करलो दुनिया मुठ्ठी मे.
थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .
गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .
विश्या ( वि. भो. )
वत्सला, वृतांत लिव्हा की
वत्सला,
वृतांत लिव्हा की
टिम इंडीया सरस खेळली.
टिम इंडीया सरस खेळली. कालचे क्षेत्ररक्षण अफलातून होते. मोहित शर्माचा थ्रो... धवन आणि रहाणेच्या खेळीच्या तोडीचाच होता.
गेल्या दोन्ही मॅच मधे टॉस जिंकुन प्रथम फलंदाजीचा पुरेपुर फायदा घेतला. पुढिल सामन्यांना मधे प्रकाशझोतात पाठलाग करुन सगळ्या टिकाकारांची तोंडे बंद करावीत.
कॅप्टन कूल परत एकदा चमक दाखवत आहे. मॅच शिवाय इतर कोणताच विचार त्याच्या डोक्यात नसतो. करोडो पाठिराख्यांचा दबाव बाजूला ठेवुन फक्त गेम वर लक्ष केंद्रीत करणे... खरच महान!
आज इथल्या ७००+ पोस्टी वाचून
आज इथल्या ७००+ पोस्टी वाचून काढल्या. स्टेडिअममध्ये असल्याचा फील आला नुसत्या पोस्टी वाचून पण.
>>
+१
शेपूट आधी खेळते की टॉप
शेपूट आधी खेळते की टॉप ऑर्डर?
प्रतिसादबेफ़िकीर | 23 February, 2015 - 14:26 नवीन
एका सामन्यात शेपटाने घात केल्यावर दुसर्या सामन्यात असे त्यांना म्हणायचे असावे.
>>>>
एक्झॅक्टली,
हेच जर गावस्कर किंवा हर्षा भोगले बोल्ला असता तर तुम्हाला लगेच समजले असते स्मित
मी स्वत: गल्ली क्रिकेटमध्ये हा अनुभव घेतलाय. १२-१२ ओवरच्या मॅचेस असायच्या आणि बोलण्यापुरते ११ प्लेअर, पण ३-४ तरी जमा करून आणलेले, त्यांना ना बॅटींग यायची ना बॉलिंग, ना फिल्डींग. येस्स फिल्डींगलाही त्यांना अक्षर्शा लपवावे लागायचे, त्यांच्याकडे झेल उडाला की बॉलर सरळ पुढचा बॉल टाकायच्या तयारीला लागायचा..
आणि अश्या संघातून मी ओपनिंगला उतरायचो. बरोबर आणखी एक तेंडुलकर!.
बाराव्या ओवरपर्यंत खेळायचेच आहे हे मनाशी ठरवूनच आम्ही डावाची सुरुवात करायचो, अन्यथा आम्ही दोघे गेलो की तिथेच सामन्याचा निकाल.
>>>>>
चालू द्या!!
कॅप्टन कूल परत एकदा चमक दाखवत
कॅप्टन कूल परत एकदा चमक दाखवत आहे. मॅच शिवाय इतर कोणताच विचार त्याच्या डोक्यात नसतो. करोडो पाठिराख्यांचा दबाव बाजूला ठेवुन फक्त गेम वर लक्ष केंद्रीत करणे... खरच महान! >>>>>>>>>> १०००००० % सह्मत
अरे वा! या वर्ल्ड कपला
अरे वा! या वर्ल्ड कपला धोन्याला शिव्या देत नाहीयेत कुणी
या वर्ल्ड कपला धोन्याला
या वर्ल्ड कपला धोन्याला शिव्या देत नाहीयेत कुणी >> पाने चाळा भाऊ. देउन झाली आहेत. खास करुन जाडेजावरुन
काल पोस्ट मॅच इंटरव्ह्यूमध्ये
काल पोस्ट मॅच इंटरव्ह्यूमध्ये धोनी अशा अर्थाचं काहीतरी म्हणाला की जडेजाने चांगली बॉलिग केली आणि बाकीच्यांनीही त्याला चांगली साथ दिली... जडेजाने असं काय केलं की तो मेन बोलर होता आणि बाकीचे साथीला होते ? की मी काही चुकीचं ऐकलं ?
बरोबर ऐकले. म्हणुन त्याला
बरोबर ऐकले.
