स्पार्टाकस या आय डी चे लेखन

Submitted by कवठीचाफा on 9 March, 2015 - 00:57

कित्येक दिवसांनी थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून सहज मायबोलीवर चक्कर टाकली, आणि स्पार्टाकस या आय डी ची कादंबरी ट्रॅप वाचनात आली.
वाचताना सुरूवातीपासूनच देजावू फिलींग येत होती चार- पाच भाग वाचल्यावर पुर्ण खात्री पटली की या कादंबरीमधे जी दोन समांतर कथानके आहेत त्यातले एक कथानक हे निरंजन घाटे यांच्या `विषकन्या' या कादंबरीशी तंतोतंत जुळत आहे. कथाकल्पना जुळणे हा निव्वळ योगायोग असू शकतो, पण इथे वाक्य न वाक्य जुळतेय.
हाच अनुभव याच आय डी च्या `भुताळी जहाजे' या मालिकेत आला होता. त्या मालिकेत `ओशन ट्रँगल' या बाळ भागवत संकलीत पुस्तकातले तंतोतंत उतारे लिहीलेले होते.
ट्रॅप संदर्भात मी स्पार्टाकस या आयडी ला विपूही केलेली होती परंतू काही वेळाने कोणतेही उत्तर न देता ती विपू डिलीट झाल्याचे कळले.
हे सर्व इथे मांडण्याचे कारण इतकेच की यामुळे मायबोली, आणि इतर मराठी संकेतस्थळांवर चुकीचा पायंडा पडू नये.

हे सगळे अतिशय रँडमरित्या घेतले आहेत. जमल्यास ट्रॅप या कादंबरीशी पडताळून पहावे.

बर्म्युडा ट्रँगल मधील भुताळी जहाजे प्रकरणार उरलेली जहाजे सापडतील, प्रिह्यु मध्ये उपलब्ध नाहीत.

(मायबोलीच्या धोरणानुसार धाग्याच्या मुख्य मजकुरातल्या लिंक काढून टाकल्या आहेत. प्रतिसादामधे पुराव्यासाठी भरपूर माहिती आहे -वेबमास्तर)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओत्म अस्म कधी कधी येवढनवीन अस्ताना. जरा जरा फेमस स्तोरि जशिच्य तशी लिहिलि जावु शकते. इथुन पुढ नाआहि होनार अस लेखकाने म्हनुन विशय सम्पवुन टाका.

<<वैज्ञानिक क्षेत्रात बहुशोध सातत्याने लागत असतात. हाच प्रकार ललित साहित्यात आणता येईल काय? आणल्यास निकष काय असावेत?>>
------
अशी तुलना करणे अयोग्य वाटते. उदा- समजा जगातले २०० शास्त्रज्ञ एकाच विषयावर (अणू गर्भात दडलेले सत्य) सन्शोधन करत आहे. येथे शास्त्रज्ञ थोडे (time wise) भरकटतील पण अन्तिम सत्य, त्या विषयापुरते केवळ एकच आहे. त्यामुळे बहुशोध शक्य आहेत. अर्थात निबन्ध लिहीताना शब्द शब्द उचलत नाही, उचल झाल्यास चोरीच समजतात.
पण काव्य, कथा, ललित याबाबत असे एकच सम्भवणे अशक्य आहे. गुलाब किव्वा फुलपाखरु या विषयावर मला आणि तुम्हाला सारखीच कविता (प्रत्येक शब्दा सकट जशीच्या तशी) सुचणे अशक्य आहे. या एकाच विषयावर हजारो कविता सहज शक्य आहे पण शब्द आणि शब्द.... अचुक बरोबर येणार नाही.

तंतोतंत उचलले असेल तर खरेच दुर्दैवी आहे, तसेच जर त्यांनी थोडाफार भाग उचलला असल्यास तसे नमूद करायला हवे होते.

ट्रॅप मी वाचली नव्हती, कारण क्रमश कथा वाचायचा आळस. पण त्यांचीच "फाळणी"कथा दिर्घकथा असूनही आवडीचा विषय असल्याने वाचली होती. आवडली होती. तसे प्रतिसादात वेळोवेळी नमूद केले होते. ट्रॅपही कधी फुरसत मिळाल्यास वाचायचा विचार होताच. त्यामुळे या प्रकाराबद्दल (खरा असल्यास) मनापासून खेद वाटतो.

त्यांच्या पुढच्या अभ्यासपुर्ण कथेची वाट बघणारा एक मायबोलीकर चाहता.

