हेल्मेटसक्ती

Submitted by प्रकाश घाटपांडे on 12 November, 2014 - 22:55

अव्यवहार्य तसेच कालबाह्य कायदे ही भ्रष्टाचाराची कुरणे निर्माण करतात. पुण्यात चालू झालेली हेल्मेट सक्ती चा नियम हे त्याचे एक उदाहरण आहे काही सेलिब्रिटी हेल्मेट जागृती साठी प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे होणार्‍या सुरक्षिततेबाबत प्रबोधन करणे अयोग्य नाही. पण विरोध आहे तो सक्तीला आहे हेल्मेटला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हेल्मेट घातले नाही तर त्या व्यक्तिची सुरक्षितता धोक्यात येउ शकते पण वाहतुकीचे बाकी नियम पाळले नाही तर अन्य लोकांची सुरक्षितता धोक्यात येते. वाहतुक सुरक्षाव्यवस्था सांभाळताना वाहतूक नियमांच्या अंमलबजावणीचे प्राधान्यक्रम ठरवले पाहिजेत. ही हेल्मेट सक्ती खरोखरच वाहनचालकांच्या सुरक्षिततेच्या कळवळ्यापोटी आहे काय? कि यात हेल्मेट उत्पादकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत? रस्त्यावर होणारे अपघात हे हेल्मेट न घातल्यामुळे होतात काय? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. एखाद्या शहरात दरोडेखोरांचा धुमाकूळ असताना त्याकडे लक्ष न देता जर पोलिसांनी उचल्यांविरुद्ध मोहीम राबवली तर त्यांच्या हेतु विषयी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे. कुठलाही कायदा करताना त्याला काही वैधता असली पाहिजे. गरजे नुसार त्याचे नूतनीकरण झाले पाहिजे वा रद्द झाला पाहिजे. हेल्मेटची शिफारस करा पण सक्ती नको.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिम्ब्या लिम्ब्या लिम्ब्या, लेका बालिस्टर का नाही झालास रे !

वेल कम ब्याक ऑन मायबोली. तुझ्याशिवाय मजा नाय साला !

पोस्टबद्दल अभिनन्दन. इथल्या चार चाकीत बसून हेल्मेतवर कॉमेन्ट करणार्‍याना अशा पैजारांची आवश्यकता होतीच.ज्यांनी 'पास ' काढूनच ठेवलाय त्यांचा प्रश्नच नाय आपन आपले साध्या लोकांची काळजी वहावी काय?

या सगळ्या लफड्यात वेलणकर (सार्वजनिक ) काका कुठे दिसत नाहीत ? ::अओ:

limbutimbu +१
सक्ती हवीच...लाथों के भूत बातों से नाही मानते हे बाकी कुठल्या शहरांइतकेच पुण्यालाही लागू आहे...>> + १

दुर्योधन,
हे आधीच लिहायला हवे होते. लोकांना हे का कळत नाही की अचानक एखादा चांगला आयडी हेक्मेट व सीट्बेल्ट नलावल्यामुळे इथुन गायब न होण्यासाठी चाललय हे सगळं. Happy

एकूण असे दिसतेय कि पुण्यातील लोकांच्या विरोधाला कुत्राही भीक घालत नाही. मुळात पुण्यातले लोक विरोध करतात का कुठल्या गोष्टीला ........... अजिबात नाही...................
तुम्ही पेट्रोल किंमती वाढवा ... आम्ही जास्त पैसे देउन खरेदी करु,
तुम्ही टोल चालू करा .... आम्ही भरु ,सुविधा द्या किंवा देऊ नका
तुम्ही एलबीटी भरायला सांगा ... आम्ही भरु
तुम्ही डोंगरावर बिल्डींग बांधा .., आम्ही पाहत बसू
तुम्ही खड्डे बूजवू नका ... तरीही आम्ही घराचा कर भरु, वाहन कर भरु
तुम्ही हेल्मेट घालायला सांगा ............ आम्ही घालणार नाही आता पुणेरी वृत्ती कशाला सोडायची

