निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.
हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..
तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.
या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...
आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..
शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.
तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.
(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
बी.............आय्यम्म
बी.............आय्यम्म मिस्सिन्ग द लास्ट विन्टर अॅन्ड द स्नो इन डीसी! बघ हं ....तुझ्या प्रत्येक फोटोला झब्बू टाकीन बरं!
असो...शांकली............अगं कालच पहिला भाग झाला. याची पेपरात, टीव्हीवर खूप अॅड करत होते. तर तू पाहिला असशील तर कालच, किंवा प्रोमोमधेच. पण नक्की पहा. फक्त रोज आहे की दर सोम. पहावं लागेल.
आणि हो गं...........नगरचं तापमान महाबळेश्वरपेक्षा कमीये. म.श्वर......१५ व नगर १०.
रिवील्ड चा पहिला भाग होता ८
रिवील्ड चा पहिला भाग होता ८ तारखेला. आता दर सोमवारी असेल एकेक भाग.
अजुन घरी टिवी नाहीय, त्यामुळे युट्युबवर आला की पाहिन. आता फक्त जाहिरात आहे
मानुषीताई, जरुर झब्बू
मानुषीताई, जरुर झब्बू टाका!!
सगळ्यांनी आपापल्याकडचे फोटो टाकावे अशी नम्र विनंती. नसतील तर काढावे
आजूबाजूला भरपुर काही आहे 
गेल्या महिन्यात गोल्डन टेंपल
गेल्या महिन्यात गोल्डन टेंपल होते रिविल्ड मध्ये.
मी काढते भरपुर. पण इथे
मी काढते भरपुर. पण इथे टाकायला वेळ नाही. आधी ते पिकासावर चढवा आणि नंतर इथे चढवा हा एवढा खटाटोप करायला वेळ मिळत नाही
त्यात आमच्याकडे कॉम्प्युटरवरही अतिक्रमण असते. आईला काय करायचाय कॉम्प्युटर???? दिवसभर हाफिसात तर अस्सतोच समोर.
निसर्ग..........ग्रेट
निसर्ग..........ग्रेट डिझायनर! बी आता ऐकत नाय!>>>>>>>+१
सुप्रभात लोक्स :-:-) बी,
सुप्रभात लोक्स :-:-)
बी, मस्तच फोटो
निगवरचे आत्या, काका, मामा, मावशी, आज्जी-आजोबा घरी गटगला कधी येणार ते आगाऊ कळवणे. म्हणजे शेजार्यांना बाहेर फिरायला जाण्याचे सांगेन. :फिदे: माबोकरांचे गटग म्हणजे नुस्ता कल्ला असणार.
रच्याकने, शुभेच्छांबद्दल सगळ्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.
"रिव्हील्डः रन ऑफ कच्छ" चा १
"रिव्हील्डः रन ऑफ कच्छ" चा १ ला भाग पाहिला. डोळ्याचे (आणि मनाचेही पारणे असते का? तर तेही) फिटले.>>>>>मानुषीताई, जलें पे नमक
:-).
:-)) आणि प्रोबेशनमुळे सुट्टी घेता येत नाही आहे. सो तिकिट्स कॅन्सल केले. 
आम्ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात कच्छला जाणार होतो (रण महोत्सव सुरू झालाय), पण येत्या १५ तारखेपासुन मी सरकारी नोकरीत रूजु होतोय (अजुन एक गुड न्युज
पुण्यात आहे का इतक्यात एखादे
पुण्यात आहे का इतक्यात एखादे गटग .. मी १८ डीसे ते ४ जाने पर्यंत भारतात आहे. काही दिवस पुण्याला राहून मग अकोल्याला.
बी, मस्त फोटो. मानुषी, वर्णन
बी, मस्त फोटो.
मानुषी, वर्णन सुपर्ब.
जिप्सी, अभिनंदन . लेकीचा पायगुण बघा. भाग्य घेऊन आलीय तुमचं तुमची लेक.
बी, मस्त फोटो. मर्ढेकरांच्या
बी, मस्त फोटो.
मर्ढेकरांच्या कवितेचि आठवण करुन दिल्यबद्दल धन्यवाद!
शिशिरऋतूच्या पुनरागमें, एकेक पान गळावया
कां लागता मज येतसे नकळे उगाच रडावया.
पानात जी निजली इथे इवलीं सुकोमल पाखरें,
जातील सांग अता कुठे? निष्पर्ण झाडिंत कांपरें!
येस जिप्सी...लेकीचा पायगुण!!
येस जिप्सी...लेकीचा पायगुण!! कॉन्ग्रॅच्युलेशन्स!!..... आणि गटग होणारच जिप्सीकडे!!