या धाग्यात मांडलेल्या विषयाबद्दल तुमच्याकडून काहीही टिप्पणी झाली नाही. याबद्दल प्रशासनाकडून त्यांचं मत अपेक्षित आहे.>>> +१

आणि जर वर उल्लेख केल्याप्रमाणे लेखकाने हे खरच केलं असेल (ज्याची शक्यत जास्त आहे) तर मात्र दुर्दैवी आणि चीड येण्यासारखा प्रकार आहे. जेव्हां आपल्या लेखनावर शेकड्यात प्रतिक्रिया येत आहेत, लोकं आपल्या लिखाणाचं इतकं कौतुक करतायत (एका प्रतिक्रिया - लेखकाने सबंध मायबोलीला काही दिवस तुम्ही खिळवून ठेवलंत), वाचकांनी इतक्या वर नेउन ठेवलं आणि हे सर्व काही स्वीकारताना लागणारी मनाची खंबीरता(?) कुठून आणलीत हा प्रश्न पडतोय

स्वतःच्या गझलेची "जमीन" दुसर्याने उचलली की हायतोबा करणारे लोक इथे मात्र पाठिंबा देत आहे
आश्चर्य आहे

<<प्रश्न असा आहे, की जर इतर पुस्तकांची प्रचि चालत नसतील, तर त्या पुस्तकांतला मजकूर असलेले धागेही व्यवस्थापन अप्रकाशित करणार का>>
------- प्रचि पुरावा आहे... होता.... योग्य मुद्दा.

मी पाठिंबा देत नाही आहे. मी असे म्हणत आहे की आता हा विषय सोडून द्यावा. काही दिवसांनी ते काहीतरी नवीन लिहितील.

गझलेची जमीन आणि लेखन कॉपी पेस्ट करणे ह्यांची तुलना गैर आहे. कशी ते समजावत बसून येथील चर्चा दिशाहीन करण्याची इच्छा नाही.

इब्लिसांनी विचारलेला प्रश्न महत्वाचा वाटतो.

या कादंबरीत दोन कथानके आहेत. एका कथानकाबद्दल कवठी चाफा यांनी खुलासा केला आहेच. दुसर्‍या कथानकाचेही बेफिकीर यांच्या 'गुड मॉर्निंग मॅडम' या कादंबरीशी खटकण्याएवढे साधर्म्य आहे. अनेक तपशील व प्रसंग तसेच्या तसे आले आहेत. मी हे आधीही लेखकांच्या निदर्शनास आणले होते पण त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. नंतरही हे सुरूच राहिले. अगदी शेवटचा प्रसंगही (पार्टी, आफ्टरपार्टी नाट्य, मागण्या, धमक्या.., शेवट) बराच या कादंबरीवर बेतलेला आहे असे वाटले.

हा माझा तिथला प्रतिसाद.
------------------------------------

जीएस | 21 January, 2015 - 13:13
स्पार्टाकस, कथानक एकदम जोरदार सुरू आहे.

पण अनेक प्रसंग व तपशील यांचे बेफिकीर यांच्या 'गुड मॉर्निंग मॅडम' या कादंबरीशी खटकण्याएवढे साधर्म्य आहे. उदाहरणार्थ,

(१) फॉरेन कोलॅबरेशन बारगळणे, त्याबद्दलच्या बैठकीत एका सेल्स विभागातल्या निकटवर्तीयाला जाब विचारणे, त्याने एमडीच्याच योग्यतेबद्दल प्रश्न उपस्थित करणे व त्याची हकालपट्टी.

(२) एमडीला विमानात प्रतिस्पर्ध्याचा सेल्सचा मनुष्य भेटणे. ती त्याच्या विंडो सीटवर बसलेली असणे. त्याने बसू देणे आणि एकदा वर गेल्यावर बाहेर काय दिसते याबद्दल बोलणे, तो अमराठी असणे, तरी त्याने मराठीतून बोलणे आणि तिने त्याब्द्दल आश्चर्य व्यक्त करताच त्याला अनेक भाषा बोलता येतात असे सांगणे. पुढे त्यालाच हायर करणे.

आधीही असे साधर्म्य जाणवले होते. पण हे खूपच जास्त आहे असे वाटते. अर्थात तुमचा प्लॉट वेगळा आहे. आणि तुम्ही मुद्दाम करत आहात असे मला म्हणायचे नाही.

कधी कधी एखादी कल्पना वा ओळ सुचते, पण नंतर ही नेमकी सुचली आहे की आधी कधीतरी वाचली आहे अशी शंका मनात येते. असेही झाले असू शकेल.

हा योगायोग असला तरी असे योगायोग टाळल्यास बरे होईल असे वाटते.

जीएस, तुम्ही ते त्यावे़ळी मलाही कळवले असते तर आवडले असते. असो.

आता मायबोलीवरील सर्व लेखन वाचत राहायला हवे.

आधीच एका आय डी ने मला माझ्या तीन कादंबर्‍या जशाच्या तश्या व माझ्या नावाशिवाय एकाने कुठेतरी डकवलेल्या असल्याचे पुरावे दिले मध्यंतरी! आपला काही कंट्रोलच नसतो ह्या गोष्टींवर Sad

स्पार्टाकस काहीतरी नवीन, फ्रेश लेखन लवकरच सुरू करतील अशी आशा!

अर्थातच , बर्याच जणानी , ट्रॅप वाचून बेफिंच्या गुड मॉर्निन्ग मॅडेम ची आठवण झाल्याचे साण्गितले होते .
बाकी "वेट एन वॉच " मोड मध्ये .