पुण्यात कितीही सक्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रयत्न केला तरी ती १०० % यशस्वी होणार नाही , पुणेकर ती करुन देणार नाही. आजही विनाहेल्मेट गाडी चालविणा-यांची संख्या जास्त आहे ( कुणाकुणाला किती वेळा पकडणार )

पुन्हा सांगावेसे वाटते हा धागा सक्तीबाबत आहे, ज्याला डोक नाही त्याने घालावे हेल्मेट आणि फिरावे , ज्यांना आहे त्यांना वेगळे घेवून मिरवायची गरज ती काय ?

हेल्मेट घालावे कि अजून काही ही बाब व्ययक्तिक इच्छेची असावी ते घातलेच पाहिजे हे पुर्णता चूकीचेच . त्याचे समर्थन करणे तेही चूकीचेच , मी घालतो मला त्रास होत नाही मग सर्वांनी घातले पाहिजे असा हट्ट कशासाठी.

>>>> ज्यांनी 'पास ' काढूनच ठेवलाय त्यांचा प्रश्नच नाय <<<<
हूडा, हे पासचे प्रकरण म्हणजे "वैकुंठ स्मशानभूमीचा पास" असे म्हणायचे आहे का तुला? Lol Proud
हे असेच चालू राहिले तर ती सोयही करावीच लागेल, नै का? म्हणजे डोके फुटून कपाळमोक्ष होऊन गचकला रस्त्यावर की खिशातल्या ड्रायव्हिंग लायसेन्स बरोबर जोडलेल्या पासाचा वापर करून डायरेक्ट वैकुंठातच न्यायचा..... हा. का. ना. का.

नशिब आपले, बर का, ड्रायव्हिंग लायसेन्सची सक्ती कशाला करता म्हणुन इथे कुणि आग पाखडत नाहीये...
आम्हाला येतेच की चालविता, मग हवे कशाला लायसन्स? अन हवी कशाला वयोमर्यादा? ... येतील येतील, असेही प्रतिपादन करणारे येतिलच...

पुणेकरांनी पुण्याच्या वेशीलगत असलेले सर्व टोलनाके पूर्णपणे स्वीकारले. त्यांचा कधी विरोध केला नाही.>>> Rofl

या एकदा मोशीच्या टोलनाक्यावर. Happy

आतापर्यंत बरीच चर्चा झाली की.
काय निष्पन्न झाले का?

बा द वे, ह्याप्रकारच्या चर्चेत एका वेगळ्या साइटवर वेगळ्या अ‍ॅन्गलचा विचार आलेला.
तो इथे आलेला नाहिये म्हणुन लिहितो. अर्थात मुळ पोस्ट गविंचीच.
मी फक्त त्याचाच आशय लिहितोय.

समजा क्ष व्यक्ती कार चालवत आहे. य व्यक्तीने हॅल्मेट घातलेले नाहिये आणि ती दुचाकी कट मारत चालव्त असताना तिचा अंदाच्ज चुकल्याने म्हणा अथवा सिग्नल न पाळल्याने अथवा चुकीच्या बाजुने ओव्हरटेक करत असताना चारचाकीला धडकली आणि डोक्याला गंभीर दुखापत होउन गेली.
तर चारचाकीवाल्याची चुक असो वा नसो, सदोष मनुष्यवधाचा आरोप / खटला दाखल होइल.
तेच दुचाकी वाला हेल्मेटधारी असेल आणि इतर दुखापत होउन देखील वाचला तर कमी गंभीर खटला दाखल होइल.

