"एकदम सोप्पी फिरनी" असं टायटल द्यायचं फार मनात होतं. पण याआधीच्या "एकदम सोप्प्या" रेसिपी संवेदनशील विषय बनल्याने ते टायटल दिलं नाही याची कृपया नोंद घ्यावी.
हॉस्टेलमधे असताना रमझान चालू झाला की आम्ही भटकायला निघायचो. हॉस्टेल होतं माझगावला. तिथून मोहम्मद अलि रोडला जायचं. एरव्ही पण मोहम्मद अलि रोड, क्रॉफर्ड मार्केट हे भाग म्हणजे डोळ्यासाठी, जिभेसाठी अगदी भरपूर मेजवानी असायची. ईदिनिमित्त जवळ जवळ अख्ख्या भागाला रोषणाई केलेली असायची. विविध रंगांचे, चमकते स्टॉल्स नटलेले असायचे. आम्ही मैत्रीणीसोबत संध्याकाळी दिवेलागणीला बाहेर पडायचो. पोटभर खादंती करायची. पाया सूप, चिकन कबाब, मटण कबाब, मालपुआ मनसोक्त हादडायचे. रस्त्यावर बार्गेनिंग करत करत शॉपिंग करायची. येताना सुलेमान बेकरीम॑धून नानकटाई घ्यायची. आणि दहाच्या आत हॉस्टेलमधे यायचं असा आमचा महिनाभर दिनक्रम.
भरपूर खाणं झाल्यावर गोड काहीतरी खावंसं वाटलं की नजर भिरभिरायची ती फिरनीसाठी. एवढंसारं मसालेदार खाल्ल्यावर थंडगार फिरनी अगदी ताजंतवानं करून जायची. मातीच्या छोट्याशा पणतीसारख्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी म्हणजे माझ्यादृष्टीने रमझानचं ते सर्व वातावरण पुन्हा एकदा जगल्यासारखंच. कधीतरी एकदा सहज नेटवर रेसिपी पाहिली तर अगदीच सोप्पी रेसिपी. शिवाय पदार्थ पण घरात कायम असनारे. झटपट होणारा हा गोडाचा पदार्थ हल्ली माझ्याकडे महिन्या दोन महिन्यातून एकदा घरात होतोच. मग घरात असलेल्या काही सामानांपासून फिरनीचे काही व्हेरीएशन्स केले.
फिरनी म्हणजे तांदळाची खीर.पण तरी साऊथ इंडियन तांदळाची खीर आणि फिरनीमधला सर्वात मोठा फरक तापमानामधे आहे. तांदळाची खीर गरमगरम खाल्ली जाते. गार झाल्यावर ती खाववत नाही कित्येकदा. त्याउलट फिरनी थंडगार खायची असते. मातीच्या भांड्यामधे सेट केलेली फिरनी घट्ट होते आणि गारेगार फिरनी वेगवेगळ्या इसेन्स आणि रंगांमधे प्रयोग करून चवीमधे बदल करता येतो.
माझ्यासारख्या किचनमधल्या बिगारीमधे शिकणार्यासाठी फिरनी हा अगदीच "जमणेबल" प्रकार आहे. करून बघा आणि सांगा बरे.
१. दूध: अर्धा लिटर. निरसे म्हणजे न तापवलेले दूध घ्या.शक्यतो टोन्ड मिल्क नको. फुल क्रीम मिल्क घ्या.
२. बासमती तांदूळ: दोन ते तीन चमचे. (बासमती लॉन्ग ग्रेन घ्या. दिल्ली राईस अथवा डेहराडून बासमती)
३. साखर: दोन वाट्या. (व्हेरीएशननुसार साखरेचे प्रमाण कमीजास्त होइल.)
४. ड्रायफ्रूट्स आणि इसेन्स.
१. सर्वात आधी बासमती तांदूळ भिजवून, धुवून निथळून घ्या. थोडेसे कोरडे भाजून घ्या.
