हेल्मेटसक्ती

Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विषय कितीही चघळला तरी,

वैयक्तिक सुरक्षेपुढे प्रशासनाचा गल्थानपणा, सक्ती, भ्रष्टाचारांच्या संधी उपलब्ध करून घेणे ह्या गोष्टी न्यून आहेत असे माझे मत आहे. त्यामुळे केवळ 'मानवी जीवन' ह्या बहुमूल्य गोष्टीसाठी सुरक्षेच्या सर्वच उपायांची काटेकोर अंमलबजावणी केली गेली पाहिजे, प्रसंगी सक्ती करूनही का होईना!

>>>तसेही, मुद्दा सक्ती असावी का नसावी हा आहे, हेल्मेट चांगले का वाईट हा नाही<<<

हे मी ह्या धाग्यावर खूप आधी लिहिले होते की सगळेजण तेच तेच बोलत आहेत पण काहीतरी नवीन सांगितल्यासारखे!

पुन्हा तेच नोंदवण्याची वेळ आली आहे Lol

१. हेल्मेट हे सुरक्षेसाठीचे उत्तम साधन आहे हे प्रत्येक पुणेकराला माहीत आहे, मान्य आहे व तेच पुन्हा कोणी येऊन सांगण्याची अज्जिबात निकड नाही,

२. हेल्मेटची सक्ती केली जाऊ नये, शिफारस करण्याइतपत ठीक आहे, असा चर्चाप्रस्ताव मूळ धाग्यात आहे.

आता पुढे बोला Lol

>>>अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे.<<<

ही विधाने मूळ लेखातील आहेत. त्यातील ठळक केलेल्या भागावरून हे लक्षात येईल की मूळ धागाकर्त्याला पुणे ह्या शहरातील हेल्मेटसक्तीसंदर्भात चर्चा करायची आहे. तेव्हा खालीलसारखी बिनडोक विधाने धाग्याखाली लिहून स्वतःला करमणूकीचा विषय बनवू नये अशी विनंती!

>>>कुठलाही जनरल धागा उगाचच पुण्यातल्या प्रश्नांकडे कसा वळवायचा हे पुणेकरच करू जाणे!<<<

शिफारस करा असे म्हणणे ही पळवाट आहे सक्तीला विरोध करणार्‍यांची हे कुणाला कळत नाही असे नव्हे!

आणि शिफारस करायची म्हणजे काय? ट्रॅफीकवाल्यांनी चौकाचौकात 'पथनाट्ये' करायची की प्रत्येक सिग्नलवर मोफत प्रत्येकी एक हेल्मेट वाटायचे Biggrin

बेफी इथे चर्चा पुण्यातल्या हेल्मेटसक्तीबद्दल चालली आहे म्हणून पुण्यातले आकडे दिले. त्यामुळे उगाच हैद्राबाद किंवा बंगळुरुचे का नाही दिले म्हणून फाटे फोडू नका....

मी जन्मापासून पुणेकर आहे त्यामुळे पुणेकर फार शिस्तप्रिय आहेत वगैरे सांगायाला गेलात तर मला हसूच येईल...

सिग्नल तोडणार्‍यांबरोबरच रात्री कितीही उशीरा सिग्नल असताना एकट्याने सिग्नल पाळणारेही बरेच आहेत. उगाच दंडांच्या रकमा डकवून पुणेकरांवर ताशेरे कशाला ओढायचे?

सिग्नल पाळणाऱ्यांचे प्रमाण सध्या तरी १० मध्ये १ असेच असावे असे खेदाने म्हणावे लागत आहे. स्वत तर सिग्नल पाळत नाहीतच वर दुसऱ्यालाही पाळू देत नाहीत. कित्येक वेळा हिरवा दिवा पडायच्या आधीच कित्येकांना गाडी दामटवयाची असते (इंडिकेटर अजून १०-१५ सेकंद आहे हे दाखवत असतानाही) आणि त्यात कुणी थांबून राहत असेल तर त्याने मोठा गुन्हा केल्यासारखे कटाक्ष टाकतात किंवा कहर म्हणजे हॉर्न वाजून पुढे जायचा इशारा करतात...हे मीच कित्येक वेळेस अनुभवले आहे.