झकोबा, तो पॉईंटही बरोबरच आहे....
च्यामारी हे दुचाकीवाले हेल्मेट न घालता गाडी कशीही चालवित चारचाकि समोर येऊन तडफडले अन काही झाले तर चारचाकीवाला "गाळात" जातो ना.....
पुण्यात बघितलय, आख्ख्या पीएम्टी समोर एका फुटावरुन क्लिनर साईड कडून आडवी गाडी घालतात.... गरज असेल तर पीएम्टीच्या ड्रायव्हरने ब्रेक मारावा अशी तर्‍हा...
अन यातल्या एकाही नरपुन्गवाला वा नारीपुन्गवीला मी "पुणेकर" म्हणणार नाही... ही सगळी पुण्यात बाहेरून आलेली लोक.... मूळचे पेठी पुणेकर कायदा देखिल "तत्वा" प्रमाणे पाळणार.... ते फारसे शिल्लकच राहिले नाहीयेत. ही मूळची पुणेकर नसलेली बाकीची भरताडच हेल्मेट नको म्हणून ओरड करीत असते असे माझे मत.

>>>> मित | 13 November, 2014 - 13:42
>>>> एखाद्या गोष्टीची सक्ती केली की "करत नाही जा !!! "म्हणणे ही पुणेरी प्रवृत्ती आहे
माफ करा, पण हा दोष पुणेरी नसून, इसवीसन १९२० नंतर "कायदेभंगाचे" व सरकारी नियम न पाळण्याचे खूळ लागले गेले, रक्तात मूरले, त्याचा आहे.

एखाद्या गोष्टीची सक्ती केली की "करत नाही जा !!! "म्हणणे ही पुणेरी प्रवृत्ती आहे
माफ करा, पण हा दोष पुणेरी नसून, इसवीसन १९२० नंतर "कायदेभंगाचे" व सरकारी नियम न पाळण्याचे खूळ लागले गेले, रक्तात मूरले, त्याचा आहे.>>>>>>>>> Happy

सकाळची बातमी:- पुण्यात सर्वात जास्त अपघातग्रस्त दुचाकीधारक. अरे चावट्ट लोकानो वापरा की हेल्मेट. कारण पटना मला हेल्मेट न वापरण्याची.:अओ:

अरे पण घाला की हेल्मेट. अगदी गाडीवर बसल्यावर घाला आणि उतरल्या उतरल्या काढा, पण घाला. वेळ काही सांगून येत नाही.

सगळे नियम पाळूनही अपघात व्हायचा असेल तर होतोच पण निदान आपण आपल्याकडून काळजी घेतलेली बरी.

पुण्यात सर्वात जास्त अपघातग्रस्त दुचाकीधारक. अरे चावट्ट लोकानो वापरा की हेल्मेट. कारण पटना मला हेल्मेट न वापरण्याची>>>>>>

त्यात विषेश काय? आख्या भारतात सर्वात जास्त दुचाकी धारक ( जे रत्यावर दुचाकी रोज वापरतात ) पुण्यातच आहेत. मग अपघात्ग्रस्त पण पुण्यातच जास्त असणार.

आमचे डोके आणि आम्ही, काय करायचे ते करु. ह्या सरकारला आमच्या जगण्या मरण्याचे काही पडले आहे का? पैसे खायला मिळावे म्हणुन सगळी तडफड चालली आहे.
कीती खाणार आहात पैसे, आणि काय वर घेउन जाणार आहात का?