२. हे तांदूळ मिक्सरमधे अगदी बारीक करून घ्या. पीठासारखे बारीक झाले पाहिजे. विकतचे पीठ मात्र वापरू नका. फिरनीला बासमती (लाँग ग्रेन) हवाच. तांदूळ मिक्सरमधे फिरवताना थोडे पाणी घालून फिरवा म्हणजे नंतर पेस्ट करत बसायला नको.
३. दूध निरसे घ्या. एका जाड बुडाच्या भांड्यात दूध घेऊन त्यामधे तांदळाची पेस्ट घाला. व्यवस्थित कालवून घ्या. अजिबात गुठळ्या नकोत. आता हे मिश्रण गॅसवर ठेवा.
५. साखर घाला. गोडाचे प्रमाण तुमच्या आवडीवर असू देत. पण फिरनी फ्रीझमधे सेट होणार असल्याने साखर किंचित जास्तच घाला.
४. सतत हालवत रहा. मिश्रण खाली लागू देऊ नका अथवा गुठळ्या बनू देऊ नका. हीच कृती जरा किचकट आणि वेळखाऊ आहे.
५. घट्ट खिरीसारखे होत आले की गॅसवरून खाली उतरवा.
६. वाफ निवेपर्यंत ढवळत रहा. अन्यथा या स्टेजला येऊन गुठळ्या होऊ शकतात. गुठळ्या झाल्याच असतील तर फिरनी गाळून घ्या. फिरनीचे टेक्श्चर अगदी मऊ आणि सिल्की व्हायला हवे.
७. असतील तर मातीच्या पसरट भांड्यामधे सेट करायला घ्या अन्यथा काचेच्या सुबकश्या वाडग्यांमधून काढा आणि फ्रीझमधे दोन ते तीन तास सेट करा.
८. थंडगार फिरनी खायला द्या आणि तुम्हीदेखील मनसोक्त खा. (सजावट करून फिरनी सर्व करा. -- हे वाक्य बर्याचदा मराठी कार्यक्रमांमधे ऐकले आहे. "खायला द्या" असे म्हणायला काय त्रास होतो न कळे) असो.
========================================
ही झाली साधी फिरनी. आता याचे अनंत व्हेरीएशन्स करता येतात. सेट करण्याआधी त्यामधे इसेन्स घालता येतात. सजावटीमधे कलाकुसर करता येते. मी करून पाहिलेली काही व्हेरीएशन्स.
१. केसर फिरनी: थंड दुधात थोडे केशर खलून फिरनीमधे मिक्स करा. वाडग्यामधे काढल्यावर वरती बदाम्-पिस्त्याचे काप घाला. (हे साधेसोपे व्हर्जन. चुकण्याची शक्यता फार कमी. )
२. काजू फिरनी: तांदळासोबत थोडे काजूदेखील भिजत घाला, शिजवताना ही काजूची पेस्ट दुधात घाला. सजावटीसाठी काजू-बदाम्-पिस्ता घाला.
३. मँगो फिरनी: फिरनी शिजत असताना त्यामधे मँगो पल्प घाला. मँगो पल्प गोड असल्यास त्यामानाने साखर कमी घाला. सजावटीसाठी आंब्याच्या फोडी अथवा थोडा मँगो पल्प घाला. (आमच्याकडे हे व्हर्जन भयंकर हिट आहे. आमरस खाऊन खाऊन कंटाळा आला की चेंज म्हणून आंबाफिरनी )
४. चॉकोलेट फिरनी: फिरनी शिजत असताना कोको पावडर घाला. अथवा फिरनी शिजल्यावर त्यामधे चॉकोलेट सिरप घाला. सजावटीसाठी चॉकोलेट किसून घाला. (कोको पावडर अंदाजाने घाला. मी एकदा कडूढाण केलं होतं. तेव्हापासून चॉकोलेट सिरप घालते)
५. स्ट्रॉबेरी फिरनी/अॅपल फिरनी: शिजत असताना त्यामधे स्ट्रॉबेरी सिरप घाला, सजावटीसाठी स्ट्रॉबेरीच्या फोडी वापरा. ( हे व्हर्जन मी केल्यावर पिताश्रींनी "डायजिनसारखं लागतय" अशी टिप्पणी केली होती. त्यामुळे जरा जपूनच. अॅपल फिरनीसाठी दिनेशदांची रेसिपी अवश्य बघा)
६. बटरस्कॉच फिरनी: शिजवून झाल्यावर त्यामधे बटरस्कॉच ईसेन्स घाला आणी सजावटीसाठी ड्रायफ्र्रूट्स घाला. अशीच व्हॅनिला फिरनी करता येइल.
