हेल्मेटसक्ती

Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुशांत मोठ्या मुश्किलीने चर्चेची गाडी पुन्हा पुणेकर आणि हेल्मेट यावर आली होती. आता पुन्हा चेतन गुगळे, ऑम्नी आणि ओडीशा प्रवास यावर जाईल....>>>>>>:हहगलो:

सुशांत मोठ्या मुश्किलीने चर्चेची गाडी पुन्हा पुणेकर आणि हेल्मेट यावर आली होती. आता पुन्हा चेतन गुगळे, ऑम्नी आणि ओडीशा प्रवास यावर जाईल....

तुम्ही पण ना... स्मित>>>

Rofl

आशु हेल्मेटपण Ergonomically well designed & tested असत. ज्यांना ते वापरताना प्रॉब्लेम येतो ते मेंटली ऑर फिजिकली ९५-१०० % मधे असतात. मेंटली म्हण्जे मला मेंटल ब्लॉक म्हणायचय. हेल्मेट वापरण हे मला कस त्रासदायक आहे हा मेंटल ब्लॉक.
मी स्वतः ह्याच मेंटल ब्लॉकमधे होतो. पण पर्यायच नव्हता तर झक मारुन वापरावीच लागायची. हळुहळु मेंटल ब्लॉक सुटायला लागला. हेल्मेटशी जुळऊन घ्यायला लागलो , आता बिना हेल्मेटची गाडी चालऊ शकत नाही.

हेल्मेटपण Ergonomically well designed & tested <<<

सीटबेल्टचे वजन वागवावे लागत नाही. तसेच, गाडी बाहेरून बंद करून कामाला गेलो तरी सीट बेल्ट आत सुरक्षित राहतो. तो बरोबर न्यावा लागत नाही किंवा गाडीच्या बाहेरून अडकवून त्याला कुलूप लावावे लागत नाही. सीट बेल्ट कार मॅन्युफॅक्चरर्स कारबरोबर देतात,

हो मी देखील आधी नव्हतो वापरत...पण एकदा माझा अपघात झाला आणि डोके आपटून काही काळाकरता बेशुद्ध झालो तेव्हा खऱ्या अर्थाने शुद्धीवर आलो. तेव्हापासून म्हणजे गेली दहा-बारा वर्षे हेल्मेटशिवाय शक्यतो गाडी चालवली नाही.

सीटबेल्टच्या बाबतीत मी जिथे गाडी शिकलो तो इन्स्ट्रकर भलताच स्ट्रिक्ट होता. सिटबेल्ट लावल्याशिवाय स्टिअरींगला हातही लाऊ द्यायचा नाही. मग त्याचीच सवय झाली आणि आता गाडीत बसलो कि यांत्रिकपणे बेल्ट लावला जातो.

हेल्मेटची सीटबेल्टसारखी यांत्रिक सवय लागू शकते हा माझाही अनुभव आहे. मीही हेल्मेट घातल्याशिवाय बाईक सुरू करत नसे. काही हेल्मेट्स काहींना सूट होत नसावीत असे मात्र वाटते. मी तीन वेगवेगळ्या प्रकारची हेल्मेट्स घातलेली आहेत. त्यातले एक मोठे, पूर्ण बंद करणारे हेल्मेट मला सूट होत असे.

सीटबेल्टचे वजन वागवावे लागत नाही. तसेच, गाडी बाहेरून बंद करून कामाला गेलो तरी सीट बेल्ट आत सुरक्षित राहतो. तो बरोबर न्यावा लागत नाही किंवा गाडीच्या बाहेरून अडकवून त्याला कुलूप लावावे लागत नाही. सीट बेल्ट कार मॅन्युफॅक्चरर्स कारबरोबर देतात,

तरी देखील कुणी तो नियम पाळत नाही. ७२ लाख ५५ हजार इतका दंड जानेवारीपासून आकारला गेला आहे..सिटबेल्ट न लावल्याबद्दल....
आता याला तरी काय हरकत होती का.