इंजिनीयरींगला रेफरन्स बुक्स मधून उतारे तसेच्या तसे उचलून लोकल लेखक पुस्तक छापायचे आणि ते फेमस असायचे कारण त्यात सगळे एकत्र मिळायचे आणि फार शोधाशोध न करता योग्य टॉपिक वरची माहिती हातात यायची..

कामाच्या व्यापात दिवसभर इकडेही फिरकायला मिळाले नाही त्यामुळे बरंच नविन कळतंय
असो इथे केवळ काही पानांचे स्क्रिनशॉट टाकल्याने प्रताधिकाराचा भंग होतो हे माझ्यासाठी नविन आहे.
प्रिंट वरून सॉफ्ट मध्ये लिहील्याने तो होत नसावा.

दुसरं असं की कथानक जुळणे इथपत ही बाब नाही तर वाक्य न वाक्य जुळणे याबद्दल आहे हे मी पुन्हा एकदा सांगू इच्छीतो.

स्पार्टाकस या आय डी ने दिलेलं भुताळी जहाज बद्दलच स्पष्टीकरण किती तोकडं आहे हे `ओशन ट्रँगल' वाचल्यावर लक्षात येईल, ( स्क्रिन शॉट आहेत पण टाकता येणार नाहीत )

त्यामुळे बेफिकीर तुमची सुचना मान्य करता येत नाही याबद्दल दिलगीर आहे.

मला भूताच्याआ गोश्टीने खुप भीती वाटते. पण वाचायला आवडभुताळ
कुठ मिळल भुताळेच जहाज ?

जीएस, तुम्ही ते त्यावे़ळी मलाही कळवले असते तर आवडले असते. असो.>>>

अरेरे बेफि , लक्शात नाही आलं की तुम्ही वाचल नसेल . Sad
या पुढे लक्शात ठेवण्यात येइल .

'ओशन ट्रँगल' वाचल्यावर लक्षात येईल. >>
मलाही तेच आठवले, वाचताना काहिसं सेम सेम वाटत होते, तसेच प्राणघातक कंठा या पुस्तकातली एक घटना स्पायांच्या दुसऱ्या मालिकेत होती, पण स्पानी तीच घटना अजून चांगल्या प्रकारे लिहिलेली (टायटॉनिकवाली). अर्थात, संदर्भ असले तरी लिखाण मला स्पाचेच आवडले.

बाकी "वेट एन वॉच " मोड मध्ये . > +१

इंजिनीयरींगला रेफरन्स बुक्स मधून उतारे तसेच्या तसे उचलून लोकल लेखक पुस्तक छापायचे आणि ते फेमस असायचे कारण त्यात सगळे एकत्र मिळायचे आणि फार शोधाशोध न करता योग्य टॉपिक वरची माहिती हातात यायची.. >>
आमच्या काही पुस्तकांत विकीपिडीयाचे मटेरियल होते/ आहे.

>>>जीएस, तुम्ही ते त्यावे़ळी मलाही कळवले असते तर आवडले असते. असो.

तुम्ही वाचले नसेल असे मला वाटलेच नाही, त्यामुळे मी मुद्दा उपस्थित करून्सुद्धा तुम्ही काही लिहिले नाहीत याचे मला आश्चर्य वाटले होते.

स्पार्टाकस यांच्या थातुरमातुर स्पष्टीकरणानंतरही मी पुढेही त्या विषयावर काही पोस्ट टाकली नाही कारण एका सुस्पष्ट पोस्ट्मधून मुद्दा कळत नसेल किंवा कळून घ्यायचा नसेल तर पुढे आणखी पोस्ट लिहून तो कळत अथवा वळत नाही असा अनुभव आहे.

इथेही हेमाशेपो.

स्पार्टाकस काहीतरी नवीन, फ्रेश लेखन लवकरच सुरू करतील अशी आशा!>> +१
जे घडलं ते वाईट... पण स्पार्टाकसाची स्वत:ची एक लेखनशैली आहे..

स्पार्टाकसाची स्वत:ची एक लेखनशैली आहे..>>>>> दुसऱ्याचे लेखन स्वतः च्या नावावर खपवण्याची Uhoh

अलिबाबाची गुहाच !>>
काय काउ! कधी प्रवेश केला की नाही गुहेत की फक्त पंजे बघुन अंदाजे दगड मारण चालल्य Proud

स्पार्टाकस हे माझे मायबोलीवरील एक आवडते लेखक आणि जर असे झाले असेल तर खरंच वाईट आहे. एखादी कल्पना सुचणे आणि तीची दुसर्‍या एखाद्या लेखकाच्या लेखनाशी साधर्म्य असणे एकवेळ समजु शकते. पण दोन्ही लेखकांचे त्यातील प्रत्येक शब्द जुळणे कठिण असते.

स्पार्टाकस काहीतरी नवीन, फ्रेश लेखन लवकरच सुरू करतील अशी आशा!>> +१
जे घडलं ते वाईट Sad

http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=180712072011&Previe...

बुकगंगावर 'विषकन्या'च्या प्रिव्ह्युमध्ये बर्‍याच ठिकाणी साधर्म्य सापडतेय. काही वाक्ये तर जशीच्या तशी कॉपी-पेस्ट केलेली दिसताहेत.

Pages