निसर्गाच्या गप्पा (भाग २३)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 10 November, 2014 - 14:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २३ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

"हिवाळा" हा सगळया ऋतुंमधे आल्हाददायक ऋतु वाटतो. हिवाळ्याची पहाट खुपच रम्य वाटते. पहाटे सभोवताल पसरलेले धुके, गार वारं, पक्षांचा किलबिलाट, गाईचे हंबरणे, कोवळ्या उन्हाचा किरणोत्सव, आंगणात पेटवलेल्या चुलीचा धुर,वाफाळता चहा.. सगळेच कसे रमणिक आणि प्रसन्न वाटते.

हिवाळ्यात थकवा, चिडचिड जाणवत नाही, शीण येत नाही, एरवी नकोस झालेले उन सुदधा हवेहवेसे वाटते. या दिवसात अहार वाढलेला असतो तसेच पचन शक्ती पण चांगली असते. या ऋतूत सशक्त होऊन ही ताकद साठवुन वर्षभर पुर्वायची असते..

तसेच थंड हवामानामुळे या दिवसात फळ भाज्यांची रेलचेल असते.. पेरु,सिताफळे,पपई,, चिक्कु अशा मधुर फळाची मेजवानी असतेच जोडीला संत्रे, मोसंबी अशी निमफळ पण चाखायला मिळतात. थंडी मुळे फुला - फळांचे रंग अधिकच गडद आणि लोभस वाटतात.

या दिवसात काही झाडांची पान गळती असते तर..काही झाडे ओसंडुन बहरत असतात.
एकी कडे बुची , पारिजातकांचे सुगंधीत सडे पडलेले असतात तर दुसरीकडे शेवंती, चमेली, सायली नटलेली दिसते..
तर असाहा सुगंधोत्सव कधीच संपु नये असे वाटते...

आपण सगळे नुकतीच दिवाळी जलौषात साजरी करुन एका वेगळ्याच जोशात कामाला लागलेले असतो... आता वेद लागतात ते तुळशीच्या लग्नाचे! आपले सगळे सण समारंभ निसर्गाशीच निगडीत आहेत.. उदा. कार्तीक महिन्यातच तुळशी विवाहा असण्याचे कारण असे की या महिन्यात तुळस बहरलेली असते , तिला भरपुर पान आणि मंजीर्‍या आलेल्या असतात.. म्हणजेच विवाहा योग्य झालेली असते... या सणाच्या निमित्याने कन्या योग्य वयात आल्यावरच तिचा विवाह करावा असे तर आपल्या पुर्व़जांना सुचवायचे नसेल ना! असे श्री दिलीप व सौ पोर्णिमा कुलकर्णीं यांच्या एका पुस्तकात वाचल्याचे आठवते..

शिवाय, तुळशीच्या लग्नासाठी लागणारे सगळे साहित्य आपल्याला निसर्गचे देते..उदा. विवाहासाठी लागणारी झोपडी किंवा मांडव उसाची किवा ज्वारीची असते,.. पुजेच्या साहित्यात बोरं, चिंचा, आवळे, सिताफळ हवेच. म्हणजेच काय तर सणा समारंभाच्या निमित्याने आपण निसर्गाचीच पूजा करतो, आभार मानतो. आणि असे करणे गरजेचे आहे.कारण आपण निसर्गाकडुन नेहमिच काही ना काही घेत आलो आहोत. त्याचे आपल्यावर अनंत उपकार आहेत, कधी न फेडु शकणारे.

तर अशा या "कधी न संपावा" अस वाटणार्‍या रुतुचे आपण सगळे मना पासुन नि.ग. वर स्वागत करुया.

(वरील फोटो व लेखन मायबोलीकर निसर्गप्रेमी सायली पातुरकर यांच्याकडून)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
निसर्गाच्या गप्पा (भाग २१) http://www.maayboli.com/node/49967
निसर्गाच्या गप्पा (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यावरच बारीक किडे झाले होते.. आता त्यांचा नायनाट केला मी>>> काय केले तेही लिहा. माझ्याकडे तुळस सद्ध्या आटतेय Sad
पाने कुरतडली जात आहेत. Sad हळदिचे पाणी मारणार आहे. नाहीच झाले काही तर तपकिरीचे. पण तुमचा पण उपाय सांगा.