बेफी चांगली आयडीया दिलीत , पर्मनंट माऊंटेड हेल्मेट. सकाळी अंघोळी नंतर येकदा डोस्क्यावर चढवल की रात्रीच काढायच. डिझाईनवर काम चालु करतो.
आतापर्यंत कस सुचल नाही हे......
हेल्मेटशी जुळऊन तर घ्याव लागणारच ना जर ते वापरायच ठरल तर. रहाता राहीला सक्तीचा प्रश्न अश्या बर्‍याच सक्त्या आहेत कायद्याने घालुन दिलेल्या. त्यातल्या सगळ्याच्या सगळ्या सगळेच्या सगळे कुठ पाळतात. ज्याला पाळायच्या आहेत तो पाळेल ज्याला नाही पाळायच्या तो नाही पाळणार.... हेल्मेट सक्ती.

बेफी तुम्ही नक्की कोणाच्या बाजुने आहात.... वाद विवादात हेल्मेट सक्तीच्या विरोधात आणि प्रत्यक्षात ३ - ३ हेल्मेट वापरता Wink
आशु Happy

करून टाका डिझाईन सुशांत!

लहान मुले वाढत जातील तसे हेल्मेटही आपोआप वाढेल अशी क्लृप्तीही ठेवा त्यात!

मी स्वतः हेल्मेट वापरत होतो. पण ते मला वापरायचे म्हणून वापरत होतो. मी हेल्मेट घातले नाही म्हणून एखाद्या पोलिसाने अडवावे, वाटेल त्या भाषेत बोलावे, पैसे खावेत आणि हेल्मेट नसतानाही पुढे जाऊ द्यावे ह्याला विरोध आहे. तुम्ही हेल्मेटलेस रायडरला पकडलेत तर पुढेच जाऊ द्यायला नको ना?

आणि ही सक्ती का? तर फक्त तुम्ही कायदे करू शकता आणि ते एन्फोर्स करू शकता म्हणून! बाकीचे कोण बघणार?

सगळ्यात बेस्ट म्हणजे आपले डोकेच टणक होत जाईल असा शोध लावा कुणीतरी...:)

यामुळे डोकेफोड, डोके आपटणे वगैरे शब्दांना वेगळे परिमाण मिळेल...

ज्यांची डोकी ऑलरेडी टणक आहेत त्यांना यातून वगळावे मात्र

गम्मत म्हणजे विवेक वेलण्कर यांची कॉमेन्ट अजून कुठे दिसली नाही. थकले काय? की स्वतःच वापरायला सुरुवात केली?

\

>>> रॉबीनहूड | 18 November, 2014 - 17:53 नवीन

सीट बेल्ट कार मॅन्युफॅक्चरर्स कारबरोबर देतात,

>>>
फुकट देतात काय? कारच्या किमतीत त्याची किम्मत नसते काय?:अ ओ, आता काय करायचं
<<<

हे एक राहिले होते ह्या चर्चेत येणारे!

अहो कोण म्हणतंय का फुकट देतात म्हणून? आँ? कारसहित तो मिळतो इतकेच! तसे हेल्मेट द्यावे की दुचाकीबरोबर? नियम म्हणून? किंमत घ्यावी मोजून चांगली!

पण तो फक्त एक - पुन्हा लिहितो - फक्त एकच मुद्दा आहे असे नाही. अन्यथा आता म्हणाल की त्यांनी तसे हेल्मेट दिले तर सक्ती लागू व्हावी का!

बाकी काही म्हणा पण सुशांत यांनी ओम्नी एकदम पंचरच करून टाकली.

क्या ओम्नी सिर्फ टेंपररी पंक्चर हुई है? क्या सुशांतके प्रतिसाद पर एक बडा प्रतिसाद आयेगा? देखते रहीये 'हेल्मेटसक्ती'!