पूर्वी आम्ही सायकलने फिरायचो पुण्यात. पुणे तेव्हा सायकलिंचे शहर होते.
तर तेव्हा आमच्या खिशात दमडा नसायचा.... सायकलवरून फिरणारा असे कितीकसे पैशे बरोबर बाळगणार?
तर नियमभन्गाबद्दल दंड नको असेल, तर हवालदार सरळ सायकलची हवा सोडून द्यायचा, एखादा जास्तच खडूस असेल तर व्हॉल्वट्यूबही जप्त करायचा... मग तो दहा पन्धरा पैशांचा भुर्दंड पडायचा. काही सायकलमार्ट मधे हातपंप असायचा तिथे स्वतःच पंप मारुन हवा भरली तर दुकानदार पैशे घ्यायचा नाही, म्हणून दंड तर् व्हायला हवा म्हणून व्हॉल्वट्यूब काधून टाकणे हा उपाय.
तर माझे काय म्हणणे आहे की आताच्या सायकलवरून बाईक/स्कुटरवर आलेल्या हल्लीच्या तरुणाईची अवस्थाही आमच्या वेळच्या सायकलस्वारांसारखीच "कडकीची" असणार, हे समजुन घेऊन मायबाप सरकारने हवालदारान्नी दंडाची पावती ठोकण्या ऐवजी सरळ दुचाकीची हवाच काढली तर नाही का चालणार? Proud
किन्वा हेल्मेट नसेल तर अमुक इतके अंतर गाडी हातातूनच न्यायची सक्ती? Lol
किन्वा भर रस्त्यावरच कान पकडून २० उठाबशा काढण्याची शिक्षा? Wink मी एकदा काढल्यात बर्का उठाबशा जेव्हा मी सायकलने फिरायचो अन हवालदाराने पकडले तेव्हा.... दोन तिन उठाबशातच सोडून दिले होते मला तेव्हा... लहान होतो खूपच.. !

पुण्यात हेल्मेट सक्ती झालीच तर सर्वात जास्त पैसे ट्राफीक पोलीस कमवतील यात शंका नाही , चौकात उभे रहायचे बकरा पकडायचा, नियमांची आणि कायद्याची भीती दाखवून हजारो चा दंड होऊ शकतो असे भासवायचे आणि दे १००-२०० म्हणून मिटवायचे. ( तुम्ही कितीही सज्जन किंवा भ्रष्टाचाराला विरोध करणारे असला तरी १००० आणि २०० तला फरक त्यांचे खिसे भरायला पुरेसा आहे)
हेल्मेट वापरायला अजिबात विरोध नाही पण सक्तीला आहेच.

घालतो की, पण एखाददिवशी नसेल घातले तर दंड ठोठावू नका ना! +१

काही प्रसंग लक्षात घ्या ...........
१) तुम्ही लक्ष्मी रोडवर आलात क्ष दुकानासमोर पार्कींग नाही म्हणून डोक्यावरचे जड ओझे आणि बॅग वगैरे आपल्या मित्राकडे देवून गाडी पार्क करण्यासाठी पुढे चालला आहात आणि ट्राफीकवाल्याने पकडले तर तो तुमचे ऐकणार आहे काय ? मग दंड फाडा.

२) तुम्ही जेथे काम करता तेथून चहा पिण्यासाठी साधारण २०० मी अंतरावर चालला आहात (जेथे अजिबात ट्राफीक नाही असेल तरी किरकोळ, हेल्मेट घालणार का ?

३) स्थळ - भाजी मंडई, लोकांच्या गलबल्यात गाडीचा वेग १५ सुद्धा नाही तरीही डोक्यावर हेल्मेट पाहिजे का ?

हेल्मेट वापरण्याबाबत जागरुकता निर्माण करण्याऐवजी सक्ती करणे खरच आवश्यक आहे का . आणखी काही उपाय करता येतील का ?
जसे... पुण्यात सीएनजी चा वापर वाढलाय हे काय सक्ती केली म्हणून काय, पेट्रोल आणि सीएनजी च्या दरातील फरक नागरिकांना स्वत:हून सीएनजी वापरण्यास भाग पाडतोय परिणामी पर्यावरणाचा विचार होतोय.
प्रथम सरकारने स्वस्त आणि मजबूत ( सुरक्षेच्या सर्व चाचण्यात उतरणारे) हेल्मेटची दुकाने उघडावीत मग काय तो शहाणपणा करावा -सक्तीचा.