आमच्याकडे स्प्रे बॉटलमधे ग्लास क्लीनर मिळते. ते संपत आले होते. त्यात दहापट पाणी मिसळले व त्याच बाटलीने फवारले. दोनतीनदा फवारल्यावर ते नाहीसे झाले. हे हिरवे किडे, मुंग्या पाळतात त्यामूळे मुंग्यांचा पण बंदोबस्त करावा लागतो.

या मिरच्यांचे बियाणे भारतातूनच आणले होते.. इतक्या "गोड" मिरच्या इथे मिळत नाहीत !

ग्लास क्लीनर मिळते. ते संपत आले होते. त्यात दहापट पाणी मिसळले >>>> ओके.
गोडेत का त्या मिरच्या Uhoh मग भरीत करायचा बेत रहित Wink नाहीतर सणसणीत व्हायला लसुण मिक्स करते त्यात Happy

मी मिरच्या लावलेल्या पण त्यांना मुंङ्यानी खाल्ले. हल्ली काहीच लावले नाही. येत्या रविवारी घराचे काम कधी करायचे ते ठरेल. त्यानंतर लावायचे की नाही ते ठरवेन.

ओह दिनेशदा बरं झालं सांगितलत माझ्याकडच्या मिरचीच्या रोपांवर हिरवे नाहीत तर बारके पांढरे किडे झालेत. त्यावर हा उपाय करुन बघू का. माझ्याक्डे कोलीन ग्लास क्लीनर आहे.

बी काय भारी भारी फोटो काढतोयस पोतडीतून! आणि पिकासो नाही रे पिकासा.
पिकासो तो चित्रकार.
असो............आज खूप रागारागाने(हा राग पानं खाणार्‍यासाठी बरं!) त्या लिंबाच्या रोपांकडे पाहात होते तर खरंच साधनाने सांगितल्याप्रमाणे एक गोगलगाय चक्क दिसली. अगदी छोटी आणि मरतुकडी.
मग आता याच्यावरही हिंगाचे/हळदीचे पाणी मारावे काय?
दिनेश ...या सीझनला कैरी लोणचं(तोंपासु)
इकडे सध्या आवळ्याचे बरेच प्रकार चालू आहेत. लोणचं, सुपारी, कॅन्डी आणि आवळा शिजवल्यावर निघणार्‍या पाण्याचे केशर वेलदोडा घालून सरबत.
काल खजुराचंही लोणचं केलं होतं. मस्तच!(मीच म्हणते :फिदी:)

Sadhana +1
manushi amhi pan mhanu mastach ASA. Dhad bara jara.
btw te khajuracha loncha kasa kartat???

नॅशनल जिओग्राफिकची, इज दॅट रियल ? नावाची मालिका होती. त्याची मी सिडी आणलीय. भुतं, उडत्या तबकड्या, हिममानव.. खरेच असतात का ? यावर छान शास्त्रीय संशोधन आहे. जिथे शंका आहे तिथे स्पष्टपणे तसे लिहिलेय.
असाच एक प्रकार म्हणजे.. स्पाँटॅनियस ह्यूमन कंबश्चन .. यात अचानकपणे एखाद्या मानवाचे शरीर जळून जाते.
याची कारणे सांगताना, खुपदा अतिस्थूल व्यक्तींच्या अंगातली चरबी.. एखादी ठिणगी ( सिगारेटची वगैरे ) पडल्यास जळू शकते. ( याला Wick Effect असे नाव आहे )

पण मुद्दाम इथे लिहायला आलो ते एका वेगळ्याच घटनेबाबत.

एका महिलेच्या पायावर अचानक ज्वाला दिसू लागल्या. त्या ज्वाला पाणी वगैरे टाकून विझत नव्हत्या. तिला योग्य ते उपचार मिळाले.. पण अनेक वर्षांनी त्याचे कारण कळले.

तिला एका समुद्रकिनार्‍यावर वेगळ्या आकाराचा शंख मिळाला. तो तिने सहज खिश्यात ठेवला. त्या खिश्यातच तिचा ओला रुमाल होता.. या दोन घटकांमूळे ती आग लागली.. नाही ना पटत ? आता आणखी एक कारण.
त्या समुद्रकिनार्‍यावरच आदल्या रात्री काही फटाके उडवले होते. त्यातला सोडीयमचा अंश त्या शंखात गेला होता.
सोडीयम आणि ओल्या रुमालातले पाणी.. एकत्र आल्याने हे घडले होते.
अशी कारणे शोधणार्‍या संशोधक वृत्तीची दाद द्यावीच लागेल.

सुप्रभात निसर्गप्रेमींनो!!!!