सुशा तुझ्या पोस्ट्स भारी आहेत Rofl

तु असं पर्मनंट माऊंटेड हेल्मेट बनवलंस तर बायकोच्या लाटण्या पासूनही अनेकांची टाळकी वाचतील.
एक घाव अनेक पक्षी Proud

फार मनोरंजन सुरू आहे इथे. Rofl

तीन वेळा पडलोय.
त्यातील एकदा जोरदार आपटलोय.
प्रत्येक वेळी डोक्याला हेल्मेट होत.
कंपनीने सक्तीने हेल्मेट वापर सुरु करायला लावला ते बरच म्हणायच.
कारण त्यामुळे सवय झाली. सुशा म्हणतोय तसा जो मेन्टल ब्लॉक होता तो निघाला. Happy

सक्ती फक्त पुण्यात दिसतेय.
पिंची मध्ये तर मला दिसत नाहियेत कोणी हेल्मेटधारी फारसे.

सुशा आधी ओम्नीच्या सीटबेल्टच डिजाइन कर.
मग हेल्मेट वर ये.

सुशा आधी ओम्नीच्या सीटबेल्टच डिजाइन कर.
नो प्रॉफीट , नो युज , नो इन्वेस्टमेंट इन R&D
मग हेल्मेट वर ये.
कॅन बी प्रॉफीटेबल , ईफ नॉट अ‍ॅप्रुव्हड फॉर प्रॉडक्शन , सेल्फ युज अगेन्स्ट लाटणे मार , हा का ना का Proud

मोठ्या मुश्किलीने चर्चेची गाडी पुन्हा पुणेकर आणि हेल्मेट यावर आली होती. आता पुन्हा चेतन गुगळे, ऑम्नी आणि ओडीशा प्रवास यावर जाईल....>>>>>>
>>>>ऑम्नि ही मोस्टली किडनॅपिंग साठी वापरली जाते म्हणे !!
(धागा किडनॅप करायला पण उपयोगी!!)

omni.jpg
Happy

हे बरे केलेत मैदेवी, इतरांनाही आनंदात सहभागी करून घ्यावे Proud

चित्र अफाट

@ -सुशांत-
<< कोणतीही गाडी ही ९५ % लोकांसाठी (शारीरक बांधा) डीझाईन केली जाते. जर तुम्ही ९५-१०० ह्या रेंज मधे असाल तर तुम्हाला गाडीचे काही फंक्श्नस रीडिझाईन / रीसर्ट्रीफाय करुन घ्यावे लागतात.

मारुती ओम्नी गाडीचे सीटबेल्टचे डिझाईन फॉल्टी असण्याची शक्यता फार फार फार कमी आहे. युझर मालफंक्शनिंगची शक्यता जास्त आहे.
माझा येक अनुभव : माझ्या पहिल्या जॉबवाली कंपनी २ चाकी गाड्यांचे स्विचेस बनवायची. येका कस्टमरने कंपनीकडे गाडीचे स्विचेस अत्यंत थर्डक्लास असल्याची कंप्लेंट केली. ते स्विच मी बनवलेल होत म्हनुन मला त्या कस्टमरला भेटायला सांगितले गेल. तर ते कस्टमर भाजीवाले काका होते जे दररोज सक्काळी सक्काळी मार्केटयार्ड मधुन भाज्यांच्या ३-४ पिशव्या प्र्तयेकी कमीत कमी १० किलोच्या त्यांच्या गाडीच्या हँडलला अडकऊन आणायचे. त्यात ईंडीकेटर लिव्हर तुटायच. स्विच व्हर्टीकल ०.८ किलो आणि लॅटरल २.२ किलो लोडला डिझाईन केल जात. मालफंक्शनींग काका करायचे , त्याला २०-२० किलो लटकावायचे आणि शिव्या आमच्या डीझाईनला द्यायचे. >>

सुशांत,
मी सीटबेल्ट ला भाजीच्या पिशव्या लावून वाहन चालवित नाही. <<युझर मालफंक्शनिंगची शक्यता जास्त आहे.>> असे आपण कसे काय म्हणू शकता? मी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की मी इतर अनेक वाहने चालविली आहेत / चालवतो. हा सीटबेल्ट चा त्रास मला फक्त ओम्नीतच जाणवतो. मी गेल्याच महिन्यात इंडिका विस्टा १५०० किमी चालविली. सीटबेल्टचा काहीच त्रास जाणविला नाही. मारुतीची इतर वाहने जसे की अल्टो, वॅगन आर इत्यादींमध्ये देखील मला हा त्रास जाणवलेला नाहीये.