कधीकधी तर पिवळा दिवा लागत असताना ब्रेक दाबायची पण भिती वाटते. मागून येणारा सुसाट वाहनचालक लाल दिवा व्हायच्या आधी पसार होण्याच्या प्रयत्नात असतो आणि आपण ब्रेक दाबला तर आपल्याला धडकू शकतो हे काय फार अपवादात्मक चित्र नाही पुण्यात...

पार्किंगचा प्रश्न आहे मलाही मान्य आहे. पण जिथे पार्किंगची सोय आहे तिथे तरी नीट पार्क करतात का कुणी...गाड्या कशाही आडव्यातिडव्या...बाजूच्या गाडीवर पार रेलून...म्हणजे गाडी काढायची असेल तर किमान आजूबाजूच्या दोन-तीन गाड्या हलवल्याशिवाय काढता येणार नाही.

तेव्हा प्रशासन समर्थ नाही आहे हे म्हणा...पण म्हणून पुणेकरांच्या बेशिस्तीचे समर्थन करू नका...उद्या खरेच व्यवस्था सुधारली तर पुणेकर शिस्तीने वागतील अशी तुम्हाला आशा आहे....

आणि शिफारस करायची म्हणजे काय? ट्रॅफीकवाल्यांनी चौकाचौकात 'पथनाट्ये' करायची की प्रत्येक सिग्नलवर मोफत प्रत्येकी एक हेल्मेट वाटायचे >>>>>>>
काहीच करु नये. लोक मूर्ख नाहीत आणि प्रत्येकाला ठरवु दे. सरकार तसेही कोणाची काहीच काळजी घेत नाही तेंव्हा खोटा काळजीचा आव हे आणु नये.

इतकीच जनतेची चिंता असेल तर २ पेक्षा जास्त मुले नकोत ह्याची सक्ती करावी सरकार ने.

आत्महत्येचा प्रयत्न हा गुन्हा म्हणून नोंदवला जाऊ नये अशा प्रकारे कायद्यात बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणे. त्याच धर्तीवर शिरस्त्राणसक्ती करु नये असे म्हणणे असावे. Light 1

सिग्नल पाळणाऱ्यांचे प्रमाण सध्या तरी १० मध्ये १ असेच असावे असे खेदाने म्हणावे लागत आहे.>>>>>>
पोलिसांचे हात कोणी धरले आहेत नियम तोडणार्‍यांना पकडुन दंड करायला.
पोलिस कारवाई करत नाहीत म्हणुन नियम तोडणार्‍यांची संख्या जास्त आहे.
खरे तर सरकार साठी Profit center आहे. बजेट डेफिसीट कमी करता येइल बरेच

>>>तेव्हा प्रशासन समर्थ नाही आहे हे म्हणा...पण म्हणून पुणेकरांच्या बेशिस्तीचे समर्थन करू नका<<<

आधीच्या प्रतिसादातील ठळक केलेले विधान पुन्हा पेस्ट करत आहे ते एकदा वाचून बघा वेळ असल्यास!

>>>सिग्नल तोडणे, राँग पार्किंग ह्याचे येथे कोणीही समर्थन करत नाही आहे आणि घाईघाईने तसा समज करून घेऊन शाब्दिक हल्लकल्लोळ करू नये, कृपयाच! <<<

पुणेकर शिस्त पाळतात असले विधान मी धाग्यावर केलेले नाही. कैच्याकै लेबल लावू नका कृपया.

अहो मग वरती दिलेत ते आकडे कशाचे आहेत....दहा महिन्यात आठ कोटी रुपयांचा दंड.....
बरं हा ऑफिशियल आकडा...याच्या किमान दीडपटीने चिरीमिरी, तोडपाणी झालेले असणार हे निश्चित...

>>इतकीच जनतेची चिंता असेल तर २ पेक्षा जास्त मुले नकोत ह्याची सक्ती करावी सरकार ने.<<
कुटुंबनियोजनाबाबत सरकारने केलेले प्रबोधन पथनाट्य गाणी आठवली. विशेष करुन
आता पेटना माझी चूल गं चूल
आता नको हो नको नको हो चौथे मूल
नको हे चौथे मूल
हे गाण खेड्यात लोकप्रिय होत. सुंदरी, ताशा व संबळ या वाद्यांच्या तालावर हे वरातीत वाजवल जायच. तस एखाद हेल्मेटसक्ती प्रबोधनावर तयार करा.