सध्या आमच्याकडेही टीव्ही नाही (म्हणजे आहे, पण तो फक्त एक शो पीस म्हणून आहे :डोमा:) त्यामुळे बहुधा मागे कधीतरी पाहिल्यासारखे वाटतेय. मात्र यू ट्यूब वर नक्की बघेन.
सध्या पुण्यात अगदी म्हणावी अशी थंडी अजून वाटत नाहीये. मधेच ढग वगैरे येतात.
आणि हो, एक सांगायचंच राह्यलं! पुण्यात मार्केटयार्ड रोडवर गोल्डन एमरल्ड हॉटेल समोर चक्क बहावा फुललाय. फुललाय हे म्हणणं तितकंसं बरोबर नाही होणार, कारण उगीच ४-५ छोट्या फांद्यांवर उसनं आवसान आणून साजरं करावं असे अगदी छोटे छोटे घोस लागलेत.
गेल्या महिन्यात गोल्डन टेंपल
गेल्या महिन्यात गोल्डन टेंपल होते रिविल्ड मध्ये.>>> ओह असं आहे का हे रिव्हील्ड?



एकेक गोष्ट रिव्हील करतात...........शांकली ...तू म्हणतेस ते बरोबरच मग.
आणि मलाही गोल्डन टेम्पल पाहिल्यासरखं वाटतंय!
अदिजो ..मीही खूप दिवसांनी वाचले हे मर्ढेकरांचे शब्द! मस्त!
गुर्जी पुढील वर्षी ज्यु.जिप्सिणीसह जा ना दोघे कच्छ महोत्सवाला!
ख्रिस्मस ट्रीचा एरियल व्ह्यू.
नगर "चौपाटीवरचे थंडीतले टिपिकल दृश्य(फोटो क्वलिटी बेक्कार...सॉरी)
जिप्सी, अभिनंदन. लेकीचे नाव
जिप्सी, अभिनंदन. लेकीचे नाव काय ठेवले? फुलांवरुनचं ठेवशील तू
पुण्यात जर गटग होत असेल तर मीही येईल.
मानुषीताई टॉप व्यूव एकदम सही आहे.
मानुषी तुझ वर्णन इतक सुंदर
मानुषी तुझ वर्णन इतक सुंदर आहे की ती फिल्म पहाविशी वाटते.
जिप्स्या खरच रे लेकीचा पायगूण. अभिनंदन. कुठे मिळाली दुसरी नोकरी?
बी फोटो मस्तच.
अरे किती मस्त फोटो व माहिती.
अरे किती मस्त फोटो व माहिती. एक्स-मस ट्री मस्त आहे मानुषी.
कुठे जातोयेस कुठे?
जिप्सी, अभिनंदन रे. डायरेक्ट सरकारी
आता आम्हाला तुमच्याकडचे स्वातंत्र दिनाचे फोटो कसे बघायला मिळणार?
मानुषी तुझ वर्णन इतक सुंदर
मानुषी तुझ वर्णन इतक सुंदर आहे की ती फिल्म पहाविशी वाटते.>> +१
बी अजुन फोटो येऊद्या. खुपच मस्त फोटो व तुम्ही केलेले वर्णन पण छान आहे.
काय हे जिप्स्या, एकटा जाणार
काय हे जिप्स्या, एकटा जाणार होता रणात?? आम्हाला नाही सांगायचे? ऐशु जाणार होती गेल्या वर्षी, कॉलेजचे एक्स्कर्शन म्हणुन.. सरकारी कॉलेज असल्याने सगळॅच ढिलेढाले.... झाले रद्द शेवटी..
आता २०१६ मध्ये आम्ही जायचे प्लॅन करतोय. २०१५ मध्ये घरदुरुस्ती कामात बिझ्णार आहे. या गुरवारपासुन सुरवात होतेय घरदुरुस्तीची. माझ्या डोक्याला जाम किडा लागलेला. गेले सहा महिने भयानक वाईट गेले या घराच्या पायात. आता जरा बरे वाटतेय. नशिबाने काँट्रक्टर बरा भेटलाय. सातारचा म्हातारा
खुपच पर्टिक्युलर आहे सगळ्या बाबतीत. त्यामुळे आशा आहे की काम नीट होईल. एक काळ्जी संपली. आता घरात काय काय डेकोरेशन करायचेय त्याची चर्चा सुरू. ऐशुने लगे हात सगळ्या भिंती तिच्या भाषेत रंगवुन आणि माझ्या भाषेत गिरबटवुन टाकल्यात.