<<मारुती ओम्नी गाडीचे सीटबेल्टचे डिझाईन फॉल्टी असण्याची शक्यता फार फार फार कमी आहे.>> हे विधान आपण नेमके कोणत्या आधारावर केले आहे? आपण स्वतः ओम्नी चालविली आहे काय? असल्यास किती किमी? किती तास? कुठल्या रस्त्यांवर? माझ्या ओम्नीतून दिल्लीप्रवासाच्या धाग्यावर आणि या धाग्यावर देखील अनेकांनी ओम्नी असुरक्षित आहे असे विधान केले आहे. त्यांनी सुद्धा ओम्नी किती चालविली असेल याची मला शंकाच आहे.

आजच मी एका दिवाळी अंकातील एका कथेत वाचले की एक व्यावसायिक ओम्नीचालकाकडून भरवेगात नियंत्रण सुटल्यामुळे ओम्नी रस्ता सोडून चार पाच पलट्या मारून पडते आणि एक शालान्त परीक्षेचा विद्यार्थी रक्तबंबाळ होतो. आता इतके बिनडोक विधान ज्याने ओम्नी चालविली नाही असा एखादा लेखकच खुर्चीवर बसल्याबसल्या कागदावर खरडू शकतो. मी स्वतः २८,००० किमी ओम्नी चालविली आहे आणि असे काही घडणे अशक्य आहे हे खात्रीने लिहू शकतो. ओम्नी भरवेगात नियंत्रणाबाहेर जाणे आणि तीही ज्याला नेहमीची सवय अशा व्यावसायिक चालकाकडून? निव्वळ अशक्य. ओम्नीला फक्त चारच गिअर्स आहेत - ओव्हरड्राईव्ह नाही. त्यामुळेच इतर अनेक वाहनांच्या तुलनेत अतिशय साधे ब्रेक असूनही ओम्नीचा वेग कमाल मर्यादेहून चटकन खाली आणता येतो, फारशा प्रयत्नांशिवाय. अ‍ॅक्सलिरेटर वरचा पाय जरा बाजूला केला की लगेच वेग कमी हा माझा ओम्नीचा नेहमीचा अनुभव. याउलट इंडिका विस्टा, वॅगन आर, ही वाहने पाचव्या गिअरमध्ये असताना ताशी १०० किमीहून अधिक वेग असेल आणि सपाट रस्त्यावर अ‍ॅक्सलिरेटर वरील पाय काढला तरी बराच वेळ वेगात धावत असतात, पाच सात मिनीटांनी हळूहळू वेग साठच्या आसपास येतो. ओम्नीत हे केवळ काही सेकंदात घडते. हे सारे मी व्यक्तिगत व सतत च्या अनुभवातून लिहीले आहे आणि केव्हाही या सार्‍याचे डेमॉन्स्ट्रेशन (सादरीकरण) इतरांसमोर करून दाखवायला तयार आहे. इतर अनेक जण (विशेषतः ओम्नीबाबत) व्यक्तिगत अनुभवाशिवाय बिनबुडाची विधाने ठोकून देत आहेत.

तसेही मी याआधी लिहीले आहेच ते पुन्हा इथे डकवतो. -
याबाबतीत मारूती तील तज्ज्ञ मंडळींशी नुकतेच बोलणे झाले. त्यांच्या मते हा ओम्नीचा दोष नाहीये. उलट सीटबेल्टचे जे खरे कार्य आहे ते अतिशय प्रामाणिकपणे ओम्नीत घडून येत आहे. इतर कुठल्याही वाहनापेक्षा जास्त प्रभावीपणे. हे ओम्नीच्या विशिष्ट उंचीमुळे आणि त्यानुसार असलेल्या सीटबेल्टच्या रचनेमुळेच. दोष असलाच तर तो विषम पातळीतील रस्त्यांचा आहे. अगदी घाट रस्त्यांवर देखील डावी व उजवीकडील चाके समान पातळीत राहतील असे रस्ते बनविणे सहज शक्य आहे. म्हणूनच बेफिकीर यांना पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावर ओम्नी चालवून देखील सीटबेल्टचा असा त्रास जाणविला नाही.

