्ड वायनरच्या मूळ पुस्तकाचा संदर्भ म्ह्णून वापर केलेला आहे. त्याच बरोबर इतरही अनेक माहिती त्या सर्व लेखांत आलेली आहे.
संदर्भ म्हणून मी जेव्हा इतर ग्रंथांचा वापर केला आहे, त्या प्रत्येक लेखाच्या खाली त्या ग्रंथाचं नाव आलेलं आहे. तसेच अनुवाद केलेल्या प्रत्येक कथेखालीही मूळ लेखकाचं नाव दिलेलं आहे.
कोणत्याही प्रकारचे किंवा कोणत्याही लेखकाचे लेखन चोरून वापरण्याचा माझा कधीही हेतू नव्हत आणि नाही.
कथाकल्पना जुळणे हा निव्वळ
कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
या कचाच्या वाक्यावरील आपली प्रतिक्रिया वाचायला आवडेल.
..
..
May be great minds think
May be great minds think alike वगैरे...
(No subject)
बापरे, यामुळे मायबोलीवर
बापरे,
यामुळे मायबोलीवर कायदेशीर कारवाई होऊ शकते.
विषकन्या कादंबरीचे
विषकन्या कादंबरीचे स्क्रीनशॉट्स घेतल्याने आणि टाकल्याने मायबोलीवर कारवाई होऊ शकते का? अरे देवा!!
लेखक महोदय काय म्हणतात ते पाहून उडवतो काही काळाने.
अहो भम, तुमच्यामुळे
अहो भम, तुमच्यामुळे नाही.
त्या कादंबरीमुळे म्हणतेय मी.
भयंकर आहे हा प्रकार.
मी ललित वाचत नाही. पण या
मी ललित वाचत नाही.
पण या आयडीच्या एका लिखाणात मुद्दाम गांधीजींचे चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न आल्यावरून प्रतिक्रिया दिल्याचे आठवते. तिथेही यांनी विकिपेडियात वाचले वगैरे सांगितले होते.
मानसिकता कशी असावी ते नक्की कळायला मार्ग नाही. पण चांगली नाही हे नक्की. यांचा फ्यानक्लब वगैरे निघाला होता म्हणे मायबोलीवर! उचल्यांचा फॅनक्लब असे त्याचे नामकरण करावे अशी माझी सूचना आहे.
कवठीचाफा यांनी हाच लेख मिसळपाव नामक संस्थळावरही टाकावा जेणेकरून संभावित उचलेगिरीस भुलू नये हा संदेश इतरत्रही पोहोचेल.
. . . . . . . . . .
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कवठीचाफा यांनी हाच लेख
कवठीचाफा यांनी हाच लेख मिसळपाव नामक संस्थळावरही टाकावा जेणेकरून संभावित उचलेगिरीस भुलू नये हा संदेश इतरत्रही पोहोचेल.>>
'ट्रॅप' कादंबरी मिसळपाव नामक संस्थळावरही आहे काय? नसल्यास तिकडे हा लेख डकवण्याचा हट्ट/आदेश कशासाठी?
पंखोबा, तिथे ती कादंबरी आहे.
पंखोबा,
तिथे ती कादंबरी आहे.
अभ्यास वाढवा.
बापरे भयानक आहे
बापरे भयानक आहे हे,
स्पर्ताकास साहेबांबाद्दलचा सगळा आदर उतरला आहे
लोकहो, कृपया हा विषय इथेच
लोकहो,
कृपया हा विषय इथेच थांबवा अशी विनम्र विनंती!
फार वाईट वाटत आहे. ह्याही गोष्टीचे की स्पार्टाकस ह्यांच्या लेखनाबाबत ही बाब पकडली जावी आणि त्यानंतर त्यांच्याबाबत राग उफाळून यावा.
स्पार्टाकस - एक मस्त कादंबरी लिहून ह्या सगळ्यावर पाणी ओतून टाका
मी आपले लेखन वाचलेले नव्हते पण मला स्वाती आंबोळेंनी सांगितले होते की आपण सुंदर लिहिता. तुम्ही म्हणता तसे निव्वळ संदर्भ, प्रेरणा इतकेच असेल तर कृपया लगेचच काहीतरी छान विषय निवडून लिहायला घ्यावात अशी मैत्रीपूर्ण विनंती!