७. रोझ फिरनी: फिरनी शिजल्यावर त्यामधे गुलाबजल आणि गुलाब ईसेन्स घाला. सजावटीसाठी गुलाबाची पाकळी आणि किंचित गुलकंद वापरा.
८. कॅरामल फिरनी: वर्षूच्या "साधेसोप्पे पुडिंग"मधल्या रेसिपीने कॅरामल तयार करून घ्या. फिरनी सेट झाल्यावर त्यावर हे कॅरामल हलक्या हाताने पसरा. पुडिंगपेक्षा हे जास्त सोपं पडेल.
९. जास्मिन फिरनी: फ्रीझमधे ठेवताना फिरनीवर एक मोगर्याचे फूल ठेवून द्या, खायला देताना फूल बाजूला ठेवा. ड्रायफ्रूट्स घाला. या फिरनीला अप्रतिम वास येतो.
१०. केवडा: शिजवताना केवडा इसेन्स घाला. नंतर सजावटीसाठी केवडाजल घाला.
११. मोदक फिरनी: फिरनी शिजवताना त्यामधे मोदकाचे सारण घाला. साखर घालू नका. याची चव छान येते. मोदक बिघडल्यावर उरलेल्या सारणाचे काय करावे असा प्रश्न पडल्यास ही फिरनी करून बघा.
केसर फिरनी
अजून सुगरण मायबोलीकरांना काही व्हेरीएशन्स माहित असतील तरी अवश्य सांगा.
लले, हे तरी नविनच आणि मस्त
लले, हे तरी नविनच आणि मस्त प्रकरण आहे!
Oats firanit gul takun ajun
Oats firanit gul takun ajun bhari lagate. Yummiest.
आता दिसतोय का???
आता दिसतोय का???
माणिकमोती, हो आता पूर्ण फोटो
माणिकमोती, हो आता पूर्ण फोटो दिसत आहे. मी एक वाटी पळवते.
अय्या! लले. मी हा प्रकार
अय्या! लले. मी हा प्रकार अनेकदा करते. नाश्त्याला ओट्स असतात (करावे लागतात) कधीकधी. त्यात अनेक व्हेरिएशन्स शोधावे लागतात. आम्ही त्याला ओट्सची खीर असे साधेसुधे नाव दिले आहे

तांदूळ नसल्याने तिला टेक्निकली फिरनी म्हणता येणार नाही ना?
माणिकमोती, मस्त फोटो. लले,
माणिकमोती, मस्त फोटो.
लले, ओट्स तिकडच्या स्वारीची फार आवडते आहेत (नाश्ता करायची जिम्मेदारी असल्याने) त्यांनाच रेसिपी पास करण्ञात येईल.
पूनम,
तांदूळ नसल्याने तिला
तांदूळ नसल्याने तिला टेक्निकली फिरनी म्हणता येणार नाही ना? >>> तरला दलालला विचारून सांगते. तिच्या वेबसाईटवरून या नावाने रेसिपीचं ईमेल आलं होतं मागे
नावाला चमचाभर तांदळाची पिठी
नावाला चमचाभर तांदळाची पिठी मिसळा
मला आता करून बघाविशी वाटतेय.
मला आता करून बघाविशी वाटतेय. सध्या अती गोड गोड चालू आहे.