म्हणुन त्याला बोलणी बसत आहेत. धोनी रिटायर्ड झाल्यावर जाडेजाला पानी देखील भरायला कोणी ठेउ नये
म्हणुन त्याला बोलणी बसत आहेत
म्हणुन त्याला बोलणी बसत आहेत >>>> ओह.. त्या स्टेटमेंट वर टीका झाली का ? मला आधी वाटलं मी पहाटे झोपेत भलतच काही ऐकलं की काय..
काहीतरी करून जडेजाला हिरो
काहीतरी करून जडेजाला हिरो बनवणारच धोनी
काहीतरी करून जडेजाला हिरो
काहीतरी करून जडेजाला हिरो बनवणारच धोनी>> अगदी अगदी... म्हणुनच मला त्याचा प्रचन्ड राग येतो.
मी नेमका बघितला नाही
मी नेमका बघितला नाही इंटरव्यु. आता बघायला पाहिजे. धोनी कधीपण बोलताना एकदम नीट बोलतो, म्हणजे त्याच्या बोलण्यात काहीही फेकतोय असं नाही वाटत आणि तो सगळ्यांच्या लक्षात येइल इतकं एखाद्याचे फुक्याचे कौतूक करेल हे एकून मला धक्का बसला आहे. मी प्रयत्न केला गूगल करायचा. कोणाकडे मॅच प्रेजेन्टेशनची लिंक असेल तर कृपया इथे टाका. धन्यवाद!
मला वाटतय की त्याच्या मॅच
मला वाटतय की त्याच्या मॅच प्लॅन नुसार जडेजा नी मधल्या ओव्हर्स सलग अफ्रिकेच्या फलंदाजांना जखडून ठेवायचे काम करायचे होते. त्यांना प्रेशराईज्ड केल्यामुळे पुढे त्यांनी रिस्क घेतल्या. त्यामुळे धोनीचा प्लॅन सफल झाला. मला तरी वाटत नाही की जडेजा कडून त्यानी काय फार विकेट काढायची अपेक्षा ठेवली असेल म्हणून. विकेट काढायचे काम फास्ट बोलर्स आणि अश्वीन चे होते.
आय सी सी च्या वेबसाईट वर आहे प्रेझेंटेशन. त्याबरोबरच बाकीचे अॅनॅलिसिस पण वाचा बुवा आणि मॅच पॉईंट पहा.
वैद्यबुवा, मी जे वाक्य लिहिले
वैद्यबुवा,
मी जे वाक्य लिहिले आहे ते असेच आपले लिहिले आहे.
एकंदर आजवर धोनीने जडेजाला डोक्यावर घेतल्यासारखे केल्यामुळे! विशिष्ट स्पीच बघून मी तसे म्हणालेलो नाही.
पण धोनीला जडेजाला हिरो बनवायचे असते हे सत्य लपलेले नाही असे मला वाटते.
(मोदींनीही आपल्या शुभेच्छा संदेशात त्याचा वेगळा उल्लेख करावा इतका तो कुठे ग्रेट आहे? मोदींनीही अगदी थट्टेने 'सर जडेजांना म्हणाव असे असे करा' म्हणणे जरा अतीच वाटले).
माझ्या अंदाजाने 'नुसते
माझ्या अंदाजाने 'नुसते फलंदाजांना जखडून ठेवण्याची क्षमता असणे' ह्या निकषावर अजून तरी गोलंदाज निवडले जात नाहीत. जडेजाने विकेट घेतलीही आणि विकेट घ्यायला हव्यातही. 'फलंदाजांना जखडून ठेवणारा गोलंदाज आणि वेळेला उपयोगी पडणारा आक्रमक फलंदाज' असे दुहेरी रेप्युटेशन असले तर ठीक आहे. जडेजा त्याच रेप्युटेशनमुळे संघात असावा, पण अजून बॅट तळपायची वेळ आलेली नाही. वेळ आली तर तळपते की नाही ते दिसेल.
बेफी या मॅचचा विचार करता
बेफी
या मॅचचा विचार करता धोनीची कमेंट अजिबात चूक नव्हती!
बेफिकिर, ओके. मी एरवी फारसा
बेफिकिर, ओके. मी एरवी फारसा क्रिकेट पाहत नाही त्यामुळे मला अंदाज नाहीये की तो तसं करतोय ते आणि म्हणूनच मला मॅच इंटरव्यु पहायचा होता.
बघतो धनि.
या मॅचचा विचार करता धोनीची
या मॅचचा विचार करता धोनीची कमेंट अजिबात चूक नव्हती! > +१.