मलाही एका धाग्यावर या
मलाही एका धाग्यावर या स्पार्टाकसने उर्मट प्रतिक्रिया दिलि होते असे पुसटसे आठवते.
वाइट वाटले
कवठीचफा, धाग्याचे शीर्षक
कवठीचफा, धाग्याचे शीर्षक बदलून 'मिळती जुळती कथानके' असे घ्यायला तुम्हाला आवडेल का?
कंपुतील लेखक वकिली करायला
कंपुतील लेखक वकिली करायला आले.
अत्यन्त दुर्दैवी प्रकार
अत्यन्त दुर्दैवी प्रकार आहे...
पण आश्चर्यकारक नाही.
स्पार्टाकस खुलासा अपुरा वाटतो... निव्वळ योगायोग मानावा का ?
<< 'मिळती जुळती कथानके'
<< 'मिळती जुळती कथानके' >>
---- निव्वळ योगायोग समजायचे: पण का ?
असे माझे शिर्षक.
पाठिंबा देण्यासारखी स्थिती
पाठिंबा देण्यासारखी स्थिती असेल तर द्यायलाच हवा.
लोक तर पाठिंबा देण्यासाठी जोक नसला तरी जोकच्या पेजवर हसण्याच्या स्माईली टाकतात
पंखोबा, तिथे ती कादंबरी आहे.
पंखोबा,
तिथे ती कादंबरी आहे. स्मित
अभ्यास वाढवा.>>
माहिती नव्हते हो! माबोभेटीला सुद्धा वेळ कमी पडतोय तर दुसरीकडे कधी जाणार..
असो..
स्पार्टाकस यांना पुलेशु...
कृपया इतर संकेतस्ठळांवरील
कृपया इतर संकेतस्ठळांवरील पुस्तकांची पाने मायबोलीवर टाकू नका. तेवढेच प्रतिसाद आणि मूळ धाग्यातील प्रकाशचित्रे अप्रकाशीत केली आहेत.
माफ करा, पण धाग्यातला आक्षेप
माफ करा,
पण धाग्यातला आक्षेप हा आहे, की लेखकाने इतर पुस्तकांतून मजकूर 'कॉपी' करून इथे ललितलेखन केले आहे.
हा आक्षेप योग्य आहे हे सिद्ध करणार्या प्रचि त्यांनी सोबत जोडलेल्या होत्या.
प्रश्न असा आहे, की जर इतर पुस्तकांची प्रचि चालत नसतील, तर त्या पुस्तकांतला मजकूर असलेले धागेही व्यवस्थापन अप्रकाशित करणार का?
लोकहो, वैज्ञानिक क्षेत्रात
लोकहो,
वैज्ञानिक क्षेत्रात बहुशोध सातत्याने लागत असतात. हाच प्रकार ललित साहित्यात आणता येईल काय? आणल्यास निकष काय असावेत?
आ.न.,
-गा.पै.
पण धाग्यातला आक्षेप हा आहे,
पण धाग्यातला आक्षेप हा आहे, की लेखकाने इतर पुस्तकांतून मजकूर 'कॉपी' करून इथे ललितलेखन केले आहे.
हा आक्षेप योग्य आहे हे सिद्ध करणार्या प्रचि त्यांनी सोबत जोडलेल्या होत्या. >>
+1
I don't get your stand.
"संकेतस्ठळांवरील पुस्तकांची पाने मायबोलीवर टाकू नका" हे इतर ठिकाणी योग्य असले तरी ह्या इथे तो पुरावा आहे आणि माझ्यादृष्टीने पुरावा नष्ट करायची गरज नाही. आणि त्यात कसलाही प्रताधिकार वगैरे भंग होत नाही.
इब्लिस, केदार +१. या धाग्यात
इब्लिस, केदार +१.
या धाग्यात मांडलेल्या विषयाबद्दल तुमच्याकडून काहीही टिप्पणी झाली नाही. याबद्दल प्रशासनाकडून त्यांचं मत अपेक्षित आहे.
Pages