मध्यंतरी एका अफगाण रेस्टॉ.मध्ये पिसासारख्या हलक्या टेक्श्चरची अप्रतिम फिरनी खाल्ली होती. ती बहुधा क्रिमची असावी.
मला ओट्सचे दुधात शिजवायचे
मला ओट्सचे दुधात शिजवायचे अॅपल, स्ट्रॉबेरी आणि केशर-बेदाणा हे तिन्ही फ्लेवर खूप आवडतात.
पण तेला फिर्नी कसे म्हणणार
काल रात्री थोडासा भात उरला
काल रात्री थोडासा भात उरला होता. सकाळी थोड दुध घालून मिक्सरवर पेस्ट केली आणि २ वाटी दूध, साखर, मिक्स ड्राय फ्रुटस पावडर घालून आटवल. नंतर वे.पा. घातली. अशी शॉर्टकट फिरनी तयार झाली. श्रद्धाने हा बाफ उकरून काढून आम्हाला कामाला लावल.
नंदिनी तुझ्या पद्धतीने पुन्हा करेन तेव्हा अजून एक फोटो टाकते.
ं
माणिकमोती मस्त दिसतीय फिरनी
माणिकमोती मस्त दिसतीय फिरनी आणी या डिश पण.
आरती तुझी इन्सटन्ट फिरनी भारीये.
ललिता-प्रीतिच्या पाककृतीत
ललिता-प्रीतिच्या पाककृतीत हॉर्लिक्सही भारी लागतं हा अनुभव आहे.
सर्वांचेच फोटो मस्त! पूर्वी
सर्वांचेच फोटो मस्त!
पूर्वी एकदा ही रेसिपी बघून ट्राय केली तर श्रध्दासारखीच परिस्थिती झाली. फिरनी दाट होईच ना! तांदूळ मेजरली कमी पडले होते. मी रोजच्या जेवणात काहीतरी गोड म्हणून थोडयाच प्रमाणात फिरनी करत होते आणि 'फिरनी' करणार आहे असं जाहीर केलं नव्हतं. त्यामुळे खिरीइतपत दाट झाल्यावर 'अब इस राझ को राझ ही रहने दो' असं ठरवलं आणि 'आज तांदुळाचा रवा काढून खीर केल्येय बरं का' असं म्हणून जेवताना वाढली
खीर म्हणून छानच लागली चवीला त्यामुळे संपलीही लगेच.
तरी बरं साबा इंडियात होत्या नाहीतर 'अगं आपल्यात अशी खीर फक्त श्राध्दाला करतात..एरव्ही नाही' असं म्हणाल्या असत्या!
होर्लिक्स ??? आर यू सिरियस ?
होर्लिक्स ??? आर यू सिरियस ?
आरती., ते वाडगं सुंदर आहे
आरती., ते वाडगं सुंदर आहे एकदम.
रश्मी, धन्यवाद. धन्स
रश्मी, धन्यवाद.
धन्स सिंडरेला, अशी बरीच मातीची भांडी मी म्हापसाच्या मार्केटमधून घेऊन आली आहे, जी गॅसवरसुद्धा सहज वापरू शकतो.
जमली बै . ( मराठी अन हिंदी)
जमली बै . ( मराठी अन हिंदी) दोन्ही.

धीर सुटायला लागला घट्ट होइपर्यंट.
फिरनी सिनॅमन आणी गार्नीश कॅरॅमल
इन्ना, फोटो टाक. आरती, फोटो
इन्ना, फोटो टाक.
आरती, फोटो मस्त.
माझ्या कुठल्यातरी पाककृतीनं शंभराच्या वर प्रतिसाद ओलांडलेले पाहून (त्यातले बरेचसे विषयानुरूप असूनदेखील हे एक आशचर्यच) मी सुखानं डोळे मिटायला मोकळी झालेली आहे.
त्या आधी एक्दा फिरनी बनवून
त्या आधी एक्दा फिरनी बनवून खा.
ह. घ्या.