अश्विनी के राहुद्या समजलय सगळ्यांना मला तर दाट शंका आहे उगाच ते उंदरांना ट्रॅप करतात तसे हेल्मेट्सक्तीच्या विरोधात बोलुन आपल्याला ट्रॅप करत आहेत. Proud Happy

ठोकण्या ऐवजी सरळ दुचाकीची हवाच काढली तर नाही का चालणार? फिदीफिदी
किन्वा हेल्मेट नसेल तर अमुक इतके अंतर गाडी हातातूनच न्यायची सक्ती? हाहा
किन्वा भर रस्त्यावरच कान पकडून २० उठाबशा काढण्याची शिक्षा? डोळा मारा +१ Lol त्यातनही जर का मागे बायको(हो बायकोच ,ग-फ्रेन्ड वगैरे आपण मानत नाय)असेल तर काय होईल? Proud

>>>> पुण्यात हेल्मेट सक्ती झालीच तर सर्वात जास्त पैसे ट्राफीक पोलीस कमवतील यात शंका नाही , चौकात उभे रहायचे बकरा पकडायचा, नियमांची आणि कायद्याची भीती दाखवून हजारो चा दंड होऊ शकतो असे भासवायचे आणि दे १००-२०० म्हणून मिटवायचे. ( तुम्ही कितीही सज्जन किंवा भ्रष्टाचाराला विरोध करणारे असला तरी १००० आणि २०० तला फरक त्यांचे खिसे भरायला पुरेसा आहे) <<<<<
हेल्मेटसक्ति नव्हती तेव्हा ट्रॅफिक पोलिस असे करत नव्हते असे म्हणायचे आहे का तुम्हाला? अहो हेल्मेट घातलेले असले तरी अन्य अनेक तृटी अशा आहेत की ते १००/२०० द्यावेच लागतात हे नविन आहे का तुम्हाला? तेव्हा या बाबीचा संबंध हेल्मेटसक्तिशी जोडण्यात अर्थ नाही. फार फार तर इतके म्हणता येईल की त्यान्ना अजुन एक कारण मिळाले. उलट माझा अनुभव असा आहे की गेल्या दहा वर्षात मला दुचाकीवरून जाताना एकदाही पकडले गेले नाहीये, कारण एक... मी हेल्मेटधारी असतो, कारण दोन... माझा चेहरा शक्य तितका सौम्य/उर्मट नसलेला, गरीबगाय असा ठेवतो, व कारण तीन... माझे वय.... हे बघुन मला सहसा पोलिस अडवतच नाहीत, उलट समोरिल ट्रॅफिक हटवुन रस्ता करून देतात.... (जा बाबा धडपणे घरला, उगा इथे तडफडू नकोस पडून झडून.. असेही म्हणत असतील मनातल्या मनात Lol )

>>>> हेल्मेट वापरायला अजिबात विरोध नाही पण सक्तीला आहेच. <<<<< हे अमान्य. सक्ति हवीच. गेल्या दोनचार पिढ्यान्नी इंग्रजांविरुद्ध केलेल्या कायदेभंगाचे खूळ स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षानिही "पब्लिक" च्या डोक्यातून हटलेले नाही, तेव्हा सक्तिच हवी. (सक्तिविरुद्ध इथे बोम्बाबोम्ब करणारे तथाकथित सुशिक्षित परदेशात गेले की मात्र तिथल्या शिस्ती व कायदे कसे सुतासारखे पाळतात ते बघणे मनोरंजक अस्ते... परदेशात राहूदे, साधे कोणत्याही शहराच्या "कन्टोन्मेन्ट हद्दीतील मिलिटरी पोलिसासमोरुन" जाउन बघा... मिलिटरी एरियात हेल्मेट सक्ति कसोशीने पाळली जातेच जाते.. तिथे कसे सुतासारखे सरळ जातात? सगळी बोम्बाबोम्ब इकडे आपापल्या गल्यात.. ! )