बेफी इथे चर्चा पुण्यातल्या हेल्मेटसक्तीबद्दल चालली आहे म्हणून पुण्यातले आकडे दिले. त्यामुळे उगाच हैद्राबाद किंवा बंगळुरुचे का नाही दिले म्हणून फाटे फोडू नका....<<<

अहो हे फाटे नाही आहेत. फक्त पुणेकर फार नालायक असतात, ते कायदे पाळत नाहीत, पुण्यात काहीही अंमलबजावणी होत नाही हा जो सूर गेले दोन तीन दिवस काही बहाद्दरांनी लावलेला आहे त्यावरील विचारणा आहे ती.

हेल्मेट नसल्याने उर्वरीत भारतात कोणीच आजवर मेलेले नाही का? हेल्मेट असूनही मेला अशी एकही केस बाकीच्या शहरांमध्ये नाही का?

जरा समजून घेत चला! Biggrin

त्याचे काये, तुम्ही चांगली चर्चा करायला जाता, पण काही विद्वान समीक्षक मधेमधे उगाच मनोरंजन करत बसतात त्यामुळे वेळ जातो.

सक्ती करून ऐकायला काही आडमुठे पुणेकर तयार नाही आहेत तिथे शिफारस करून ऐकतील असे वाटत आहे का टोच्या आपल्याला.

सक्तीच्या विरोधात आठच्या आठ आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. हे सर्व आमदार मूर्ख पुणेकरांनी निवडून दिलेले मूर्ख आमदार आहेत असे वरील काही विद्वान समीक्षकांच्या सैलसर व रिकामटेकड्या ताशेर्‍यांमुळे वाटू लागले आहे. Proud

बरं बरं....:)

माझं एवढंच म्हणणं आहे की पुण्यातल्या वाहतूक व्यवस्थेला प्रशासन जितके जबाबदार आहे तितकेच पुणेकर देखील....त्यामुळे सुधरण्याची सुरुवात नक्की कुणी पहिल्यांदा करायची यावर गाडे अडलेले आहे.

अहो मग वरती दिलेत ते आकडे कशाचे आहेत....दहा महिन्यात आठ कोटी रुपयांचा दंड.....>>>>>

एक पावती १०० रुपयाची धरली.
पुण्यात २० लाख लोक जर दिवसात एकदा रस्त्यावर वहाने घेउन उतरतात असे समजले तर हे दंड होण्याचे हे प्रमाण फक्त ०.१३ % इतकेच आहे.
प्रत्येक पावती मागे १० वेळेला लाच खाल्ली असे समजले तरी फक्त १.३%. तुम्ही तर १० मधले ९ लोक नियम पाळत नाहीत असे म्हणता. मग खरे तर ८०० कोटी जमायला पाहीजे होते १० महीन्यात ( पावतीचे )

मग पोलिस झोपा काढतायत का?

>>>माझं एवढंच म्हणणं आहे की पुण्यातल्या वाहतूक व्यवस्थेला प्रशासन जितके जबाबदार आहे तितकेच पुणेकर देखील....त्यामुळे सुधरण्याची सुरुवात नक्की कुणी पहिल्यांदा करायची यावर गाडे अडलेले आहे.<<<

अनुमोदन आशूचँप!

सक्ती करून ऐकायला काही आडमुठे पुणेकर तयार नाही आहेत तिथे शिफारस करून ऐकतील असे वाटत आहे का टोच्या आपल्याला.
>>>>>
नसेल कोणाला ऐकायचे तर मरतील. माणसाला स्वताच्या मरणाचा अधिकार तरी असु नये का भारतात?
चांगले रस्ते, सज्जन राजकारणी, लाच न घेणारे अधिकारी, पिण्याचे पाणी ह्याचा अधिकार नाहीच आहे, कमीतकमी मरणाचा तरी असु देत.

आमदारांची काय इंटेशन्स असतात अशा गोष्टी करण्यामागची हेही तारणहारांना समजत नाही की 'कांगावा' करण्यातल्या एक्सपर्टीजचे प्रदर्शन सुरू आहे Rofl

हो तुमच्या आकडेवारीमुळे आता तसेच वाटू लागले आहे...
रात्रीचे हे जे ट्रॅफिक पोलिस घरी जाऊन झोपतात त्याऐवजी त्यांना शिफ्टमध्ये ड्यूटी लावली पाहिजे....

पुढच्या वर्षात अगदी आठशे नाही पण ८० कोटी दंड व्हायलाच हवा...

अच्छा तुम्हाला इच्छामरण असे म्हणायचे आहे का टोच्या!