सीटबेल्टची सक्ती करण्याआधी रस्त्यांमधला हा दोष दूर होणे गरजेचे. एकदा असे रस्ते असले म्हणजे माझी सीटबेल्ट सक्तीला हरकत नसेल. सपाट रस्त्यांवर ओम्नीच्या सीटबेल्टचा जराही त्रास होत नाही. मला सर्वात जास्त त्रास जाणवायचा मी जेव्हा धुळे-औरंगाबाद प्रवास करायचो तेव्हा कन्नड घाटात आणि त्या घाटात नेमके पोलिस तपासणीसाठी उभे असायचे. मी तेव्हा पोलिसांनाच प्रयोग करून दाखविला. सीटबेल्ट ऐवीतेवी काढलेलाच होता आणि वाहन घाटात उभे होते. रस्ता विषम पातळीत असल्यामुळे आता सीटबेल्ट खेचून खाली घेता येतच नव्हता. तो सीटबेल्ट नंतर चाके समपातळीत केल्यावर खेचून शरीराभोवती लावला आणि वाहन पुन्हा विषमपातळीतल्या रस्त्यावर आणले तर तो आता शरीराभोवती एकदमच घट्ट झाला आणि त्रासदायक ठरू लागला. हे सगळे एकदा एका पोलिस अधिकार्‍याला दाखविले. त्यांनी मग आर्थिक दंड केला नाही (पण यात माझा वेळ वाया गेलाच म्हणा). हा सगळा अनुभव इथे लिहीला आहे. http://www.maayboli.com/node/41986
पुढे हा सीटबेल्ट बदलून नवा लावला. काही दिवस ठीक चालले. पुन्हा या सीटबेल्टने देखील तसाच त्रास द्यायला सुरुवात केली. मारूती डिलरशिपने देखील मान्य केले - वारंवार सीटबेल्ट बदलूनही ही समस्या दूर होणार नाहीच. सपाट रस्ते नसतील तर हे असे होतच राहणार.

मी मारूती ओम्नी हे वाहन फेब्रुवारी २०१० मध्ये खरेदी केले. त्यानंतर आजवर २८००० किमी चालविले. त्यातील दोष / समस्या दूर करण्याकरिता सेवा केन्द्रात अनेक वेळा खेटे घातले. अनेक अभियंत्यांशी चर्चा केली. हा सगळा वास्तविक अनुभव आणि माझी समज या द्वारे मी केलेली निरीक्षणे, काढलेली अनुमाने / निष्कर्ष या संस्थळावरील प्रतिसादकांच्या पुढे शून्य मोलाची आहेत असे दिसते.

तेव्हा ही वृथा डोकेफोड इथेच थांबवतो.

आणि या विद्वान प्रतिसादकांना एकच विनंती करतो -

ज्याला सीटबेल्ट बांधायचे त्याने बांधा, हवे तर एक सोडून दोन दोन बांधा. हेल्मेट घालायचे आहे; घाला. नाहीतर बोडक्या डोक्याने फिरा. मी तुमच्या अध्यात मध्यात येत नाही. मला देखील माझ्या निर्णयस्वातंत्र्यावर सोडून द्या. सीटबेल्ट न लावता वाहन चालवून काहीही अनुचित झाले तरी तुम्हाला इस्पितळातील इलाजाकरिता / अंत्ययांत्रेच्या खर्चाकरिता मदत मागायला येणार नाही याची खात्री बाळगा.

ध न्य वा द. (हा वाद तुम्हालाच धन्य, मी कंटाळलो.)

Pages