विश्वचषक २०१५ .

Submitted by विश्या on 18 December, 2014 - 04:44

करलो दुनिया मुठ्ठी मे.

थोड्याच दिवसात २०१५ च्या विश्वचषकाच्या महासंग्रामाला सुरवात होईल . प्रत्येक देश सर्व जीव ओतून जग जेते पदावर स्वार होण्यसाठी प्रयत्न करणार . भारतीय निवड समितीने संभाव्य खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत पण मला काही नावे सुचवावी वाटतात . ज्यामुळे संघ समतोल पण वाटेल आणि संघ उभारणी मजबूत असेल . या मध्ये जे खेळाडू आहेत त्यातील बरेचसे खेळाडू निवड समितीने दिलेल्या संघामध्ये आहेत , जे खेळाडू मला वाटत होते ते फक्त मी add केले आहेत .
फलंदाज :- शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली , अजिंक्य राहणे, वीरेंद्र सेहवाग , अंबाती रायडू, रोबिन उत्तप्पा , सुरेश रैना , संजू सामसन, आणि महेंद्र सिंघ धोनी .
all Rounder - युवराज सिंघ , रवींद्र जडेजा , रवी आश्विन, मनोज तिवारी .हरभजन सिंघ .

गोलंदाज :- झहीर खान, भुवनेश्वर कुमार, मोहमद शमी, इशांत शर्मा , उमेश यादव, अशोक dhinda , अमित मिश्रा, आणि धवल कुलकर्णी . मुनाफ पटेल .

WC_520022f.jpg
यातील बऱ्यापैकी नावे हि निवडलेल्या ३० लोकांच्या यादीत आहेतच पण काही नावे नाहीत जी असावीत असा मला प्रकर्षाने जाणवते . संघाची ओपेनिंग सेहवाग कडून, मधली फळी मजबूत करण्यासाठी युवराज , तर गोलंदाजीत झहीर असे तीन अनुभवी खेळाडूचे त्रिकुट या संघात असायला हवेत असे वाटते .

विश्या ( वि. भो. )

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कालचा विजय मला पण अपेक्षित नव्हता पण. आपण खरच सर्व क्षेत्रांमध्ये त्यांच्यावर मात केली. अगदी फिल्डिंग पण. २ रन आऊट म्हणजे कळस!!

विंडिज नंतरचा वाटतोय. त्यात त्याच्या हायलाईट दिसतात.

सॉलिड हैराण झाला आहे शोएब... आपल्या मॅचला कॉमेंटरी करताना कसाबसा शांत होता.. अमिताभ होता ना त्याच्या बाजुला.. आणि नंतर दादा आणि द्रविड बरोबर असतानाही मॅच परिस्थीती अशी होती की दादा जे बोलत होता त्याने त्याचा तिळपापड होत होता पण दादा बोलत होता ते खरच होत... त्यामुळे त्याला काहीच करता येत नव्हत. शेवटी तो राग त्याने पाकिस्तानी वार्ताहरांशी बोलताना काढलेला दिसतोय.. Happy

वैद्यबुवा.. याडा याडा याडा की याडी याडा याडा...? (साइनफिल्ड चा जबरी फॅन असल्यामुळे याडी याडा याडा.. एपिसोड विसरणे कदापि शक्य नाही.. जे इथे साइनफिल्ड फॅन्स असतील त्यांना मी काय म्हणत आहे ते नक्कीच कळेल..!).. Happy

वत्सला, तुमचे फोटो असले तर टाका ना .. लकी आहात, असा ऐतिहासिक दणदणीत विजय स्टेडिअममध्ये उपस्थित राहत अनुभवायला मिळाला..

इथून आता काही लिंबूटिंबू आणि एक वेस्टईंडिज उरलेत, आताचा फॉर्म पाहता या सगळ्यांना हरवू आणि अपराजित राहूनच क्वार्टरला प्रवेश करू.. बस्स मग हेच विनिंग मोमेंन्टम आणखी तीन सामने की विश्वचषक वोन्ट गिव ईट बॅक झालाच!

मुकुंद, आय पी एल च्या पहिल्या लिलावानंतर सर्व खेळाडूंची यादी तयार करत असताना सर्वात जास्त सतावलं ते अजिंक्य रहाणे आणि योगेश ताकवाले या नावांनी.

चार वेगवेगळी स्पेलिंग आणि त्या कॉम्बिनेशनमध्ये हवे तितके उच्चार. बॉस म्हणे तुम मराठि हो तुम बताओ. मला त्यातल्या त्यात अजिंक्य हे नाव समजलं. (बॉस कितीतरी वेळ अजिंका अजिंकी असं वाटेल ते म्हणत होता) नंतर रेहान (हो!!!!), रहान, रेहाने, रहाने. राहने, रोहने अशा अनेक स्टेशनवरून गाडी शेवटे "रहाणे" वार स्थिरावली. बॉस म्हणे ऐसा भी सरनेम होता है क्या?? म्हटलं या पारसी बावाला मराठी आडनावांची वैविध्यं दाखवली तर बेहोश पडायचा.