>>>> १) तुम्ही लक्ष्मी रोडवर आलात क्ष दुकानासमोर पार्कींग नाही म्हणून डोक्यावरचे जड ओझे आणि बॅग वगैरे आपल्या मित्राकडे देवून गाडी पार्क करण्यासाठी पुढे चालला आहात आणि ट्राफीकवाल्याने पकडले तर तो तुमचे ऐकणार आहे काय ? मग दंड फाडा. <<<<< डोक्यावर जड ओझे? कसले? बॅग मित्राकडे द्यायचीच कशाला? दिली तर दिली, हेलेम्ट कशाला काढायचे? गाडी पार्क करेस्तोवर हेल्मेट काढायचेच का म्हणून?

>>>> २) तुम्ही जेथे काम करता तेथून चहा पिण्यासाठी साधारण २०० मी अंतरावर चालला आहात (जेथे अजिबात ट्राफीक नाही असेल तरी किरकोळ, हेल्मेट घालणार का ? <<<<< मूळात २०० मीटर अंतरावर जायला बाईक हवीच कशाला? पायी गेलात तर व्यायाम नाही होणार फुकटचा? अन विनाकारण पेट्रोल का जाळायचे? परकीय चलन वाचणार नाही का? समजा म्हणालात की आमचे (कष्टाच्या कमाईचे) पैसे, आम्ही काहीही करू, ठीके, पैसे तुमचे, तरी वर आलेत का? Lol अन पुण्यातील अशी कोणती किती कामाची ठिकाणे आहेत ज्याच्या पन्नास मीटर परिघाच्या आत चहाची सोय नाही? ठिकाणे सांगा... बाकी सर्व ठिकाणी पाचपन्चवीस मीटरच्या आतच, चहाची टपरी/पानपट्टी याची सोय आहेच. गावामधे तर चौकाचौकात मिठाईची दुकाने नि जोडीला औषधांची दुकाने आहेत. अन येवढीच चहाची तलफ रेग्युलरली येत असेल, अन सोय नसेल जवळपास तर थर्मास वापरा की...... हा.का. ना.का. त्यात.

>>>> ३) स्थळ - भाजी मंडई, लोकांच्या गलबल्यात गाडीचा वेग १५ सुद्धा नाही तरीही डोक्यावर हेल्मेट पाहिजे का ? <<<<< हो, हवय. कारण तुमचा वेग १५ की पन्नास हा प्रश्न नाही, मंडईपर्यंत पोहोचेस्तोवर वेग जास्त होता ना? मंडईजवळच रहात असाल तर गाडी हवीच कशाला गर्दी वाढवायला? अन तुमचे तुम्ही १५च्या वेगात पडाल / पडणारच नाही, / पडलो तरी लागणारच नाही या गृहितकाव्यतिरिक्त, दुसरी कोणती भरवेगात सुटलेली गाडी तुम्हाला धडकणार नाही कशावरून? मंडईतील मोकाट जनावरे तुम्हाला वेगात धडकणार नाहीत कशावरून? मंडईतील केळीच्या सालीवरून तुमच्या गाडीचे चाक आमनधपक्या घसरून तुम्ही पडणार नाहीत कशावरून?

मी जवळ वा लाम्ब, अंतर कितीही असले तरी गाडीवर बसायच्या आधी माझ्या डोक्यावर हेल्मेट घातलेलेच असते, व गाडी वरुन उतरुन गाडी स्टेंडला लावल्यावरच ते काढले तर काढतो, अन्यथा तसेच डोक्यावर ठेवून भेटीच्या ठिकाणी जातो (एटीएम वगळून, तिथे हातात घेतो). हे गेली कित्येक वर्शे करीत असूनही मला कसलीही अडचण आलेली नाही हेल्मेट वापराची.
माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तिकडे गाडी नाही, ते शक्यही नाही, पण प्रत्येक व्यक्तिच्या नावचे स्वतंत्र हेल्मेट आहे व ते वापरले जाते.