धोनी नेहमीच जाडेजाला विशेषतः भारतात फलंदाजांना जखडून ठेवण्यासाठी वापरतो. Australia मधेही तसे करायला जमले म्हणून त्याने कौतुक केले असावे असे मला वाटले. तसेच जाडेजा फार दिवसांनी खेळतोय त्यामूळे तोही अँगल असावा.
'फलंदाजांना जखडून ठेवणारा गोलंदाज आणि वेळेला उपयोगी पडणारा आक्रमक फलंदाज' असे दुहेरी रेप्युटेशन असले तर ठीक आहे.> तसेच ह्यात अजून दुसरा viable पर्याय उपलब्ध नाही हाही भाग आहेच. अक्षर पटेल अननुभवी आहे पण तो पुढे होउ शकेल. जाडेजाच्या fielding ला मात्र फारसा option नाही (रैना नि राहणे वगळता).
असामी +१ जडेजाची फलंदाजी हा
असामी +१
जडेजाची फलंदाजी हा तसा चिंतेचा विषय सध्या तरी नाहिये. त्यानी येऊन २०-२५ धावा चांगल्या स्ट्राईक रेट नी काढल्या तरी पुरेश्या आहेत.
टेस्ट साठी तरी चांगला ऑलराऊंडर पाहिजे. जडेजा रणजी मध्ये चांगला खेळला आहे पण आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याची फलंदाजी तितकी चालली नाहिये.
अजून आपला रोहित शरमा जर ऑल
अजून आपला रोहित शरमा जर ऑल सिलिंडर्स वर फायर झाला ना तर फार मजा येइल. ऑस्ट्रेलिया विरुद्ध ३४० वगैरे टोटलची आपल्याला नितांत गरज आहे आणि तेव्हा शर्मा सुटला तर ते सहज शक्य होईल.
Man! I am getting really excited!
धोनीचे काही लाडके आहेत आणि
धोनीचे काही लाडके आहेत आणि त्यात सर जडेजांचा नंबर फार वरचा आहे यात काही लपवाछपवी नाही.
आता ते तसे का आहे याबाबत मात्र चर्चा होऊ शकते
म्हणजे जडेजा खरेच त्याच्या गेमप्लानिंग मध्ये बसतो म्हणून की इतर काही हितसंबंध गुंतले आहेत.
कारण चेन्नाई सुपर्किंग हे भारतीय संघाचे प्रवेशद्वार आहे अशीही चर्चा अधूनमधून होत असतेच.
बाकी संघनिवडीत राजकारण हे चालतेच, म्हणूनच एखादा रॉजर बिन्नी यांचा सुपुत्र स्टुअर्ट बिनी काहीही विशेष चमक न दाखवता थेट ओस्ट्रेलियामध्ये विश्वचषक खेळायला जातो, तर युवराजसारखा मॅचविनर रणजीत फॉर्मला असतानाही संभाव्य ३० मध्येही त्याचा साधा विचार होत नाही वा एखाद्या रहाणेसारख्या क्लास प्लेअरला आपली जागा डोक्यावर टांगती तलवार घेत झगडून मिळवावी लागते.
थोडे राजकारण चालत असेल पण
थोडे राजकारण चालत असेल पण धोनी धोरणी आहे.
समित बाळचा फेब २३ चा क्रिकइन्फोवरचा लेख वाचा. फुकट हितसंबंधांची चर्चा करण्याऐवजी खर्या स्ट्रॅटेजीज काय असतील ते समजावून घ्या.
बाकी संघनिवडीत राजकारण हे
बाकी संघनिवडीत राजकारण हे चालतेच, म्हणूनच एखादा रॉजर बिन्नी यांचा सुपुत्र स्टुअर्ट बिनी काहीही विशेष चमक न दाखवता थेट ओस्ट्रेलियामध्ये विश्वचषक खेळायला जातो, तर युवराजसारखा मॅचविनर रणजीत फॉर्मला असतानाही संभाव्य ३० मध्येही त्याचा साधा विचार होत नाही >> मी बिन्नीचा फॅन नाही हे आधीच नमूद करून, यंदा रणजीमधे बिन्नीचा फॉर्म - विशेषतः बॉलिंग मधला बघून त्याला घेतले असावे. युवराजने तीन शतके मारली हे कबूल आहे पण हा पूर्वीचा युवराज वाटत नाही हे कारण त्याच्या विरुद्ध गेले असावे. जाडेजाच्या जागी हि एकमेव position त्याला होती नि सध्या तरी जाडेजा is better baller and way better fielder than Yuvi. असे असताना कशा टाइपचा all rounder हवा ह्याचा निर्णय जाडेजा नि बिन्नीच्या बाजूने गेला असावा.