आता नविन रंग दिल्यावर तिच्या मॉडर्न आर्टवर बंधने येणार ना 
जिप्स्याच्या घरात दोन वर्षात
जिप्स्याच्या घरात दोन वर्षात दोन लक्ष्म्या त्यांचे शुभशकुनी पायगुण घेऊन आल्यामुळे त्याला नोकरी मिळाली नाही तर ती स्वतःच्या पायाने चालत त्याच्या दारात आली. त्याला फक्त हो की नाही एवढेच सांगायचे होते. आणि मग सर्व गोष्टींचा विचार करुन त्याने हो म्हटले
मानुषीताई ख्रिसमस ट्रीचा
मानुषीताई ख्रिसमस ट्रीचा चांदणी आकारातला एरीयल व्ह्यू मस्त.
जिप्सी नवीन जॉबच्या शुभेच्छा आणि अभिनंदन!
क्रिसमस झाड खरेच सुंदर. मला
क्रिसमस झाड खरेच सुंदर. मला आधी सायकस वाटले. नंतर लक्षात आले.
मलाही माबोकरांचा कल्लाच लक्षात आलेला तेव्हाच. म्हटले आत्या आणि काका मंड़ळी कल्ला करता करता नाव ठेवायचे विसरणार.. आणि बाळाला मात्र कुठुन ही सातभाईंची मानवी आवृत्ती इथे येऊन कलकल करतेय असे वाटणार..
हा जंगली चिंचोका. मी २५
हा जंगली चिंचोका. मी २५ रुपयाला एक विकत घेतला होता. गुडगे दुखत असल्यास खाल्ला तर आराम पडतो. मी वापरुन नाही पाहिला. पण आईला आता विचारावे लागेल कुठे ठेवला. भंडार्याच्या जंगलात आढळतो हा चिंचोका. आकारानी अक्रोळ इतका मोठा असतो.
जिप्स्या.. डब्बल अभिनंदन...
जिप्स्या.. डब्बल अभिनंदन... खूप आनंद झाला.. एका वर्षात दोन दोन लक्षींची पावलं तुझ्या घरात आलीत.. व्वा!!
बी सुप्पर्ब फोटोज आहेत सगळे च्या सगळे..
मानुषी.. खरंच खूप छान वर्णन केलेयंस आता डॉक्यु. चं नाव टाक बरं .. म्हंजे विनासायास यू ट्यूब वर शोधता येईल..
बी, मस्तच फोटो ! रीव्हील्ड..
बी, मस्तच फोटो !
रीव्हील्ड.. बहुतेक भारतापुरतेच आहे. आमच्याकडे नाही दिसले. आता सिडी किंवा यू ट्यूब.
मानुषी, नगर तपमानाच्या बाबतीत अगदी दोन टोके गाठतंय.
जिप्स्या.. मी पण येणार आहे पुढच्या महिन्यात. लेकीला घरी कधी आणणार आहेस ? यावेळेस एखाद्या सकाळचा चहा ( बिनसाखरेचा ) प्यायला यायचेय तुझ्याकडे.
बी मला घेऊन ये बरं हा
बी मला घेऊन ये बरं हा चिंचोका.. उजवा गुडघा जाम दुखतोय
बरं नाही वाटलं तर मात्र बघ हाँ..
जिप्स्या, अभिनंदन रे!
जिप्स्या, अभिनंदन रे!
वर्षू, चिंचोके सापडायला हवेत
वर्षू, चिंचोके सापडायला हवेत आता. मागच्या २०१३ च्या दिवाळीला हातसळीचा तांदूळ आणि हे दोन चिंचोके विकत घेतले होते. आता जर मिळालेत तर एक तुला आणि एक मला
माझाही गुडगा दुखतो आहे. त्यावेळी म्हातारपणाची तजवीज म्हणून घेतला होता पण खूप आधीच गरज भासत आहे 
.. बी , तुझा चिंचोका ,'
गुलबकावली च्या फुलाचा आव
गुलबकावली च्या फुलाचा आव आण्तोय..>>म्हणजे काय मला कळले नाही.
मानुषी, हे ख्रिसमस ट्री नाही.
मानुषी, हे ख्रिसमस ट्री नाही. हे आहे अरुकेरिया - Araucaria. आपण ह्याला ख्रिसमस ट्री म्हणतो पण, कोनिफेरस ट्रीज - coniferous trees - मधे सर्च केलं की दोन्हीतला फरक कळेल. पण या अरुकेरियातली सिमेट्री मान गये उस्ताद अशीच असते. ह्यालाच मंकी पझल ट्री असंही म्हणतात.
आणि बी, हे चिंचोके नसावेत. ही बहुधा गारंबी वेलीची फळं असावीत. गारंबीचं बोटॅनिकल नाव मी थोड्या वेळाने सांगते.
Pages