माझ्या कुठल्यातरी पाककृतीनं
माझ्या कुठल्यातरी पाककृतीनं शंभराच्या वर प्रतिसाद ओलांडलेले पाहून (त्यातले बरेचसे विषयानुरूप असूनदेखील हे एक आशचर्यच) मी सुखानं डोळे मिटायला मोकळी झालेली आहे. >>
माझ्या कुठल्यातरी पाककृतीनं
माझ्या कुठल्यातरी पाककृतीनं शंभराच्या वर प्रतिसाद ओलांडलेले पाहून (त्यातले बरेचसे विषयानुरूप असूनदेखील हे एक आशचर्यच) मी सुखानं डोळे मिटायला मोकळी झालेली आहे. >>> नंदिनी, पुढच्या कथेत फिरनीलाच नायिका कर
मीही उरलेल्या मऊभाताची
मीही उरलेल्या मऊभाताची शॉर्टकट फिरनी करून पाहिली दूध, रोज वॉटर आणि वेलची घालून. छान झाली.
इथे एका पाकिस्तानी रेस्टॉरन्टमधून ऑथेन्टिक समजून आणलेली (आणि चवीला भारी असलेली) फिरनी चक्क कॉर्नफ्लोअरची केलेली निघाली.
एकदातरी तुझ्या रेसिपीने करेनच पण.
बाय द वे, तांदुळाची पेस्ट पाण्यात का करतेस? दुधातच का नाही?
चिनूक्स, मी आता ओट्समधे
चिनूक्स, मी आता ओट्समधे हॉर्लिक्स घालून बघेन हां...
स्वाती, मऊभातात मीठ नव्हतं का?
इथे माकाचु बघून धीर आलाय. मी
इथे माकाचु बघून धीर आलाय. मी एकदा करायला घेतली. कथा सुरू....
तर, वर दिलेलं प्रमाण घेऊन सुरूवात केली. मिस्टर ९ म्हणाले बॉस येतोय... काहीतरी वेगळं हवंय स्वीट म्हणून.. अमेरिकेत न मिळणारं वगैरे वगैरे...!! मी आऊट! पटकन फिरनीची रेसिपी दिसली. सगळं वर लिहिल्याप्रमाणे केलं.
घट्ट काही होईना. तांदूळ लाँग ग्रेन नव्हता म्हणून की तो नीट वाटलाच गेला नाही की नीट पेस्टच झाली नाही की मी अजून थांबले असते तर झालंही असतं की काय! काहीही समजलं नाही. २ वाट्या साखर वाचूनच मी गपगार झाले होते; कारण बेताचं गोड खायची सवय!
आणि शेवटी घोळ झालाच! अजून दूध घालून खीरीसारखी खाल्ली. वेलची-बदाम फ्लेवर. मग एकदा तयार भाताची करून बघितली. जमली.
कथा समाप्त!
आता पुन्हा करून बघेन नक्की.
माझ्या उलट प्रॉबलेम कसा येतो
माझ्या उलट प्रॉबलेम कसा येतो जनतेला? आमची खीर घट्ट होउन वड्याच एकदम आणि लोकांची पातळढोण?
तांदूळ आणि दुधाचं प्रपोर्शन हीच की असणार.
होय! मी घेतले त्याच्यापेक्षा
होय! मी घेतले त्याच्यापेक्षा दुप्पट तांदूळ घ्यायला हवे होते.
प्रमाण नीट घेतलं आणि तांदूळ
प्रमाण नीट घेतलं आणि तांदूळ बारीक दळले गेले तर पेस्ट होउन चांगला दाटपणा येतो असा माझा अनुभव आहे.
ललिताप्रीति च्या ओट्स अॅपल
ललिताप्रीति च्या ओट्स अॅपल प्रकारात अॅपल्स् काळे पडत नाहीत का?
माझे तांदूळ अगदी बारीक दळले
माझे तांदूळ अगदी बारीक दळले गेले नव्हते मॅजिक बुलेटमध्ये. पेस्ट ग्रेनी वाटत होती. कदाचित तोही प्रॉब्लेम असेल.
Pages