ताकवाले (हे मी अजून शुअर नाहीये) ची अवस्था तर टकावले, टाकावले, टकवले, तकावले अशी काय वाट्टेल ते सुरू होती शेवटी ताकवाले सांगितल्यावर बॉस म्हणे ये हमारे बिरादरी का लगता है Proud

नंदिनी, त्या प्लेयरचे माहीत नाही पण मराठी आडनाव ताकवले (वाले नाही) असत. पुणे विद्यापीठाचे जुन्या काळी ते कुलगुरु होते.

अख्तरचा विडिओ... Rofl

इनशाल्लाह माशाअल्लाह बॉईज प्लेईड वेल.. कच्ची पक्की अंग्रेजी सुना के भाग जाता है Lol

वकार युनुसका बच्चा बना हुआ है युनुस खान, उसको बोलो पाकिस्तानपे रहम करो और निकल जाओ.. Lol

नंदिनी, त्या प्लेयरचे माहीत नाही पण मराठी आडनाव ताकवले (वाले नाही) असत. >>> येस्स ताकवले इझ कर्रेक्ट सरनेम.

सीमंतिनी,तसंच आडनाव असेलही. प्रेस कॉणमध्ये नावं "वाचून" दाखवायची असल्यानं आमची उच्चारांवर हुज्जत चालू होती. शेवटी हे काम कुणी केलं ते आता आठवत नाहिये. Happy आय पी एल वॉज फन.

अख्तरचा व्हीडीओ काल पाहिला होता. कसला भडकलाय रे बाबा. मै यहा इंडिया मे बैठा हू. हंस रहे है इंडियावाले. जिस पाकिस्तान टीमसे डर लगता था, उसपे हंस रहे है. ऐसा नही की ना हारो हारो मगर लडाई करके तो हारो.

अख्तर एरव्ही कधीच आवडला नाही, पण या व्हीडीओत ज्या तळतळीनं बोलतोय ती तळतळ मात्र पोचली.

काल धमाल आली एकदम. त्यांची फिल्डींग भारी होती त्यामुळे ४० रन तरी वाचल्या होत्या. ABD असे पर्यंत व नंतर तो पाफ व मिलर.. नंतर झोकात जिंकलो आपण. Proud Happy

ऑसीविरुध्द घाण खेळुन धवनने लोकांना गाफिल ठेवले होते. Wink

सॉरी! उशीरा पोस्ट टाकतेय, पण इथे लिहिल्याशिवाय राहवत नाहीये.

वेल डन इंडिया! सांघिक खेळ म्हणजे काय ते काल दाखवून दिलं भारताने.

गो धोनी अँड टीम! गो रवी शास्त्री!!

जास्त अपेक्षा ठेवू नका, आपल्याकडे देहबोली नाही, धमक नाही, आक्रमकता नाही इत्यादी इत्यादी लिहिणार्‍यांचे दात कालच्या मॅचनंतर घश्यात गेलेच असतील Wink

धागा नुसता पाण्य्सारखा वाहत चालला आहे ----- भारतीय संघही असाच पुढे प्रवास करो आणि विश्व चषक परत न देता पुन्हा घेऊन येवो .

शेवटी ताकवाले सांगितल्यावर बॉस म्हणे ये हमारे बिरादरी का लगता है..:खोखो:

आपल्या टिमने गेल्या दोन सामन्यात जरी दणदणीत विजय मिळवले असले तरी त्या दोन्ही मॅचमधे शेवटच्या ५ ओव्हर्स मधे जो काही घोळ झाला तसा परत होउ नये याबाबत आपल्या टिमने सिरीअसली विचार केला पाहीजे... बाद फेरीत असला लोचा व्हायला नको..या २ सामन्यात आपल्याला त्याची झळ बसली नाही पण दॅट प्रॉब्लेम हॅज टु बी सॉल्व्ह्ड इफ वुइ सिरिअसली वाँट टु डिफेंड अवर टायटल. आय अ‍ॅम शुअर शास्त्री अँड अदर पिपल इन अवर थिंक टँक आर वर्किंग ऑन दॅट इश्यु राइट नाउ..