पुणेकरांनी पुण्याच्या वेशीलगत असलेले सर्व टोलनाके पूर्णपणे स्वीकारले. त्यांचा कधी विरोध केला नाही. कोल्हापूरमध्ये टोलनाक्यांच्या विरोधात अनेकदा अतिशय हिंसक प्रकार झाले. कोल्हापूरमधील टोलनाके हा नेहमीच एक वादग्रस्त विषय होऊन राहिला. मी कोल्हापूरला गेलो की आनंदाने दिवसाचा २० रुपये टोल एकदाच भरून मग दिवसभर कुठेही फिरतो. मला त्यात कमीपणा किंवा त्रासदायक असे काही वाटत नाही. जेथे खराब रस्ते आहेत तेथे कोल्हापूरचे कॉर्पोरेशन काही का करत नाही ह्यावरून मी टोलवाल्यांशी भांडत नाही. मग कोल्हापूरचे लोक तेथील टोलचा विरोध का करतात?

>> हेल्मेट घाला किंवा घालू नका . पण उगाच नाही त्या बातम्या पसरवू नका . कोल्हापूरात टोलला विरोध आहे तो शहरांतर्गत टोल वसूल करण्याबाबत . उद्या डेक्कनच्या चौकात रोज जाण्याबद्दल २० रू टोल द्यावा लागला ना तर अख्ख पुण ते टोल नाके जाळायला निघेल (अन ते बरोबरही असेल)
नाहीतर उद्या तुमच्या गल्लीच्या रस्त्यावर काल २ बुट्ट्या डांबर ओतायला १००० रू खर्च आला म्हणून प्र्त्येक जाणार्य्यने महिनाभर १० रू टोल द्या म्हणायला कमी करणार नाहीत Happy

>>>> त्यातनही जर का मागे बायको(हो बायकोच ,ग-फ्रेन्ड वगैरे आपण मानत नाय)असेल तर काय होईल? <<<< काय व्हायचय त्यात? दोघान्नाही जोडीने उठाबशा काढायला लावायच्या एकमेकांसमोर उभे करून.

हेल्मेट घाला किंवा घालू नका . पण उगाच नाही त्या बातम्या पसरवू नका . कोल्हापूरात टोलला विरोध आहे तो शहरांतर्गत टोल वसूल करण्याबाबत . उद्या डेक्कनच्या चौकात रोज जाण्याबद्दल २० रू टोल द्यावा लागला ना तर अख्ख पुण ते टोल नाके जाळायला निघेल (अन ते बरोबरही असेल)
नाहीतर उद्या तुमच्या गल्लीच्या रस्त्यावर काल २ बुट्ट्या डांबर ओतायला १००० रू खर्च आला म्हणून प्र्त्येक जाणार्य्यने महिनाभर १० रू टोल द्या म्हणायला कमी करणार नाहीत

+ १००

लिंबुभाऊ तुमच्या प्रत्येक पोस्टला प्रचंड अनुमोदन

कोल्हापूरात टोलला विरोध आहे तो शहरांतर्गत टोल वसूल करण्याबाबत . > बरोबर काहीजण सत्य न बघताच लिहितात

उठाबशा काढेल हो पण दुसरया दिवसापासुन नवरा एकतर हेल्मेट घालुन किंवा बसच्या लायनीत असेल. Happy आणि हेही पटलं नाही तर एकदा करुन पहावे असे.

आजच्या पिढीचे वाक्य : डोक्यावर पडला काय ?
पुढच्या पिढीचे वाक्य : हेल्मेटवर पडला काय ? Happy

>>>उगाच नाही त्या बातम्या पसरवू नका . कोल्हापूरात टोलला विरोध आहे तो शहरांतर्गत टोल वसूल करण्याबाबत <<<

कृपया प्रतिसाद नीट वाचून मत बनवत जावेत. कोल्हापूरात टोलला विरोध आहे इतकेच म्हणणे आहे. त्याची मीमांसा देणे हा त्या प्रतिसादाचा हेतूच नाही आहे. तुलना फक्त एका शहरवासीयांप्रमाणेच दुसर्‍या शहरवासीयांना आपापल्या शहरातले प्रश्न माहीत असतात ह्याची केलेली आहे. कोल्हापूरमध्ये टोल भरा नाहीतर भरू नका, त्याच्याशी काही घेणेदेणे नाही.

