हेल्मेटसक्ती

Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>उद्या डेक्कनच्या चौकात रोज जाण्याबद्दल २० रू टोल द्यावा लागला ना तर अख्ख पुण ते टोल नाके जाळायला निघेल (अन ते बरोबरही असेल)
नाहीतर उद्या तुमच्या गल्लीच्या रस्त्यावर काल २ बुट्ट्या डांबर ओतायला १००० रू खर्च आला म्हणून प्र्त्येक जाणार्य्यने महिनाभर १० रू टोल द्या म्हणायला कमी करणार नाहीत<<<

अनावश्यक तर्कटी प्रतिवाद!

मुद्दा लक्षात घेतला असता तर हे असले काहीतरी लिहिले गेले नसते.

वर दिलेल्या लिंकमध्ये ज्यांनी मते मांडली आहेत ते लोक येथील अनेक प्रतिसाददात्यांपेक्षा अधिक सूज्ञ म्हणून समाजात मान्यता पावलेले लोक आहेत. त्यांनाही विषयातील काहीच कळत नाही असा ग्रह करून खुशाल पुढचे प्रतिसाद द्यावेत.

विरोध हेल्मेट ला नाही.
विरोध सुरक्षेसाठी घ्यायच्या काळजीला नाही.
विरोध दंडास, शिस्तीस नि अडवणुकीस आहे.
शासनाने सक्ती करायचीच असेल तर इन्शुरन्स कंपन्याना करावी. व्यक्तीचा अपघात घडला आणि इन्शुरन्स क्लेम आला तर एफाआयआर मधे हेल्मेट न घातलेले नोंदलेले नसेल तर क्लेम देऊ नये. बाकी जीवाची जबाबदारी ज्याची त्याची आहे. शासनाने कधी जनतेच्या जीवाची काळजी केलीय? दंडात्मक कारवाई ही काळजीची बळजबरी आहे. जगा पण रिकाम्या खिशाने... कारण हा दंड तो दंड भरत रहा आपले...शिस्तीने वागणार्‍यास बक्षिस ही द्या की मग! शासनाला स्वत:चे खिसे भरायचे आहेत असे दृश्य कशासाठी?

गेल्या दोनचार पिढ्यान्नी इंग्रजांविरुद्ध केलेल्या कायदेभंगाचे खूळ स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षानिही "पब्लिक" च्या डोक्यातून हटलेले नाही, तेव्हा सक्तिच हवी>>

लिम्बु बोल्ड केलेल्या शब्दांवर नो सहमती.
आणि इतक्या वर्षानेही इतक्या पिढ्यानंतरही डोक्यात सविनय कायदेभंग लोकांच्या आहे अस म्हणतोय्स? हे देखील नाही पटत.

केदार, टोलच्या विषयावर फार नाही लिहिले कारण विषयांतर होइल. तु ही नको लिहुस प्लीज.

>>>> पुणेकरांनी पुण्याच्या वेशीलगत असलेले सर्व टोलनाके पूर्णपणे स्वीकारले. त्यांचा कधी विरोध केला नाही. <<<< हे कोणत्या आयडीने केलेले विधान आहे माहित नाही.... वर बघण्याइतके त्राण व वेळ शिल्लक नाही, तरीही...
हे थोडेसे अर्धसत्य आहे.
पुण्याबाहेरील जे जे रस्ते आहेत, ते हमरस्ते आहेत, व त्यांचा नियमित वापर करण्याची गरज पुणेकरांवर फार कमी वेळा येते, व सातारा/सोलापूर/नगर/नाशिक वगैरे रुंद केलेल्या हमरस्त्यांना टोल देण्याबाबत पुणेकरांची वा कुणाचीच कधीच काकू नाही.
मात्र जेव्हा देहू कात्रज बायपास पुणे शहरात येऊन भिडला (वारजे वगैरेचा सहभाग झाल्यावर) तेव्हा याच पुणेकरान्नी सिंहगडरोडपासच्या पुलाजवळील टोलनाक्याला आक्षेप घेऊन, त्याचे पैसेही वसूल झालेत हे सिद्ध करुन हा टोलनाका काढायला लावला होता. असे अन्य काही टोलनाकेही आहेत्/असू शकतात, जसा की सोमाटणे फाट्याजवळचा, वा नाशिकरोडवरचा. पण या बाबी दैनंदीन जीवनात व्यत्यय आणत नाहीयेत.

बाकी टोल वसुली खर्च पुरा वसूल झाल्यानंतरही चालूच रहाणे हे नविन नाही, ठाण्याच्या जुन्या खाडीपूलाचा टोल खर्च वसुल झाल्यावरही कित्येक म्हणजे पंधराएक वर्षे सुरूच होता. जेव्हा तो बंद झाला, तोवर पूलच उण्यापुर्‍या तीसचाळीस वर्शातच मोडकळीस येऊन नविन पुल बांधणे झाले होते.

