हेल्मेटसक्ती

Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

होय, सक्ती बेकायदेशीर असल्याचे सिद्ध होणे आनंददायकच आहे. सक्ती अंमलातच का आणता येत नाही आहे ह्यावर चर्चा व्हायला हवी आहे.

हेल्मेट वापरायलाच हवे, हेल्मेटची सक्ती शासनाने करू नये अशी ती भूमिका आहे. ही भूमिका खोडून जबरदस्तीने हेल्मेट घालायला भाग पाडणे शासनाला आजही जमत नाही आहे. Happy

हे विचित्र वास्तव आहे.

>>>>>> हेल्मेट घ्यायची इच्छाच का होत नाही ह्यावर संशोधन व्हायला हवे बहुधा! होत असेलही! <<<<<
माझ्या मते पुढील कारणे माझ्या निदर्शनास आली....
१) कंटाळा - हेल्मेट बरोबर वागवायचा, डोक्यावर आठवणीने घालायचा, व जिथे जाऊ तिथे ते सांभाळायचा कंटाळा.
२) स्वतःच्या गाडी चालविण्याच्या कौशल्याबद्दल अति आत्मविश्वास - मी व्यवस्थित गाडी चालवतो/चालविते, अगदी हळूच तर जातो/जाते, काही होईलच कसे काय मला?
३) आजवर झाले नाही, पुढेही होणार नाही हा "स्वतःच्या भविष्याबाबतचा अंधविश्वास": - आजवर कुठे काय झालय मला? एकुणात असे होतातच कितिसे अ‍ॅक्सिडेंट? उग्गाच आपल काहीतरी..... आजवर काही झाले नाही मला, इथुन पुढेही होणार नाही मला.... !
४) कोणताही कायदा मोडायचीच मूळ प्रवृत्ती - "कायदेभंगाची लागलेली कीड" इतकी खोलवर रुजली आहे आता की कोणताही नियम/कायदा हा मोडण्याकरता-धाब्यावर बसविण्याकरताच असतो असे बाळकडूच लहानपणापासून मिळते, व हेल्मेटचा कायदा, भले स्वतःच्या भल्याकरता का असेना, तो मोडण्यात "भूषण" मानले जाते. याबाबतच्या संस्कारात शाळा/पालक्/आईबाप/नातेवाईक/मित्र सगळेच कमी पडताहेत, व कानाखाली जाळ काढून नियम पाळायला लावण्याच्या सक्तिचा कायदा नसल्याने मोकळे रान मिळते.
५) हेल्मेट/सुरक्षाविषयक नियम पाळणे म्हणजे "घाबरटपणा/अपौरुषत्व/बायकी-बायलीपणा" असा काहीसा ग्रह असणे - हेल्मेट न घालताच सुसाट गाडी चालविण्यात रिस्क घेण्यात "पौरुषत्व" असल्याचा मूर्ख गैर "अंधविश्वास" नाही ते उपद्व्याप करावयास भाग पडतो.
६) पैशांचा माज - जे काय होईल ते पैशाने सुधरवता येईल हा पैशांचा माज सर्व थरात बघायला मिळतो, व त्याचे दृष्य परिणाम म्हणुन स्वतःच्या व दुसर्‍याच्या जीवास धोका होईल असे सर्रास वागले जाते.

माझ्यापुरते, मी कायदा वगैरे व्हायच्या आधीपासून म्हणजे १९९५ अखेरीपासून हेल्मेट वापरतो आहे. हल्ली तर सायकलवरही हेल्मेट वापरतो आहे. अन तरीही माझी मुले/नातेवाईक माझे बघुनही हेल्मेट वापरतातच असे नाही. त्यांना शहाणपण जेव्हा येईल तेव्हा येईल, पण ते लौकर येऊदे अशी देवाजवळ प्रार्थना. ज्यांचे पालक/आईबापच हेल्मेटसक्तिच्या विरोधात असतील, अशा पोरांचे काय होत असेल देव जाणे....!

Pages