केदार, या प्रश्नाला अजुनही दुसरी बाजू आहे ती म्हणजे युति सरकारचे एक्स्प्रेसवे वेळचे मूळचे धोरण केवळ महत्वाच्या राज्य हमरस्त्यांबाबत व तेही नव्याने काही होत असेल तर करता होते. पण आघाडी कॉन्ग्रेसी सरकार आल्यावर त्यान्ना या अशा स्वरुपाच्या कामातून "जिझियाकरापेक्षाही" भयन्कर कर लादून बक्कळ कमाई करून आख्ख्या निवडणूकीचा "खर्चवेच" वजा जाऊनही भरपुर पैसा मिळू शकतो असे दिसल्याने अशा पैशाला चटावलेल्यान्नी राज्यहमरस्ते राहूद्याच, कोल्हापूर शहरान्तर्गत रस्तेही या कक्षेत आणले, त्याकरता कोणकोणत्या कायदेशीर पळवाटा वापरल्या व लांड्यालबाड्या केल्या तो स्वतंत्र विषय. अन एकदा टोल वर आधारीत रस्त्यांचे जाळे बिनबोभाट निर्माण करुन त्या त्या भागातील लोकप्रतिनिधींची(?) सोय होते म्हणल्यावर आख्ख्या महाराष्ट्रात हे जाळे उभे राहिले ते आघाडी सरकारच्या काळात, ज्याचे परिणामस्वरुप निवडणूकीच्या निकालात दिसले कारण तुम्ही काही काळ सर्वजणान्ना फसवू शकत असला तरी सर्वकाळ सर्वजणान्ना नाही फसवू शकत.
याचा दुसरा वाईट परिणाम असाही झाला वा केला गेला की रस्ते महामंडळ त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांकडे ढुंकुनही बघेना, व वाईट रस्त्यांची अवस्था वाईट होऊन ते टोलखाती जमा करायची वाट बघत बसले, अन तोवर साईड पट्ट्या/खड्डे बुजविणे/डागडुजी असल्या थिल्लर कामात उपलब्ध निधी जिरवित राहिले.
मला हे कळत नाहीये की या अशा प्रशासनावर नविन सरकार कशाप्रकारे नियंत्रण आणणार, त्यान्ना काबूत ठेवणार. लौकरच सरकारी कर्मचार्‍यांचा सम्प /आंदोलन वगैरे सुरू झाले तर मला नवल वाटणार नाही. असो.

कोल्हापूरच्या आंदोलनाने एक साध्य झाले की कोल्हापूर सोडल्यानंतर बाकी कोणत्या शहरात टोल वर आधारीत रस्ता करण्याचा दीडशहाणेपणा केला गेला नाही. (मुंबई अपवाद असेल कदाचित, पण तिथेही अन्य रस्त्यांचे पर्याय आहेत, तसे ते कोल्हापूरात नाहीत). कोल्हापूरच्या जनतेला नावे ठेवण्या आधी हा वरील विचारही करणे भाग आहे की त्या आंदोलनमुळेच पुण्याचे व अन्य शहरांचे रस्ते अजुनही टोलमुक्त आहेत, नाहीतर सरकारी पैशावर पडलेली ही आघाडी सरकारची टोळधाड तुम्हाला केव्हाच सफाचाट करून गेली असती....! त्यामुळे कोल्हापूरकरांचे बाकी शहरांनी आभारच मानले पाहिजेत, असे माझे मत.

Pages