हा फोटो मी वर्जिनिया बीचवर घेतला आहे. हिवाळा ओसरत आला आहे. आता हिवाळा सरणार असे म्हणता म्हणता परत बर्फ पडेल अशी बातमी ऐकायला मिळते. परत झाडे बर्फाची शाल पांघरतात. पण एक पान मात्र हे निळे गोड गुलाबी जग बघायला वाळूच्या मुलायम कुशीतून हलकेच बाहेर पडून आपल्या अंगावरचे चमचमते लव आणि जगण्याप्रतिचे लव्ह दाखवते. त्याची आपली एक छोटीशी छबी.. सावली असते.

आणि मग एक पान बाहेर डोकावले की बाकीचे सवंगडीसुद्धा त्याशी खेळावयास येतातः

काहीं कंद कळ्या घेऊनच वर डोकावतात. आता मी उमलणार ... वाट बघा हा संदेश निगप्रेमींना देतात..:)

हे बघून एक फुल म्ह्णते मल पाने नकोच. मला मी पुर्ण आहे.

आणि मग लागोपाठ नवीन मित्रगण जमायला लागतात...आपल पण इथे असच आहे ना.. मी आलो की मग एके करुन तुम्ही पण येतात Happy

काही फुलांना मात्र जरा जास्त मोठ व्हायच असत्स. त्यांचा असा मोरपिसारा असतो Happy

आणि मग वेगवेगळे रंग उमलू लागतात..

ह्यातल एक फुल मी एकटाच बसलेलेलो असतना माझ एकटेपण ओळखत आणि मला म्हणत हे मित्रा बघ मी पण एकटाच चल आपण दुकटे होऊ Happy

बी मस्त फोटो आहेत सगळे.
माझ्या एका गुलाबावर पांढरे किड होते, इथले वाचुन मी कोलिनच स्प्रे करुन आले.
@दिनेश दा लोणच मस्तच.
रच्याकने- पुढ्च्या महिन्यात तारकरली ला जात आहे, तेव्हा तिथे आल्या असतील का कैर्‍या.

बी, फार सुरेख फोटो टिपता तुम्ही. प्रत्येक फोटोत पाहून झाल्यावरही क्षणभर का होईना मनाला मागे रेंगाळत ठेवण्याची क्षमता आहे.

बी अतिशय सुंदर फोटो आहेत. तुमचे वॉटर मार्क टाकत जा.
पिंकी तुझे गार्डनही सुंदर आहे.

मी रविवारी गो ग्रिन मध्ये जाऊन आले. नविन गार्डन सदस्य आणले आहेत.फुरसतीने फोटो टाकेन.

पिकासामधे वॉटरमार्क आहे की नाही माहिती नाही. चेक कराव लागेल. बघतो.

गजानन, फार स्तुती करतोस. लगेच मुठभर मास वाढतं!!!

गजानन, परवा ज्या गोगलगायीबद्दल आपण बोलत होतो तिचे सुनिल तांबेंकडून चित्र मिळाले: कमेन्ट सुद्धा त्यांचीच आहे.

हा इंद्रगोप वा मृगाचा कीडा. हे दिसले की मृग नक्षत्राचा पाऊस सुरु होतो असं मानलं जातं. काही कट्टर विज्ञानवादी लोक ह्याला अंधश्रद्धा मानतात. हवामान तज्ज्ञाने सांगितल्यावर सुरु होतो तो मान्सून असं त्यांचं म्हणणं असतं.

विदर्भात आम्ही मात्र हिलाच गोगलगाय म्हणतो. मेळघाटात हिला देवगाय म्हणतात. मखमली त्वचा असते ह्या गोगलगायीची.

माझ्याकडे परवा नविन पिसी बसवलाय ऑफिसमध्ये ह्यामध्ये टाईप करताना स्पेशली मायबोलीवर क बॅकस्पेस घेतला की मागच लिहीलेल कोलमदून जात. क काय सेटींग करावी लागेल?

बी, मस्त फोटो. केशराचे आहे का ते फुल ? बहुतेक तसेच वाटतेय.

जागू, तो गुगल क्रोमचा प्रॉब्लेम आहे. या चौकटीबाहेर एकदा क्लीक करत आणि परत चौकटीत ये !

दिनेश, कुठले फुल नक्की? ते फिकट जांभळे फुल का? मला वाटत ही फुले ट्युलिप्स वर्गातली आहेत.

जागू, मी गुगल प्लस वापरत आहे आणि मला कुठेच वॉटरमार्कची सोय दिसत नाहीये.

Pages