बेफिकीर मी लिम्बुभाऊन्च्या उठाबशा ( नवरा-बायको) ला हसलेय तेव्हा कृ.गै.नसावा.:स्मित:

नेमके तुमच्या पोस्टनन्तर माझी पोस्ट आलीय.

धागा हेल्मेट्चाच आहे पण जर का इथे सीट्बेल्ट येउ शकतो तर टोल का नाही? डीविनिता .तुमचं आणि माझं खरच कायतरी गेल्याजन्मीचं नातं आहे. Happy

प्लीज ओम्नी ला आणु नका आता झोपेतही ओम्नी दिसत होती तेव्हा .:फिदी: (सीट्बेल्ट ठीक ,टोल च तुम्हीच बघा सध्या मी त्या चर्चेत नाही.)

उद्या डेक्कनच्या चौकात रोज जाण्याबद्दल २० रू टोल द्यावा लागला ना >>>>>>>>>>>

कोल्हापूरातले टोल नाके मनपा हद्दीवर आहेत, पुण्यात डेक्कन ला जाण्याचे तर्कट लावू नका.

कोल्हापुरमधे पण शहरातल्या शहरात जायला टोल लागत नाही. काहीतरी सांगु नका.

देहुरोडातून सोमाटणे फाट्याकडे जाताना चारचाकी असेल तर द्यावाच लागतो < बहुतेक देहुरोड हे पुण्यापासुन वेगळे आहे. मिलिटरी कॅम्प च्या अख्यारितीत येते.

>>>> वर दिलेल्या लिंकमध्ये ज्यांनी मते मांडली आहेत ते लोक येथील अनेक प्रतिसाददात्यांपेक्षा अधिक सूज्ञ म्हणून समाजात मान्यता पावलेले लोक आहेत. <<<<<<
हा सरळ सरळ मायबोलिकरांचा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा अधिक्षेप/अपमान आहे असे नाही वाटत? अशी गरज नाही की येथिल प्रत्येक मायबोलीकर "समाजात" जाऊन तथाकथित मानमान्यता मिळविलेलाच असायला हवा, तरच त्याच्या मताला अर्थ.

>>>>> त्यांनाही विषयातील काहीच कळत नाही असा ग्रह करून खुशाल पुढचे प्रतिसाद द्यावेत. <<<< त्यान्ना काय कळतय वा नाही याची उठाठेव करायची गरज मला तरी नाही. पण याच न्यायाने पुण्याचे पोलिस महासंचालक जे सक्तिच्या बाजूने आहेत, कायदेमंडळ, ज्यान्नी कायदे केले आहेत, कोर्टातील न्यायाधीश ज्यांनी कायदा पाळा असे सांगितलय, त्यांची अक्कलही (म्हणजे ते सूज्ञ नाहीत असे सुचवित) आपण अप्रत्यक्षपणे काढतो असे नाही जाणवत तुम्हाला?

असो. पिंडे पिंडे मतिर्भिन्नता....

+१

@लिंबु - ज्यांनी असल्या हेल्मेट सक्तीच्या कायद्याचा विचार केला आहे ते हुशारच आहेत. पण असला कायदा करण्यामागे त्यांचा उद्देश फक्त आणि फक्त पैसे खाणे हाच आहे.

पुण्यात अनेक ठीकाणी कोट्यावधी रुपये खर्चुन ( प्रत्येकी ) रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात आले. जे पुर्ण पणे ओस पडलेले असतात, इतके ओस पडलेले असतात की आतुन यायला भीती वाटेल.
हे असे खर्च करण्यामागे पण एकमेव उद्देश असतो पैसे खाण्याचा.

भारतात राजकारणी आणि नोकरशहा जे काही निर्णय घेतात ( ९५ टक्के ) त्यामागे फक्त पैसा खाणे हाच उद्देश असतो.

पुण्यात अनेक ठीकाणी कोट्यावधी रुपये खर्चुन ( प्रत्येकी ) रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात आले. जे पुर्ण पणे ओस पडलेले असतात, इतके ओस पडलेले असतात की आतुन यायला भीती वाटेल.>>> वापरा की ते. वर्दळ सुरु झाली की भिती नाही वाटणार.

पुण्यात अनेक ठीकाणी कोट्यावधी रुपये खर्चुन ( प्रत्येकी ) रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात आले. जे पुर्ण पणे ओस पडलेले असतात, इतके ओस पडलेले असतात की आतुन यायला भीती वाटेल.>>> वापरा की ते. वर्दळ सुरु झाली की भिती नाही वाटणार.>>>>>>>>

अहो मुर्खपणा आहे ते भुयारी मार्ग वापरणे म्हणजे. त्यांचा उपयोग असता तर लोकांनी वापरले नसते का?
६० फुटाचा रस्ता ओलांडण्यासाठी ५० पायर्‍या उतरायच्या आणी ५० चढायच्या. बर रस्त्यावरुन ओलांडायला बंदी होइल असे बॅरीकेड पण लावले नाहीयेत. मग लोक काय मूर्ख आहेत १०० पायर्‍यांची चढ उतार करायला?