रणजीचा फॉर्म बघून
रणजीचा फॉर्म बघून ऑस्ट्रेलियात विश्वचषक हे जराही पचनी पडू शकत नाही.
आणि रणजीचाच फॉर्म बघायचा झाल्यास तो युवराजनेही तो दाखवलाच आणि योग्य वेळी दाखवला. बाकी युवराजचा मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव, ऑस्ट्रेलियात खेळण्याचा अनुभव, सर्वात महत्वाचे म्हणजे मॅचविनर असणे हे तर इतर कोणातही सापडू नये. फॉर्म हे कारणही मग रणजीतल्या तीन सलग शतकांनंतर शिल्लक उरत नाही.
अर्थात इथे युवराज हे पटकन आठवलेले नाव आहे. बिन्नी किंवा जडेजा विरुद्ध युवराज असे तुलना करण्याचा हेतू नाही. निवडीत चालणार्या राजकारणाबद्दल भाष्य करने एवढाच हेतू आहे.
(हाहा सहीये हा पॉईंट).
बाकी हे असे आहे की इथे जस्टीफिकेशन कश्याचेही करता येते. युवराजला बसवण्याचेही करू शकतो वा घेण्याचेही करू शकतो. मुरली विजयलाही घेण्या न घेण्याचे जस्टीफिकेशन करू शकतो. बाकी बिन्नीला घेतले नसते तर कोणी जाब वा जस्टीफिकेशन विचारायलाही आले नसते यातच काय ते आले
समित बाळचा फेब २३ चा क्रिकइन्फोवरचा लेख वाचा. फुकट हितसंबंधांची चर्चा करण्याऐवजी खर्या स्ट्रॅटेजीज काय असतील ते समजावून घ्या.
>>>>>
लेख वाचेन सावकाश, पण काय आहे त्यात? कोणाचे तरी वैयक्तिक मत वा दृष्टीकोण असेल तर ते वाचून न वाचून एकच. त्यात काही आपल्याला पटलेले मुद्दे असतील तर तुम्हीही ते इथे मांडू शकता.
बरेचदा एखादा खेळाडू (इथे
बरेचदा एखादा खेळाडू (इथे धोनी) आपला आवडीचा असतो आणि आवडत्याची द्राक्षे नेहमीच गोड! त्याने जे केलेय वा ज्यात त्याचा सहभाग आहे त्यामागे काही उदात्त हेतू वा सकारात्मकताच असणार हे मनाशी ठाम करूनच आपण त्याचे अवलोकन करतो. असो, यावर सविस्तर उद्या बोलतो, तुर्तास झोप आलीय, शुभरात्री शब्बाखैर खुदाहाफिज!!
मी चांगले ज्ञान मिळावे म्हणून
मी चांगले ज्ञान मिळावे म्हणून लेख वाचायला सांगितला. Sambit Bal क्रिकइन्फोचा संपादक आहे. त्याआधी विस्डेनचा होता. त्याला या क्षेत्रात पत्रकारितेचा १५ वर्षांहून अधिक अनुभव आहे. धोनीबद्दल काही मला विशेष जिव्हाळा नाही. पण त्याची स्ट्रॅटेजी काय आहे ते समजावून घेतल्यावर त्याचा निर्णय पटला.
आता काही लोकांना काही न वाचता, अभ्यास न करता आपले नुसते वाद विवाद घालायला आवडत असतील तर त्यात मी काही करू शकत नाही.
आजची मॅच पूल बी मधली. वेस्ट
आजची मॅच पूल बी मधली.
वेस्ट इंडीज विरुद्ध झिंबाब्वे
ड्वेन स्मिथ ० वर आऊट दुसर्या बॉलला.
गेल वाचला! लकी मॅन!
गेल वाचला!
लकी मॅन!
लाडक्या जिंक्स बद्दल आज मटा
लाडक्या जिंक्स बद्दल आज मटा मधे ...
http://maharashtratimes.indiatimes.com/sports/cricket/ajinkya-rahane/art...
Pages