त्यालाही भारताचा कायदा परवानगी देत नाही असे ऐकले आहे.... की नवीन कायदा झाला तसा Uhoh

चेतन तुमचे मारुती ओम्नी च्या सिटबेल्टचे अनुभव वाचुन मजा आली. १५ वर्ष ऑटोमोटीव्ह डीझाईनमधे काम करत असल्यामुल तर अजुनच मजा आली. तुमच्या माहीती साठी खालील मुद्दे
Ergonomics : Man machine relation.
1. Approach : Vehicle ingress & exit
2. Sitting posture : Seat arrangement , it's feel
3. Different operations : like changing gears , operating different switches
तुमच्या म्हणन्यानुसार जर सीट्बेल्ट प्रॉब्लेमेटीक आहे तर ओम्नी गाडी 2 , 3 या मुद्द्यांसाठी सर्टीफाय होऊ शकत नाही. प्रत्येक गाडीला अस सर्टीफीकेशन आवश्यक असत. सर्टीफिकेशनसाठी लागणारा डेटा कंपनीचे तज्ञ माणस जमा करतात , तज्ञ माणस अ‍ॅनलाईझ करतात. आणि अ‍ॅपृव्हल देणारे पण तज्ञ असतात.
कोणतीही गाडी ही ९५ % लोकांसाठी (शारीरक बांधा) डीझाईन केली जाते. जर तुम्ही ९५-१०० ह्या रेंज मधे असाल तर तुम्हाला गाडीचे काही फंक्श्नस रीडिझाईन / रीसर्ट्रीफाय करुन घ्यावे लागतात.

मारुती ओम्नी गाडीचे सीटबेल्टचे डिझाईन फॉल्टी असण्याची शक्यता फार फार फार कमी आहे. युझर मालफंक्शनिंगची शक्यता जास्त आहे.
माझा येक अनुभव : माझ्या पहिल्या जॉबवाली कंपनी २ चाकी गाड्यांचे स्विचेस बनवायची. येका कस्टमरने कंपनीकडे गाडीचे स्विचेस अत्यंत थर्डक्लास असल्याची कंप्लेंट केली. ते स्विच मी बनवलेल होत म्हनुन मला त्या कस्टमरला भेटायला सांगितले गेल. तर ते कस्टमर भाजीवाले काका होते जे दररोज सक्काळी सक्काळी मार्केटयार्ड मधुन भाज्यांच्या ३-४ पिशव्या प्र्तयेकी कमीत कमी १० किलोच्या त्यांच्या गाडीच्या हँडलला अडकऊन आणायचे. त्यात ईंडीकेटर लिव्हर तुटायच. स्विच व्हर्टीकल ०.८ किलो आणि लॅटरल २.२ किलो लोडला डिझाईन केल जात. मालफंक्शनींग काका करायचे , त्याला २०-२० किलो लटकावायचे आणि शिव्या आमच्या डीझाईनला द्यायचे.

सुशांत मोठ्या मुश्किलीने चर्चेची गाडी पुन्हा पुणेकर आणि हेल्मेट यावर आली होती. आता पुन्हा चेतन गुगळे, ऑम्नी आणि ओडीशा प्रवास यावर जाईल....

तुम्ही पण ना... Happy

१. हेल्मेट हे सुरक्षेसाठीचे उत्तम साधन आहे हे प्रत्येक पुणेकराला माहीत आहे, मान्य आहे व तेच पुन्हा कोणी येऊन सांगण्याची अज्जिबात निकड नाही,

२. हेल्मेटची सक्ती केली जाऊ नये, शिफारस करण्याइतपत ठीक आहे, असा चर्चाप्रस्ताव मूळ धाग्यात आहे.
>>>>>>>>
हेल्मेट हे सुरक्षेसाठीचे उत्तम साधन आहे हे जर खरे आहे आणि ते आपणहून कोणी वापरत नसेल तर निदान सक्ती केल्याने तरी आपली सुरक्षितता वाढू शकते मग त्यात काय तोटा आहे?

हेल्मेट हे सुरक्षेसाठीचे उत्तम साधन आहे हे जर खरे आहे आणि ते आपणहून कोणी वापरत नसेल तर निदान सक्ती केल्याने तरी आपली सुरक्षितता वाढू शकते मग त्यात काय तोटा आहे?<<<

पहिल्या एक दोन पानांवर लिहिले आहे त्याबद्दल काहींनी!

Pages