वत्सला..पुर्वी इथे मास्टरकार्डची एक अ‍ॅड यायची... त्या अ‍ॅडच्या धरतीवर्.... ह्युमिडीटी इन मेलबोर्न यस्टरडे.. अनबेअरेबल...मनी रिक्वायर्ड फॉर द गेम ...१०० डॉलर्स्.. नंबर ऑफ पिपल ऑन द ट्रेन.. टु मेनी... व्हॉइस आफ्टर द गेम... गॉन्!....बट............. द एक्स्पिरिअंस ऑफ वॉचिंग टिम इंडिया विनिंग यस्टरडे विथ ८२००० फेलो टिम इंडिया फॅन्स.... प्राइसलेस...! Happy

झक्कींचे दक्षिण दिग्विजय अजुन डोक्यातुन जात नाही..:हहगलो:

शेपूट गंडलेलेच आहे..
कॅप्टन धोनी आणि सर जडेजा हे भारतीय पाटावर असतात तसे इथे इफेक्टीव नाहीयेत, त्यामागच्या ४ कडे तर जायलाच नको.
टोटल झाले शेवटचे सहा!
म्हणजे पहिल्या पाचांवर जास्तीत जास्त दारोमदार.
शर्मा, धवन, कोहली, रहाणे, रैना!

दोन्ही सामन्यात शेपटाची गरज शेवटालाच पडल्याने त्याचा फारसा फटका पडला नाही आणि म्हणून ते फारसे जाणवले नाही,
परीणामी टॉप ऑर्डरवर अजून टेंशन आले नाही की आपले शेपूट फारसे तगडे नाही याचे.

जर का एखाद्या सामन्यात शेपटाने घात केला आणि टॉप ऑर्डरने असा विचार करायला सुरुवात केली की आता आपल्यालाच सांभाळायचे आहे, तर मात्र त्या प्रेशरखाली आता ते जसे मनसोक्त मुक्तयुक्त फटकेबाजी करत आहेत ती देखील गंडेल अन खरा फटका बसेल.

इन्शाल्लाह असे होऊ नये, तसेही दोन महत्वाचे सामने उरकल्याने लिंबूटिंबूंसमोर अशी वेळ येऊ नये.

जर का एखाद्या सामन्यात शेपटाने घात केला आणि टॉप ऑर्डरने असा विचार करायला सुरुवात केली की आता आपल्यालाच सांभाळायचे आहे, तर मात्र त्या प्रेशरखाली आता ते जसे मनसोक्त मुक्तयुक्त फटकेबाजी करत आहेत ती देखील गंडेल अन खरा फटका बसेल.>>>

शेपूट आधी खेळते की टॉप ऑर्डर?

एका सामन्यात शेपटाने घात केल्यावर दुसर्‍या सामन्यात असे त्यांना म्हणायचे असावे.

मलाही जमू लागले रीयासारखे आता!

शिखर धवन ची सासुरवाडी मेलबोर्न आहे म्हणे... त्याची बायको भारतीय वंशाची aussie आहे असं कालच समजल... (ख खो दे जा) ससुराल में जमाई राजा को तो छा जानाही था >> मी कालच मॅच चालू असताना पोस्ट टाकलं होतं की यावर.. सगळ्यांनी इग्नोरास्त्र चालवलं बहुतेक विजयाच्या उन्मादात Wink Light 1

Looks like Shikhar Dhawan is the first man who feels comfortable at in-laws' place. Wink

आज इथल्या ७००+ पोस्टी वाचून काढल्या. स्टेडिअममध्ये असल्याचा फील आला नुसत्या पोस्टी वाचून पण.

मुकुंद, तुमच्या पोस्ट्स मस्त असतात.

लगे रहो लोक्स

मनीष, मी मधल्या पोस्ट स्टेडियम मधून बघू शकले नाही (कवरेज नसल्याने)
सासरी कंफर्टेबल>>> Lol
मुकुंद यांच्या पोस्ट्स खरच मस्त असतात.
ऋनमेष, फोटो टाकन्याचा प्रयत्न केला पण जमत नाहीये. उद्या परत बघते.

शेपूट आधी खेळते की टॉप ऑर्डर?
प्रतिसादबेफ़िकीर | 23 February, 2015 - 14:26 नवीन
एका सामन्यात शेपटाने घात केल्यावर दुसर्‍या सामन्यात असे त्यांना म्हणायचे असावे.

>>>>

एक्झॅक्टली,
हेच जर गावस्कर किंवा हर्षा भोगले बोल्ला असता तर तुम्हाला लगेच समजले असते Happy

मी स्वत: गल्ली क्रिकेटमध्ये हा अनुभव घेतलाय. १२-१२ ओवरच्या मॅचेस असायच्या आणि बोलण्यापुरते ११ प्लेअर, पण ३-४ तरी जमा करून आणलेले, त्यांना ना बॅटींग यायची ना बॉलिंग, ना फिल्डींग. येस्स फिल्डींगलाही त्यांना अक्षर्शा लपवावे लागायचे, त्यांच्याकडे झेल उडाला की बॉलर सरळ पुढचा बॉल टाकायच्या तयारीला लागायचा..
आणि अश्या संघातून मी ओपनिंगला उतरायचो. बरोबर आणखी एक तेंडुलकर!.
बाराव्या ओवरपर्यंत खेळायचेच आहे हे मनाशी ठरवूनच आम्ही डावाची सुरुवात करायचो, अन्यथा आम्ही दोघे गेलो की तिथेच सामन्याचा निकाल.

Pages