त्याचा वापर होणार नाही हे नगरसेवकांना नक्कीच माहीती होते पण पैसा खाणे हा एकमेव उद्देश असल्यामुळे ते बांधले गेले.

बरोबर आहे टोचा तुमचे याच नियमाने रेल्वे फलाटावर देखील पुल बांधु नये. समोरच्याच फलाटावर जाण्यासाठी एक उडी मारायची असते कशाला त्यासाठी ५०-६० पायर्‍या चढायच्या.? पायर्‍या चढणारी लोक मुर्खच नाहीत का ? बाकी तुम्हालाच डोक आहे. म्हणुन तुम्ही परदेशी सगळे नियम पाळतात. भारतात नियम पाळणारे मात्र मुर्खच
बरोबर आहे तुमचे टोचा.

नियमाने रेल्वे फलाटावर देखील पुल बांधु नये>>>>>> काहीतरी तर्कट मांडू नका. लोक वापरतात रेल्वे चे पूल कारण लोक शहाणे आहेत.

लंडन ला पण इतकी गर्दी असताना असले चौक ओलांडायचे भुयारी मार्ग नाहीयेत. सिडनी मेलबर्न ला पण नाहीयेत. तिथे लोकांना खरच उपयोगी पडेल अश्या गोष्टींवर पैसे खर्च केलेत, नगरसेवकांना खायला मिळावे म्हणुन नाही.

भारतात नियम पाळणारे मात्र मुर्खच>>>>>>> रस्ता ओलांडायला भुयारी मार्गच वापरावा असा कुठलाही नियम नाहीये जिथे भुयारी मार्ग आहे तिथे सुद्धा. त्यामुळे नियम तोडण्याचा प्रश्नच येत नाही. रेल्वे चे रुळ ओलांडु नयेत असा नियम मात्र आहे.

बरोबर रेल्वे पुल वापरायचे पण भुयारी पुल मात्र नाही वापरायचे हे तर्कट तुम्हीच मांडले आहे. आणि इतकेच गुणगाण लंडनचे असल्यास तिथलीच काळजी घ्यावी.

अहो मुर्खपणा आहे ते भुयारी मार्ग वापरणे म्हणजे. त्यांचा उपयोग असता तर लोकांनी वापरले नसते का?
६० फुटाचा रस्ता ओलांडण्यासाठी ५० पायर्‍या उतरायच्या आणी ५० चढायच्या. बर रस्त्यावरुन ओलांडायला बंदी होइल असे बॅरीकेड पण लावले नाहीयेत. मग लोक काय मूर्ख आहेत १०० पायर्‍यांची चढ उतार करायला?>>>> सीएसटी स्टेशनचे भुयारी मार्ग वापरणारे सर्वच मुंबईकर मूर्ख आहेत ना? तिथे तर भुयारी मार्गांमध्ये दुकानं विकून रेल्वेने पैसा कमावला (प्लीज नोट: खाऊन नव्हे, राजरोस टेन्डर मागवून) तेही मूर्खच.

नंदिनीताई त्यांच्या मते भारतात सगळे पैसाखाउनच करतात त्यांच्या लंडनला मात्र असे नाही बरं पैसा बैसा खाल्ला जात नाही. Wink

>>>> पुण्यात अनेक ठीकाणी कोट्यावधी रुपये खर्चुन ( प्रत्येकी ) रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग करण्यात आले. जे पुर्ण पणे ओस पडलेले असतात, इतके ओस पडलेले असतात की आतुन यायला भीती वाटेल.>>> वापरा की ते. वर्दळ सुरु झाली की भिती नाही वाटणार. >>>> अगदी अगदी....
अश्विनी, नशीब आपले की दरवर्षी वा वर्षातून दोनतिनदाही झेब्राक्रॉसिन्गचे पट्टे आखले जातात, ते एकतर पादचार्‍यांअभावी ओस पडलेले असतात (पादचारी चौकातून कसेही आडवेतिडवे बेशिस्तपणे सिग्नलची फिकीर न करता जात असतात याचे असंख्य फोटो पुण्यातल्या कोणत्याही रस्त्यावर कुठेही काढता येतील) किन्वा पुण्यातील बेशिस्त वाहनचालकान्नी व्यापलेले असतात. तर या गोष्टीचा वापरच होत नसेल, तर हा खर्चही अनाठाई/पैसे खाण्याकरता वगैरे भुमिका अजुन ही लोक कशी काय घेत नाहीत? नै का? Proud

Pages